नैसर्गिक दृष्ट्या समृध्द असणार्या ,अतिशय सुरेख अश्या वसई-विरार महानगरपालीकेतून ५३ गावे वगळावी यासाठी तेथील आमदार विवेक पंडित यांनी बेमुदत उपोषण केले.त्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी ५ मार्चला पोलीसांनी ज्या पध्द्तीने बळाचा वापर केला.स्रिया,वृध्द,लहान मुले,तरुण मुले ,मुली यांवर घरात घुसून बघाणार्यालाही चीड यावी असा अमानुषपणे लाठीमार केला,त्याचा निषेध करायलाच हवा.दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून लाठीमाराचे दृष्य पाहताना इतिहासात वाचलेल्या इंग्रज सरकारच्या जुलुमाची आठवण झाली.एखादे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस ज्या पध्द्तीने वागतात ते लोकशाहीला धरून आहे का?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी लाठीमार प्रकाराबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत.जे कोण पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांना सजाही होईल.पण पोलीसांच्या परीणामी राज्यसरकारच्या दहशतीची झळ बसलेले वसईकर पुन्हा उठू शकतील का?मूळ प्रश्न असा आहे की लोकांनी आंदोलन करावे असे निर्णय सरकार घेतेच कशी.
प्रतिक्रिया
7 Mar 2010 - 10:21 am | अविनाशकुलकर्णी
जमीनिसाठी बिल्डर लोकांच्या सोयि साठी...त्या मुळे विकास होतो.....विकासाच नाव घेतले कि मग काहि चालते
7 Mar 2010 - 10:28 am | वेताळ
नगर विकास खाते आहे. त्यामुळे काय लक्षात घ्यायचे ते घ्या. हे सरकार महाराष्ट्रातले सर्वात जास्त भष्ट सरकार असेल असे सध्या वाटते आहे.
वेताळ
7 Mar 2010 - 10:37 am | विकि
सरकार भ्रष्ट असूच शकत नाही ते चालवणारे भ्रष्ट असू शकतात.कारण लोकांनी निवडून दिले याचे अर्थ ते चांगले असेच आपण गृहीत धरतो.मी तर म्हणेण नोकरशाहीने जर यांना साथ नाही दिली तर भ्रष्टाचार काही अंशी तरी कमी होईल.असो पण सध्या प्रश्न वसईचा आहे.येथे टिच़की मारा
येथे टिचकी मारा
7 Mar 2010 - 10:44 am | वेताळ
जर राजाच वाईट निघाला तर प्रधानाला दोष देवुन काय फायदा.
मुख्यमंत्र्यानी पुण्यात परवा एका बिल्डरला १०० एकर जागेवरील आरक्षण उठवुन दिले आहे. ते प्रकरण पण सध्या गाजत आहेच की.
वेताळ
7 Mar 2010 - 10:49 am | विकि
पणा राजा,प्रधान या हुकुमशाहीतल्या प्रवृत्ती आहेत.लोकशाहीत त्या बसत नाहीत.म्हणुनच मी म्हटले की सामान्य माणसाचे पेटून ऊठणेच बंद झाले आहे.
7 Mar 2010 - 10:30 am | विकि
अविनाशजी.
अख्ख्या मुंबईत आणी महाराष्ट्रात या बिल्डर शाहीने हैदोस घातला आहे अर्थात त्यांच्या पाठीशी आपली नोकरशाही,राज्यकर्ते यांचे पाठबळ आहेच की?वसईत ही हेच झाले.त्यामुळे यंत्रणा तर बिघडलीच आहे त्याचबरोबर सामान्य माणसाचे न पेटून उठणे हे कारणही याला कारणीभुत आहे.
7 Mar 2010 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>सामान्य माणसाचे न पेटून उठणे हे कारणही याला कारणीभुत आहे.
सामान्य माणसाचे आंदोलन खूप कचखाऊ असते. नसत्या भानगडी आपल्याला मागे लावून घ्यायची सवय नाही. आपलं काय जातंय ! आपण भले आणि आपले काम भले, यात माणूस 'स्व'ला प्राधान्य देण्यात गुंतून गेलेला आहे. भ्रष्ट्र राजकारण आणि नोकरशाहीविरुद्ध सामान्य माणसेच काहीतरी उठाव करु शकतील हे खरे असले तरी अजूनही शासनावर सामान्य माणसाचा कोणताच वचक नाही. शासन, राजकारणी सामान्यांना मोजत नाही. सामान्य माणसामधे अन्यायाविरुद्ध मरु तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही अशी वृत्ती आली तर सामान्य माणसाला भले दिवस येतील, पण असा सुदिन कधी येईल कोणास ठाऊक ?
-दिलीप बिरुटे
[हतबल सामान्य माणूस]
7 Mar 2010 - 2:24 pm | अन्या दातार
कोणाच्या जीवावर तुम्ही पेटून उठायच्या गोष्टी करत आहात अविनाशराव? कोणत्यातरी कलमाखाली अटक करतील पोलिस. आणि आपल्याकडे पुरावा काय आहे सरकार किंवा मुख्यमंत्रांवर आरोप करायला? अशा रितीने तुम्ही कायदा हातात घेउ शकत नाही.
ही अप्रत्यक्षरित्या हुकुमशाहीच झाली आहे. सरकार करेल तेच बरोबर हा खाक्या आहे सध्या.
7 Mar 2010 - 11:09 am | विकि
आपल्याशी मी सहमत.या सर्वांवर वचक बसावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.या आधीच्या सरकारांनी अनेक चळवळी दडपून टाकून त्या संपवून टाकल्या.आझाद मैदानापर्यंत मोर्चा.तिथे काय ते करा.शिष्टमंडळाने तिथे मंत्रालयात जायचे आणि संबंधित खात्याच्या मंत्र्याशी चर्चा करायची यामुळे पेटुन उठणे कमी झाले