गाभा:
काय करावे .
पेन मागायला काहिना काहिच वाट्त नाहि.
शिक्षिताला पेनाचे मह्त्त्त्व आहे.एक तर माझे पेन ह्ररवतो. त्या चा मला इतक काहि वाट्त नाहि. जितक कोनाला पेन
दिल्यानन्तर परत नाहि मिळाल्ञावर् होतो.मि कितेक वेळा असे पाहिले आहे, महागडे सुट्बुट , टाय घातलेले
माणसे मऴके कपडे असणार्याना पेन मागतात , गरज नसति तर बोलणे देखिल त्याना आवडत नाहि.तो पेन मागताना
' साहेब जरा पेन देता का ' असे म्हणतो . पेन देणार्याला आश्चर्य वाट्ते साहेब सारखा दिसणारा मला साहेब म्हणतो.
तो लगेच पेन देतो
(आणी पेन गमावुन बसतो.)
आपन बैंक, बीमा किवा ऑफ़िस गेल्यावर असे कधी तरी होते कि कोणी आपल्याला पेन मागितला नाहि.
कितेकदा असे होते कि माझ्या कडुन पेन घेवुन काम झाल्या नतर तो पेन घेउन जात असतो आंणी आपण कामात
असल्याने आपण पेन गमावतो.
प्रतिक्रिया
3 Mar 2010 - 12:53 pm | अप्पा जोगळेकर
साईली ताई,
तुमच्या लिखाणामागचा उद्देशच कळला नाही. आणि लिखाण खूपच अशुद्ध आहे हो.
जर तुम्ही अ-मराठी असाल तर मात्र अभिनंदन. कारण तसे असेल तर हे लिखाण चांगले आहे असे म्हणता येईल.
3 Mar 2010 - 5:07 pm | साईली
लेखन अशुद्ध आहे
कारण काहि शब्द सापडत नाहि.
----------------------------
मी नक्की सुधारणा करीन .
आणी हो .... मी मराठी च आहे.
प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद .
3 Mar 2010 - 6:34 pm | विसोबा खेचर
>>आणि लिखाण खूपच अशुद्ध आहे हो.
मिपावरती शुद्धलेखन अत्यावश्यक नाही..!
साईली, तुम्ही लिहा हो बिनधास्त काय चाहेल ते!
तात्या.
3 Mar 2010 - 1:38 pm | अरुण मनोहर
जे Pain देऊन जाते ते पेन.
-------: शाईली
3 Mar 2010 - 1:57 pm | सुनील
मी कधीच लेखणी घेऊन जात नाही. नेहमी दुसर्याचीच वापरतो. काही गोष्टी दुसर्यांच्याच वापराव्यात. चांगले असते ते! ;)
आणि हो, माझ्याकडे लेखण्यांचा मोठा संग्रह जमला आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Mar 2010 - 8:47 am | सुधीर काळे
चपलाही दुसर्यांच्याच वापराव्यात. म्हणून मी देवळातही अनवाणीच जातो! हा हा हा!
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
3 Mar 2010 - 1:59 pm | सुनील
मी कधीच लेखणी घेऊन जात नाही. नेहमी दुसर्याचीच वापरतो. काही गोष्टी दुसर्यांच्याच वापराव्यात. चांगले असते ते! ;)
आणि हो, माझ्याकडे लेखण्यांचा मोठा संग्रह जमला आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Mar 2010 - 2:23 pm | शैलेन्द्र
पेन देताना टोपण काढुन ठेवा.., पेन परत येइल..
(हल्ली कोणाला कसली चर्चा करावीशी वाटेल त्याचा काय नेम नाही)
4 Mar 2010 - 8:12 am | सायबा
बरोबर. मीही पेनचे टोपण काढून पेन देतो. कारण बहुतेक वेळी पेन घेऊन नाहीसा होणारा नकळत पेन खिशाला लावून घाईघाईत निघून जातो. टोपण नसल्यास त्याला ते खिशाला लावता येत नाय. मग आठवते की हे दुसर्याचेच आहे व पेन परत मिळते.
खटक्याचे बॉलपेन असल्यास गेलेच समजा.
सायबा
4 Mar 2010 - 8:45 am | सुधीर काळे
मीही असेच करतो. अगदी रामबाण उपाय. ही कल्पना एकदम मस्त आहे.
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
4 Mar 2010 - 9:02 am | II विकास II
>>मीही असेच करतो.
+१
>>अगदी रामबाण उपाय.
-१
काही लोक तरी सुध्दा पेन घेउन जातात.
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
3 Mar 2010 - 3:01 pm | मितभाषी
तुमच्या लिखाणामागचा उद्देशच कळला नाही. आणि लिखाण खूपच अशुद्ध आहे हो.
मना गावना एक जोडीदार शे. तो निरक्षर आहे. पण पठठ्याच्या खिशाला कायम भारी पेन असनार. खिशात डायर्या, बीलं, अजुन काय काय भरुन खिसा अगदी तट्टम फुगलेला असतो गड्याचा. तर एकदा आम्ही बसलो होतो. एक माणुस हातात डायरी घेवुन याच्याजवळ आला नि याला म्हनाला, साहेब जरा एक पत्ता लिहुन देता का? तसा हा क्षणभर सटपटला कारण याला लिहीता येत नव्हते. पण लगेच सावरुन मोठ्या आवाजात त्या माणासाला म्हणाला, 'आयला जो उठतो तो पेन मागतो, कुणी मला पत्ता लिहुन द्या म्हनतो, मला अजिबात वेळ नाही, तरी हा पेन घ्या नि कोणाकडुनही पत्ता लिहुन घ्या.'...... =)) =))
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
3 Mar 2010 - 3:10 pm | गुपचुप
"मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..."
3 Mar 2010 - 3:11 pm | गुपचुप
"मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..."
3 Mar 2010 - 3:21 pm | मितभाषी
गुपचुप एकच पुरे
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
3 Mar 2010 - 6:21 pm | विनोदबाण़खेले
अहो जरा पेन देता का ?
विनोद बाण़खेले,
९८५०२२९८२२
4 Mar 2010 - 1:22 am | मिसळभोक्ता
पेन म्हणजे अगदीच पी ए आय एन आहे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
4 Mar 2010 - 5:58 am | अगोचर
पेन आणि खोड रबर (लहानपणी) ह्या दोन गोष्टी शेवटपर्यंत टिकल्या तर मोक्ष मिळाल्याचा आनंद होतो. एकतर हरवतात, नाहीतर कोणीतरी मागते आणि परत करत नाही.
दुसऱ्याचे बॉल पेन ढापले तरी रिफील (ह्याला मराठी शब्द काय) संपली असे कधीही होत नाही. भारतातल्या गरम हवेमुळे त्यातल्या त्यात रिफील संपण्याचे तरी प्रकार घडतात. स्वतःकडेच शेवटपर्यंत होते असे तरी वाटते.
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
4 Mar 2010 - 8:41 am | सुधीर काळे
साइलीताई,
मिसळपाववर वापरलं जाणारं 'गमभन' हे सॉफ्टवेअर व 'बरहा' हे सॉफ्टवेअर ९०-९५ टक्के सारखं आहे. तुम्ही बरहा www.baraha.com या site वरून download करा (चकटफू आहे). त्याचे Barahapad व barahadirect असे दोन applications आहेत तीही desktop वर घ्या. बरहाचा help विभाग सुंदर व समजायला सोपा असा व उदाहरणासह लिहिलेला आहे. तुम्हाला सहज समजेल.
'बरहा' वापरायला यायला लागलं कीं 'गमभन'ही येतं.
गमभन जरासं "वाह्यात" सॉफ्टवेअर आहे. ते फक्त हुशार लोकांनाच पूर्णपणे समजतं. मला पूर्ण समजलेलं नाहीं. पण 'बरहा' येत असल्यामुळे 'गमभन' बरंचसं जमतं.
याउप्पर अडचण आल्यास मला 'व्यनि'वर विचारावे. मी आळस न करता आपल्याला समजावून सांगेन. अगदी चकटफू!
खूप लोकांना मी ही मदत केलेली आहे व त्याच्यावरचा एक write-up माझ्याकडे तयार आहे. पण तो आता सांगून उपयोग नाहीं. आधी मी सांगितल्याप्रमाणे करा व मला लिहा.
धन्यवाद.
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
4 Mar 2010 - 8:43 am | पाषाणभेद
मी तर माझा पेन दुसर्याला नेहमी वापरायला देतो. काही फरक पडतो का आपल्याला त्याने. तेवढीच समाजसेवा.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
4 Mar 2010 - 9:33 am | टारझन
अगदी मनातल्या भावना आल्यात साईली तै !! बिंगो !!
ह्या माझं लक्की पेन एका कुडमुड्या तोंडाच्या काकुंनी घेतलन् परत नाही दिलं ! एवढा जीव गेला म्हणून सांगु ! मनात म्हंटलं कधी चुकून तोच पेन टोचेन तुम्हाला असा की ... बास्स !!
- (पेन प्रेमी) सेलोबा ग्रिप्पर
4 Mar 2010 - 9:46 am | मंगेशपावसकर
dear saylee if u wanna download typex software then u can download from typex.com or if u have orkut id then i ll help u to provide. just forward ur id to mgccmangeshpaw@gmail.com
4 Mar 2010 - 11:19 am | राजकारणी
आयला हिथ पन ईग्रजी का??
तुमी मास्तर हाय का वो पावसकर ??( फकस्त्त शन्का )