गाभा:
राम राम मंडळी !!
आत्ताच "वल्लीं"चा उत्क्रुष्ट मराठी कादंबर्यांबद्दलचा काथ्याकुट वाचत होतो. अचानक 'श्रीमानयोगी'ला नरहर करुंदकनांनि दिलेल्या प्रस्तावनेची आठवण झाली. त्या प्रस्तावनेत करुंदकरांनी कुठल्या 'शेषप्रश्न' (आत्ता नेमकं नाव आठवत नाहि) या सव्यसाची वर अधारीत कादंबरीचा उल्लेख केला आहे. त्या कादंबरीचे नेमके नाव/प्रकाशक वगैरे माहिती कोणास असेल तर क्रुपा करुन सांगणे. या जुजबी माहितीवर मी ति कादंबरी पुण्यात अप्पा बळवंत चौकात बरीच शोधली... पण नाहि सापडली :(
(शोधात असलेला) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
प्रतिक्रिया
9 Mar 2010 - 3:15 am | चतुरंग
शरतचंद्र चट्टोपाध्यायांच्या 'शेषप्रश्न' कादंबरीबद्दल बोलत असतील का कुरुंदकर साहेब? (नक्की माहीत नाही पण हा दुवा सापडला म्हणून विचारतोय.)
चतुरंग
9 Mar 2010 - 9:42 am | युयुत्सु
शेषप्रश्न पुण्याच्या नूमवीच्या ग्रंथालयात ७८ साली होती. आता असेल की नाही ते माहित नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
9 Mar 2010 - 10:02 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री अर्धवटराव, शेषप्रश्न व सव्यसाची या शरदचंद्रांच्या दोन वेगवेगळ्या कादंबर्या आहेत. श्री विश्वास पाटील यांच्या या लेखात त्यांनी दोन्ही कादंबर्यांचा उल्लेख केला आहे.
9 Mar 2010 - 10:41 pm | अर्धवटराव
या कादंबर्यांचा 'जबरी' मराठी अनुवाद उअपलब्ध असेल तर काय मजा येइल :)
अर्धवटराव
-रेडि टु थिंक