अंतर

सचिन's picture
सचिन in जे न देखे रवी...
16 Mar 2008 - 12:33 am

ओळींमधलं....मधलंही वाचता आलं पाहिजे
बोलणं अन अबोलणंही...ऐकता आलं पाहिजे
मौनं सर्वार्थसाधनं की स्वार्थसाधनं..जोखता आलं पाहिजे
खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे

वळू पाहणार्‍या पावलाला थांबता आलं पाहिजे
पण थांबू पाहणार्‍या पावलालाही चालता आलं पाहिजे
मोहाच्या नशेत झुलतानाही जागता आलं पाहिजे
खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे

आसुसल्या मनालाही वाट पहाता आलं पाहिजे
अजाणत्या वेडेपणातही भान राखता आलं पाहिजे
व्यक्तापेक्षा अव्यक्तच समजून घेता आलं पाहिजे
खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

16 Mar 2008 - 12:37 am | स्वाती राजेश

सचिन छानच कविता लिहिली आहेस.
व्यक्तापेक्षा अव्यक्तच समजून घेता आलं पाहिजे
खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे
या ओळी मस्त वाटल्या.

फटू's picture

16 Mar 2008 - 12:42 am | फटू

खूप छान लिहिली आहे कविता. आवडली...

प्राजु's picture

16 Mar 2008 - 12:47 am | प्राजु

छान कविता.

अजाणत्या वेडेपणातही भान राखता आलं पाहिजे
व्यक्तापेक्षा अव्यक्तच समजून घेता आलं पाहिजे

हे आवडले.

- (सर्वव्यापी)प्राजु

इनोबा म्हणे's picture

16 Mar 2008 - 1:12 am | इनोबा म्हणे

सही...!जबरदस्त कविता लिहीली तुम्ही सचिनराव...
सर्वच कडवी उत्तम असल्याने कोणत्याही एका कडव्याचा उल्लेख करत नाही.येऊ द्या अजून काही अशीच.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विसोबा खेचर's picture

16 Mar 2008 - 12:28 pm | विसोबा खेचर

वा सचिनराव! क्या बात है...

केवळ अप्रतिम कविता....

आसुसल्या मनालाही वाट पहाता आलं पाहिजे
अजाणत्या वेडेपणातही भान राखता आलं पाहिजे
व्यक्तापेक्षा अव्यक्तच समजून घेता आलं पाहिजे
खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे

या ओळी अतिशय आवडल्या...

आपला,
(व्यक्ताव्यक्त!) तात्या.