भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे ज्या समस्या निर्माण झालेल्या असतात त्यांची उत्तरे शोधताना वर्तमानकालीन वस्तुस्थितीचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. राष्ट्रीय ऐक्याच्या दॄष्टीने, हिंदू आणि मुसलमानांचे परंपरागत वैर केवळ याच दृष्टीने हाताळाले जाऊ शकते. कोणी यावर असा आक्षेप घेऊ शकेल की हिंदुस्थानात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध, जैन्,शीख अशा अनेक धर्मांचे लोक राहात असताना, पुन्हा त्यांच्यातही चौदा भाषा आणि शेकडो पोटभाषा, जाती, पोटजाती यांच्या आधारे भेदाभेद असताना आणि त्यामुळेच की काय, विविध प्रकारचे धर्मवाद, जातीयवाद्,प्रांतवाद आणि भाषावाद उफाळून वर आलेले असताना, एका हिंदू-मुसलमान वादासच अवास्तव महत्त्व का द्यावयाचे ? यावर आमचे उत्तर इतकेच आहे कि या सगळ्याच वादंच ऊहापोह एकेकटा आणि स्वतंत्रपणे केला गेला पाहिजे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अत्यंत जटिल आणि मूलभूत समस्येच्या स्वरूपात भारतीय राष्त्रासमोर उभा असलेला जो हिंदू- मुसलमान यांच्यातील परंपरागत संघर्ष, त्याचीच काय ती चर्चा वर्तमानकालीन परिस्थितीच्या संदर्भात आपण करणार आहोत. असल्या चर्चा आणि वादविवाद यांनी राष्ट्रांची भवितव्ये घडत नसतात हे आम्ही जाणून आहोत. परंतु अशा चर्चा कोणचे काही बिघडवित नसतात हेही लक्षात ठेवले पाहिजे.
सर्वसाधारणपणे सगळ्या कट्टर हिंदुत्ववाद्यांचे म्हणणे असे असते कि हिंदू हे ह्या देशातले मूळ रहिवासी आहेत, येथे हजारो वर्षांपासून राहात आहेत, विविध प्रकारच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृती असलेल्या इथल्या रहिवाशांना जोडणारा समान धागा हिंदुत्व हाच काय तो आहे. परकीय आक्रमणांचा सामना करताना हिंदुस्थानातील लोकांमध्ये राष्ट्रीय वृत्ती निर्माण करन्याचे महत्कार्य हिंदुत्वानेच केले आहे. म्हणून अखंड हिंदुराष्ट्र हा अखिल हिंदुजातीचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
हा दावा निखालस खोटा आहे असे आम्ही म्हणू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. जेंव्हा जेंव्हा आपण 'भारत हे एक पाच हजार वर्षांचे सातत्य आहे असे म्हणतो' तेंव्हा भारताचा इतिहास हा प्रामुख्याने हिंदूंचा इतिहास आहे हे ऐतिहासिक सत्य नाकारता येत नाही आणि 'पाच हजार वर्षांचे सातत्य' हा शब्दप्रयोग प्राचीन हिंदू परंपरा, प्रथा आणि इतिहास या संदर्भातच वापरला गेला आहे हे देखील नाकारता येत नाही . पूर्वीच्या काळी एक सरकार, एक संविधान, एक तिरंगा झेंडा, एक संसद अशा गोष्टींचे अस्तित्व नव्हते. फुटकळ फुटकळ राजे आपापल्या वकूबाप्रमाणे ठराविक प्रदेशावर राज्य करीत असत. अशा परिस्थितीत परकीय आक्रमणांचा सामना करण्यासाठी, इथल्या जनतेत राष्ट्रीय वृत्ती निर्माण करण्यासाठी इथल्या राजांनी हिंदुत्वाचाच आधार घेतला यात नवल नाही. म्लेंच्छ शकांशी लढणारा राजा विक्रमादित्य असो किंवा हिंदवी स्वराज्यासाठी लढणारा शिवाजी असो, आसाममधले आहोम राजे असोत की चितोडचा महाराणा प्रताप असो; हे सगळे राष्ट्रपुरुष लढले ते हिंदुधर्मासाठीच. हिंदू हा शब्द त्याला जोडल्या गेलेल्या इतिहास आणि परंपरा, धर्म आणि तत्त्वज्ञान, संस्कृती आणि प्रथा या संदर्भांमुळे खोलवर दडलेल्या प्रेरणांना आवाहन करणार्या राष्ट्रीय धर्माचे प्रतीक बनला होता.
आज जागोजाग दिसणार्या कडव्या हिंदुत्ववादाचा उगम असा खोल इतिहासात आहे. पण हा हिंदुत्ववाद म्हणजे आधुनिक राष्ट्रवाद नव्हे. पुरातन संदर्भांच्या आधारे कोणत्याही आधुनिक राष्ट्राची उभारणी करणे शक्य आहे काय, व्यवहार्य आहे काय याचा विचार आपण प्रथम केला पाहिजे. मुस्लिम धर्मांधतेचा पाडाव करण्याच्या इर्ष्येतून निर्माण झालेल्या हिंदुराष्ट्राच्या भूमिकेस पारशी, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, जैन धर्मीय पाठिंबा देतील काय? हिंदू धर्मातले शतकानुशतके अन्याय सहन केलेले हरिजन आणि नवबौद्ध तरी या भूमिकेस पाठिंबा देतील काय ? मुसलमान धर्मांध आहेत म्हणून आपण अब्दुल कलामाना नाकारू शकत नाही. आमिर खान. इरफान पठाण, हुसेन दलवाई, अझीझ प्रेमजींना नाकारू शकत नाही. आपण नाकारले पाहिजे त्यांना जे संविधानाऐवजी शरियतला प्रमाण मानतात. आपण नाकारले पाहिजे त्यांना की जे समान नागरी कयद्याला विरोध करतात. आपण नाकारले पाहिजे त्यांना कि जे वंदे मातरमला विरोध करतात आणि त्यांनाही की जे स्वतंत्र हिंदुराष्ट्राची मागणी करतात. प्रश्ण विचारण्याचे हत्यार हे लोकशाहीतले सर्वांत प्रभावी हत्यार आहे. आहे ना खुमखुमी मग उचला ते. जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा का जाळतात ? भिवंडीत पोलिसांच्या अमानुष हत्या क होतात? मालेगावात स्फोट का होतात ? साध्वी प्रज्ञासिंग, अफझल गुरू सारखे अतिरेकी वर्षानुवर्षे सरकारी पाहुणचार झोडत जिवंत कसे राहतात? आम्हाला उत्तरे मिळाली पाहिजेत. अशा प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्याचे धैर्य आपण दाखवले पाहिजे. तसे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय प्रवाह निर्माण केले पाहिजेत. तसे करण्याचे उत्तरदायित्व त्यांचे आहे की जे स्वतःला बुद्धिजीवी म्हणवतात, त्यांचे आहे की जे स्वतःला विचारवंत म्हणवतात आणि त्यांचेही आहे की जे स्वतःला राज्यकर्ते म्हणवतात.
अप्पा जोगळेकर, डोंबिवली
(आमचे लिखाण गंभीर आहे. वृत्ती नव्हे.)
प्रतिक्रिया
21 Feb 2010 - 11:55 am | अप्पा जोगळेकर
आम्ही येथेही लिहीत असतो.
http://thoughtfacet.blogspot.com
21 Feb 2010 - 1:09 pm | ज्ञानेश...
अतिशय उत्तम लेख आहे, अप्पासाहेब.
आपले संतुलित विचार पटले, आवडले.
(कथित) हिंदू राष्ट्रवाद ही तुलनेने नवी आणि फारशी प्रभाव नसलेली संकल्पना आहे. तिचा उहापोह करतांना आपण अत्यंत जटील अशा 'इस्लामी मूलतत्ववादावरही' लिहावे, अशी विनंती करतो.
साध्वी प्रज्ञासिंग, अफझल गुरू सारखे अतिरेकी वर्षानुवर्षे सरकारी पाहुणचार झोडत जिवंत कसे राहतात?
हा उल्लेख खटकला. दोन्ही केसेस वेगळ्या आहेत. साध्वीवरील आरोप अद्याप सिद्ध व्हायचे आहेत. अफजल गुरूला सजा सुनावली गेली आहे.
आपला संतुलित विचार सिद्ध करण्यासाठी अश्या अनावश्यक जोड्या जमवण्याची आपल्याला आवश्यकता नाही, हे नम्रपणे नमूद करतो.
21 Feb 2010 - 9:37 pm | सुधीर काळे
<<साध्वीवरील आरोप अद्याप सिद्ध व्हायचे आहेत. अफजल गुरूला दोषी ठरविले गेले आहे.>> १०० टक्के सहमत.
खरंच! आपण किती "तोल-मोलके" विचार करतो हे दाखविण्यासाठी अप्पासाहेबांना अशा कुबड्यांची आवश्यकता का वाटावी!
जय हो, ज्ञानेश
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
23 Feb 2010 - 12:18 pm | देशीसंत्रा
<<साध्वीवरील आरोप अद्याप सिद्ध व्हायचे आहेत. अफजल गुरूला दोषी ठरविले गेले आहे.>>
पूर्ण पणे सहमत
खरंच! आपण किती "तोल-मोलके" विचार करतो हे दाखविण्यासाठी अप्पासाहेबांना अशा कुबड्यांची आवश्यकता का वाटावी!
अगदी खरं बोललात !!
21 Feb 2010 - 1:21 pm | अप्पा जोगळेकर
इस्लामी मूलतत्त्ववादाचा मी पुरेसा अभ्यास केलेला नाही. तरी योग्य तयारी झाली की त्यासंदर्भातही लिहेनच. याबाबत अधिक वाचन करावयाचे असल्यास 'नरहर कुरुंदकर' यांची 'जागर' आणि 'शिवरात्र' ही पुस्तके अवश्य वाचावीत.
21 Feb 2010 - 1:35 pm | सुनील
नरहर कुरुंदकरांच्या जागरवर आपण जरूर लिहावे, असे सुचवावेसे वाटते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Feb 2010 - 10:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नरहर कुरुंदकरांच्या 'जागर' आणि 'शिवरात्र' वर आपण लिहावे असे वाटते.
आपण वरील पुस्तके वाचलेले असल्यामुळे मुस्लीमांचा 'राष्ट्रवाद' त्यावर काही संदर्भ देऊन विचार मांडले तर लेखनाला वेगळी धार येईल असे वाटते.
बाकी, कर्मठ मुस्लीम, आक्रमक मुस्लीमांबद्दलचे विचार थोडे समजले. पण, उदारमतवादी,शांतताप्रेमी मुस्लीमांना आपण राष्ट्रीय प्रवाहात सहभागी करुन घेऊ का ? आपल्याला काय वाटते
जरासे अवांतर: शाहरुख खान आणि त्याच्या चित्रपटाला कोणत्यातरी निमित्ताने प्रचंड विरोध करुन हजारो मुस्लीमांना आपण काय संदेश देत आहोत. राष्ट्रवादाची भावना उभी करण्यास असलेले अडथळ्यांबद्दल आपण काय विचार करता ?
-दिलीप बिरुटे
22 Feb 2010 - 8:41 pm | विकास
पण, उदारमतवादी,शांतताप्रेमी मुस्लीमांना आपण राष्ट्रीय प्रवाहात सहभागी करुन घेऊ का ?
या संदर्भात रफिक झकेरीयांचा गेल्या आठवड्यातील न्यूजवीक मधला लेख वाचण्यासारखा आहे. The Jihad Against the Jihadis - How moderate Muslim leaders waged war on extremists—and won. मात्र हे भारतासंदर्भात नाही तर इतरत्र विशेषकरून मुस्लीम राष्ट्रांसंदर्भात आहे. भारतासंदर्भातील एक वाक्य वाचून माझ्या माहीतीत भर पडली: "The Darul Uloom Deoband movement in India, home to the original radicalism that influenced Al Qaeda, has inveighed against suicide bombing since 2008." (अधोरेखीत मी केले आहे). देवबंद चळवळीची मुळे ही स्वातंत्र्यापुर्वीची आहेत मात्र त्याचे (दुष्)परीणाम हे आजही दिसत आहे असे यामुळे म्हणावे लागेल...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
21 Feb 2010 - 1:47 pm | सुनील
प्रकाटाआ
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Feb 2010 - 4:22 pm | शशिकांत ओक
माननीय अप्पाजी,
आपला उद्देश उदात्त आहे. थोडासा भाबडा आहे.
ज्या लोकांची नावे आपण वर घेतली आहेत व त्याशिवाय असे अनेक जे आपल्याशी व्यवहारात शांततामय व सुशिक्षित वा अर्थिक दृष्ट्या सधन आहेत. ते तरी आपण अपेक्षिता तसे कुराण, शरीयतला नाकारण्याचे धाडस करू शकतात का हे आजमावा.
दिवसेंदिवस जगभरातील सर्वच मुस्लिम उग्र व कठोर बनत आहेत. जे काही त्यातल्या त्यात मॉडर्न व सहिष्णू असल्याचे थोडेफार दिसते ते ही मनोमन भिउन आहेत. आपण रोजच्या व्यवहारात पहात असाल की गेल्या काही वर्षांत पुरुषांनी दाढी वाढवणे, नमाझी गोल टोप्या घालणे, कुडता लेंगा घालणे, स्त्रियांनी काळा अंगभर पोषाख घालणे हे सर्रास झाले आहे. हा तर कळून येणारा फक्त बाह्य बदल आहे. तो बदल मानसिकतेत फरक तयार झाल्याशिवाय सहज शक्य नाही हे सर्वज्ञात आहे. त्यांच्यावर पडत असलेले धार्मिक व सामाजिक धाकाचे वजन किंवा बदलत्या वातावरणात आपल्याला सोईचा पडेल असा पेहराव असणे. असे असताना, आपण म्हणता तसे राष्ट्रवादाचे डोस हे त्यांना मान्य करायला - आत्ता पर्यंत अवघड परंतु यापुढे - अशक्य वाटते.
ज्या सर्वधर्मातील बुद्धिवादी लोकांवर हे काम आपण सोपवू इच्छिता ते लोक तर अत्यंत पुळचट व कुचकामी असल्याचे आत्तापर्यंतच्या इतिहासाचे अवलोकन करता ध्यानात येईल.
आधुनिक शस्र्त्रबळाने अचाट कामे फत्ते होत आहेत हे प्रत्यक्ष दिसत आहे. अशा परिस्थितीत हातात मेणबत्त्या घेणारे बुद्धिजीवी भावनिक आवाहने करुन फार तर प्रसिद्धी माध्यमांची वाहवाही लुटतील इतकेच.
उरला प्रश्न हिंदूंच्या सहिष्णुतेचा. अशी अगतिक व दुबळी मानसिकता हिंदूंनी पाठीवर बाळगून राहण्यापेक्षा शस्त्र हातात घेणे हाच पर्याय आहे असे वाटणारा गट वा शक्ती उफाळून आली तर नवल नाही. पण ती दुसरा पर्याय नाही म्हणून केलेली प्रतिक्रिया आहे. हा यातील फरक आहे.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
21 Feb 2010 - 5:03 pm | मदनबाण
अखंड हिंदुराष्ट्र हा अखिल हिंदुजातीचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
१००% सहमत...
इथे जे राहतात ते सर्व हिंदुस्थानीच आहेत...पण इथे राहुन जर निष्ठा दुसरीकडे असेल त्यांना इथे स्थान नाही,मग ते कोणीही असोत...
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
21 Feb 2010 - 8:53 pm | Dhananjay Borgaonkar
आप्पा..साध्वींना अतिरेकी म्हणुन चुक केलीत.
21 Feb 2010 - 9:26 pm | पारंबीचा भापू
अप्पासाहेब,
आपला सनसनाटी लेख वाचून निराशा वाटली.
खरे तर आपल्या लोकशाहीतील काही पक्षानी धर्मावरचे राजकारण करून मुसलमान लोकाना बिघडवले आहे.
एकदा एक झकास मुद्दा लिहिला गेला होता (बहुधा मिसळ-पाववर). ज्या खास सवलती सरकार मुसलमान लोकाना देते (सरकारी नियमापेक्षा जास्त मुले झाली तरी सरकारी सवलती देत रहाणे, हजची सब्सिडी वगैरे) त्या सवलतीना एक देशभक्तीचा भाग म्हणून मुसलमान लोक "आमाला नाय पाहिजे" असे का म्हणत नाहीं? असा एकही मुस्लिम नेता जन्माला का आला नाही?
ज्या आपल्या हिन्दू भाईना भेटत नाहीत अशा सवलती घेणे म्हणजे एक टाईपची गद्दारी नाही का?
सगळ्यानी विचार केला पायजे.
भापू
21 Feb 2010 - 9:55 pm | Dipankar
पण हि सुविधा देणारे हिंदूच आहेत न, जो पर्यंत निवडणुकातील तात्कालिक फायद्या साठी मुसलमानांना कुरवाळणे चालू आहे , बांगलादेशी घुसखोरांना मतांसाठी नागरिकत्व देणारे आपलेच राजकारणी , अधिकारी आहेत तो पर्यत हे चालणारच
21 Feb 2010 - 10:06 pm | अप्पा जोगळेकर
श्री शशिकांत,
तुम्ही ढाल्-तलवार घेऊन जणू लढायलाच निघाले आहात असे वाटते. असो, मी तुम्हाला नाउमेद करणार नाही. आणि माझ्यासारख्या माणसाच्ञा नाउमेद करण्या - न करण्याने तुमच्यासारख्या कडव्या हिंदुत्ववाद्यांचे काही अडणार नाही. नाडीग्रंथाची लिंक पाहिली. त्याचा या लेखाशी काय संबंध आहे ते (भाबडेपणामुळे) कळले नाही. तरी तो (बाद्रायण) संबंध समजावून सांगावा अशी विनंती आहे. स्वतःच्या धर्मातल्या कोट्यवधी अस्पृश्यांवर अन्याय करणारा हिंदू धर्म स्वधर्मीयांबद्दल अ-सहिष्णू पणे वागला आणि अन्य धर्मीयांशी सहिष्णूपणे वागला याची नोंद घ्यावी.
श्री पारंबीचा भापू,
हजची सब्सिडी किंवा हिरव्यांचे लांगूलचालन करणार्या जातीला काँग्रेजी म्हणतात. आम्ही त्यांच्यापैकी नव्हे. बाकी तुमचा मुद्दा बरोबर आहे.
22 Feb 2010 - 1:52 am | चिरोटा
जरा off the topic ..
ही ७०च्या दशकापासून चालु झाली.पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे तेथे जाणार्या लोकांना विमानाच्या प्रवासात सूट देण्यात आली.हजला जाण्याचा खर्च साधारण ९०,००० रुपये ते १ लाख येतो.सरकार फक्त एयर इंडियाने जाणार्या हाजी ना प्रत्येकी १२ ते १५,००० रुपयांची सवलत देते. आणि ही प्रवासाची रक्कम हज कमीटीकडे एक वर्ष आधी जमा करावी लागते.सध्याच्या जमान्यात एयर इंडियापेक्षा दर्जेदार आणि स्वस्त सेवा देणार्या एयर लाइन्स आहेत ज्याने बरेच भारतिय तेथे जातात. ही सबसिडी रद्द करावी अशी मागणी मुस्लिम् समाजातल्या अनेकांनी कित्येकवेळा केलेली आहे. (ज्यांना ७०,००० रुपये परवडतात त्यांना ८५ ते ९०००० रुपये परवडायला हरकत नसावी.सरकार सवलत देते असा आव आणते पण प्रत्यक्षात एयर इंडियाला ह्या प्रवासी सेक्टरमध्ये बराच फायदा होतो. ).
(अवांतर- इतर अनेक धर्मियांसाठीही सरकार सवलती देते.कुंभमेळा,मनसरोवर. रेल्वे तीन धाम्/चार धाम साठी स्पेशल गाड्या वगैरे..
बाकी आधुनिक राष्ट्रवादात धर्म असताच कामा नये असे माझे मत.
भेंडी
P = NP
21 Feb 2010 - 11:06 pm | हर्षद आनंदी
तुम्ही बर्याच संवेदनशील गोष्टींना अगदी संक्षिप्तपणे हात लावुन सोयिस्कर रित्या सोडुन दिले आहे...
"हिंदू" असा भारतीयांचा उल्लेख "सिंधु" नदीच्या खोर्यात राहणारे लोक यावरुन अपभ्रंषीत होऊन आला आहे. ईथली मुळ वस्ती आर्य आणि शैव यांची असो.... या भारताच्या (हिंदुस्थानाच्या नाही) पुरातन, भव्य, समृध्द इतिहासाला काळा डाग आहे तो परकियांच्या आक्रमणांचा!!
गेल्या काही हजारो वर्षापासुन चालत आलेले हे असे युध्द आहे, ज्याची सुरवात हिंदुंनी नक्कीच केली नाही. पण ते कारण नसताना आमच्यावर अर्थात हिंदूंवर लादले गेलेले आहे, आमचा अपरिमीत संहार, लुट, विटंबना होऊन सुध्दा आम्ही आज हिंदू म्हणुन ताठ मानाने जगतो आहोत, त्याला कारण एकच आमच्या निष्ठा, संस्कॄती, परंपरा, जगण्याची ऊर्मी ह्या अत्यंत समतोल आणि विज्ञानावर आधारीत आहेत. हिंदू संस्कृती सारख्या अनेक प्राचीन संस्कृती काळाच्या ओघात नष्ट झाल्या, होत राहतील, पण हजारो वर्षांपासुन आमच्या धमन्यातुन वाहणारी ही हिंदू संस्कॄती अजरामर आहे. म्हणुनच आधुनीक राष्ट्रवादाला फक्त आणि फक्त हिंदू संस्कृती तारु शकते, हीच एकमेव संस्कृती विश्वबंधुत्व आणि शांतीचा अमुल्य संदेश देते.
ज्या धर्मांध जमातींचा देवसुध्दा त्यांचा नाही त्यांना कसली आली आहे परंपरा. त्यांचा ईतिहास जरा अभ्यासुन बघा. त्यांचे धर्मग्रंथ वाचा, समजुन घ्या आणि मग हिंदुराष्ट्राबद्दल बोला. त्याची गरज तुम्हालाही भासु लागेल. तुम्हाला प्रश्न पडतो इतर धर्मीयांचा, त्यांना त्यांचा विचार करण्याची कुवत आहे. तुम्ही उल्लेखलिले सर्व धर्मांची स्थापना, विस्तार करण्यात हिंदूंचा सहभाग खुप मोठा आहे आणि ते सुध्दा शांतताप्रिय अश्या हिंदूराष्ट्राचा नागरीक बनणे कधीही पसंत करतील.
साध्वीच्या विषयापासुन अंमळ दुरच रहा, त्यांची तुलना अफजलसारख्या देशद्रोही, धर्मांध लांडग्याशी करणे हा हिंदू संस्कॄतीचा अपमान आहे. हे लांडगे तुम्हा आम्हा हिंदुंच्या पैशावर मस्त मजा मारत रोज बिर्याणी झोडत आहे, आणि आमची साध्वी दोन पायांवर नीट उभे राहात यावे म्हणुन प्रयत्न करत आहे. हा भेदभाव आहे म्हणुन ही हिंदूराष्ट्राची लढाई आहे.
जाता जाता तुमचा भारतीय संस्कृतीचा अभ्यासही तपासुन पहा अशी विनंती कराविशी वाटते, कारण ही लोकशाही सुध्दा भारतातच जन्माला आली. ईथली अनेक राज्ये लोकतंत्रावर चालली. बाकी तुम्ही हवे त्यांना नाकारा अथवा स्विकारा, हिंदूराष्ट्राशी त्यांनी एक निष्ठ रहावयास हवे... ही काळ्या दगडावरची रेषा !!
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
22 Feb 2010 - 12:59 am | राजेश घासकडवी
हिंदुत्वाद्यांच्या आपण दिलेल्या स्पष्टीकरणात हिंदू धर्म, सर्वसामान्य जनता, व राष्ट्र या संकल्पना बिन्धास्तपणे एकमेकांऐवजी वापरल्या गेलेल्या आहेत. हे गोंधळ आपले आहेत की हिंदुत्ववाद्यांचे हे नीट कळलं नाही.
नाय बुवा पटत. ते लढले त्यांच्या राज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या प्रजेच्या भल्यासाठी. हिंदू हा शब्द जरी वापरला असेल तरी तो आपण व परके यांच्यात स्पष्ट भेद करण्यासाठी.
पाच हजार वर्षांचे सातत्य केवळ गंगा नदी वाहते व हिमालय होता तिथेच आहे याबाबत म्हणता येईल. मुळात देशभर असलेलं हिंदूंमधलंच वैविध्य व त्यांत झालेली प्रचंड स्थित्यंतरं यामुळे 'सातत्य' हा शब्द वापरणं धैर्याचं आहे. सातत्य असलंच तर ते जातीभेदाला आहे - जातीभेद काढला तर हिंदुत्वात काय राहातं?
तुम्ही जी ही भूमिका तुमची म्हणून मांडली आहे ती पटते. हिंदुत्व मुळातच नक्की व्याख्या न केलेलं असल्यामुळे शेवटी 'भारतात राहातात ते हिंदू व ते पाळतात त्या हिंदू चालीरीती' असल्या निरुपयोगी निष्कर्षाला पोचतं. असल्या विशविशीत पायापेक्षा पेक्षा सबळ राष्ट्र लोकशाही, समता, ज्ञान व आर्थिक प्रगतीसाठी एकजूट यावर आधारायला हवं.
राजेश
22 Feb 2010 - 9:08 am | १.५ शहाणा
साध्वीवरील आरोप अद्याप सिद्ध व्हायचे आहेत. अफजल गुरूला दोषी ठरविले गेले आहे.>> १०० टक्के सहमत.
22 Feb 2010 - 3:15 pm | विजुभाऊ
भारताचा इतिहास हा प्रामुख्याने हिंदूंचा इतिहास आहे हे ऐतिहासिक सत्य नाकारता येत नाही
असहमत.
ज्याला तुम्ही हिंदुंचा इतिहास म्हणता ते एक अर्ध सत्य आहे.
आपल्याल जो इतिहास माहीत असतो तो फक्त पश्चिम भारत आणि उत्तर भारताबद्दल माहीत असते.
मणीपूर आसाम ब्रम्हदेश याच्याबद्दल किती लोकाना नीट माहीती असते?
भारतातील नाग वगैरे अनार्य हे पूर्वे कडे सरकले याव्यतीरीकत फार काही माहिती आपल्याला नसते.
दक्षीणेत होऊन गेलेल्या राजराजा बद्दल आपण अनभिज्ञ असतो.तसेच राजा महेंद्र ज्याचे साम्राज्य जावासुमात्रापर्यन्त पसरले होते त्याबद्दल काहीच वाचलेले नसते.
भारतात इतिहास कालात पाहिले तर हिंदू या पेक्षाही
शैव ,शाक्त, वैष्णव , वगैरे धर्म / पंथ मानणारेच लोक जास्त होते.
धर्म ही केवळ उपासनापद्धती म्हणून आस्तित्वात होती
भारतात आजसुद्धा शेख जैन बौद्ध हे स्वतःला हिंदू म्हणवत नाहीत
भारतासारखा मोठा भू भाग हा कधीच एकछत्री अमला खाली राहणे शक्य नव्हते त्यामुळे प्रत्येक ठीकाणी जेत्यानी त्यांची संस्कृती तेथील जनतेवर लादली आणि तो त्यांचा इतिहास मान्ला गेला.
भारताचा इतिहास हा ब्रिटीशानी त्यांच्या दृष्टीकोनातून लिहीला.
त्यानी बराचसा इतिहास सोईनुसार बदलून लिहीला.
सातवाहनकाली किंवा राष्ट्रकुटांबद्दल किती इतिहास माहीत आहे?
ते सोडा ज्या सिंधू संस्कृतीशी आपला संबन्ध जोडला जातो त्या सिंधू संस्कृती च्या हडप्पा मोहोंजोदडो लोथल वगैरे बद्दल अजून आपल्या काहीच उपलब्धी नाहीय्ये
जर शिवाजी या देशात घडला नसता तर आपणसुद्धा आपली नावे खान शेख वगैरे अशी लावली असती.
यादेशात आपण रहातो तेथील लोकांशी/ भूभागाशी आपली नाळ जोडलेली असते. तेथील परंपरांशी/भूभागावरील सरकारशी प्रामाणीक रहाण्याचा प्रयत्न म्हणजे राष्ट्रवाद एवढेच म्हणू शकतो.
राष्ट्रवादाला धर्माशी जोडण्याची चूक करू नका.
एकच विचारतो जर उद्या भारतातील काही कारणास्तव एखादा प्रदेश वेगळा झाला तर तेथल्या नागरीकाना स्वतःच्या भूमीका बदलून नवा राष्ट्रवाद स्वीकारावा लागेल.
त्या वेळेस राष्ट्रवाद ही सापेक्ष संकल्पना ठरते
23 Feb 2010 - 7:38 am | अक्षय पुर्णपात्रे
का बुवा? आणि अशी 'वस्तुस्थिती' आहे असे धाडसी विधान करण्याचे काय कारण आहे?
प्रज्ञा आणि अफजल यांना एकाच प्रतलात बसवले हे आवडले. किंबहूना म्हणूनच वरील प्रश्न विचारावासा वाटला.
23 Feb 2010 - 12:24 pm | मदनबाण
जर शिवाजी या देशात घडला नसता तर आपणसुद्धा आपली नावे खान शेख वगैरे अशी लावली असती.
सहमत...
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
23 Feb 2010 - 1:36 pm | विशाल कुलकर्णी
सालं आपण आयुष्यभर या वांझोट्या चर्चाच करत बसणार.
चालुद्या तुमचं, आपल्याला स्वारस्य नाही. काही कृती करणार असाल तर सहभागात पहीलं नाव आपलं असेल. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
23 Feb 2010 - 2:07 pm | क्लिंटन
>>जर शिवाजी या देशात घडला नसता तर आपणसुद्धा आपली नावे खान शेख वगैरे अशी लावली असती.
मान्य. कवीराज भूषण यांचेही अशा अर्थाचे एक कवन आहे.
पण माझा प्रश्न असा आहे की समजा मी शेख म्हणूनच जन्माला आलो असतो तर त्याचे वैषम्य मला का वाटले असते?पारशी लोक मुळचे इराणचे. तिकडे कोणी शिवाजी जन्माला आला नाही म्हणून इराणमध्ये पारशी लोक औषधाला शिल्लक राहिले नाहीत. पण म्हणून इराणमध्ये सध्या राहात असलेल्यांना ते पारशी म्हणून जन्माला आले नाहीत याचे वैषम्य वाटत असेल का? तसे नकीच वाटत नाही.किंबहुना बहुतांश इराणी लोकांना त्यांचे पूर्वज पारशी होते याचा पत्ताच नसेल. तीच गोष्ट पाकिस्तानातल्या लोकांची.पाकिस्तानात आज जे कट्टर तालिबानी अतिरेकी आहेत त्यांचे पूर्वज काही शतकांपूर्वी हिंदूच होते. कदाचित त्या पूर्वजांपैकी एखादा भगवद्गीता, उपनिषदे आणि इतर गोष्टींचा पंडितही असेल! पण त्या तालिबान्यांना आपण हिंदू म्हणून जन्माला आलो नाही याचे वाईट नक्कीच वाटत नाही. त्याचप्रमाणे मी जर शेख म्हणून जन्माला आलो असतो तर त्याचे मला वाईट वाटले असते असे मला तरी वाटत नाही कारण तसे म्हणायला पुरेसा आधार नाही.
आणि देवाने मनात आणले असते तर माझा जन्म हिंदू बहुसंख्यांकाच्या भारतातही शेख कुटुंबात होऊ शकला असताच. त्या गोष्टीवर माझा काय अधिकार चालला असता? काहीही नाही. तेव्हा माझा मूलभूत प्रश्न हा की ज्या गोष्टीवर (अमक्या धर्मात-जातीत जन्माला येणे) माझा अजिबात ’कन्ट्रोल’ नाही आणि देवाने मनात आणले असते तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी होऊ शकली असती या गोष्टीचा अभिमान का बाळगावा? मला हिंदूंच्या भगवद्गीतेसारख्या काही गोष्टी आवडतात तर कर्मकांडांसारख्या गोष्टी आवडत नाहीत. तसेच नॉर्मन व्हिन्सेंट पील यांच्या पॉवर ऑफ पॉझीटीव्ह थिंकिंग या पुस्तकातील बायबलमधील वचनेही आवडतात. आणि बायबलमधील वचने आवडल्याबद्दल मला कोणी ’अहिंदू’ किंवा ’पाखंडी’ म्हणू शकत नाही ही हिंदू धर्माविषयीची गोष्ट मला आवडते. पण म्हणून हिंदू म्हणून जन्माला आल्याचा पराकोटीचा अभिमान का बाळगावा?
अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर क्लासीकल अर्थशास्त्र आणि किनेशीयन अर्थशास्त्र यांना अभिप्रेत असलेले योग्य मार्ग वेगळे आहेत. किनेशियन पध्दतींमध्येही इतर सुधारणा अनेकांनी सुचवल्याच आहेत. यापैकी एखादी गोष्ट आपल्याला पटते नाहीतर सर्व गोष्टींमधील काही भाग पटतो पण ’मी किनेशियन आहे’ याचा पराकोटीचा अभिमान कोणाला असेल असे वाटत नाही. त्याचप्रमाणे मला हिंदू धर्मातील काही गोष्टी पटतात तर काही पटत नाहीत. यापलीकडे जाऊन मला हिंदू म्हणून जन्माला आल्याचा अभिमान का वाटावा? त्या गोष्टीची लाज वाटण्यासारखे जसे काही नाही तसेच अभिमान बाळगण्यासारखे तरी काय आहे? देवाने मनात आणले असते तर माझा जन्म हिंदू कुटुंबात न होता ओसामा बीन लादेनच्या कुटुंबात किंवा स्वत: ओसामा बीन लादेन म्हणूनच झाला असता तर मी काय करू शकणार होतो? तेव्हा अशा गोष्टींचा अभिमान बाळगणे मला तरी पटत नाही.
---------
विल्यम जेफरसन क्लिंटन
वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८
भारतीय प्रबंध संस्थान
वस्त्रापूर
अहमदाबाद-३८००१५
गुजरात
---------
23 Feb 2010 - 4:01 pm | सुधीर काळे
हा माझा प्रतिसाद भापूंचा प्रतिसादाला व भेंडीबाजार यांच्या उत्तराला उद्देशून आहे.
पहिली गोष्ट अशी कीं "कुंभमेळा,मनसरोवर. रेल्वे तीन धाम्/चार धाम साठी स्पेशल गाड्या वगैरे" या कांहीं सवलती नव्हेत. उन्हाळ्याच्या सुटीत कितीतरी Holiday Express गाड्या सोडल्या जातात त्या अशा जास्त प्रवाशांसाठी असतात व त्यात रेल्वेचा फायदा होत असणार.
दुसरी गोष्ट अशी की हज यात्रा व मुस्लिम नागरिक सोडल्यास कुठल्याही अन्यधर्मीय नागरिकाला अशी "वैयक्तिक" सवलत मिळत असल्याचे मला तरी माहीत नाहीं उदा. हिंदूंना काशी-रामेश्वर यात्रे साठी, कॅथॉलिक नागरिकांना रोमला जाण्यासाठी सवलत दिली जाते असे कुठे ऐकण्यात वा वाचण्यात आलेले नाहीं. मिळत असल्यास दुवा द्यावा. त्याबद्दल वाचायला आवडेल.
तिसरी गोष्ट म्हणजे मी गोव्यातील ज्या कंपनीचा प्रमुख होतो त्या कंपनीचा मुस्लिम एजंट कमीत कमी कोट्याधीश, बहुदा अब्जाधीश, आहे. त्याच्या वडिलांनी ७ वेळा हज यात्रा केली आहे व तो मला सरळ म्हणायचा कीं सवलत आहे तर कां नये जाऊ? म्हणजे ही सवलत फक्त गरीबांना मिळते असे नाहीं.
चौथी गोष्ट अशी कीं भारतात असतांना मी उत्तर प्रदेशच्या निवडणुकींचा झी-न्यूजवरील वृत्तांत ऐकला होता तिथे उघड-उघड "होऊ द्यात तुम्हाला हवी तेवढी मुले, आम्ही तुमच्या सवलती चालूच ठेवू" असा केलेला प्रचार टीव्हीवर पाहिला आहे.
शेवटचा मुद्दा: <<ही सबसिडी रद्द करावी अशी मागणी मुस्लिम समाजातल्या अनेकांनी कित्येकवेळा केलेली आहे.>> हे अनेक कोण व कित्येक वेळा केलेली मागणी मी तरी ऐकली-पाहिलेली नाहीं. दुवा असेल तर द्यावा. मला वाचायला आवडेल.
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
23 Feb 2010 - 5:22 pm | चिरोटा
रेल्वेचा फायदा होतोच्. सरकार सर्व धर्मीयांना सवलती देते हे माझे म्हणणे आहे. जम्मु काश्मीर सरकारची ही लिंक पहा-
http://jammukashmir.nic.in/view/may25.htm
अर्थात हे असे करणे योग्य की गैर हा वेगळा मुद्दा आहे.
हे अर्थातच गैर आहे.मी वर म्हंटल्याप्रमाणे ही रक्कम एक वर्ष आधी जमा करावी लागते आणि जी व्यक्ती ७०/७५ हजार ख्रच करायला तयार आहे ती व्यक्ती १२/१५,००० रुपये वाचवायला असल्या भानगडी का करेल? जुनी विमाने/बेकार सेवा देवूनही एयर इंडियाला ह्या सेक्टरमध्ये फायदा होतो.शिवाय तेवढ्याच पैशात इतर एयर लाइन्स चांगली सेवा देतात.
नरसिंह राव पंतप्रधान असताना बर्याचवेळा हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आला होतो.लिंक लवकरच देतो.
भेंडी
P = NP