गाभा:
दहशत वादाला धर्म नसेल पण जिहादला धर्म असतोच , तसे नसते तर जगातला कुठलाही मुस्लिम तरुण अफगाणिस्तान , इराक वा काश्मीर - पॅलेस्टाईन ही कारणे दाखवून घातपातास का पुढे सरसावतो ?
सुशिक्षित उच्चभृ मुस्लिम तरुण ( संगणक अभियंता - १ लाख रुपये महिना पगार ) जिहादी हिंसाचाराकडे का आकर्षित होतात ?
उल्फा , नक्षल, लिट्टे इ. आंदोलने बव्हंशी त्या त्या भागातील समस्यांपुरती त्यांच्या सीमित होती.
प्रतिक्रिया
6 Mar 2010 - 11:20 am | टारझन
हॅहॅहॅ .. ह्यावर आम्ही फक्त एकंच म्हणतो :)
"प्रत्येक ##### हा आतंकवादी नसला तरी आजवर सापडलेला प्रत्येक हरामखोर आणि भाडखाऊ आतंकवादी हा #####चं होता. "
टिप : "#####" मधे प्रत्येकाला फक्त एकंच शब्द भरावासा वाटतो ह्यातंच सगळंकाही आलं :)
अवांतर : अजुन एक धार्मिक धागा ? :)
-- भप्पीलहरी
7 Mar 2010 - 5:57 am | राजेश घासकडवी
जर ८० च्या दशकात भारतात हा प्रश्न विचारला असता तर तुम्ही त्या पाच खुणांऐवजी दोन वापरल्या असत्या व आपला दावा 'सिद्ध' केला असता...
तुम्ही विजापूरच्या दरबारी काम करत असता, १७व्या शतकात, तर आतंकवाद ऐवजी 'गनिमी कावा' हा शब्द वापरून काय प्रश्न विचारला असता याचा विचार करा.
मुद्दा असा आहे की आतंकवाद कशाला म्हणावं हे तितकं काळंपांढरं नाही. कोणाविरुद्ध, कोण, कधी, कुठे, कशासाठी, लढतो हे खूप महत्त्वाचं असतं. यात कसलं समर्थन नाही, फक्त वास्तव सांगतोय.
धर्मांच्या पुस्तकांबाबत व त्यांत दिलेल्या सल्ल्यांबाबत जितकं कमी बोलू तितकंच चांगलं आहे. जन्माप्रमाणे एक विशिष्ट लेबल लावून आपले -परके करणं आणि इतरांना तुच्छ मानणं, त्यांच्यावर अन्याय करणं यासाठी कोणाला पुस्तकं वाचण्याची गरज पडत नाही. सर्व धर्मीय आपल्या पुस्तकात असलेलं-नसलेलं वापरून ते करतातच.
राजेश
8 Mar 2010 - 12:28 am | नितिन थत्ते
सहमत आहे.
हे खरेतर ब्रिटिश राज्यात पारध्यांना ज्याप्रमाणे गुन्हेगार जमात ठरवलं होतं तसंच आहे.
१९व्या शतकाच्या शेवटी असलं काही नव्हतं (आंतरजाल वगैरे). नाहीतर ब्रिटिश समाजात कदाचित हेच वाक्य मध्यंतरी पुण्यात जागतिक संमेलन भरवणार्या एका समाजाविषयी सर्क्युलेट झालं असतं
नितिन थत्ते
8 Mar 2010 - 1:20 pm | तन्गो
जसे गान्धि तत्व वाचुन भाशन केले तर तो गन्धिवादि थर्तो .
मओना वाचुन हिन्सा केल्यने माओवदि थर्तो ...
तसेच कुरान वाचुन हिन्स केल्यने तो इस्स्लामिक दह्शत्वदि का थरत नाहि?
तर घासस्कव्देजि १७ व्या शत्कत कोनिहि 'गनिमि कावा' गिता किन्वआ ग्य्नेश्वरि वचुन केला नाहिन . किन्वा तो कुन्य एका सम्जआविरुधहिन न्हव्ता जसाकि हा इस्लमिक दहशत्वद कुरान वाचुन इस्लामेतरान्च्या अस्तित्व विरोधत आहेन,आनि तो सम्पुर्न विश्श्वात चालु आहेन.उदा: कश्मिर.
आनि हे दहशत विरोधि फत्वे तेव्हाच निघत आहेत जेवन मुस्लिमाना त्त्याचि झल बसत आहे अफ्गनिस्तानात्,अमेरिकेत्,एउरोपआत,इरआ॒क. हे फत्वे तेवन क नहिन निघले जेव्हन कश्मिर झाले ९० च्यन दश्कत.किवन तेव्हन क नहिन निघाले जेव्हन तलिबनि जिन्क्ले रस्सिआ विरोधत य्हाच इस्लमिच तत्व्वचन जय्घोश करुन.
मुस्लिमन्नि जनु जगाचे विभाजन केले आहेन . त्यान्नि विभ्भाजलेल्या भागाला ते 'इस्लमिक जगत' म्हन्तात.
8 Mar 2010 - 1:56 pm | राजेश घासकडवी
शिवाजीने शिवलिंगावर स्वराज्य स्थापण्याची शपथ घेतली. मराठा समाज एकत्र केला. स्वराज्य स्थापण्यासाठी युद्धं केली. तुम्ही शिवाजीला हिंदूवादी किंवा शंकरवादी किंवा मराठावादी किंवा स्वराज्यवादी आतंकवादी म्हणणार आहात का? माझी तशी इच्छा नाही. अमुकवादी आणि तमुक पुस्तकाचा आतंकवाद याला काही अर्थ नसतो. लोक पुस्तकं वाचून युद्धं करत नाहीत. माझा मुद्दा असा आहे की सरसकट लेबलं लावणं धोक्याचं असतं. त्यातून अनेक निरपराध हकनाक पोळून निघतात. व त्याचा आतंकवाद निपटून काढायला फारसा उपयोग होत नाही.
8 Mar 2010 - 8:23 pm | तन्गो
तुम्हिन प्रश्नान्चि भेसल कर्तआय.
सर्व मुस्लिम दहशत्वादि आहेत कि नाहिन?
अनि जे आहेत त्याना 'इस्लमिक-दह्शत्वादि' म्हनावे कि नाहि?
प्र्श्न १> य्हआवर दुसरा धागाच होउन जाउ देत......:)
प्र्श्न २>हित्लरच्या भाश्नावरुन प्रेरित होउन लाखो निरप्रध जिवन्चा बलि घेत्ल गेला.मार्क्स आनि लेनिनच्या विचारावरुन क्रान्त्या झाल्या.आनि कित्येक उदहरन देता येतिल.शक्तिशलि विचार परिवर्तन घदोउन अन्तात.आनि पुस्तक '' म्हन्जे विचरान्चा(चन्ग्ल्यआ/वाइत) सन्च.प्रश्न पुस्त्कचा नाहि तो विचारान्चा आहे.
म्हनुन कुरान वाचुन जर कुनि बयालेक्रन्चा जिव घेत असेल तर तो कुरानिक/इस्लमिक दहशत्वाद का नहि? तो आहे.
9 Mar 2010 - 12:13 am | राजेश घासकडवी
मी कुराण वाचलेलं नाही. तुम्ही ते अभ्यासलेलं असावं असं तुमच्या ठाम विधानांवरनं वाटतं. त्यावर मी जे काही ऐकलेलं आहे त्यावरून कुठच्याही धर्मग्रंथामध्ये जशी सगळंच करावं, हेही चांगलं अन् तेही चांगलं अशी विधानं आहेत. बंधुभाव आहे, मोठ्यांचा आदर आहे, गरीबांची कणव आहे,(कोणी इस्लामी मानवतावादी अशा शब्दप्रयोगासाठी हट्ट धरताना दिसत नाही...) स्वसंरक्षणासाठी आणि सत्याच्या प्रचारासाठी युद्ध करणं आहे. हे सगळं १४०० वर्षांपूर्वीच्या भाषेत लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ लावता येतात. हिटलर, किंवा मार्क्सच्या बाबतीत संदेश स्पष्ट होता. जर मुळात संदेश स्पष्ट नसेल, तर वाटेल तो अर्थ काढून वाटेल ते सांगणारे लोक जगात निर्माण होतात. त्यामुळे मी म्हणेन की एक विशिष्ट अर्थ सांगणाऱ्या वादाला किंवा व्यक्तीला दहशतवादाबरोबर जोडणं जास्त चांगलं.
वहाबी किंवा तालीबानी दहशतवादी कसं काय वाटतं? किंवा त्याहूनही चांगलं - दुर्विचारी दहशतवादी...पण असा सरळसोट, प्रामाणिक विचार केला तर लेबलं लावण्यातली मजाच निघून जाते.
राजेश
8 Mar 2010 - 1:34 pm | तन्गो
इस्लाम काय आहेन मला माहित नाहिन आनि म्ला त्यचेन कहिन करय्चेहिन नाहिन.पन जगाच्या इतिहसाक्दे बघा.
आजचा इरान : हे होतेन पर्सिअन राश्त्रा आनि झूरोएस्त्रिइअन त्यान्च धर्म.
तेथे इस्लम गेला अनि त्या सन्स्क्रितिचे समुल उच्च्तन झालेन/केलेन.अधिक महिति विकि पनावर वचान.
आज्चन अफ्गनिस्तनः बमियन बुध्मुर्तिन्चेन कय झलेन ते पहा पुन्हआ विकि.
अजचन मलेशिआ: मलेसिअन नग्रिक होन्न्यासाथिन काय अत आहेन बघा.
8 Mar 2010 - 1:55 pm | तन्गो
|सर्व धर्मीय आपल्या पुस्तकात असलेलं-नसलेलं वापरून ते करतातच.
पुर्नपने असहमत.मला हे पुर्न चुकिचेन विधान वाते.
9 Mar 2010 - 1:12 am | राजेश घासकडवी
असं एकंदरीत प्रतिसादांवरून वाटतं. तुमच्या प्रश्नाला थोडक्यात उत्तरं देऊन मी बोलणं थांबवतो...
हिंदू : शेकडो वर्षं शूद्रांना व स्त्रियांना अत्यंत हीन वागणूक. सती, छळ, वेगवेगळ्या शक्तीप्रदर्शनांतून हत्या इत्यादी. इंदिरा गांधी हत्येनंतर शीखांचं हत्याकांड
ख्रिश्चन : ज्यूंवर फायनल सोल्यूशन, रशियात ज्यू जमातीचा छळ वगैरे.
मुस्लिम : इथे तुम्हाला पटवावं लागेल असं वाटत नाही.
शीख : खलिस्तान चळवळ
जगातले साठ सत्तर टक्के लोकसंख्येचे धर्म झाले कव्हर करून.
इति.
9 Mar 2010 - 6:15 pm | तन्गो
मी येथेन थाम्ब्तो कारन चर्चा तुम्च्या हाताबहेर चाललि आहेन.:)
9 Mar 2010 - 12:32 am | टारझन
श्रीमान घासकडवी ह्यांस ,
मी २०१० आणि आत्ताच्या काळाबद्दल बोललो .. ८० च्या दषकातले साबण आपण विषिष्ट सुविधा पुरवणार्या बायकांच्या पाठीला चोळा .. आमचं काहीही म्हणनं नाही.
अजुन एक इफ-एल्स चा लुप .. अर्थात मुघलांच्या काळचा साबण :)
काय सांगता ? मग ल्ह्या बरं एक करडा-कोरडा लेख :) आमच्यासाठी जो आयघाला निष्पाप लोकांचे जिव घेतो .. मग तो धर्मासाठी असो वा सत्ते साठी .. तो आतंकवादीच्च !! आणि तो कुठल्या ही धर्माचा असो ..
हे असले फेस न येणारे साबण उगळण्याची आपल्याला एवढी हौस का ? आणि आम्ही कोणाचा कधी कुठे कशासाठी उल्लेख केला आहे का ?
बंबात घालुन जाळतो आम्ही धर्माची असली पुस्तकं !!
=)) ह्या परिच्छेदाचा आगापिछा सांगितलात (आणि तो समजला ) तर एक पार्लेजी चॉक्लेट देईन तुम्हाला :)
बाकी भरपुर प्रतिसाद हस्यास्पद आणि मणोरंजणात्मक :)
-- टारेश (जाऊ द्या! इथे एक सहि विंडबण माफ करतो)
9 Mar 2010 - 12:56 am | राजेश घासकडवी
तुमच्या इफ-देन लूपातल्या निव्वळ चॉक्लेटासाठी एवढं कठीण (कोणी म्हणेल अशक्य) काम करायला घ्यायची इच्छा नाही...बाकी वाटलंच तर खाली काही प्रतिसाद आहेत. ते वाचावे.
आमची फारच पंचाईत केलीत राव. तुमच्या लेखनानंतर म्हटलं, चला निदान सही तरी वाचण्यासारखी असेल. पण तोही आनंद काढून घेतलात.
सगळीच धर्माची पुस्तकं जाळून टाकावी. एवढं मात्र पटलं. ती टाचणी आम्ही काढून घेतली आहे, बाकी सर्व पत्र तुमच्या 'विशिष्ट सुविधा पुरवणाऱ्या स्त्रिया व त्यांच्या पाठीला चोळायच्या साबणां'सकट तुम्हाला परत.
9 Mar 2010 - 9:19 am | विसोबा खेचर
हे बाकी अगदी खरं!
बाकी गप्पांना काही अर्थ नाही..
तात्या.
9 Mar 2010 - 12:18 pm | वाहीदा
"प्रत्येक ##### हा आतंकवादी नसला तरी आजवर सापडलेला प्रत्येक हरामखोर आणि भाडखाऊ आतंकवादी हा #####चं होता. "
हे बाकी अगदी खरं!
बाकी गप्पांना काही अर्थ नाही..
तात्या.
तात्याश्री,
एखादी गोष्ट पाठ झाली म्हणजे पटली का हो ?? अशी घरंगळून जाणारी अक्षरे फार असतात , शिलालेख होणारी उगीच थोडी अन ज्या
अक्षरांना वैचारिक सुसंक्रुत बैठक असते तिच अक्षरे शिलालेख होतात असे आम्हास वाटते.
वैयक्तिक स्वरुपाचा मजकूर संपादित.
--संपादक.
10 Mar 2010 - 11:23 pm | पक्या
या बाबतीत आपण टारझनशी सहमत आहोत,
जय महाराष्ट्र , जय मराठी !
7 Mar 2010 - 12:02 am | हुप्प्या
इस्लाममधे म्हणजे कुराणात आणि हडिथमधे अनेक वचने अशी आहेत की ज्यात धर्माकरता परधर्मियांची हिंसा करणे, कपट करणे हे उचित असल्याचे लिहिले आहे. अनेक वचने आहेत ज्याचा हवा तसा अर्थ लावता येऊ शकतो आणि ह्या हिंसेचे समर्थन करता येते. गैर-मुस्लिमांना दुय्यम वा तिय्यम स्थान दिलेले आढळते. खुद्द महंमदाने अनेकदा क्षुल्लक कारणाकरता परधर्मी, टीका करणारे ह्यांची क्रूर हत्या केल्याच्या नोंदी आहेत. अर्थातच ह्या कृत्यांबद्दल त्याला दोष देणे म्हणजे मुस्लिमांकरता आपले मरण ओढवून घेणे आहे.
कुराण हे देवाने सांगितले आहे. त्यात काडीचाही बदल होणे नाही. असे बदल सुचवणारा पाखंडी, महापापी आहे असे समजले जाते. इस्लाममधे बदल सुधारणा करायचा प्रयत्न करणारे मारले जातात वा परागंदा होतात. कुराण अरबी भाषेत आहे. तीही १४०० वर्षे जुन्या काळातील अरबी. त्यामुळे त्याचा कोण कसा आपापल्या कुवतीनुसार. गरजेनुसार अर्थ लावेल ते सांगता येत नाही. पण धार्मिक सुधारणांना कडवा विरोध असल्यामुळे हे असेच होत रहाणार हे कटू सत्य आहे.
७व्या शतकातला "शुद्ध" इस्लाम स्थापन करणारे २० व्या नि २१ व्या शतकातील हत्यारे, वाहने नि यंत्रणा वापरणे त्याज्य समजत नाहीत.
7 Mar 2010 - 5:20 am | अक्षय पुर्णपात्रे
प्रसिद्ध मुस्लिम अभ्यासक डॉ. ताहीर अल् काद्री यांनी २ मार्चला दहशतवादविरोधी ६०० पानी फतवा जाहीर केला. मुस्लिम धर्मीय दहशतवादाचा तीव्र विरोध करत नाही, कुराणात हिंसाचारास वैध मानले आहे असे आरोप वारंवार केले जातात. या पार्श्वभुमीवर हा फतवा महत्त्वपूर्ण ठरावा. डॉ. काद्री यांनी अतिशय स्पष्ट शब्दात धर्माच्या नावाखाली होणार्या हिंसाचाराचा कुराणातील दाखले देवून विरोध केला आहे. त्यांचे ८० मिनिटांचे भाषण मूळापासून ऐकण्यासारखे आहे. येथे पहिला भाग देऊन इतर भागांचे दुवे देत आहे.
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ८
7 Mar 2010 - 9:00 am | II विकास II
धन्यवाद, दुव्याबद्दल.
---
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
7 Mar 2010 - 9:57 am | विकास
हे नक्कीच चांगले आहे पण डॉ. काद्री हे सुफी संप्रदायाचे आहेत. माझ्या समजुतीप्रमाणे सुफी संप्रदायातील कोणी दहशतवाद करत आहेत असे वाटत नाही. हे जर मुस्लीम धर्मियांच्या प्रमुख पंथातून (शिया/सुन्नी) आले तर त्याचा अधिक उपयोग होईल असे वाटते. शिवाय ज्या क्विलीयम फाउंडेशनच्या (दहशतवाद विरोधी वैचारीक मंच) आधारे त्यांनी हा फतवा जाहीर केला आहे, त्यांना ब्रिटीशसरकार ने गेल्या वर्षी एक मिलियन (दहा लाख) पाउंड दिले होते हा वेगळाच भाग आहे.
त्या शिवाय अनेक इमामांनी जगभर आधीपासून निषेध आणि फतवे काढले आहेत पण त्यांचा आवाज एकतर कमी पडतो अथवा त्यांचे स्थान. बुखारींनीपण भारतात (हल्ली हल्ली, आधी नाही) निषेध केला आहेच.
तरी देखील या चर्चेच्या मथळ्याशी मी पूर्ण सहमत नाही. एकतर त्यातून अनेक निष्पांपांना पण नकळत दोष दिला जात आहे आणि ते मान्य होण्यासारखे नाही. असो.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
7 Mar 2010 - 10:05 am | II विकास II
>>तरी देखील या चर्चेच्या मथळ्याशी मी पूर्ण सहमत नाही. एकतर त्यातून अनेक निष्पांपांना पण नकळत दोष दिला जात आहे आणि ते मान्य होण्यासारखे नाही. असो.
+१
---
7 Mar 2010 - 10:08 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री विकास, मी विकिपीडियात शोधले असता त्यात अशी माहिती मिळाली नाही. ते सुन्नी असावेत, असे मला त्यांच्या विकिपानावरून जाणवले.
8 Mar 2010 - 12:46 am | हुप्प्या
हो डॉ. कादरी हे सुफी असल्याचे विकीवर साफ लिहिले आहे. त्यामुळे "अस्सल" वहाबी मुस्लिम ह्या तथाकथित स्कॉलरचा सल्ला साफ धुडकावणार हे नक्की. वहाबींच्या मते शिया, सूफी आणि तत्सम पंथ हे मुस्लिम म्हणवण्याच्या लायकीचे नाहीतच. १९७९ मधे मक्केचा ताबा मिळवायचा काही डोकेफिरू वहाबी सौदी लोकांनी प्रयत्न केला होता. त्या लोकांचे डोके फिरण्याचे एक कारण म्हणजे ह्या "दुय्यम" मुस्लिम लोकांना सौदी सरकार अनाठायी सन्मान देत आहे. शुद्ध इस्लामला ते मंजूर नाही.
ज्या कुराणाचे दाखले देऊन अतिरेकी लोक हिंसा करतात त्याचेच दाखले देऊन हा स्कॉलर त्या हिंसेला त्याज्य मानतो. खरा तोडगा असा आहे की ह्या कालबाह्य ग्रंथाला प्रमाण मानणे बंद करावे. पण तसे होण्याची शक्यता नाही.
8 Mar 2010 - 12:56 am | नितिन थत्ते
हुप्प्या यांच्याशी सहमत.
दहशतवाद वाईट असं कुराणात सांगितलंय म्हणून दहशतवाद नको हे म्हणणं कमी दर्जाचं.
कुराणात काहीही लिहिलेले असो. दहशतवाद नको हे म्हणण्यापर्यंत प्रगती व्हायला हवी.
(पण हा टप्पाही स्वागतार्ह. हिंदू समाजातही पूर्वी सुधारणांचा पुरस्कार करताना अनेकदा 'ही रूढी वेदात नाही म्हणून ती नको' असा आधार घेतला जाई. हिंदू त्याटप्प्यावरून आज बरेच पुढे आले आहेत).
नितिन थत्ते
8 Mar 2010 - 1:52 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री हुप्प्या आभारी आहे. ते सुफी असावेत अशा प्रकारचे वाक्य विकिवर सापडले. (Qadri was featured by Reuters in August 2009 as a leading Sufi scholar, who is working to bring the western youth away from extremism and to combat extreme tendencies.)
सहमत आहे. मात्र काद्री यांच्यासारख्या लोकांचा हिंसेला असलेला विरोध मुस्लिमेतरांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मुस्लिम हिंसेचा विरोध करत नाही यासारख्या गैर आरोपांना खतपाणी मिळणे त्यामुळे कमी होईल.
सर्वच धर्मांमधील लोकांनी आपल्या पवित्र ग्रंथांत सर्व उत्तरे शोधणे सोडून देण्याची खरोखर गरज आहे.
8 Mar 2010 - 2:50 pm | वाहीदा
काद्री यांच्या सभा संमेलनाला प्रचंड गर्दी असते =D>
Muhammad Tahir ul-Qadri (Urdu: محمد طاہر القادری) (born February 19, 1951) is an Islamic Scholar from Pakistan
Qadri is a Muslim, who doesn't just promote Sunniism he promotes Islam as a religion who should unite.
His main aims and objectives are to promote interfaith dialogue and to suppress the extreme image of Islam. His main effort is towards the betterment of the social, cultural, and religious teachings of Islam, and to enlighten people with the knowledge of their rights and duties and to present a realistic, rational and scientific picture of Islam.
Qadri has criticized Wahhabi doctrines and delivered a series of lectures highlighting their extremist nature. Militant groups, such as al Qaeda and the Taliban, have grown out of the religious extremism propounded by the Wahhabi doctrines. Qadri was one of few religious leaders in Pakistan to condemn the terrorist attacks on September 11, 2001, and by doing so challenge the Islamic legitimacy of those who advocated violence to advance their religious goals.
कुराण हा धार्मिक ग्रंथ आतंकवादाला नाकबुल करतो . Islam and Quran is strictly against Extremism and Militancy, aggressiveness
~ वाहीदा
9 Mar 2010 - 8:45 am | सुधीर काळे
प्रिय वाहीदा,
तुझे प्रतिसाद वाचल्यावर "जसजशा मुस्लिम स्त्रिया शिक्षण घेतील तसतसा हा धर्म कट्टरपणातून बाहेर पडेल" या माझ्या ठाम श्रद्धेला व विश्वासाला पुष्टीच मिळाली.
कुठलाच धर्म वाईट किंवा क्रूर कृत्यांना पाठिंबा देत नाही. धर्माच्या शिकवणीचे अर्थ लावण्यात/समजण्यात ज्या चुका होतात त्यामुळे जगात गैरसमज निर्माण होतात.
शाबास वाहीदा!
काका
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा http://pmindia.nic.in/write.htm या दुव्यावर)
8 Mar 2010 - 3:29 pm | वाहीदा
तुमचे आधीचेही प्रतिसाद वाचले आहेतच ... कोण काय म्हणते या मुळे ईस्लाम ची प्रतिमा धोक्यात नाही येत.
ईस्लाम विरोधात बोलणे हा तुमचा आवडता विषय
तोडगा Islamic Scholar (who are calm, cool , composed and dignified) काढतीलच
असो ..
काद्री यांच्या सभा संमेलनाला प्रचंड गर्दी असते =D>
Muhammad Tahir ul-Qadri (Urdu: محمد طاہر القادری) (born February 19, 1951) is an Islamic Scholar from Pakistan
Qadri is a Muslim, who doesn't just promote Sunniism he promotes Islam as a religion who should unite.
His main aims and objectives are to promote interfaith dialogue and to suppress the extreme image of Islam. His main effort is towards the betterment of the social, cultural, and religious teachings of Islam, and to enlighten people with the knowledge of their rights and duties and to present a realistic, rational and scientific picture of Islam.
Qadri has criticized Wahhabi doctrines and delivered a series of lectures highlighting their extremist nature. Militant groups, such as al Qaeda and the Taliban, have grown out of the religious extremism propounded by the Wahhabi doctrines. Qadri was one of few religious leaders in Pakistan to condemn the terrorist attacks on September 11, 2001, and by doing so challenge the Islamic legitimacy of those who advocated violence to advance their religious goals.
कुराण हा धार्मिक ग्रंथ आतंकवादाला नाकबुल करतो . Islam and Quran is strictly against Extremism and Militancy, aggressiveness
~ वाहीदा
8 Mar 2010 - 3:32 pm | वाहीदा
तुमचे आधीचेही प्रतिसाद वाचले आहेतच ... कोण काय म्हणते या मुळे ईस्लाम ची प्रतिमा धोक्यात नाही येत.
ईस्लाम विरोधात बोलणे हा तुमचा आवडता विषय
तोडगा Islamic Scholar (who are calm, cool , composed and dignified) काढतीलच
~वाहीदा
7 Mar 2010 - 1:18 pm | अनामिका
सागरलहरी
तुमच्या मताशी थोड्याफार प्रमाणात सहमत.........
इस्लामी जिहादचा आग्रह धरत दहशतवादाला प्रोत्साहन देणार्यांनी कधीतरी त्यांच्या अतिसामान्य इस्लामी अनुयायांचा विचार केलाय का?......." धर्माचा बुरखा ओढून दहशतवादाचा पुरस्कार करत संपुर्ण मानवजातीला वेठीस धरणार्या इस्लामच्या या स्वयंघोषित ठेकेदारांनी आज मुस्लिम समाजाची अवस्था अतिशय दयनिय करुन ठेवली आहे......आज आझमगढ मधिल सर्वसामान्य मुसलमानांना कश्या प्रकारे या इस्लामी दहशतवादाला वेगळ्यारुपात बळी पडाव लागतय यावर नुकतीच एक डॉक्युमेंट्री आयबीएन ७ वर काल दाखविण्यात आली(कधी नव्हे ते एक चांगल काम राजदिपने केले ) "becoz i am a muslim"या मथळ्याखाली प्रकाशित करण्यात आली.....
मुस्लिम समाजाला प्रबोधनाची नितांत गरज आहे......"जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धरी" असे असताना मुस्लिम स्त्रियांना मुलभुत शिक्षणापासुन वंचित ठेवले गेल्यामुळेच आज हा समाज बव्हंशी बुरसटलेल्या विचारांनी ग्रासलेला अढळतो........
भारतापुरता विचार करता मुख्यप्रवाहात या समाजाला सामिल करुन घेण्याच्या गप्पाच फक्त राज्यकर्त्यांनी आजतागायत मारल्या.....पण मुळात फक्त या धर्माचा यथोचित वापर केवळ पक्षीय स्वार्थ साधण्यासाठी व प्रसंगी स्वतःची खुंटी बळकट करण्यासाठीच केला गेला......त्यांच्यामधे वेगळेपणाची भावना रुजवणारे देखिल राजकिय पक्ष व त्यांचे तथाकथित निधर्मवादी नेतेच कारणीभुत आहेत..
सध्या fox history या वाहिनीवर दहशतवादाचा उगम व आजचा दहशतवाद या विषयावर एक मालिका सुरु आहे .......अफगाणीस्तानची जी अवस्था आज आहे ती पाहता या इस्लामी दहशतवादाचा बिमोड वेळीच केला नाही तर अखिल जगतात किती भयंकर परिस्थिती ओढवेल याची कल्पना न केलेलीच बरी......
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
7 Mar 2010 - 2:54 pm | अन्या दातार
अक्षयजी, अजुन एक चित्रफीतीचा दुवा देतो. झकीर नाईक नामक एक विद्वान(?) इस्लाममधे हिंसेला असलेले स्थान समजावत फिरत आहेत तसेच जिहादच्या नावाखाली चाललेला दहशतवाद त्यांना मान्य आहे.
http://www.youtube.com/watch?v=ZMAZR8YIhxI&feature=related
http://www.youtube.com/watch?v=6jYUL7eBdHg&feature=related
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=83405&boxid=183721641&pgno=4&u...
7 Mar 2010 - 3:01 pm | jaypal
म्हणाले होते " धर्म हा धर्मप्रचारकानुसार बदलत असतो"
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
8 Mar 2010 - 8:46 am | हर्षद आनंदी
पुन्हा एकदा तेच गुर्हाळ
.
.
.... चालु देत
अंमळ मजा येतेय..
स्वगत:- क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, असे समर्थांनी म्हटल्याचे आठवते
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
9 Mar 2010 - 1:28 pm | shekhar
तेच असल तरी गुळाची चव दर घाण्याला वेगळी असतेच.
- शेखर