विडंबन-गुत्त्याच्या रे उंबरठ्यावर आपण दोघे.

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
14 Mar 2008 - 10:11 pm

आमची प्रेरणा- आपण दोघे ही रुपेश देशमुख यांची गझल.

कधी न संयमी, सदा अनावर आपण दोघे;
गुत्त्याच्या रे उंबरठ्यावर आपण दोघे.
तापवून रे उगाच डोके भांडण करतो;
थंड ओततो सोडा त्यावर आपण दोघे.
तेच तेच ते बोलत बसता उजाडते ही;
एकमेका म्हणतो आवर; आपण दोघे.
बिल आणतो कशास साकी; कुणी द्यायचे?
शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे.
जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही;
कधी तरी राहू भानावर आपण दोघे.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

14 Mar 2008 - 11:46 pm | प्राजु

जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही;
कधी तरी राहू भानावर आपण दोघे.

हे छान.

- (सर्वव्यापी)प्राजु

इनोबा म्हणे's picture

15 Mar 2008 - 10:53 am | इनोबा म्हणे

बिल आणतो कशास साकी; कुणी द्यायचे?
शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे.

जबरा...
बाकी बरेच दिवस दिसला नाही तुम्ही.जोरदार कमबॅक झालं बॉ

जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही;
कधी तरी राहू भानावर आपण दोघे.

हे काय आमाला जमायचं नाय...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

सृष्टीलावण्या's picture

15 Mar 2008 - 11:03 am | सृष्टीलावण्या

अविनाश ओगले - मद्य = शून्यभोपळा

:)

कविता अगदी हृदयापासून आली आहे...

>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

विसोबा खेचर's picture

15 Mar 2008 - 11:51 am | विसोबा खेचर

तापवून रे उगाच डोके भांडण करतो;
थंड ओततो सोडा त्यावर आपण दोघे.

वा वा! या ओळी मस्त बरं का ओगलेशेठ...

आपला,
(ऑन द रॉक्स्वाला) तात्या.