गाथा इराणी

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
17 Mar 2010 - 7:43 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
परवाच पुण्यातून -पक्षी क्रॉसवर्ड मधून पुस्तक खरेदी झाली.
त्यात मीना प्रभु यांचे "गाथा इराणी " हे पुस्तक देखील खरेदी केले.
मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक(कंटेंट) अतिशय देखणे झाले आहे. नेहमीप्रमाणे मीना प्रभुंची लेखणी सुंदरच बरसलि आहेच.
परंतु वाचता वाचता असे लक्षात आले कि पुस्तकातील मधली बरीचशी पाने गायब आहेत.
काहि पानांचा क्रम वाट्टेल तसा आहे. कशाचा कशालाहि काही ताळमेळ नाही.
पुस्तकाची किंमत ३०० रुपये असल्याने चिडचिड झाली. क्रॉसवर्डवाल्याला फोन केला तर त्याने चक्क कानावर हात ठेवले.
एकदा विकलेले पुस्तक आम्ही बदलून देत नाहि. जे काय आहे ते तुम्ही थेट प्रकाशकांशी बोला.
आम्ही गुगलून दमलो परंतु मौज प्रकाशनाचा गिरगावातल्या पत्त्याखेरीज हाती जास्त काहि लागले नाही.
गिरगावात जाउन येउन खर्च व वेळ पकडता पुस्तक फारच महागात लागण्याची शक्यता आहे.
तर मंडळी , कुणाकडे मौज प्रकाशनाचा दुरभाष वा इमेल अ‍ॅड्रेस असल्यास तो हवा आहे.

(एक संतप्त पुणेकर) अभिज्ञ.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

17 Mar 2010 - 10:50 pm | चिरोटा

बिंग्,याहु,गूगल,MTNL वर शोधून दमलो. पोस्ट कार्डच पाठवावे लागेल असा विचार करताना आणि एकदा शोधावे म्हणून 'Mauj Prakashan Griha Phone" म्हणून शोधले. शेवटी एका लिंक मध्ये हा नंबर मिळाला-
Mouj Prakashan Griha,. Khatau Wadi, Goregaonkar Lane, Girgaum,. Mumbai - 400 004. Phone: 022 2387 1050
इंटरनेट येवून एवढी वर्षे झाली.पण मराठी प्रकाशकांची वेब साइटही नसावी ही लाजीरवाणी गोष्ट आहे.
मराठी प्रकाशकांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
भेंडी
P = NP

देवदत्त's picture

18 Mar 2010 - 12:39 am | देवदत्त

मला माहित असलेली माहिती (साल २००८ ची आहे):

मौज प्रकाशन गृह,
संजय भागवत,
खटाववाडी, गोरेगावकर लेन, गिरगाव,
मुंबई ४००००४

फो: (०२२) २३८७१०५०, २३८८६९७७, २३८७२४२६
विपत्रः mouj@vsnl.com

प्रमोद देव's picture

18 Mar 2010 - 9:47 am | प्रमोद देव

वरील दूध्वक्रमांकावर ’विकास भागवत’ ह्यांच्याशी बोलून पुण्यात त्यांचे कोण वितरक आहेत ह्याची चौकशी करून आणि संबंधित लोकांना पुस्तक बदलून देण्याचे आदेश देण्यास विनंती करावी.

भडकमकर मास्तर's picture

18 Mar 2010 - 1:14 am | भडकमकर मास्तर

या धाग्याचे शीर्षक फसवे आहे... पुस्तकाबद्दल माहिती मिळणार असे वाटले होते..

इराणसारख्या देशावरचे लेखणी बरसवणारे देखणे पुस्तक आपण विकत घेतल्यामुळे आपल्याला देवाने शिक्षा केलेली असावी...

अवांतर : कतारहून इराण किती लांब आहे?
नव्या मुंबईतून गिरगावएवढे दूर नसेल... :)

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Mar 2010 - 8:33 am | बिपिन कार्यकर्ते

जस्ट समुद्रात उडी मारायची... पोहत पोहत गेले तर ४-५ दिवसात येईल इराण...

बिपिन कार्यकर्ते

II विकास II's picture

18 Mar 2010 - 8:40 am | II विकास II

जस्ट समुद्रात उडी मारायची... पोहत पोहत गेले तर ४-५ दिवसात येईल इराण...
>>=))

कवटी's picture

18 Mar 2010 - 11:30 am | कवटी

मास्तरांशी सहमत... पुस्तकाबद्दल चांगली माहिती मिळेल या आशेचा धागा वाचून विचका झाला....
गुगलून येथे चांगली माहिती मिळाली.

अवांतरः प्रत्तेक वाक्य नविन ओळीत लिहून लेखाची लांबी वाढवायची स्टाईल बदला अता.
कवटी

Nile's picture

18 Mar 2010 - 2:15 am | Nile

प्रकटाआ

हुप्प्या's picture

18 Mar 2010 - 4:02 am | हुप्प्या

माझी तुम्हाला पूर्ण सहानुभूती आहे. पैसे पूर्ण देऊन असला गचाळ माल मिळाला की माझीही चिडचिड होते. ह्यात खरी जबाबदारी क्रॉसवर्डची आहे. त्यांनी ते पुस्तक परत घेऊन प्रकाशकाला दिले तर तो प्रकाशक चुपचाप दुसरे देईल. तुमच्या सारख्या वाचकाला हे प्रकाशक उडवून लावणे सहज शक्य आहे. क्रॉसवर्डसारख्या मातब्बराला इतके सहज उडवून लावणार नाहीत. आणि तुम्ही तुमचे पैसे क्रॉसवर्डला दिलेले असल्यामुळे खरे तर त्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या गिर्‍हाईकाला चोख माल मिळाला पाहिजे.

तुम्हाला क्रॉसवर्डचा कुणी उच्चपदस्थ अधिकारी वा मालक ह्यांचा पत्ता मिळवता आला तर आपले गार्‍हाणे त्यांना पाठवून बघा. गिर्‍हाईकांच्या त्रासाची थोडी चाड वाटत असेल तर ते काही करणे शक्य आहे. काऊंटरवरचे लोक दाद देणार नाहीत पण कदाचित वरचे लोक देतील.

II विकास II's picture

18 Mar 2010 - 8:41 am | II विकास II

मौजची पुण्यात शाखा नाही का?

सुनील's picture

18 Mar 2010 - 9:39 am | सुनील

असावी कारण मौजकार मूळचे पुण्याचे नसल्यामुळे त्यांच्या इतरत्र शाखा असण्यास अडचण नसावी!

"मौजेची छपाई" हा एकेकाळी मराठी पुस्तकविश्वात मानदंड मानला जात होता. त्यांच्याकडून इतका गलथानपणा अपेक्षित नव्हता.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

18 Mar 2010 - 9:54 am | चिरोटा

असावी कारण मौजकार मूळचे पुण्याचे नसल्यामुळे त्यांच्या इतरत्र शाखा असण्यास अडचण नसावी!

:))
मराठी प्रकाशक पुस्तकांवर स्वतःचे पत्ते त्रोटक का लिहितात हा प्रश्न मला लहानपणापासून पडायचा.
"अनमोल प्रकाशन्,अप्पा बळवंत चौक, पुणे-२"हा पत्ता अगदी पाठ झाला होता.हे अनमोलवाले 'नवनीत' वाल्यांचे स्पर्धक असायचे बहुतेक.
चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्तीपासून ते दहावी पर्यंतं. नवनीतवाल्यांचा पत्ता जरा त्यातल्या त्यात बरा होता-भवानी शंकर रोड्,दादर्-मुंबई-४०००२८."चार लाईन्स" ४/५ दूरध्वनी क्रमांक पण असायचे.धीरेन गाला का कोणीतरी मालक होते म्हणा.!!

P = NP

विजुभाऊ's picture

18 Mar 2010 - 10:07 am | विजुभाऊ

अहो निदान तेवढा तरी पत्ता आहे हे नशीब समजा
नुस्ते पुणे २ किंवा पुणे ३० असे दिले नाही हे काही कमी आहे का

झुळूक's picture

19 Mar 2010 - 2:04 pm | झुळूक

तुमचे पुस्तक बदलून देणे ही क्रॉसवर्डचीच जबाबदारी आहे.क्रॉसवर्डशीच सम्पर्क साधा.(कोणतं क्रॉसवर्ड- shop one च्या शेजारचे का? सेनापती बापट रोड)
ईथुन पुढे मात्र पुस्तक बघुनच घेत चला.पुणेकर फसवले जाणे थोडे गमतिचे वाटले मात्र!
एक पुणेकर!

मी-सौरभ's picture

20 Mar 2010 - 12:14 am | मी-सौरभ

थोडा जाउन दंगा करा तिथे , गुमान बदलून देतील

-----
सौरभ :)

पाषाणभेद's picture

20 Mar 2010 - 8:30 am | पाषाणभेद

इरान आरबस्तानातच हाय नवं? नाय तिथं तर आरबी घोडे लय भारी मिळत्यात. त्येच घेवून जावा कारसवरड मधी. नायच जमलं तर आमच्याकल्डे गावठी घोडे घेवून जावा.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

शुचि's picture

20 Mar 2010 - 2:22 am | शुचि

मला तर वाटतं प्रत्येक पुण्यातील मिपाकरानी जेव्हा कधी क्रॉसवर्ड मधे जाण्याचा प्रसंग येइल तेव्हा त्या मालकाला या पुस्तकाची उपरोधीक आठवण करून द्यावी .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

II विकास II's picture

20 Mar 2010 - 10:10 am | II विकास II

सोबत ह्या धाग्याचा संगणक छाप घेउन जा. आणि मोठ्याने वाचुन दाखवा, बाकी ग्राहकांपुढे