पतीच्या वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये पत्नीला काहीही हक्क नाही

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
18 Mar 2010 - 4:40 pm
गाभा: 

सध्या पती हयात असताना पतीच्या वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये पत्नीला काहीही हक्क नाही अशा अर्थाचा एक लेख आजच्या सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची लिंक सापडली नाही.

हा असा हक्क पत्नीला असावा की नसावा या वर मिसळपावाच्या सभासदांचे मत जाणून घेण्यास मी उत्सूक आहे.

-------------------------------------
हा घ्या दुवा
http://72.78.249.125/Sakal/18Mar2010/Enlarge/PuneCity/page7.htm
(प्रत्यक्ष वृत्तपत्र जसे दिसते त्या ई-पेपरच्या दुव्यावरती पान क्रमांक सात पहा.)
-संपादक

प्रतिक्रिया

II विकास II's picture

18 Mar 2010 - 4:49 pm | II विकास II

नसावा असे माझे मत आहे.

पति हयात अस्ताना पतिचा फक्त नावाला ह्क्क अस्तो सर्व ह्क्क पत्निचे स्वाधिन असतात त्या मुळॅ कायद्याचि चर्चा व्यर्थ

सुनील's picture

18 Mar 2010 - 5:06 pm | सुनील

सासर्‍याच्या वडिलोपार्जित इस्टेटीत जावयाला हक्क असतो का, हे जाणण्यास उत्सुक आहे!! ;)

(जर तुमचे वडील गरीब असतील तर ते तुमचे दुर्दैव. पण जर तुमचा सासरा गरीब असेल तर तो तुमचा मूर्खपणा, अशा आशयाची एक म्हण पूर्वी वाचल्यासे स्मरते! ) ;)

बाकी चालू द्यात...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

18 Mar 2010 - 5:08 pm | विसोबा खेचर

जोपर्यंत ती इस्टेट विकली जात नाही, तोपर्यंत पत्नीला हक्क नसावा..

ती इस्टेट विकायची किंवा नाही, हा अधिकारही पूर्णत: पतीकडेच असावा..

परंतु,

१) त्या इस्टेटतून जर काही उत्पन्न मिळत असेल (रोख भाडं वगैरे किंवा अन्य स्वरुपात) तर त्या उत्पन्नावर,

किंवा,

२) ती इस्टेट विकल्यावर त्यातून येणार्‍या पैशांवर मात्र पत्नीचा बरोबरीचा हक्क असावा..

-- न्यायमूर्ती तात्या अभ्यंकर.

विसोबा खेचर's picture

18 Mar 2010 - 5:25 pm | विसोबा खेचर

उपकलम..

परस्त्री सोबतची,

१) असभ्य प्रकाशचित्रं,
२) असभ्य फोन संभाषण/प्रेम-संवाद/उत्तेजक संवाद,
३) लिखित पत्र, एसएमएस, अथवा विरोपपत्र,

इत्यादी सबळ पुराव्यांद्वारे पती बाहेरख्याली आहे असे सिद्ध झाल्यास त्या इस्टेटीवर (विक्री होवो अथवा न होवो,) आणि त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर पत्नीचाही बरोबरीचा हक्क असावा.. :)

-- न्यायमूर्ती तात्या अभ्यंकर.

II विकास II's picture

18 Mar 2010 - 5:58 pm | II विकास II

.

पतीच्या लग्ना आधीच्या कमाई मध्ये देखील पत्नीचा हीस्सा नसतो. पतीच्या वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये देखील पत्नीला काहीही हक्क नसतो.

पतीचे चरित्र कसे आहे यावर पत्नीचा हीस्स्सा कीती हे ठरत नाही.

हे वाद टाळण्या साठी "Prenuptial Agreements" हा चांगला उपाय आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Mar 2010 - 5:13 pm | प्रकाश घाटपांडे

हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. ती पत्नी कोणाची तरी मुलगी असल्याने पित्याच्या वडिलोपार्जित इस्टेटीत भावांप्रमाणे तिला समान हक्क आहे ना?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

18 Mar 2010 - 5:31 pm | विसोबा खेचर

हो, आहे..

युयुत्सु's picture

18 Mar 2010 - 8:59 pm | युयुत्सु

हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे.

ही गुंतागुंत स्पष्ट झाली तर बरे होईल. समानता म्हणजे समान हक्क असे गृहित धरले तर जावयाला सासर्‍याच्या इस्टेटीत पण हक्क मिळायला हवा त्याचा विचार फक्त एकानेच केला आहे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Mar 2010 - 9:20 pm | प्रकाश घाटपांडे

समानता म्हणजे समान हक्क असे गृहित धरले तर जावयाला सासर्‍याच्या इस्टेटीत पण हक्क मिळायला हवा त्याचा विचार फक्त एकानेच केला आहे.

घरजावईच्या बाबतीत मध्ये असे होण्यास काहीच हरकत नसावी.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

पतीच्या वडीलोपार्जित मिळकतीत त्याच्या बहिणींचा ,भावांचा व त्याच्या आईचा कायदेशीर वाटा असतो. पत्नीला कसा काय मिळु शकेल?( जो पर्यंत तो हयात आहे तोपर्यंत)

वेताळ

विसोबा खेचर's picture

18 Mar 2010 - 5:31 pm | विसोबा खेचर

कृपया आमचा प्रतिसाद/निर्णय वाचावा! :)

वडिलार्जीत की वडिलोपार्जीत?
दोन्हीच्या बाबतीत नवर्‍याला त्याचा हक्क मिळाल्यानंतर त्या मिळकतीत निम्मा वाटा पत्नीला मिळावा....
पण नवरा - दिर - नणंद यांच्या बरोबरीने समान वाटा नसावा.....त्या वडिलाम्च्या अविवाहीत अपत्याचा शेअर विनाकारण विवाहित अपत्यापेक्षा कमी होइल.....
नवरा हयात नसेल तर नवर्‍याच्या वाट्याचा हक्क संपूर्ण मिळावा.

कवटी

विसोबा खेचर's picture

18 Mar 2010 - 5:30 pm | विसोबा खेचर

सहमत..

युयुत्सु's picture

18 Mar 2010 - 9:06 pm | युयुत्सु

एखाद्या व्यक्तीला जेवढे विवाहित मुलगे त्या प्रमाणात सुनांचा अधिकार निर्माण झाला तर भागाचा आकार कमी होत जाणार, हे कुणीही लक्षात घेताना दिसत नाही.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित,

काहीतरी नक्की होईल.

विसोबा खेचर's picture

18 Mar 2010 - 10:34 pm | विसोबा खेचर

एखाद्या व्यक्तीला जेवढे विवाहित मुलगे त्या प्रमाणात सुनांचा अधिकार निर्माण झाला तर भागाचा आकार कमी होत जाणार, हे कुणीही लक्षात घेताना दिसत नाही

सुनांचा अधिकार?

मूळ धागा हा बायकोच्या अधिकारांविषयी आहे, सुनांच्या नाही..

तात्या.

टारझन's picture

18 Mar 2010 - 11:01 pm | टारझन

कृपया आमचा प्रतिसाद/निर्णय वाचावा! :)

युयुत्सु's picture

19 Mar 2010 - 9:09 am | युयुत्सु

प्रत्येक पत्नी ही सून असतेच. फक्त Live-in relationship मधल्या सूनाना (बायकाना) हा अधिकार मिळाला तर मात्र हाहाकार उडेल. ३३ % आरक्षण मिळाल्यावर अशी तरतूद आली तर मला आश्चर्य वाटणार नाही.

हा अधिकार पत्नीला मिळावा या मताचा हिरीरीने पुरस्कार करणारे एक गोष्ट विसरतात ती अशी की एकदा आज जे इस्टेटीच्या लोभाने/आशेने किंवा लाजेकाजेस्तव ज्या बायका नवर्‍याचे किंवा सासुसासर्‍यांचे करतात त्यापण करणार नाहीत.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

नितिन थत्ते's picture

18 Mar 2010 - 10:48 pm | नितिन थत्ते

अहो, पत्नीला अधिकार असावा असे कुणीच म्हटलेले नाही. मग कसली काळजी?

नितिन थत्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Mar 2010 - 5:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा असा हक्क पत्नीला असावा की नसावा या वर मिसळपावाच्या सभासदांचे मत जाणून घेण्यास मी उत्सूक आहे.

मी पण उत्सुक आहे. झाडावर बसून पहात आहेच.

जर वडिलार्जित संपत्ती आई आणि मुलांमधे समान विभागली जात असेल, तर या इस्टेटीवरचं उत्पन्न हे पत्नी आणि पुरूषाची मुलं यांमधे विभागलं गेलं पाहिजे.

अदिती

नितिन थत्ते's picture

18 Mar 2010 - 6:01 pm | नितिन थत्ते

सध्या हक्क नाही हे बरोबर.

असला पाहिजे असे वाटत नाही.
वारसा हक्क हा वडिलोपार्जित इस्टेटीत असतो. प्रॉपर्टी सुनेच्या वडिलांची नसल्याने हक्क नसायला हवा.

१९९४ च्या सुधारणेनुसार (महाराष्ट्रात लागू) मुलीला वडिलांच्या इस्टेटीत वाटा मिळाला आहे. (विवाह जून १९९४ नंतर झालेला असल्यास).
परंतु पतीच्या पश्चात त्याच्या पत्नीला वाटा मिळतो. तो वडिलार्जित इस्टेटीत नसून पतीचा म्हणून जेवढा वाटा होता त्यापैकी मुलांचा वाटा सोडून पत्नीचा वाटा असतो.
म्हणजे २ मुले असतील तर पतीच्या पश्चात १/३ वाटा असतो.
(हे मिताक्षरा पद्धतीनुसार. दायभाग पद्धतीनुसार काय असते ते माहिती नाही)

नितिन थत्ते

समंजस's picture

18 Mar 2010 - 6:10 pm | समंजस

सहमत!

टारझन's picture

18 Mar 2010 - 6:06 pm | टारझन

बापाच्या पैशावर/संपत्तीवर जगणार्‍याच्या/ढुक ठेवणार्‍या पोरा/पोरींच्या जिंदगी वर थ्थ्थू !!! सुन बाई तर लै लांब राहिल्या !
येडझवा कायदा काही ही म्हनो

- कायदा मोडक

ईन्टरफेल's picture

18 Mar 2010 - 7:20 pm | ईन्टरफेल

टारझन साहेब आम्हि बि सहमत बर का ?

स्वातीदेव's picture

18 Mar 2010 - 11:17 pm | स्वातीदेव

कृपया कोणाला या लेखाची लिंक सापडल्यास द्याल का?

इंटरनेटस्नेही's picture

19 Mar 2010 - 1:08 am | इंटरनेटस्नेही

टारोबांन्शी सहमत. योग्य न्याय.

Pain's picture

19 Mar 2010 - 2:10 am | Pain

भारतामधे Prenuptial agreement ची काही तरतूद आहे का ?

युयुत्सु's picture

19 Mar 2010 - 2:53 pm | युयुत्सु

भारतामधे Prenuptial agreement ची काही तरतूद आहे का ?

माझ्या माहिती प्रमाणे उच्च्भ्रू समाजात असे Prenuptial agreement करण्या कडे कल वाढतो आहे. पण कोर्टात त्याला किंमत नाही. शिवाय हिंदू विवाहाच्या मूळ कल्पनेला त्याने धक्का बसेल. हिंदू विवाह हा संस्कार असतो, agreement हे त्याला कराराचे रुप देते.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

निमिष सोनार's picture

19 Mar 2010 - 8:51 am | निमिष सोनार

कोणत्याही कायद्यात "मुलगी-जावई" आणि "मुलगा-सून" यात निवडण्याची पाळी आली की मुलगीला प्रधान्य दिले जाते.

तसेच, मुलगा आणि जावई यात सुद्धा जावयालाच (कारण त्याला काही दिले की शेवटी मुलगीच सुखात राहील) अग्रक्रम दिला जातो.

म्हणजे कायदे हे स्त्रीकडूनच आहेत.

"पतीच्या वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये पत्नीला काहीही हक्क नाही " यात वरकरणी स्त्रीच्या विरोधात कायदा वाटत असला तरी त्याचे मूळ हे
"मुलगा (सून) यांना दुय्यम स्थान आणि मुलगी (जावई) यांना अग्रक्रम"
यातच दडले आहे.
मी वर मांडलेला दॄष्टिकोन थोडा वेगळा आहे. पण थोडा खोलवर विचार केल्यास ते लक्षात येईल.

या चर्चेशी साधर्म्य असलेल्या आणखी एका चर्चे साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा-
http://www.misalpav.com/node/10836

नितिन थत्ते's picture

19 Mar 2010 - 9:23 am | नितिन थत्ते

>>कोणत्याही कायद्यात "मुलगी-जावई" आणि "मुलगा-सून" यात निवडण्याची पाळी आली की मुलगीला प्रधान्य दिले जाते.

उदाहरणार्थ?

>>तसेच, मुलगा आणि जावई यात सुद्धा जावयालाच (कारण त्याला काही दिले की शेवटी मुलगीच सुखात राहील) अग्रक्रम दिला जातो.

हे काही घरांतून वैयक्तिक रीत्या होते. कायदा अशी अपेक्षा करीत नाही.

>>म्हणजे कायदे हे स्त्रीकडूनच आहेत.
कायद्यात मुलगी / मुलगा यांना समान अधिकार (महाराष्ट्रात - अविवाहित + १९९४ नंतर विवाह झालेल्या मुली) आहे. मुलीला अग्रक्रम कुठेही नाही. महाराष्ट्राबाहेरच्या मुलींना तो तरी अधिकार आहे की नाही माहिती नाही.
(अवांतरः २ वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यांची व्यवस्था लावण्याचा प्रसंग आला त्यावेळी जी कागदपत्रे / वारसांचे फॉर्म वगैरे पाहिले त्यात मुलगी ही वारस म्हणून दाखवलेली नव्हती. मुलाची विधवा मात्र होती :( )

>>"पतीच्या वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये पत्नीला काहीही हक्क नाही " यात वरकरणी स्त्रीच्या विरोधात कायदा वाटत...

इथे मिसळपाववर धागाप्रवर्तक सोडून कोणाला तसे वाटत आहे असे दिसत नाही.

>>मी वर मांडलेला दॄष्टिकोन थोडा वेगळा आहे

तो चुकीच्या गृहीतकांवर माहितीवर आधारलेला असावा.

नितिन थत्ते

अनामिका's picture

19 Mar 2010 - 8:19 pm | अनामिका

कोणत्याही कायद्यात "मुलगी-जावई" आणि "मुलगा-सून" यात निवडण्याची पाळी आली की मुलगीला प्रधान्य दिले जाते.
पण प्रत्येक जावई हा कुणाचा तरि मुलगा व प्रत्येक सून हि कुणाची तरि मुलगी असतेच .......असो नवर्‍याच्या वडिलोपार्जित मालमत्ते मधे पत्नीला हक्क नसावा ह्या मताशी सहमत.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।