"झेंडूची फुले" परंपरा

प्रा सुरेश खेडकर's picture
प्रा सुरेश खेडकर in काथ्याकूट
18 Mar 2008 - 11:55 pm
गाभा: 

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)यांचा "झेंडूची फुले" हा विडंबन काव्य संग्रह १९२५ साली प्रकाशित झाला.त्यानंतर अनेक कवींनी विडंबन कविता लिहिल्या आहेत.प्राचार्य राम डोके यांच्या "शतकातील विडंबन काव्य" ह्या पुस्तकात त्यापैकी काहींचा परामर्श घेण्यात आला आहे. "झेंडूची फुले" नंतर फारच मोजके विडंबन काव्य संग्रह आजपर्यंत प्रकाशित झाले आहेत.विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा. विडंबन काव्याची नुसती आवड असेल तरीही ही कम्युनिटी जॉईन करा व आपल्या मित्रांना सांगा.विडंबन काव्य संग्रहांची माहिती पाठवा.
Click here & join
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095
प्रा.(इं)सुरेश खेडकर ( नागपूर)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Mar 2008 - 6:11 am | विसोबा खेचर

विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा. विडंबन काव्याची नुसती आवड असेल तरीही ही कम्युनिटी जॉईन करा व आपल्या मित्रांना सांगा.विडंबन काव्य संग्रहांची माहिती पाठवा.

ऑर्कुटचे एजंट प्राध्यापक खेडकरसाहेब,

मिपावर देखील मंडळी विडंबने लिहीत आहेत. ज्या प्रमाणे आपण 'ऑर्कुटवरील समूहावर विडंबने लिहा' असं मिपावर येऊन सांगताय, त्याचप्रमाणे 'मिपावर येऊन विडंबने लिहा' असं ऑर्कुटवरील त्या कम्युनिटीवर जाऊनही सांगताय का?

असो, मिपाला काहीच वर्ज्य नाही. इथे येऊन कुणीही कुठलीही जाहिरात करावी!

तात्या.

प्रा सुरेश खेडकर's picture

19 Mar 2008 - 2:07 pm | प्रा सुरेश खेडकर

असो, मिपाला काहीच वर्ज्य नाही. इथे येऊन कुणीही कुठलीही जाहिरात करावी!

तात्या.

असे जर आहे तर आपल्या " ऑर्कुटचे एजंट प्राध्यापक खेडकरसाहेब," अशा

उपरोधक व तिरकस शब्दातील प्रतिक्रियेचे प्रयोजन काय? शेवटी आपले विचार जास्त्तीत जास्त लोकापर्यंत ( ऑरकुटसकट) सर्व विधायक मार्गंनी पोहोचावे असे प्रत्येकाला वाटणे सहाजिक नाही का? श्री. अविनाश ओगले यांनी ऑर्कुटवरील "झेंडूची फुले" परंपरा या समूहावर "मिसळ पाव" ची माहिती दिली तेव्हा मला पहिल्यांदा मिपा बद्दल कळले व मी इथे आलो. आपला आकस कशाबद्दल आहे ते स्पष्ट होत नाही. असो.

इनोबा म्हणे's picture

19 Mar 2008 - 2:32 pm | इनोबा म्हणे

विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा. विडंबन काव्याची नुसती आवड असेल तरीही ही कम्युनिटी जॉईन करा व आपल्या मित्रांना सांगा.विडंबन काव्य संग्रहांची माहिती पाठवा.
हे इथेही करता येण्यासारखे आहे.असो.
तुमच्या 'झेंडूची फूले' या कम्युनिटीचा मी फार पुर्वीपासून सदस्य आहे. दर दोन-तीन दिवसाला कुठल्या ना कुठल्या जाहिराती (कम्युनिटी अथवा आपल्या कार्यक्रमासंबंधीत)माझ्या मॅसेज बॉक्समधे जमा होत असतात,तेव्हा जाहिरातींचा जोर थोडा कमी असायला हवा असे माझे प्रमाणिक(आणि वैयक्तीक) मत आहे.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्रा सुरेश खेडकर's picture

19 Mar 2008 - 4:45 pm | प्रा सुरेश खेडकर

विसोबा खेचर यांना : ऑरकुट वर मी गेल्या दोन वर्षापासून तर मिपा वर जेमतेम २ महिन्यापासून आहे. त्यामुळे इथले रिती रीवाज आणि Who is who अजून नीट माहित नाहीत , तरी क्षमस्व. ऑरकुट वर मी मिपा चा प्रसार ( मी त्याला जाहिरात म्हणणार नाही) जरूर व लगेच करेन. श्री. अविनाश ओगले यांनी ऑर्कुटवरील माझ्या "झेंडूची फुले परंपरा " या समूहावरच "मिसळ पाव" ची माहिती दिली तेव्हा मला पहिल्यांदा मिपा बद्दल कळले व मी इथे आलो.
======================================================
इनोबा म्हणे यांना: तुम्ही माझ्या ऑरकुट वरील 'झेंडूची फूले' या कम्युनिटी चे फार पुर्वीपासून सदस्य आहात हे कळून अतिशय आनंद झाला ,पण तुम्ही इथे याआधी ओळख दिली असतीत तर जास्त आनंद झाला असता.. "दर दोन-तीन दिवसाला कुठल्या ना कुठल्या जाहिराती (कम्युनिटी अथवा आपल्या कार्यक्रमासंबंधीत)माझ्या मॅसेज बॉक्समधे जमा होत असतात,तेव्हा जाहिरातींचा जोर थोडा कमी असायला हवा असे माझे प्रमाणिक(आणि वैयक्तीक) मत आहे." ह्या आपल्या मताशी मी सहमत आहे. आपल्याला झालेल्या त्रासा बद्दल दिलगिर आहे.आपण नीट लक्षात घेतले तर असे दिसेल की ती जुनी गोष्ट असून गेल्या ३/४ महिन्यात सर्व सभासदांना ग्रूप मेसेज करणे मी जवळ जवळ बंद केले आहे. कारण आता सदस्य संख्या ५३० म्हणजे पुष्कळ बरी झाली आहे व ती प्रसाराशिवाय ( मी जाहिरात म्हणणार नाही) वाढत आहे. झाड/ मूल लहान असते तेव्हा जास्त निगा राखावी लागते तसे. माझ्या बरोबर एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या अनेक समुहांची सदस्य संख्या १०च्या वर जाऊ शकलेली नाही हे आपण पाहू शकता.
तसे जाहिरातेत एवढे वाईट काय आहे? आजच्या बदललेल्या युगात जाहिरात केल्याने माती पण विकल्या जाते पण जाहिरातीशिवाय सोने पण विकणे कठीण झाले आहे. " आपली आपण करी स्तुती ..... " ही समर्थांची उक्ती लक्षात ठेवल्या मुळे मराठी माणूस मागे पडतो आहे.
"हे इथेही करता येण्यासारखे आहे." जरूर . कोणी नाही म्हटले? दोन्ही कडे झाले तर काय नुकसान आहे हे कळले नाही.

विसोबा खेचर's picture

19 Mar 2008 - 5:06 pm | विसोबा खेचर

प्राध्यापक साहेब,

खुलाश्याबद्दल धन्यवाद...

जास्त-कमी शब्दाबद्दल माफी असावी..

आपला,
तात्या.

प्रा सुरेश खेडकर's picture

19 Mar 2008 - 10:27 pm | प्रा सुरेश खेडकर

"ऑरकुट वर मी मिपा चा प्रसार ( मी त्याला जाहिरात म्हणणार नाही) जरूर व लगेच करेन. "ह्या माझ्या वचना प्रमाणे ऑरकुट वर "मिसळ पाव" चा प्रसार करीत आहे. कृपया ही लिंक पहावी. धन्यवाद.
http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2589676827082582914&...
पण "मिसळ पाव" ला जाहिरातीची ( तुमच्या आगाऊपणाची) जरूर नाही असे म्हणून कोणी नाराज झाल्यास मी काय करावे असा विचार मनात येवून गेला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2008 - 11:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण "मिसळ पाव" ला जाहिरातीची ( तुमच्या आगाऊपणाची) जरूर नाही असे म्हणून कोणी नाराज झाल्यास मी काय करावे असा विचार मनात येवून गेला.

कोणताही विचार आपल्या मनात येऊ देऊ नका. मिपाची जाहिरात ऑर्कुट वर करत राहा, आम्हीही एखादा स्क्रॅप खरडू तिथे :)