हुसेन, हिंदू, त्यांच्या दुखावणार्‍या भावना आणि आमचं (अर्थात) शंकेखोर मन...

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
26 Feb 2010 - 6:32 pm
गाभा: 

मकबूल फिदा हुसेन यांना कतारचे नागरिकत्व बहाल झाल्याने जो उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार भवताल व्यापून राहिला आहे, त्यामुळे आमचे शंकाखोर मन पुन्हा उसळी खाऊ लागले. भावनाविष्काररूपी अमृताच्या मंथनातून उत्पन्न झालेल्या काही शंका:

  • परकीय नागरिकत्व घेतल्याने अशा त्रासदायक, हरामी इसमाची आपसूकच आपल्या पवित्र देशातून मरेस्तोवर हकालपट्टी झाली, तर आम्हांस किंचितसा आनंद का बरे होत नाही? सभोवार इतका क्षोभ का?
  • या प्रकाराने आपल्या पवित्र देशाची नालस्ती कशी होते? आम्हांस वाटले होते की ९५ वर्षांच्या वृध्दास कोठडीत डांबून तृतीय रत्न दाखविल्यास नालस्ती होण्याची शक्यता होती.
  • 'भारतात अल्पसंख्याकांच्या जिवास धोका आहे' असा अपप्रचार करण्यास इस्लामी आणि मानवतावादी यांचे फावते. - यास इलाज काय? अखेर, हुसेन यांच्यावर हल्ले आपणच केले, १२५०खटले आपणच भरले, त्यांविषयीच्या हलाहलाने आंतरजाल आपणच भरले. मग आता त्याची फळे आपणच भोगायची. यांतले काहीच न होते, तर आपण इतरांस 'तुम्ही कांगावा करता' असे छातीठोकपणे म्हणू शकलो असतो. रणांगणावर गेल्यावर रक्तमांसाचा चिखल अंगावर उडताच गर्भगळित होणारे नेभळट तर आम्ही नव्हेत. आम्ही तर ही अभिमानाने मिरवण्याची बाब मानायला हवी.
  • आणि मुळात आम्हांस पडलेला एक 'सनातन' प्रश्नः आमची पुराणे आणि त्यांवर आधारित आमचे अभिजात साहित्य तर देवादिकांच्या आणि ऋषीमुनींच्या चाळ्यांनी आणि त्यांच्या सुटलेल्या चळांच्या रसभरित वर्णनांनी ओतप्रोत भरले आहे. आमचे देव काही अनाघ्रात मेरीच्या पोटी जन्मास आलेल्या येशुबाळासारखे शामळू आणि पुळचट नव्हते. पुष्ट, मांसल शरीरांच्या स्त्रिया दाखवून याच देवादिकांचे चित्रण करणार्‍या राजा रविवर्म्याची चित्रे - उदा. ही आमची शकुंतलाआजी. आमच्या (दुष्यंत नसलेल्या) आजोबांचा हिच्यावर फार जीव! - तर आबालवृध्दांच्या नजरा निवळण्यासाठी अभिमानाने आपापल्या दिवाणखान्यांत एकेकाळी मिरवणारे आपण इतके का बरे त्रासलो? सारखे एवढ्या-तेवढ्यास हात कलम करणे, दगड फेकून मारणे असे रानटी आणि रासवट चाळे करणार्‍यांच्या रांगेत जाऊन बसण्यास आपण एवढे उतावीळ का बरे झालो?

असो. आता आम्ही आमच्या शंकेखोर मनास आलेला शीण हलका करण्यासाठी या संस्थळाच्या मुखपॄष्ठावरील पुष्ट, कायस्थ स्त्रीचे काही काळ आमच्या लोलुप नेत्रांनी अवलोकन करावे म्हणतो. अहो, त्यातून आमच्या पुणेरी बावन्नखणी संस्कृतीचे रक्षण होते! आता परस्त्री देवी असते, असे या जननी-जन्मभूमीत काही जण मानतात म्हणे. आशा आहे की आमच्या संस्कृतीरक्षक लोलुप अवलोकनाने अशा कायस्थ वा कायस्थेतरांच्या भावना दुखावणार नाहीत!

आपला स्नेह-(आणि बरेच काही) लोलुप,
चिंतातुर जंतू

प्रतिक्रिया

JAGOMOHANPYARE's picture

26 Feb 2010 - 8:32 pm | JAGOMOHANPYARE

कतार काळजात घुसली! :)

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

शुचि's picture

26 Feb 2010 - 8:42 pm | शुचि

हरामी मस्त शब्द वापरलात!!!!!! .......... अजून काही आहेत पण इथे देता येत नाहीत.

वोह बुढढा जा रहा है यही अच्छी बात है!!! - खरं बोललात.

जाता जाता , जिस थाली मे खाया वही छेद करके गया सूअर की अवलाद!!!

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चिंतातुर जंतू's picture

27 Feb 2010 - 10:49 am | चिंतातुर जंतू

हरामी मस्त शब्द वापरलात!!!!!! .......... अजून काही आहेत पण इथे देता येत नाहीत.

याविषयी आम्ही धन्यवाद व्यक्त करू शकत नाही, कारण ते कर्तृत्व आमचे नाही; आम्ही इतरांच्या भावनांचे प्रकटन करण्याचा फक्त यत्न करीत होतो.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

राजेश घासकडवी's picture

26 Feb 2010 - 11:36 pm | राजेश घासकडवी

आमचे देव काही अनाघ्रात मेरीच्या पोटी जन्मास आलेल्या येशुबाळासारखे शामळू आणि पुळचट नव्हते.

आणि आम्ही देखील त्या धार्मिकांप्रमाणे पुळचट नव्हे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत एका चित्तरड्याने मेरीचे चित्र शेणाने व खऱ्या विष्ठेने फासले व ती कला म्हणून सादर केले. त्यावर लोकांची प्रतिक्रिया? "हे असले करावे तर स्वत:च्या पैशाने करावे. सरकारी ग्रांट घेऊन करू नये" इतकी शामळू झाली. बरं ही नुसतीच बोलाची कढी - ग्रांट काढून वगैरे काही घेतली नाही. त्यावर खटला भरणे, हल्ले करणे, देशातून हाकून लावणे वगैरे काहीच त्यांना सुचले नाही. निदान जिथे ते प्रदर्शित केले होते तिथे तोडफोड करणे, त्या चित्राची विटंबना करणे (अर्थात कशाने करणार हा प्रश्न असेलच) गॅलरीच्या मालकाला हग्या दम भरणे - काही, काही नाही. याला कल्पनाशून्यता म्हणावे, की कर्मदारिद्र्य? या बाबतीत अमेरिकन लोकांना महत्त्वाची कृती करण्याच्या बाबतीत द्यावा लागणारा वेळ व कष्ट देण्याची तयारी नसते हेच खरे!
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या तत्त्वांना एकनिष्ठ राहायचे म्हणजे किती? त्याला काही सुमार? अं? शेवटी भावना, भावना म्हणून म्हणतात ती काही नाहीच का?

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Feb 2010 - 12:43 am | अक्षय पुर्णपात्रे

अमेरिकन लोकांना 'शामळू आणि पुळचट' म्हणण्याचा निषेध नोंदवतो.

निदान जिथे ते प्रदर्शित केले होते तिथे तोडफोड करणे, त्या चित्राची विटंबना करणे (अर्थात कशाने करणार हा प्रश्न असेलच) गॅलरीच्या मालकाला हग्या दम भरणे - काही, काही नाही. याला कल्पनाशून्यता म्हणावे, की कर्मदारिद्र्य?

एकटाच का असेना पण एका ७२ वर्षीय शूर नागरिकाने ते कर्तव्य केले आहे. कल्पनाशून्यता आणि कर्मदारिद्र्य या दोहोंचाही अभाव सदर वीराच्या कृतीतून दिसून येतो. (येथे वाचा)

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 1:22 am | राजेश घासकडवी

माझी टिप्पणी एकंदरीत अर्धवट ज्ञानातून झाली म्हणायची. मी दुरुस्तित उभा आहे (आय स्टॅंड करेक्टेड).

एकंदरीत अमेरिकेत देखील असले जुन्या पठडीतले खंदे वीर आहेत तर. तिचं भविष्य अगदीच काही शेणाने माखलेलं नाही म्हणायचं तर. कोणीतरी नक्की रंगसफेदी करेल...:-)

विकास's picture

27 Feb 2010 - 1:49 am | विकास

अमेरिकेत तुम्ही म्हणता तसे नक्कीच होत नाही. आणि तसेच स्वातंत्र्य भारतात पण असायला हवे - सर्वांना समानतेने, असेच वाटते. (अर्थात त्यासाठी लोकशाही मानली पाहीजे बरं का! ;) )

पण बाकी तुम्ही अमेरिकन्सना शामळू म्हणालात ते काही पटले नाही. धर्माधारीतच भावनांचा उद्रेक हा प्लॅन्ड पेरेंटहूड सारख्या हॉस्पीटल्सच्या बाहेर कसा होतो ते माहीत आहे ना? डॉक्टरांवरपण गोळ्या झाडल्या जातात त्याच्यामागे धर्मच असतो ना? ब्रँच डेव्हीडीयन, वॅको टेक्सास प्रकरण (क्लिंटनच्या काळातले) आठवते का? आणि त्याला कायद्याने (जेनेट रेनो) उत्तर दिल्याबद्दल झालेला हलकल्लोळ आणि त्यातून घडलेले ओक्लाहोमा बाँबिंग? - जाउंदेहो मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी.... आपण भारतीय फार क्षुल्लक आहोत त्यांच्यापुढे.

बाकी अमेरिकेत जसा चर्चमुळे असलेल्या देवाने असे घडते तसेच व्यवहारातील देवामुळे - अर्थात पैसा आणि करीअरमुळे काय घडते ते माहीत असेलच. टेन्युअर नाकारल्यावर अलाबामा मधे प्राध्यापकांना (त्यात एक भारतीयपण होता) मारणारी एमी बिशप झाली काय किंवा टेक्सास मधे आयआरएसच्या इमारतीवर विमानाने हल्ला करणारा झाला काय शामळू नक्कीच नाहीत. :)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

रविवर्म्याची शंतनू आणि सत्यवती. भावना भडकल्यास पूजेअर्चेचा मार्ग मोकळा आहेच.
पुराणकालातील ललना
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

Nile's picture

28 Feb 2010 - 3:40 am | Nile

हा हा हा!

ही आमची शकुंतलाआजी. आमच्या (दुष्यंत नसलेल्या) आजोबांचा हिच्यावर फार जीव!

ह्या वाक्याने पाणावले.. डोळे! ;)
तुमच्या चिंतेने कुणाचे कुठले जंतु उद्दीपीत होतील ह्याची कल्पना करवत नाही!

पण एक निरिक्षण नोंदवु इच्छितो, रवि वर्म्याच्या चित्रांना पाहुन जे काय होतं तसलं हुसेनच्या चित्रांनी होत नाही हो. (म्हणजे हुसेनकडे पाहुन जितकी किळस येइल तितकीच त्याची चित्रे पाहुन येते!)

हुप्प्या's picture

28 Feb 2010 - 5:28 am | हुप्प्या

१. शंतनू आणि सत्यवती वगैरे लोक काही कुणी देवस्थानी मानल्याचे ऐकिवात नाही.
२. सीतेला रावणाबरोबर अर्धनग्न वा तत्सम प्रकारे दाखवणे आणि शंतनू सत्यवती किंवा शकुंतला दुष्यंतांची कामुक चित्रे ह्यात फरक आहे. रामायणात रावणाने सीतेवर जबरदस्ती केल्याबद्दल लिहिलेले नाही किंवा सीता रावणाला भुलल्याचेही लिहिलेले नाही. तसे असताना हुसेनच्या बच्च्याने असले अभद्र चित्र का काढावे बरे?
३. भूतकाळातील मढी उकरून तसेच वागायचे असे ठरवून कसे चालेल? २००-३०० वर्षापूर्वी अस्पृश्यता सर्रास होती म्हणून आज कुणी त्याविरुद्ध आवाज उठवता कामा नये असे म्हणता का? शिवाजी, शहाजी वगैरे मंडळींना अनेक लग्ने करता यायची म्हणून आज कुण्या हिंदूला तसे केलेले खपवून घेतात का? नाही. त्याकरता मुस्लिम बनण्याचा कायदेशीर मार्ग स्वीकारावा लागतो. महम्मदाने वयाच्या ५० व्य वर्षी ९ वर्षाच्या कन्येशी लग्न करुन ११व्या वर्षी शरीरसंबंधही केला म्हणून आज कुणी मुस्लिम तसे करतो का? किंवा महम्मदाला तसे केल्याबद्दल नावे ठेवतो का?
तस्मात वर्तमानकाळाकडे बघावे. "हात कलम करणारी, दगडाने ठेचणारी" मंडळी म्हणून ज्यांचे वर्णन करता त्या मंडळींचा काही अंशी तरी हा थेरडा प्रतिनिधी आहे. त्यामुळे ज्याचा धर्म असा हळवा, सहज दुखावणारा आहे, त्याने इतरांच्या धर्माची विटंबना करताना थोडा विचार करायला हवा होता. "हात कलम करणारी, दगडाने ठेचणारी" मंडळींनी ह्या देशात अनेक वेळा अनेक गोष्टींवर आपल्या दुखावलेल्या भावनांची सबब वापरुन बंदी आणली आहे. अशी पूर्वपीठिका असताना हिंदूंनी मात्र मऊ मेणाहूनी असावे असा आग्रह का?

थोडक्यात हा काळाचा महिमा आहे. इतकी वर्षे मुस्लिमांच्या दुखर्‍या भावनांवर फुंकरा घालण्यात राज्यकर्ते मग्न होते. आता हिंदूंही तसेच वागायला शिकले. एकाला जो न्याय लावला तोच दुसर्‍यालाही लागू असावा नाही का?

चिंतातुर जंतू's picture

28 Feb 2010 - 11:26 pm | चिंतातुर जंतू

आपल्या प्रतिसादावरून आमच्या शंका आपणास नीट कळल्या नसाव्यात, असे वाटते. डोक्यात अंगार असल्यावर होते असे.

१. शंतनू आणि सत्यवती वगैरे लोक काही कुणी देवस्थानी मानल्याचे ऐकिवात नाही.

तो मुद्दा नाही. ज्यांची चरित्रे मुळातच 'रसरशीत' आहेत, अशांना देवस्थानी ठेवले की कालिदासापासून कालच्या लांड्या पोट्ट्यापर्यंत सर्वांचे फावते. त्यापेक्षा आपले देवच बदला ना! सर्व प्रश्न सुटतील.

२. सीतेला रावणाबरोबर अर्धनग्न वा तत्सम प्रकारे दाखवणे आणि शंतनू सत्यवती किंवा शकुंतला दुष्यंतांची कामुक चित्रे ह्यात फरक आहे. रामायणात रावणाने सीतेवर जबरदस्ती केल्याबद्दल लिहिलेले नाही किंवा सीता रावणाला भुलल्याचेही लिहिलेले नाही. तसे असताना हुसेनच्या बच्च्याने असले अभद्र चित्र का काढावे बरे?

अच्छा, म्हणजे कोण्या एका कथेवर आधारित कामुक चित्रे चालतील, पण तसा आधार नसलेली (आणि कामुकही नसलेली) नग्नता म्हणजे अभद्र, असे म्हणता होय! असो. आम्ही कर्नाटकात असलेल्या सीता-रावणाच्या प्रेमाच्या पारंपरिक आख्यायिका (चवीचवीने) सांगितलेल्या ऐकल्या आहेत. त्यातल्या एकीत तर अयोध्येत परतल्यावर सीता आपल्या पलंगाखाली रावणास दडवून ठेवते असे होते. त्यामुळे जबरदस्तीच असावी असे आम्हांस तरी विशेष आवेशाने म्हणण्यास जागा नाही.

३. भूतकाळातील मढी उकरून तसेच वागायचे असे ठरवून कसे चालेल? २००-३०० वर्षापूर्वी अस्पृश्यता सर्रास होती म्हणून आज कुणी त्याविरुद्ध आवाज उठवता कामा नये असे म्हणता का? शिवाजी, शहाजी वगैरे मंडळींना अनेक लग्ने करता यायची म्हणून आज कुण्या हिंदूला तसे केलेले खपवून घेतात का? नाही. त्याकरता मुस्लिम बनण्याचा कायदेशीर मार्ग स्वीकारावा लागतो. महम्मदाने वयाच्या ५० व्य वर्षी ९ वर्षाच्या कन्येशी लग्न करुन ११व्या वर्षी शरीरसंबंधही केला म्हणून आज कुणी मुस्लिम तसे करतो का? किंवा महम्मदाला तसे केल्याबद्दल नावे ठेवतो का?

अच्छा, नग्नता हे भूतकाळातले मढे आहे, होय. आमच्या माहितीनुसार अस्पृश्यता आज वाईट मानली जाते, पण नग्नता तर आजकाल पूर्वीहून कमी आक्षेपार्ह आहे. रविवर्म्याची चित्रे काहीच नाहीत, इतकी कामुकता आज आमच्या वाहिन्यांवरून ओघळत असते. त्यामुळे काळानुसार नग्नतेच्या बाबतीत आमची जननी जन्मभूमी तर फार प्रगती करून राहिली आहे. धर्माचा पगडाही आता कमी झाला आहे. पाव खाल्ल्याने धर्म बुडणारी मंडळी आता पिझ्झा, बर्गर आणि वडा-पाव त्रिकाळ खातात. त्यामुळेच आता असल्या चित्रांना घेऊन कुथणारेच भूतकाळातली मढी उकरताहेत, असे आमच्या बालमनास वाटले, तर त्यात आमचा काय बरे दोष?

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

टारझन's picture

28 Feb 2010 - 11:55 pm | टारझन

चिंतातुर आणि हुप्प्या षि सहमत :)

- हुप्प्यातुर

हुप्प्या's picture

1 Mar 2010 - 10:15 am | हुप्प्या

<<
अच्छा, म्हणजे कोण्या एका कथेवर आधारित कामुक चित्रे चालतील, पण तसा आधार नसलेली (आणि कामुकही नसलेली) नग्नता म्हणजे अभद्र, असे म्हणता होय! असो. आम्ही कर्नाटकात असलेल्या सीता-रावणाच्या प्रेमाच्या पारंपरिक आख्यायिका (चवीचवीने) सांगितलेल्या ऐकल्या आहेत. त्यातल्या एकीत तर अयोध्येत परतल्यावर सीता आपल्या पलंगाखाली रावणास दडवून ठेवते असे होते. त्यामुळे जबरदस्तीच असावी असे आम्हांस तरी विशेष आवेशाने म्हणण्यास जागा नाही.
<<
मुख्य लोकप्रवाहात रामायणातील ह्या गोष्टी दाखवलेल्या नाहीत. आपण चवीचवीने काय ऐकता ते खाजगीत ठेवले तर कोणाचे काही म्हणणे नाही. पण हुसेनचे काम सार्वजनिक पातळीवर होते. कुठलीतरी विकृत आख्यायिका ही रामायणाची अधिकृत आवृत्ती असल्यासा आव आणण्याचे कारण नाही.
<<
अच्छा, नग्नता हे भूतकाळातले मढे आहे, होय. आमच्या माहितीनुसार अस्पृश्यता आज वाईट मानली जाते, पण नग्नता तर आजकाल पूर्वीहून कमी आक्षेपार्ह आहे.
<<
धार्मिक विषयावरती नग्न अश्लील चित्रे काढणे हे आजच्या हिंदू धर्मात प्रचलित नाही. आणि हुसेनची विकृत चित्रे ही आजच्या काळाच्या संदर्भात चर्चिली जात आहेत.
टीव्ही आणि सिनेमातील नग्नता आणि देवघरातील देवांची नग्नता ह्यात फरक आहे हे सांगायची खरे तर गरज नाही. पण वेड पांघरून पेडगावला जाणार्‍यांना सांगावे लागते. वडाची साल पिंपळाला लावू नये.
पुन्हा एकदा, जो इसम एका अत्यंत ताठर, कर्मठ धर्माचा काही अंशी तरी प्रतिनिधी आहे त्याने इतरांच्या धार्मिक भावना दुखावताना विचार केला पाहिजे. हुसेनने मी मुस्लिम नाही असे म्हटल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही.

चिंतातुर जंतू's picture

2 Mar 2010 - 11:21 am | चिंतातुर जंतू

आम्ही कर्नाटकात असलेल्या सीता-रावणाच्या प्रेमाच्या पारंपरिक आख्यायिका (चवीचवीने) सांगितलेल्या ऐकल्या आहेत. त्यातल्या एकीत तर अयोध्येत परतल्यावर सीता आपल्या पलंगाखाली रावणास दडवून ठेवते असे होते. त्यामुळे जबरदस्तीच असावी असे आम्हांस तरी विशेष आवेशाने म्हणण्यास जागा नाही.
<<
मुख्य लोकप्रवाहात रामायणातील ह्या गोष्टी दाखवलेल्या नाहीत. आपण चवीचवीने काय ऐकता ते खाजगीत ठेवले तर कोणाचे काही म्हणणे नाही. पण हुसेनचे काम सार्वजनिक पातळीवर होते. कुठलीतरी विकृत आख्यायिका ही रामायणाची अधिकृत आवृत्ती असल्यासा आव आणण्याचे कारण नाही.

सर्वप्रथमः आम्ही चवीचवीने काय सांगितले जाते, ते निदर्शित केले होते. यात आमच्या चवीचा मुद्दा कुठे येतो? आम्हास शंका पडल्या एवढेच काय ते आमचे कर्तृत्व.

आता आला प्रश्न मुख्य प्रवाहाचा. दक्षिणेतील विविध भागांत होणारी रावणाची पूजा आणि रामायणाविषयीच्या उपरनिर्देशित कथेसारखी अनेक उदाहरणे आपणांस ठाऊक नाहीत, असे दिसते. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे 'जांभूळ आख्यान' पिढ्यान् पिढ्या सांगितले जाते, त्याच प्रमाणे दक्षिणेत अशी अनेक आख्याने यक्षगान, कथकली वगैरे पारंपरिक नृत्य-नाट्य प्रकारांद्वारे थेट मंदिरांत शेकडो वर्षे सर्रास सादर केली जातात. त्यांविषयी कधी कोणी आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. यावरून एक क्रांतिकारी विचार (शंका नव्हे) मनात आला. नाहीतरी बराचसा दक्षिण भारत आखातात वसलेला आहेच. आपल्यासारख्या काही सद्गृहस्थांनी याकडे लक्ष दिल्यास उरलेला दक्षिण भारत हुसेनांप्रमाणेच आखातात ढकलला जाऊन 'आपले' रामायणही पवित्र राहील, आणि जाताजाता लोकसंख्येचा प्रश्नही आपसूक सुटेल.

प्रतिसाद संपादित

प्रतिसाद अद्ययावतः 'प्रतिसाद संपादीत' यात मुद्रितशोधनोत्तर सुधारणा व संपादित शीर्षक अद्ययावत
प्रति संपादकः अहो, श्रध्दास्थानांविषयी थोडे स्वातंत्र्य होळीस तरी घेऊ द्यायचे होते, पण असो. भावना पोचल्या. तसदीबद्दल क्षमस्व.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

युयुत्सु's picture

1 Mar 2010 - 12:36 pm | युयुत्सु

धार्मिक विषयावरती नग्न अश्लील चित्रे काढणे हे आजच्या हिंदू धर्मात प्रचलित नाही.

आजचा हिंदू धर्म नक्की काय आहे हो? मनुस्मृतीची लेटेस्ट आवृत्ती विहिंप किंवा बजरंग दलाने काढली असल्यास मला विकत घ्यायची आहे. कृ. डिटेल्स कळवावेत...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

विसोबा खेचर's picture

28 Feb 2010 - 11:58 pm | विसोबा खेचर

या हुसेनला एकदा धरून जाम चोपून काढला पहिजे! :)

तात्या.

टारझन's picture

28 Feb 2010 - 11:59 pm | टारझन

तुम्ही धरा ... मी चोपतो :)

टार्‍या.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Mar 2010 - 12:07 am | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

1 Mar 2010 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार

त्या येडझव्या हुसेनसाठी आणी काही खास गोष्टी चवीचवीने ऐकण्यासाठी लोकांकडे येवढा फालतु वेळ आहे हे बघुन फालतु आश्चर्य वाटले.

असो...चालु द्या.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

II विकास II's picture

27 Mar 2010 - 8:16 am | II विकास II

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5728379.cms

आपल्याविरूद्धचे सर्व खटले मागे घ्यावेत आणि पुन्हा भारतात परतण्याच्या दृष्टीने सरकारला योग्य ती पावले उचलण्याचे आदेश द्यावेत, अशी वादग्रस्त चित्रकार एम. एफ. हुसैन यांनी केलेली मागणी सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली.

मुख्य सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या खंडपीठापुढे ९५ वर्षीय हुसैन यांची याचिका सुनावणीसाठी आली असता, त्यांनी हे आदेश दिले. आपणाला भारतात परतायचे असून, त्यापूर्वी आपणाविरुद्धचे सर्व खटले मागे घ्यावेत, अशी याचिका त्यांनी दाखल केली आहे. हुसैन यांना भारतात येण्याचा अधिकार आहे, मात्र तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, अशी पुस्तीही कोर्टाने जोडली.

हुसैन यांनी अलिकडेच भारतीय पासपोर्ट जमा केला असून, कतारचे नागरिकत्व स्वीकारले आहे. हिंदू देवदेवतांची नग्न चित्रे काढल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध विविध कोर्टात खटले दाखल करण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते अज्ञातवासात राहत होते.

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Mar 2010 - 8:57 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री विकास, बातमीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. पण महाराष्ट्र टाइम्समधील वृत्त अत्यंत त्रोटक आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाने श्री हूसेन यांची याचिका फेटाळून लावण्यामागे काहीच कारणे दिलेली नाहीत. शक्य असल्यास अधिक माहिती असलेला दुवा द्यावा. (कृपया टाइम्स उद्योगसमुहाच्या कुठल्याही वृत्तपत्राचा दुवा देऊ नये. इंडियन एक्सप्रेस व हिंदू या वृत्तपत्रांमध्ये ही बातमी शोधली पण सापडली नाही.)

चित्रगुप्त's picture

27 Mar 2010 - 8:56 am | चित्रगुप्त

आता तिकडे राहून त्यांच्या प्रेषितांच्या अकरा बायकांची तसली चित्रे काठून बघा म्हणावं, मग बघा काय होते ते....

वेताळ's picture

27 Mar 2010 - 10:16 am | वेताळ

त्याला तोंड लपवत फिरायची पाळी यावी ह्यासारखी दु:खद घटना ती कोणती?
भारतात परत आल्यावर त्याला अटकपुर्व जामीन मिळु शकतो. मग आता केस मागे घ्या असा बालहट्ट का धरावा?
डॅनिश कार्टुनिस्टने जे कार्टुन काढले आहे त्याबद्दल हुसेनचे मत काय आहे? तो पण एक कलेचा अविष्कार नव्हे का? मग त्याला मारण्याचा फतवा का बरे मुस्लिम देशांनी काढावा?
असे खुप प्रश्न हुसेनबद्दल अनूत्तरीत आहेत.

वेताळ

मिपावरील एखाद्या प्रतिभावान संगणकीय चित्रकारा कडून हुसेन यांच्या गर्भाधान प्रसंगाचे चित्र काढून घ्यायचे आहे...
त्यात गर्भाधाना साठी हुसेन चा बाप घोड्याच्या केसांचा ब्रश इंद्रिया च्या जागी लावून वापरतो आहे.. व त्याची आई फाटक्या कॅन्व्हास वर झोपून पार्श्वभागा कडून हुसेन चे बीज स्वीकारत आहे व त्या बीजाला देखील दाढी आहे...

आणि ज्याना ज्याना हुसेन चे कव्तिक आहे त्यानी असेच स्वतःच्या गर्भाधानाचे चित्र वरील प्रमाणे काढून स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यात लावावे.

संपादक महाशय... रामायण आणी इतर प्रतिसाद चालत असतील तर हा प्रतिसाद काढायचे काही कारण नाही असे वाटते...

गोगोल's picture

27 Mar 2010 - 3:01 pm | गोगोल

> त्याची आई फाटक्या कॅन्व्हास वर झोपून पार्श्वभागा कडून हुसेन चे बीज स्वीकारत आहे

तुमचा बेसिक मध्येच राडा आहे..

त्या बीजाची लायकी तीच आहे. पार्श्वभागातून येण्या जाण्याची. त्याशिवाय का हुसेन ला इतका सडका मेंदू मिळाला ?