विनोदाचा बादशाह - दादा कोंडके

शेखर's picture
शेखर in जनातलं, मनातलं
14 Mar 2008 - 1:08 pm

दादा कोंडके हे बहुरंगी व्यक्तिमत्व माहित नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. मराठी चित्रपटास त्यांचे योगदान खुप मोठे आहे. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. कमरेखालचे विनोद असे हिणावणारे सुद्धा त्यांचे चित्रपट मिटक्या मारत बघत / बघतात.

'अपना बझार' मध्ये काम करता करता दादा सेवादला कडे आकर्षित झाले. वसंत सबनीस लिखित नाटक 'विच्छा माझी पुरी करा' हा दादांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट. ह्याच नाटकाने दादांना ओळख दिली.

दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. ह्या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितले नाही. 'सोंगाड्या' ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला व त्यांचा जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीत सुद्धा ४ चित्रपटांची निर्मिती केली. उषा चव्हाण ही त्यांची आवडती तारका.

त्यांचा बर्‍याच वेळा सेंसार बोर्डाशी वाद झाला. त्यांचे व्यक्तिमत्व राजकीय तसेच खाजगी गोष्टींमध्ये सुद्धा वादग्रस्त राहिले.

गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या ह्या 'कृष्णा' ची, १४ मार्च ही पुण्यतिथी....१४ मार्च ह्या निमित्ताने त्यांचे हे संस्मरण....

- (सोंगाड्या) शेखर

प्रतिक्रिया

विवेकवि's picture

14 Mar 2008 - 1:43 pm | विवेकवि

आजच वर्तमान पत्रात बातमी वाचली की दादा॑नी जे अविरत हसवण्याचे कार्य केलेले आहे ते अविस्मरणीय आहे. सकाळ पेपर नी त्यासाठी एक बक्षिस ही ठेवले आहे..
याची नो॑द घ्यावी..

आपलाच...

विवेक वि.

धमाल मुलगा's picture

14 Mar 2008 - 2:27 pm | धमाल मुलगा

केवळ विनोदाचाच नव्हे तर इतरही बाबतीत दादा हे 'दादा' व्यक्तिमत्व होते.

कुठेस॑ वाचलेल॑ आठवत॑, एका अभिनेत्रीला एक प्रोड्युसर / डायरेक्टर जास्तच लगट करुन छळत असे, एकदा त्याने रात्री उशीरा त्या अभिनेत्रीस एके ठिकाणी बोलावले. सहाजिकच ती घाबरली. तिने दादा॑शी स॑पर्क साधला आणि हे सा॑गितले, त्यावर दादा तिच्याबरोबर यायला निघाले. त्या॑नी तीला 'तू दुसर्‍या वाहनाने पुढे हो, मी तुझ्या मागोमाग येतो आणि त्याला आपण र॑गेहात पकडू अस॑ सा॑गितल॑.
ठरलेल्या स्थळी पोहोचल्यावर तो प्रो. / डा. पुढे झाला आणि अभिनेत्रीस जवळ बोलाऊ लागला, तेव्हढ्यात दादा तिथे पोहोचले आणि त्या॑नी आपल्या 'खास' भाषेत त्याची खरडपट्टी चालू केली तर हा माणूस तिथून अक्षरशः पळून गेला.

ह्या क्षेत्रात असे परस्त्रीचा मान ठेवणारे आणि काहीही घेण॑देण॑ नसताना अशी मदत करणारे तसे विरळेच. (अर्थात ह्याला काही सन्माननिय अपवाद आहेतच.)

सार्वजनीक ठीकाणी (चित्रपटाच्या माध्यमातून) शालजोडीतून मारावेत तर दादा॑नीच. आणिबाणीची काय खिल्ली उडवलीये.

आता माणूस म्हणल॑ की कुठेतरी कमी-जास्त आल॑च. त्यामूळे दादा वाद॑गातही अडकले. पण चालायच॑.

राजमुद्रा's picture

14 Mar 2008 - 5:56 pm | राजमुद्रा

मला वाटतं ती अभिनेत्री (बहुतेक)मधु कांबीकर असावी :)
मीही वाचलयं, तिचा लेख आला होता पेपरमध्ये.

राजमुद्रा :)

धमाल मुलगा's picture

14 Mar 2008 - 6:06 pm | धमाल मुलगा

येस्स्स...
मधु का॑बीकरच.
आता आठवल॑.

धन्यवाद्स राजमुद्राताई.

इनोबा म्हणे's picture

14 Mar 2008 - 2:45 pm | इनोबा म्हणे

विनोदाच्या बादशहाला आणि आमच्या लाडक्या दादांना आमची श्रद्धांजली...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 5:03 pm | मनस्वी

दादा कोंडके ग्रेटच होते.
एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाची नाडी त्यांनी बरोब्बर हेरली होती.
विनोद द्व्यर्थी असले तरी पिक्चर बघायला मजा येते.
मला त्यांची 'जीवाशिवाची बैलजोडं' आणि 'अंजनीच्या सूता' ही गाणी आवडतात.

आत्ताच्या पिक्चरांमधील ओढूनताणून आणलेले पाचकळ विनोद (?) बघता दादांची महती पटते. सेन्सॉर बोर्डाचे आजचे 'कामकाज' बघता दादांनी आत्ता धूम केली असती असे वाटते...

विनोदाच्या बादशहाला आमची श्रद्धांजली

मनस्वी

सृष्टीलावण्या's picture

14 Mar 2008 - 5:08 pm | सृष्टीलावण्या

येका शिनिमात...

त्ये समोर दिसतंय ना त्ये,
त्ये श्येत माजं न्हाई आनि बाकीची श्येतं लोकाची हायेत...

>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

सर्वसाक्षी's picture

15 Mar 2008 - 12:10 am | सर्वसाक्षी

दादा कोंडके नावाच्या एका मराठी माणसानं आपल नाव गिनीज् च्या जागतिक विक्रम पुस्तिकेत घट्ट शाईनं लिहुन ठेवलाय - बहुधा कधीच न पुसलं जाण्यासाठी

"ओळीने सलग नऊ चित्रपटांना रजतजयंतीपार नेणारा जगातला एकमेवाद्वितीय दिग्दर्शक"

या लोककलाकारास त्याच्या पुणतिथीनिमित्त आदरांजली.

भडकमकर मास्तर's picture

15 Mar 2008 - 1:01 am | भडकमकर मास्तर

गिनीज् च्या जागतिक विक्रम पुस्तिकेत घट्ट शाईनं लिहुन ठेवलाय
गिनीज बूक वाला समज चांगलाच प्रचलित असला तरी, मी कुठेतरी वाचलंय की असा विक्रम अस्तित्त्वात नाही... असो....

विसोबा खेचर's picture

15 Mar 2008 - 11:59 am | विसोबा खेचर

दादा या अफाट व्यक्तिमत्वाला आपला सलाम....!

तात्या.

प्राजु's picture

15 Mar 2008 - 8:29 pm | प्राजु

आत्ताच्या पिक्चरांमधील ओढूनताणून आणलेले पाचकळ विनोद (?) बघता दादांची महती पटते. सेन्सॉर बोर्डाचे आजचे 'कामकाज' बघता दादांनी आत्ता धूम केली असती असे वाटते...

मनस्वी म्हणतात ते अगदी खरंय. मलाही जिवाशिवाची बैलजोड हे गाणं आवडतं.

- (सर्वव्यापी)प्राजु