श्वानराजाधिराज

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
18 Mar 2008 - 9:07 am

pashmina

लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली
आहे. त्यांना पश्मीना हे नाव देण्यात आले आहे. हे कुत्रे अतिशय लढवय्ये असून त्यांची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा उत्तम आहे. मात्र ते महाग आहेत.

पण मूळ कुत्रे ज्यांचा संकर करून ही जात निर्माण केली गेली ते धनगर कुत्र्यांमधून शोधून काढण्यात आले होते. मूळातच धनगरांसोबत असलेले कुत्रे लढाऊ, तीक्ष्ण कानाचे, भेदक नजरेचे आणि धैर्यशाली असतात. ते प्रसंगी एकटे वाघावर पण चालून जातात.

मी परळच्या बैलघोडा रुग्णालयात कुत्र्यांवरच्या एका कार्यशाळेला गेले होते. तिथे असे ऐकले की हे धनगर लोक कुत्रे नखे तपासून, कानाचा आकार वैगरे पाहून कुत्रा निवडतात. एकदा पिल्लू पाळायचे ठरवले की एक मोठ्ठा खड्डा खणतात (हौदासारखा). त्यात त्या पिल्लाला ठेवतात आणि दिवसातून फक्त दोन- तीनदाच त्या कुत्र्याजवळ अन्न-पाणी ठेवायला आणि घाण साफ करायला त्याच्या जवळ जातात.

आता हे जे पिल्लु असते ते खड्ड्यात कंटाळते आणि कान देऊन मालक कधी येतोय त्याची वाट पाहाते. त्यामुळे जरा खुट्ट झाले की हे पिल्लू कान टवकारते. दुसरे म्हणजे, एकटेपणाची सवय होऊन ते आपोआपच माणूसघाणे बनते. तिसरे आणि महत्वाचे म्हणजे धनगरांच्या कळपात इतर कुत्र्यांबरोबर / माणसांसोबत राहून सुद्धा हा कुत्रा अन्नदात्याशी प्रामाणिक राहतो.

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

18 Mar 2008 - 10:41 am | धमाल मुलगा

अरे वा..माझ्या आवडीचा विषय :-)

माहिती आवडली. पण मी 'कारवानी' ला पस॑ती देतो. कारण, मुळातच कारवानी (कारवान हाउ॑ड) कुत्रे हे काटक, शेलाट्या बा॑ध्याचे, रागीट स्वभावाचे असतात. रोगप्रतिकारक शक्तीदेखील इतर इलायती जाती॑पेक्षा उत्तम असते. अगदी शिळ॑-पाक॑ सुध्दा खाऊन टुणटुणीत राहतात.

कारवानी॑चा आणखी एक 'प्लस पाइ॑ट' म्हणजे त्या॑चा चेहरा (तो॑ड). सतत हि॑स्त्र भाव असतात. गेटातून आत शिरताना अनोळखी माणूस असेल तर हे कुत्र॑ नुसत॑ समोर आल्याबरोबर बघणार्‍याची चड्डी ओली व्हायची वेळ येते. (अतिशयोक्ती नाही करत : पहिल्या॑दा आमच्याकडे आलेल्या एका मित्राची खर॑च झाली होती.)

तरीही, हे पश्मिना प्रकरण जरा 'इ॑टरेश्टी॑ग' वाटत॑य. बघायला पाहिजे एकदा.

सृष्टीताई, ह्याबद्दल आणखी माहिती कुठे मिळेल?
ब्रिडर्स, साधारण कि॑मत, त्या॑ची पथ्य॑-पाणी, आणि सर्वात महत्वाच॑ त्या॑ना कारवानी कि॑वा लॅब्रेडॉर / फ्रे॑च मॅस्टीफ सारखी अक्कल असते का? ट्रेनि॑ग दिल्यास ते व्यवस्थित शिकू शकतात का?

आपला,
- श्वानप्रेमी ध मा ल.

सृष्टीलावण्या's picture

19 Mar 2008 - 8:18 am | सृष्टीलावण्या

ट्रेनि॑ग दिल्यास ते व्यवस्थित शिकू शकतात का?

हो, ते खरे तर पोलीसी कुत्रे आहेत आणि पटकन शिकतात सुद्धा. मी ही जात प्रत्यक्ष पाहिली तेव्हा मला फार आवडली होती. त्यांच्याविषयी इंटरनेटवर फार कमी माहिती उपलब्ध आहे.

हे वाच :
http://www.hinduonnet.com/mag/2005/01/09/stories/2005010900860800.htm
http://pashmis.tripod.com/index.html

>
>
आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

इनोबा म्हणे's picture

19 Mar 2008 - 5:09 pm | इनोबा म्हणे

लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली
त्यानंतर त्याला मुंबईच्या लोकलमधे सोडलं असावं.गर्दीमधे चेपून लांबट झाल्यासारखं वाटतंय. लातूरमधेच राहीलं असतं तर,मोकळ्या वातावरणात चांगलं सुटलं असतं.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्राजु's picture

19 Mar 2008 - 8:15 am | प्राजु

अतिशय सुंदर माहिती सृष्टीताई...
खरं म्हणजे हे तुम्ही सांगितले इथे म्हणून नाहीतर या ब्रिड बद्दल समजलेच नसते. फोटोही चांगला आहे.
कुत्रे लढाऊ असणार हे नक्की.

- (सर्वव्यापी)प्राजु

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 Mar 2008 - 9:44 am | डॉ.प्रसाद दाढे

पश्मी ह्या जातीबद्दल पूर्वी ऐकले होते पण कधी पाह्यला नव्हता वा फोटोही पाहिला नव्हता. माझ्या मते विदेशी कुत्रे तब्येतीने थोडे नाजूक असतात व (भारतीय हवामानात) पावसाळ्यात वगैरे त्या॑ची विशेष काळजी घ्यावी लागते. एतद्देशीय कुत्रे जर एव्हढे देखणे असतील तर पाळायला काही हरकत नसावी. 'स्वदेशी अपनाओ!'

सृष्टीलावण्या's picture

19 Mar 2008 - 6:42 pm | सृष्टीलावण्या

खरेच. देशी वाणाचे एक छानच असते (ते पण रस्त्यावरून उचलून आणले असेल तर) सहसा आजारी पडायची भीती नाही आणि दुसरे म्हणजे त्यांना साध्या आजारांसाठी आजीबाईचा बटवा आणि इतर माणसांची औषधे लागू पडतात. पशुवैद्याकडे न्याच कशाला.

आमच्या एका ओळखीच्याने कुत्र्याला जंत झाल्यावर वावडिंगाचा काढा पाजला होता. जंताचा त्रास पूर्ण गेला. तो कुत्रा चांगलाच बलदंड झाला.

माझ्याकडे एक मांजराचे पिल्लु आहे त्याच्या एका डोळ्यातून सारखी पिवळी घाण बाहेर येत होती (पू नव्हता), त्याच्या डोळ्यात रोज २-३ दा Ciplox eye drops टाकले. आता डोळा छान आहे.

मी तर म्हणेन, कुत्रा आणि मांजर यांचे फाजील लाड करू नयेत आणि त्यांना सारखे डॉक्टरकडे पण नेऊ नये.

अवांतर: पाळीव प्राण्यांच्या जेवणात चिमूटभर मीठ घालायला विसरू नये असे प्राणी तज्ञांचे मत आहे.
>
>
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

तात्या विंचू's picture

19 Mar 2008 - 7:39 pm | तात्या विंचू

परवा Eight Below हा चित्रपट पाहिला...
दक्षिण धृवावरची ही कहाणी आहे. सर्व चित्रपट हा स्लेज गाडी ओढणर्या कुत्र्यांवर आधारित आहे.
दक्षिण धृवावर मोहिमेसाठी आलेल्या प्रोफेस्सोर्ला कुत्रे आनि त्यान्चा ट्रेनर बर्फातून वाचवतात. त्याला उप्चारांसाठी अमेरिकेत न्यावे लागते. तेव्हा पूर्ण बेस रिकामा कर्तात... ट्रेनरला वाटते की लगेच २-३ दिव्सात परत येता येइल त्यामुळे तो कुत्र्याना बरोबर घेत नाही..पण नंतर हवामान खराब झाल्याने कोणीही परत दक्षिण धृवावर जाउ शकत नाही. प्रायोजक मिळत नस्ल्याने ट्रेनर पण परत जाउ शकत नाही. अशा परिस्थितित सर्व कुत्रे कसे आनि किति दिवस दक्षिण धृवावर राहतात, एकमेकाना कसे सांभाळून घेतात,त्यांचा ट्रेनर त्यांना घ्यायला परत येतो का नाही
ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा चित्रपट नक्की बघा...
सुरेख फोटोग्राफी, कुत्र्यांचा सुंदर अभिनय ही या चित्रपटाची वैशिषट्ये आहेत...

हॉलिवूड्चे चित्रपट बेश्ट मानणारा-
तो मी नव्हेच

सुधीर कांदळकर's picture

19 Mar 2008 - 10:00 pm | सुधीर कांदळकर

मी पाहिला. अतिशय छान आहे.

पाहिल्यावर चौदा इंजेक्शने घ्यावी लागत नाही. मी कुत्र्याला घाबरतो. तरीहि पाहिला.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.