आमच्या प्रेरणा -
१. शांता शेळके यांची कविता तोच चंद्रमा नभात
२. बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आमचे काही नशीबवान सहकारी
३. त्याच सुमारास कर्नाटक सरकारने एक्साइज ड्यूटी कमी करुन मद्य स्वस्त केल्याची आनंद वार्ता
(हुश्श...... आता वाचा विडंबन)
तोच नौरोबा घरात, स्थूल आणि स्वस्थ ही
स्वेच्छेच्या निवृत्तीत, दंग आणि मस्त ही
आळशीपण ते तसेच, मंद तेच वागणे
पिक्चर अन् मॅच बघत, ते तसेच जागणे
टीव्हीच्या चॅनलवर, घाली जणूं गस्त ही
फंड पुरा घेऊनिया, वर घेतो पेन्शन गं
काहीच ना त्यास उरे, डोक्याला टेन्शन गं
सोफ्यावर लोळूनिया, होत जाय सुस्त ही
त्या पहिल्या मित्रांच्या आज शोधतो खूणा
बोलावून त्यास घरी, ग्लास शोधतो पुन्हा
रोज आता दिपवाळी, होय मद्य स्वस्त ही
प्रतिक्रिया
16 Mar 2008 - 9:12 pm | सचिन
अविनाशजी दि ग्रेट !!
टीव्हीच्या चॅनलवर, घाली जणूं गस्त ही ....खासच !!
16 Mar 2008 - 10:07 pm | प्रा सुरेश खेडकर
खूप आवडली.
16 Mar 2008 - 10:17 pm | प्राजु
आवडले विडंबन..
- (सर्वव्यापी)प्राजु
18 Mar 2008 - 12:33 pm | विसोबा खेचर
ओगलेशेठ,
हे विडंबन ठीक वाटले, फारसे आवडले नाही..
आपला,
तात्या.
18 Mar 2008 - 12:46 pm | चित्तरंजन भट
"मूळ रचनेपेक्षा विडंबन छान आहे," असे म्हणणारा प्रतिसाद कधी येतो ह्याची वाट बघतो आहे. :)