या दोन ओळी घ्या... पुढचे शेर लिहा........

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
14 Mar 2008 - 8:42 pm

या दोन ओळी गेले खूप दिवस मनात घोळताहेत... मिपाकरांनी पुढचे शेर लिहावेत...

ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू
हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

14 Mar 2008 - 9:03 pm | चतुरंग

ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू
हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु

दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू
देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु?

चतुरंग

तळीराम's picture

14 Mar 2008 - 10:29 pm | तळीराम

ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू
हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु

दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू
देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु?

लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही
लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु

वरदा's picture

14 Mar 2008 - 11:11 pm | वरदा

ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू
हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु

दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू
देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु?

लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही
लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु

स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग
नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु

येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे
सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु

प्राजु's picture

14 Mar 2008 - 11:40 pm | प्राजु

ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू
हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु

दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू
देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु?

लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही
लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु

स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग
नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु

येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे
सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु

थोडासा धिर धर, किनारा नाही दूर
लगाम नको सोडू, जरा अवखळ आहे वारू..

बळ आहे मनगटी, इच्छाशक्ती दुर्दम्य उरी
घे भरारी मजसवे , संकटांना आपण पुरून उरू

- प्राजु

- (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट's picture

15 Mar 2008 - 2:42 am | व्यंकट

ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू
हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु

दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू
देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु?

लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही
लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु

स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग
नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु

येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे
सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु

थोडासा धिर धर, किनारा नाही दूर
लगाम नको सोडू, जरा अवखळ आहे वारू..

बळ आहे मनगटी, इच्छाशक्ती दुर्दम्य उरी
घे भरारी मजसवे , संकटांना आपण पुरून उरू

हुश्श्य संपला आठवडा, लागला विकेंड पुकारू
दोन घोट घेऊ आणिक, कुठेतरी जाऊन चरू

व्यंकट

विजुभाऊ's picture

15 Mar 2008 - 11:31 am | विजुभाऊ

ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू
हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु

दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू
देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु?

लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही
लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु

स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग
नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु

येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे
सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु

थोडासा धिर धर, किनारा नाही दूर
लगाम नको सोडू, जरा अवखळ आहे वारू..

बळ आहे मनगटी, इच्छाशक्ती दुर्दम्य उरी
घे भरारी मजसवे , संकटांना आपण पुरून उरू

हे कोण जाणतो कोठे ; असेल उद्याचा वारू
असेल उरी ध्येय नवे एक अन एक नवे तारु

........विजुभाऊ

विसोबा खेचर's picture

15 Mar 2008 - 11:47 am | विसोबा खेचर

एक छानशी कविता तयार झाली की बघता बघता! :)

आपला,
(आनंदीत!) तात्या.