दि. १६ मार्च २०१० रोजी पहाटे ३:२८ मिनिटानी सायन मीन राशीत २५ अंश १२ मि. वर अमावस्या होत असून ती गोचर युरेनसच्या युतीत होत असल्याने बर्याच जणाना तीव्र शुभ अथवा तीव्र अशुभ फलदायी (+/- ५ दिवस) ठरेल.
ज्या व्यक्तींच्या जन्मपत्रिकेत अमावस्या शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो यांच्याशी युती, प्रतियुती, केंद्र इ. योग करते त्याना ती विशेष फलदायी ठरेल. खाली अशा प्रभावित व्यक्तींच्या जन्मतारखा खाली दिल्या असून ही अमावस्या, जन्मपत्रिकेतील शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचे रवी, चंद्र, लग्न, ख-मध्य यांच्याशी योग होत असल्यास जोरदार फलदायी ठरेल.
इंग्रजी मध्ये reform म्हणतात येईल अशा, किंवा तडकाफडकी घडणार्या अनपेक्षित शुभ अथवा अशुभ घटना युरेनस सक्रिय असताना घडतात. या घटना आयुष्यात मोठे बदल, उलथापालथ घडवतात. राज्यसभेत मांडले गेलेले स्त्री-आरक्षण विषयक विधेयक हि अशीच reform स्वरूपाची घटना आहे.
जन्म पत्रिकेतील शनी प्रभावित असलेल्या तारखा
२४ ऑगस्ट १९४३ ते २९ नोव्हे १९४३
७ मे १९४४ ते २९ मे १९४४
ऑक्टोबर १९४९ (सम्पूर्ण महिना)
१ एप्रिल ते २१ जुलै १९५०
मार्च - एप्रिल १९५८
१७ अप्रिल १९६६ ते १६ मे १९६६
४ सप्टेम्बर १९६६ ते २२ ऑक्टोबर १९६६
जानेवारी १९६७
१५ जुन १९७३ ते १३ जुलै १९७३
१३ नोव्हेम्बर १९७९ ते ५ मार्च १९८०
जन्म पत्रिकेतील युरेनस प्रभावित असलेल्या तारखा
५ ऑगस्ट १९४७ ते २९ नोव्हेम्बर १९४७
१७ मे १९४८ ते १ जुलै १९४८
४ फेब्रुवारी ते २१ मार्च १९४९
१२ सप्टेंबर १९६७ ते १२ ऑक्टोबर १९६७
२० मार्च १९६८ ते १५ ऑगस्ट १९६८
जन्म पत्रिकेतील नेपच्यून प्रभावित असलेल्या तारखा
सप्टेम्बर १९४०
एप्रिल ते ऑगस्ट १९४१
जन्म पत्रिकेतील प्लुटो प्रभावित असलेल्या तारखा
१ डिसेंबर १९६८ ते ३१ जाने १९६९
१४ सप्टेंबर १९६९ ते ३० सप्टेंबर १९७०
२० एप्रिल १९७१ ते १ ऑगस्ट १९७१
प्रतिक्रिया
10 Mar 2010 - 3:39 pm | बिपिन कार्यकर्ते
सुटलो...
बिपिन कार्यकर्ते
10 Mar 2010 - 4:20 pm | कुंदन
मागच्या वेळेला सुटलो म्हटले खरे , पण बेक्कार अडकलो होतो कामामध्ये.
बघु या वेळी काय होतेय.
10 Mar 2010 - 4:25 pm | घाशीराम कोतवाल १.२
बच्ची गय्यो बावा ! :S :S :T
10 Mar 2010 - 10:50 pm | आनंद घारे
१९८० च्या नंतर जन्माला आलेली सारी बालके आणि तरुण मंडळी सुटली आहेत! ही अमावास्या इतकी पार्श्यालिटी का करते आहे? तिचा धिक्कार असो.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
10 Mar 2010 - 3:46 pm | नितिन थत्ते
आरक्षण विधेयक ८ मार्च ला मांडले ते १६ ता च्या +/- ५ दिवसांत कुठे आहे?
नितिन थत्ते
10 Mar 2010 - 3:57 pm | युयुत्सु
+/- ५ दिवस ही अट व्यक्तींसाठी आहे. संदिग्धते बद्द्ल क्षमस्व!
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
10 Mar 2010 - 3:52 pm | हर्षद आनंदी
१९८० नंतर सुध्दा माणसे जन्मली की, त्यांचे ही सांगा..
फर्मास बेत आखतोय वीकांताला, त्यात अमावस्येचा बिब्बा नको :D
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
10 Mar 2010 - 4:18 pm | बिपिन कार्यकर्ते
व्यक्ती म्हणून बेत नका आखू... :D
बिपिन कार्यकर्ते
10 Mar 2010 - 4:20 pm | नितिन थत्ते
बरोबर. आय डी म्हणून बेत आखला तरी चालेल.
नितिन थत्ते
11 Mar 2010 - 7:57 am | विंजिनेर
किंवा संदिग्ध बेत आखा ;)
10 Mar 2010 - 5:08 pm | अस्मी
माझा तर तिथीने वाढदिवसच आहे....फाल्गुन अमावास्या :(
- मधुमती
11 Mar 2010 - 1:09 am | शुचि
कर्क राशीला कोणतीही अमवस्या लै ब्येकार बगा .... :P
तव जर जपून्शान आसा.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
11 Mar 2010 - 8:15 am | हर्षद आनंदी
अवसे-पुनवंच सोयर्सुतक आमी कवाच बासनात गुंडाळन्श्यानी ठिवलया..
आमी ईचारल तं अवसच्या पावन्यांसाटी येखादी हडल घावायचा चानस असता तर..
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
10 Mar 2010 - 5:11 pm | विसोबा खेचर
आमचा जन्मदिन २ जाने, ६९ जो वरील कालावधीत मोडतो आहे.. म्हणजे ते आम्हाला शुभ की अशुभ हे कृपया सांगावे..
तात्या.
10 Mar 2010 - 11:18 pm | शुचि
अय्या! तुम्ही कॅप्रीकॉर्न माझ्यासारखे?? तरीच स्मार्ट, डायनॅमिक , हुश्शार वगैरे वगैरे : )
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
10 Mar 2010 - 11:37 pm | विसोबा खेचर
वो तो हैईच! :)
10 Mar 2010 - 11:58 pm | टारझन
अय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्याआआआआ !!!! (इथे एक स्वतःभोवती पिंगा घेऊन छाणशी टाळी वाजवणारी स्मायली इमॅजिन करावी)
- (अय्या प्रेमी) इश्शोबा अय्यार
10 Mar 2010 - 5:17 pm | आशिष सुर्वे
अप्रेझल च्या येळेला कसले ओ अशुभ अशुभ संदेश पाठवताय??
भ्या वाटतं ना!!
:T
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
10 Mar 2010 - 5:20 pm | परिकथेतील राजकुमार
तेज्यायला दोन पेग लावुन आम्ही कुठल्याही अशुभ ग्रहाकडे बघितले की तो गपगुमान शुभ होउन जातो.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
10 Mar 2010 - 5:21 pm | युयुत्सु
मनस्तापदायक... :((
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
10 Mar 2010 - 5:33 pm | महेश हतोळकर
मनस्तापदायक. जातकाला की संपर्कात येणार्यांना?
11 Mar 2010 - 1:21 pm | जिन्क्स
विसोबाराव ला मनस्तापदायक...म्हणजे मंगेशपावसकर अजुन एक लेख टन्कणार मिसळपाव वर.
11 Mar 2010 - 6:18 pm | वाहीदा
=)) =)) =)) =)) =))
~ वाहीदा
10 Mar 2010 - 6:19 pm | मदनबाण
याच्यात काय माझी तारीख दिसत नाय बाँ...म्हणजी सुटलो !!! ;)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
10 Mar 2010 - 10:51 pm | नावातकायआहे
>>दि. १६ मार्च २०१० रोजी पहाटे ३:२८ मिनिटानी सायन मीन राशीत
सायनला प्रोब्लेम आहे 'कुर्ल्याला' नाही... :?
10 Mar 2010 - 11:07 pm | मेघवेडा
सायनला प्रोब्लेम आहे 'कुर्ल्याला' नाही...
=)) =))
साहेब .. प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आहे.. जागेच्या 'नावात काय आहे??' ;)
-- (सायन आणि कुर्ल्याच्या 'शीवे'वर राहणारा) मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
10 Mar 2010 - 11:01 pm | आनंद घारे
राज्यसभेत मांडले गेलेले स्त्री-आरक्षण विषयक विधेयक हि अशीच reform स्वरूपाची घटना आहे.
त्या विधेयकाबद्दल शनी, युरेनस, नेपच्यून, प्लूटो वगैरे पुराण पुरुषांचे काय मत आहे? ते त्याला पास होऊ देणार? त्यांच्या दरबारात महिला( नाचणार्या अप्सरा सोडून) होत्या का? की लालू, मुलायम, शरद यांच्या यादवीला हातभार लावणार? बिच्चारी अमावास्या! एकटीनेच त्या विधेयकाला निभावून नेणार की पुरुषप्रधान नवग्रहांवर (युरेनस, नेपचून प्लूटो धरून बारा)कावणार?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
11 Mar 2010 - 8:38 am | प्रकाश घाटपांडे
प्लुटोला डिसमिस केला ना? बाकी ग्रहांनी बी आपल्यातला वाटेकरी कमी झाल्याचे समाधान व्यक्त केले होते.
बाकी विधेयकाची कुंडली बाबत आमचे भाकीत असे की हे विधेयक पास होणार.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
11 Mar 2010 - 5:08 pm | तिमा
आमच्या जलमापासून आतापर्यंत लई आमोश्या आल्या न गेल्या , काई कळलं नाई राव! बाकी मनस्ताप म्हनायचा तर साळंचं सगळं दिस आमोश्यांनी भरलेले असनार! आत्ता कळलं साळा संपल्यासरशी यावढं म्वॉकळं का वाटाया लागलं त्ये!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
13 Mar 2010 - 12:29 pm | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ. कालच घरी गेलो होतो. घरच्या क्यालेंडरात १६ मार्चला पाडवा आहे. अमावास्या १५ मार्चला आहे.
साळगावकर चुकले की काय? (की मी भलत्याच वर्षाचे क्यालेंडर पाहिले?)
नितिन थत्ते
13 Mar 2010 - 1:24 pm | युयुत्सु
श्री नितीन थत्ते यांस
आपला प्रतिसाद अज्ञानमूलक आहे. एवढेच मी म्हणेन.
अमावस्येची चंद्र सूर्य युतीची खगोलशास्त्रीय घटना १६ मार्चच्या पहाटे आहे. भारतीय पंचागात तिथीची व्याख्या बराच गोंधळ निर्माण करते म्हणून मी भारतीय तिथी शक्यतो वापरत नाही. मी माझ्या ज्योतिष विषयक गणितासाठी Janus 4.3 हे व्यावसायिक सॉफ्ट्वेअर (Licensed copy) वापरतो. याने केलेल्या गणिताला साळगांवकरांचे प्रपितामह पण आह्वान देउ शकणार नाहीत.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
14 Mar 2010 - 12:08 am | आनंद
अमावस्येची खगोल शास्त्रीय घटना २.३१ (पहाटे) १६ मार्चला आहे(संदर्भ :http://www.heavens-above.com),तुम्ही लिहल्या प्रमाणे आणि
Janus 4.3 प्रमाणे ३.२८ (पहाटे) १६ मार्च,
हा फरक का पडला असावा.
----आनंद
14 Mar 2010 - 12:22 am | आनंद
कालनिर्णय प्रमाणेही अमावस्या समाप्ती (कालनिर्णय प्रमाणे एकदा की घटना घडुन गेली म्हणजे संपली असे असावे) ची वेळ हीच दाखवली आहे व मी संदर्भ दिलेल्या वेबसाइट प्रमाणे वेळ अचुक जुळत आहे.
(मला वाट्त की आनंद घारे साहेब इथे मदत करतील)
----
14 Mar 2010 - 11:05 am | आनंद घारे
आपण दिलेल्या दुव्यावरून पाहता हेवन्स अबाव्ह या संस्थळावर खालील माहिती दिली आहे.
New moon: 22:01 Monday, 15 March ही वेळ जीएमटीनुसार असणार.
भारतीय वेळ ५ तास ३० मिनिटांनी पुढे आहे. याचा अर्थ त्या वेळी भारतात १६ मार्च पहाटे ३ वाजून ३१ मिनिटे झालेली असणार
माझ्या घरातल्या 'भिंतीवरी' टांगलेल्या कालनिर्णयाप्रमाणे अमावास्या समाप्ती १५ तारखेच्या उत्तररात्री ०२-३० या वेळेस दिलेली आहे.
जेनस मद्दल मला माहिती नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
14 Mar 2010 - 7:51 pm | आनंद
परत हेवन्स अबाव्ह बघीतले असता वेळ २१.०१ ( २२.०१ नसुन) १५ मार्च जी एम टी नुसार त्या नुसार २.३१ हीच वेळ बरोबर येते .
व कालनिर्णय नुसार बरोबर येते.
15 Mar 2010 - 9:06 am | आनंद घारे
मी माझा प्रतिसाद टंकल्यानंतर कांही क्षणातच अमेरिकेतील घड्याळे एक तासाने पुढे करण्यात आली. शिशिरकालीन वेळेऐवजी (विंटर टाइम) ग्रीष्मकालीन वेळ (समर टाईम)सुरू झाली. मी हिशोब करतांना ग्रीनिच व मुंबईमधील वेळेमधला फरक साडे पाच तास धरला होता, पण आजपासून तो साडे चार तास इतकाच आहे. त्यामुळे दि. १६ मार्चला पहाटे ०२.३१ ही वेळ बरोबर येते.
हेवन अबाव्हमधील माहिती मी कट पेस्ट केली होती. माझ्या हिशोबात चूक झाली होती.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
14 Mar 2010 - 10:22 am | युयुत्सु
हा फरक coordinate system मधल्या फरकाने पडतो. पृथ्वीचा मध्य हा ओरिजिन मानून गणित केले तर २.३१ ही वेळ Janus 4.3 मध्ये पण येते. ही झाली geocentric coordinate system. या पद्धती मध्ये निरीक्षक पृथ्वीच्या केंद्राशी असल्याचे मानले जाते.
मी वापरतो ती coordinate system , tropical या नावाने ओळ्खली जाते. त्यात निरीक्षकाचे वास्तव स्थान विचारात घेतले जाते, निरीक्षकाची समुद्र सपाटी पासुन उंची पण गणितासाठी विचारात घेतली जाते. सर्व प्रगत ज्योतिषी हीच coordinate system वापरतात.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
15 Mar 2010 - 9:56 am | नितिन थत्ते
>>याने केलेल्या गणिताला साळगांवकरांचे प्रपितामह पण आह्वान देउ शकणार नाहीत.
मग पाडवा बुधवारी साजरा करावा असे म्हणता?
नितिन थत्ते
15 Mar 2010 - 10:15 am | युयुत्सु
सण कधि साजरा करायचा याचा निर्णय करण्यात मला स्वारस्य नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
13 Mar 2010 - 12:46 pm | सन्दीप
२० एप्रिल १९७१ ते १ ऑगस्ट १९७१
माझी जन्म तारीख ४ जुन १९७१ म्हन्जे मला शुभ की अशुभ ?
13 Mar 2010 - 1:08 pm | युयुत्सु
ते पत्रिकेतील सक्रिय झालेल्या ग्रह योगांवर ठरेल.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
14 Mar 2010 - 8:54 pm | दिपाली पाटिल
१९८० नंतरच्या जन्मतारखांना कशी आहे ही अमावस्या?
दिपाली :)