मंडळी आज सकाळ सकाळ बेत केला होता दडपे पोहे.
साहित्यः
१. ३-४ चमचे तेल
२.जिरे (फोडणीसाठी)
३.मोहरी (फोडणीसाठी)
४.एक चमचा हळद
५.एक चमचा मीठ
६.एक चमचा पिठीसाखर
७.दोन भरलेल्या मिरच्या तुकडे करुन (माझ्याकडे भरलेल्या मिरच्या नसल्याने मी लाल मिरच्या वापरल्या)
८.१०-१५ कडिपत्त्याची पाने
९.कोथिंबीर
१०.एक मिरची कापून
११.एक कांदा कापून (बारीक कापला नसला तरी चालेल)
१२.मूठभर शेंगादाणे.
१३.दोन चमचे दही
१४.पातळ पोहे
कृती:
एका कढईमधे तेल घ्या.
त्यात शेंगादाणे परतून्/तळून घ्या.
त्यातच आता जिरे मोहरी हिंग टाकून फोडणी करा.
आता कोथिंबीर, कडीपत्ता, कांदा, हिरवी आणी लाल मिरची फोडणीत परतून घ्या.
परतल्यानंतर त्यात हळद टाका.
एका पातेल्यात पातळ पोहे घेउन त्यावर ही फोडणी टाका.
वरून दोन चमचे दही टाका. कालवा.
कोणाचीही वाट न बघता हाणायला सुरुवात करा.
प्रतिक्रिया
21 Feb 2010 - 10:50 pm | काजुकतली
वाव......... अगदी मस्त उद्याच करते.
माझ्याकडे आहेत भरल्या मिरच्या.. त्या फोडणीत घालाव्या की वेगळ्या तळून मग चुरुन टाकाव्या.. (चुरुन टाकल्या तरी मस्त लागतील माझ्या मते)
21 Feb 2010 - 10:53 pm | प्रभो
भरल्या मिरच्या असतील तर त्या वेगळ्या तळून चुरून टाका. फोडणीत टाकायची गरज नाही.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
21 Feb 2010 - 10:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दडपे पोहे भारी झालेले दिसतात.
अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
21 Feb 2010 - 10:52 pm | रेवती
फोटू मस्त रे ज्यु. गणपा!
हे अगदीच वेगळे दडपे पोहे आहेत.
माझी कृती थोडी वेगळी आहे.
आता द. पो. करीन तेंव्हा फोटू टाकीन.
रेवती
21 Feb 2010 - 10:57 pm | टारझन
प्रभ्या चोच्या ... कांदा कमी खा भाड्या ! :) हॅहॅहॅ ..
बाकी पोहे म्हणजे जीव की प्राण :)
- (पोहे प्रेमी) टारझन
21 Feb 2010 - 11:09 pm | मेघवेडा
छान! असंच आणि काय काय करत राहा!
साग्रसंगीत जेवण बनवत असशील तर त्याही पाकृ टाक लेका!
बाकी पोहे मस्त दिसतायत! छानच झाले असणार!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
21 Feb 2010 - 11:13 pm | विसोबा खेचर
!!!!!
आपला,
(हळवा) तात्या.
21 Feb 2010 - 11:54 pm | शुचि
=))
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
21 Feb 2010 - 11:14 pm | आशिष सुर्वे
ऐतवारी रातच्याला असली पाकॄ टाकताय व्हय!
सकालधरनं कुटं व्होतात??
जल्ला सकाली केला नसता काय हा परयोग म्या!!
असो..
भन्नाट पाकृ हो.. मन अगदी दडपून गेलं बगा..
पुढल्या विकांतालाच करतु..
======================
कोकणी फणस
कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..
मिक्सरमधूनच काढावे!!
21 Feb 2010 - 11:59 pm | प्रभो
आमचा ऐतवार आता चालू झाला ना भौ..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
21 Feb 2010 - 11:31 pm | प्राजु
गधड्या..!!
परवा गेटटुगेदर ला तुला करून आणायला सांगायला हवे होते.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
22 Feb 2010 - 12:15 am | पक्या
पाकृ छानच. पण हे दडपे पोहे नव्हेत.
दडपे पोहे नारळाच्या पाण्यात भिजवतात, त्यात बारिक चिरलेली काकडी, मिरच्या वगैरे घालून दडपून ठेवतात . शिवाय त्यात भरपूर ओले खोबरे पण घालतात. आणि मुख्य म्हणजे त्यात हळद नसते.
ही जालावर सापडलेली रेसिपी -
आमच्या घरी साधारण असेच करतात.
दडपे पोहे :
साहित्य : १ वाटी भर जाड/पातळ पोहे, ताजे खवलेले खोबरे अर्धी वाटी आणि नारळाचे पाणी, ३ ते ४ हिरव्या मिर्च्या, मीठ अन साखर चवीनुसार, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य,१ मध्यम कांदा.
कृती : सहसा पातळ पोहेच, न धुता घेतात. (जाड)पोहे एकदा धुवुन नारळाच्या किसात अर्धा ते १ तास मिक्स करुन ठेवावे. ( नारळाचे पाणी पण शिंपडले तरी चालेल) नंतर हाताने मोकळे करुन त्यात बारीक चिरलेला कांदा अन हिरवी मिर्ची व कोथिंबीर बारीक चिरुन घालावी. भाजलेले शेंगदाणे ही घालावे . मीठ अन साखर घालुन नीट मिक्स करावे.
वरुन नेहेमीसारखी जीरे मोहरीची अन कढीपत्याची फोडणी द्यावी. आणि परत नीट हलवुन घ्यावे.वाटल्यास मिर्ची फोडणीत टाकली तरी चालेल. पोह्याचा भाजलेला पापड कुस्करुन घालावा . बारीक चिरलेली काकडी पण घालतात. दडपून ठेवतानाच घालावी.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
22 Feb 2010 - 1:00 am | रेवती
पक्याभौ,
मलाही आधी तुम्ही म्हणता तसेच वाटायचे, किंबहुना आपण म्हणता जवळजवळ तश्याच प्रकारे मीही पोहे दडपते (नंतर हादडते;)). माझ्याकडच्या जुन्या पुस्तकांमध्ये मात्र नारळपाणी नसल्यास ताक शिंपडावे असे लिहिले आहे. प्रभोच्या कृतीमध्ये दही आहे हा एक मोठा फरक जाणवला, पण दडप्या पोह्याच्या अनेक पाकृ आहेत्.......बहुतेक प्रदेशातल्या वेगळेपणामुळे जेवढा फरक रेशिपिमध्ये येतो तो हा असावा.:)
रेवती
22 Feb 2010 - 5:58 am | प्रभो
पक्याभौ,
माझ्याकडे ओला नारळ नव्हता म्हणून घातला नाहीये.
आणी हो, तुम्ही दिलेली कृती ही कोकणी दडप्या पोह्यांची असावी.ही वरची पाकृ मी लहानपणापासून अशीच बघत आहे , फक्त घरी दह्याऐवजी रेवतीताई म्हणाली तसा ताकाचा वापर होतो.
*हिरव्या मिरची ऐवजी भरल्यामिरच्या जास्त चांगल्या लागतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
*पाकृ कशी का असेना, चवदार होण्याशी मतलब...आपण फक्त हादडण्याकडे लक्ष देतो.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
22 Feb 2010 - 7:14 am | पक्या
>> पाकृ कशी का असेना, चवदार होण्याशी मतलब...
प्रश्नच नाही.
पाकॄ छानच आहे . वर मी म्हटले आहेच.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
22 Feb 2010 - 11:48 am | अस्मी
माझी आई पण असेच करते दडपे पोहे...फक्त ते केल्यानन्तर दडपून ठेवते.
and नारळाचे पाणी is must..
- मधुमती
22 Feb 2010 - 5:45 am | मदनबाण
आत्ताच हादडायची तीव्र इच्छा झाली आहे... :)
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
22 Feb 2010 - 2:25 pm | गणपा
मस्त रे प्रभ्या कालच सकाळी केले होते कांदे बटाटे पोहे.
दडपे पोहे प्रकार केला नाही या पुर्वी कधी करुन पहावा म्हणतो :)
25 Feb 2010 - 9:51 pm | चित्रा
पोह्यांपेक्षा शेंगदाणेच जास्त दिसतायत. मी चिवड्यातूनही शेंगदाणे बाजूला काढून ठेवणारी.. :)
आमच्याकडे दडपे पोहे केले की त्यात पोह्याचा पापड भाजून चुरून घालतात, दही/ताक नसते. पण कोथिंबीर, लिंबू आणि खोबरे मात्र असते. पण वरचे पोहे झकास दिसतायत.
हल्लीच्या तरूण मुलींनाही तरूण मुलांएवढाच चांगला स्वयंपाक येतो का असा एक आगाऊ (आणि जुनाट) प्रश्न पडला, आणि प्रभोसारख्या मुलांबद्दल कौतुक वाटले. (मला लग्नाआधी स्वयंपाक येतच नव्हता असे म्हटले तरी चालेल).
25 Feb 2010 - 11:46 pm | शेखर
>> हल्लीच्या तरूण मुलींनाही तरूण मुलांएवढाच चांगला स्वयंपाक येतो का असा एक आगाऊ (आणि जुनाट) प्रश्न पडला,
येत नसावाच... त्या शिवाय का प्रभो सारखी मुले पारंगत होतात का? आधी पासुन शिकले की बरे पडते नाही तर आई म्हणेलच बायको आल्यावर .. मला नाही कधी करुन घातले खायला ;)
(ह.घ्या.)
26 Feb 2010 - 12:10 am | प्रभो
चित्राताई आणी शेखर्याने धागा वर आणलाय तर सर्वांचे आभार मानून घेतो.
बाकी आमच्या पाककलेची सुरुवात चहा आणी शाबुदाण्याच्या खिचडीपासून झाली.
चांगलं खायचंय आणी करून देणारं कोणी नसेल तर जमायला हवं या हेतूने शिकून घेतलं...आणी हॉस्टेलचे राहणंही कामाला आलं.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
26 Feb 2010 - 12:26 am | मेघवेडा
>>> चांगलं खायचंय आणी करून देणारं कोणी नसेल तर जमायला हवं या हेतूने शिकून घेतलं >>>
होय रे बाबा.. आणि पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतोच रे माणूस... माझंही असंच झालंय! स्वप्नात देखील विचार केला नव्हता कधी जेवण बनवीन म्हणून.. आज मजबुरीखातर बनवावं लागतंय! जमायला लागलंय हल्ली थोडंथोडं!!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
27 Feb 2010 - 8:06 pm | श्रीयुत संतोष जोशी
मते ही पाककृती चुकिची आहे .
दडप्या पोह्यांत दही........ पटलं नाही बुवा.
आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे दडप्या पोह्यांत फोडणी वरून घालायची असते
फोडणीत पोहे नाही घालायचे.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
28 Feb 2010 - 12:15 pm | प्रभो
मालक, कृपया नीट बघाल तर फोडणी वरूनच घातलेली आहे.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी