मदतीचे आवाहन / कळकळीची विनन्ती

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in काथ्याकूट
17 Mar 2008 - 9:33 am
गाभा: 

मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते
छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे
मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती.

आपला विनम्र,

उदय सप्रे,
ठाणे

प्रतिक्रिया

जुना अभिजित's picture

17 Mar 2008 - 2:58 pm | जुना अभिजित

आपला उपक्रम स्तुत्य आहे. पण मला वैयक्तिक माहिती नसले तरी इथले कोणीतरी नक्कीच मदत करेल.

आपण मनोगत, मायबोली तसेच उपक्रम संकेतस्थळांवरही विचारून पाहू शकता.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर's picture

18 Mar 2008 - 12:24 pm | विसोबा खेचर

मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे
मुद्रकासह ,

उदयराव, आपण शिवरायांच्या माणसांविषयी लिहिताय ही खूप मोठी गोष्ट आहे. मलातरी असे काही प्रायोजक माहीत नाहीत परंतु एक खारीचा वाटा म्हणून जर कुणाला काही रक्कम द्यावीशी वाटली तर काही सोय आहे का? कुठे द्यायची ही रक्कम? कुणाच्या नावावर?

कृपया खुलासा करावा...

असो...

आपला,
तात्या.

उदय सप्रे's picture

18 Mar 2008 - 3:38 pm | उदय सप्रे

प्रिय तात्यासाहेब,
तुमच्या मनातील भावना पोचल्या, पण आजच्या तारखेला मी ती रक्कम घेऊन जर क पुस्तक छापयला आणि मधे १ वर्ष गेले तर परत त्यामुळे गैरसमज नाहि का होणार ? हा प्रश्न डोके खातोय, काय करु आपणच सान्गा.मी एक पुस्तक वाचले होते त्यात प्रत्येक पानावर "स्पॉन्सर्"चे नाव दिले होते , ३० पानी पुस्तकातील किती पाने तुम्ही "स्पॉन्सर्" करु शकाल? तर असे काही करता येणे मात्र शक्य आहे- किन्वा आपली अन्य काही सूचना असल्यास त्यावर पण विचार करुया, आपल्या उत्तराच्या अपेक्षेत,
उदय सप्रे

विसोबा खेचर's picture

18 Mar 2008 - 5:22 pm | विसोबा खेचर

पण आजच्या तारखेला मी ती रक्कम घेऊन जर क पुस्तक छापयला आणि मधे १ वर्ष गेले तर परत त्यामुळे गैरसमज नाहि का होणार ?

हम्म! खरं आहे. कारण पुस्तक छपाईची संपूर्ण रक्कम जमा व्हायला वेळ लागू शकतो...

मी एक पुस्तक वाचले होते त्यात प्रत्येक पानावर "स्पॉन्सर्"चे नाव दिले होते ,

थोरल्या आबासाहेबांविषयीच्या पुस्तकाबाबत प्रत्येक पानावर प्रायोजकाचे नांव छापणे हे माझ्या मते हास्यास्पद आहे. अहो धारातीर्थी पडलेल्या कित्येक मावळ्यांची साधी नांवेही आपल्याला माहीत नाहीत!

३० पानी पुस्तकातील किती पाने तुम्ही "स्पॉन्सर्" करु शकाल?

प्रत्येक पानाला किती खर्च येतो हे मला माहिती नाही त्यामुळे मी किती पाने प्रायोजित करू शकेन ते मला माहिती नाही.

आपण थोरल्याआबासाहेबांच्या निष्ठावान माणसांवर पुस्तक लिहीत आहात, ही गोष्ट मिपावरील आपला एक सहसदस्य या नात्याने मला कौतुकाची वाटते आणि म्हणूनच मी आपल्या पुस्तक छपाईकरता मदत म्हणून रुपये ५०१ एवढी रक्कम देऊन खारीचा वाटा उचलू इच्छितो!

माझ्यापुरतं बोलायचं झालं तर एकदा रक्कम दिली की पुढे तुम्ही तिचं काय केलंत? पुस्तक छपाईला वेळ का लागतो आहे? असे कुठलेही प्रश्न मी तरी तुम्हाला विचारणार नाही, एवढंच अगदी नि:संदिग्धपणे सांगू शकतो!

आपल्या प्रामाणिकपणावर आणि मुख्य म्हणजे थोरल्या आबासाहेबांच्या पुण्याईवर माझा पूर्ण विश्वास आहे..

असो..

ता क - उद्या जर देवकृपेने पुस्तक छापून पूर्ण झालेच तर त्यावर प्रायोजक म्हणून माझं कुठेही नांव नको एवढीच माझी अट आहे..

आपला,
(बाजीप्रभूंचा भक्त) तात्या.

धमाल मुलगा's picture

18 Mar 2008 - 5:49 pm | धमाल मुलगा

मीपण आहे यादीत.
लिहा माझेपण ५०१/-.
आणि राहिला प्रश्न प्रगती विचारण्याचा, तर शब्द देतो...पैशाच॑ काय केल॑त एका शब्दान॑ पुसणार नाही! फक्त अट एकच. पुस्तक प्रकाशीत होईल तेव्हा नक्की कळवावे. बाजारात येणारी पहिली प्रत माझ्या स॑ग्रही असावी असा मानस आहे!

राहिला प्रश्न "स्पॉन्सर" चे नाव देण्याचा, तर लिहा श॑भु महादेव, जेजुरीचा ख॑डेराया आणि उभ्या महाराष्ट्राच॑ कुलदैवत आई तुळजाभवानी ह्या॑ची नाव॑.

आपले पुस्तक लवकरात लवकर प्रकाशीत होवो अन् त्याला आणि पर्यायाने आपल्याला उद॑ड यश मिळो हीच श्रीश॑भुचरणि प्रार्थना !

आपला मित्र,
ध मा ल.

ता.क. : पैसे कोठे आणि कसे जमा करायचे ते कळवल्यास बर॑ पडेल.

इनोबा म्हणे's picture

18 Mar 2008 - 6:45 pm | इनोबा म्हणे

मी पण आहे.आमच्याकडचा ५०१ रु. चा चेक कुठे पाठवायचा ते सांगा. मात्र या पुस्तकात आपण काय लिहीणार आहात्,प्रकाशक कोण्(व्यंकटरावांनी विचारल्याप्रमाणे) याची माहीती कळाली तर बरी होईल.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

व्यंकट's picture

18 Mar 2008 - 6:14 pm | व्यंकट

प्रकाशक आणि लेखकांप्रमाणे प्रायोजक पुस्तकांतील कथा, दावे, पात्र, वैगेरें करता जबाबदार असणार आहे का? प्रकाशक कोण आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे महत्वाची आहेत असे मला वाटते.

व्यंकट

विसोबा खेचर's picture

18 Mar 2008 - 6:28 pm | विसोबा खेचर

व्यंकटरावांनी मांडलेले मुद्देही अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांचाशी मी पूर्णत: सहमत आहे. सध्या तरी सगळंच संदिग्ध दिसत आहे. उदयरावांनी कृपया विस्तृत व पूर्ण माहितीनिशी आपले म्हणणे मांडावे असे वाटते..

तात्या.

केशवराव's picture

18 Mar 2008 - 11:50 pm | केशवराव

उदय सप्रे यांसी _ _ _ _
आपला उपक्रम स्तुत्य आहेच ; आणि आपली अडचणही खरी वाटते.
मदतीचे हात नक्कीच पुढे येतील. थोडे आपल्या पुस्तकाबद्दल सविस्तर कळविले तर ते आपल्यालाच बरे होईल. 'प्रोजेक्ट रीपोर्ट ' जरा नीट असावा. मदत करताना आपले नांव व्हावे असे सर्वानाच वाटते असे नाही , पण आपण मदत कुठे करतो ते त्याला कळले तर बरे होईल. वर काही जणांनी भावनिक पातळीवरुन आपल्याला मदत केली.त्यांना मी कमी लेखत नाही. त्यांची मदत लाख मोलाची नव्हे तर अमुल्य आहे.त्यांनी तर नावासाठी देखील आग्रह धरलेला नाही. अशी थोडी माणसें असतात. आपल्याला मदत करणारी बरीच माणसें हवीत.मग बर्‍याच माणसांना भावेल तसे आपण सांगावे. [ अपील होईल असे... ]
यात कोणताही कमीपणा नाही.
तरी कृपया, आपल्या लिखाणाचा थोडा नमुना, छपाईचा अपेक्षीत खर्च , लोकांच्या मदतीवर छापुन आलेल्या पुस्तकाच्या विक्रीतुन जर नफा झालाच तर त्याचे काय करणार ? कुठल्या शिवप्रतिष्ठानला दान करणार का?
हे प्रश्न माझ्यासाठी नाहीत , पण लोकं दान / मदत करताना अशा सर्व गोष्टीं बघतात. माझ्याकडून आपल्या उपक्रमाला १००१/- मदत , विना अट! कसे आणि कुठे पाठवू ते कळवा.
जाता जाता ..... पुस्तक ठराविक वेळेत नक्की प्रकाशीत होईल असाच विचार करा. उशीराची भिती बाळगू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत.
- - - - - - - - केशवराव .

उदय सप्रे's picture

19 Mar 2008 - 5:54 pm | उदय सप्रे

प्रिय केशवराव,
आपेल म्हणणे रास्त आहे.परन्तु "बाजी पासलकर" यान्चेविशयी "सबकुछ" या पुस्तकात मी लिहिले आहे, अश्या क्रमिक पुस्तकाचे नाव आहे "रत्न्तपारखी".यापेक्षा अधिक मी काहीही सान्गु शकत नाहिये सध्ध्या तरी.प्रकाशक्,मुद्रक यान्च्या मी शोधात आहे, मी नवीन लेखक असल्याने माझा लेखनाचा विषय काय आहे यापेक्षा जास्त रस सगळ्यान्ना "आपले उखळ किती आणि कसे पान्ढरे होईल?" याचीच जास्त फिकीर आहे , अजुन माझे कुठल्याही प्रकाशकाशी अन्तिम बोलणे झालेले नाही, एक मात्र निश्चित - मिळालेल्या मदतीचा दुरुपयोग माझ्या हातून कधिही होणार नाही.
यापेक्षा अधिक माहिती म्हणजे मी तुम्हाला ते पुस्तक माझ्या घरी आलात तर नक्किच वाचायला देवू शकतो, तसेच "कान्होजी जेधे"८५ % झालेले ते पण देवू शकतो, "झन्झावात" सुध्धा देवू शकतो- जे २०% इतकेच झाले आहे - उरलेले पूर्ण करायला अजून २ वर्ष नक्किच लागतील कारण पुढचे वर्ष चिरन्जीव (म्हणजे पर्यायानी आम्हीच !) दहावीत जाणार आहेत (अशी दाट शन्का आहे.....)
माझा भ्रमण्ध्वनी खाली देत आहे, आपल्याशी सविस्तर बोलयल नक्किच आवडेल, मी ठाणे पश्चिम - पान्च्पाखाडी येथे रहातो.
आपला विनम्र,
उदय सप्रे
९९६७५ ४२७०३
०२२ - २५४३ २६ ५६

केशवराव's picture

22 Mar 2008 - 11:53 pm | केशवराव

श्री. उदय सप्रे यांसी - - - - --
शक्यतो प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करीन .
केशवराव .

उदय सप्रे's picture

19 Mar 2008 - 2:37 pm | उदय सप्रे

मि.पा.वरील सर्व सभासद,

तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले आहे, माझ्यासारखीच "शिव-शम्भू" भक्त मन्डळी आज माझ्यासोबत आहेत याची पुन्हा एकदा खातरजमा झाली.
"बाजी पासलकर" लिहून तयार आहे, पश्न फक्त हा आहे की मुद्रक आणि प्रकाशक कोण्?मी "मेहता" ना लिहिले होते, पण आजकाल प्रत्येकाला "लेखक कोण्?नवा आहे का?आम्हाला त्यात काय मिळेल्?असे व्यावहारीक प्रश्न अधिक महत्वाचे वाटतात - यात त्या लोकान्चा काही दोष नाही , पण माझ्यासारख्याचि गळचेपी होते आहे , मी प्रयत्नात आहे-नक्की झाले कि ते मि.पा.वर कळवीनच , तोवर मी मि.पा.वर माझे :"काही लेख आणि एक कविता" च्या लिन्क्स दिल्या होत्या त्या नमुम्यादाखल म्हणून वाचाव्यात म्हणजे तुम्हाला माझ्या अक्षरासकट माझ्या लिखाणाबध्धल थोडासा तरी अन्दाज येईल.

पुस्तके पूर्ण करणारच आणि माझे "झन्झावात" हे पुस्तक मराठीतील पहिलेच ऐतिहासिक पुस्तक असेल ज्यात ३ पिढ्यान्चा इतिहास असेल आणि माझ्या दुर्दैवाने मी ज्यान्ना लेखक म्हणून माझा आदर्श मानतो ते भाशाप्रभू श्री.रणजित देसाई, श्री.शिवाजी सावन्त यावेळी हयात नाहीत !
माझे लेख वाचून मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात, तुम्ही सगळे "आपले" वाटता म्हणून "आभार" सारखा औपचारीक शब्द न वापरता तुमच्या रुणात रहाणे अधिक महत्वाचे मानतो आणि इथेच थाम्बतो.
आपला विनम्र,
उदय सप्रे

मी पण धमाल शी आणि केशवराव शीसहमत आहे.
मदत कोठे पोहोच करायची ते सांगा
.............शिवप्रभुंचा मावळा
विजुभाऊ

उदय सप्रे's picture

19 Mar 2008 - 6:13 pm | उदय सप्रे

प्रिय विजुभाऊ,
मी आधी एखाद्या प्रकाशकाशी अन्तिम बोलणे करतो आणि मग आपल्या सगळ्यान्ना सविस्तर सान्गतो, तोवर माझे :"काही लेख आणि एक कविता" या लिन्क्स ज्या जनातल मनातल या सदरात मी दिल्या आहेत त्या वाचून मला आपला अभिप्राय जरूर कळवावा.तसेच मी अत्ताच माझी आणि एक प्रतिक्रिया प्रकाशित केली आहे ती पण वाचावी - श्री. केशवराव यान्ना उद्देशून आहे ती.
तुम्हा सगळ्यान्विषयी भावना व्यक्त करायला माझ्याकडे पुरेसे शब्दच नाहियेत- या क्षणी डोळे पाण्याने भरले आहेत्.एक आठवण सान्गतो : १५ औगस्ट २००६ : आम्ही मढे घाटातून चालत चालत ऐन पावसाळ्यात श्वथर घळीकडे चाललो होतो-वाट निसरडी व अरुन्द असल्याने सारखे घसरत होतो.एका गावकर्याने विचारले "शिवथर घळीत जायचे तर खाली महाड वरून जयचे तर?" त्याना मी म्हणालो,"तस नाही राव, आमच्या पहिल्या २ छत्रपतीन्नी आमच्यासाठी कश्या टाचा झिजवल्या आहेत ते आम्हाल कळायला हवे म्हणून आम्ही असे जातोय !" त्यावर त्या ग्रुहस्थाच्या डोळ्यात आलेली चमक मी अजूनहे विसरु शकत नाहिये आणि त्यावेळी त्यान्नी माझ्या खान्द्यावर थोपटले आणि मला जाणवले कि माझ्यासारखेच कित्येक लोक अजून पण शिव्-शम्भू यान्ना आपले दैवत मानतात ! हा प्रसन्ग मी माझ्या आयुश्यात कधिही विसरणार नाही.समर्थ चरणी प्रार्थना केली आहेच आणि जमल्यास पहिली प्रत तिथेच प्रकाशित करयचा मानस पण आहे.
यापेक्षा जास्त लिहिण्याच्या मानसिक अवस्थेत मी अत्ता नाहिये म्हणून इथेच थाम्बतो आहे.
आपला विनम्र,
उदय सप्रे,ठाणे
२५४३ २६ ५६
९९६७५ ४२७०३

अनामिका's picture

5 Apr 2008 - 8:37 pm | अनामिका

श्री उदय!
तुमच्या या कार्याला जर मी देखिल थोडा हातभार लावू शकले तर मला मनापासुन आनंद होइल.
आयुष्यात काहिहि करु न शकल्याची खंत तरी निदान काही अंशी कमी करता येईल.
जर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती आणि शंभुराजांनी त्या निर्दयी औरंगजेबाला ९ वर्षे झुंजवत ठेवला नसता तर आज महाराष्ट्राचे नामोनिशाण राहीले नसते..............!
या अशा महान विभुतींचे अस्तित्व सध्या फक्त राजकारणापुरतेच राहिले आहे हे अतिशय खेदजनक आहे.................!
असो मी प्रत्यक्ष तुम्हांस भेटायचा प्रयत्न करीनच.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!