राज ठाकरे डोंबिवलीत

सुमीत भातखंडे's picture
सुमीत भातखंडे in काथ्याकूट
20 Feb 2010 - 8:17 am
गाभा: 

३ फेब्रुवारी २०१० रोजी राज ठाकरे यांची डोंबिवली येथे सभा झाली. सभा नेहमीसारखीच सॉलिड झाली. मराठीचा नेहमीचा मुद्दा तर होताच, पण त्याबरोबरच सध्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे काही प्रकार चालू आहेत त्याचाही उत्तम समाचार घेतलाय.

टॅक्सी परवान्यांचा इश्यु, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी केलेलं घुमजाव याबद्दल राज बोललेच, पण त्याचबरोबर ह्याप्रकारानंतर विधानसभेत विरोधी पक्षाबरोबरच राष्ट्रवादींनीही झाल्या प्रकाराचा विरोध केल्याबद्दल राजनी त्यांचं अभिनंदनही केलं. राज जे नेहमी सांगत आलेले आहेत, की जे चांगलं असेल त्याचं कौतुक करूच मग तो रायव्हल पक्ष का असेना, त्याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आल. राहिला टॅक्सी ड्रायव्हर्सना मराठी येण्याचा मुद्दा - आपल्या राज्यात असा कायदाच आहे मुळी की टॅक्सी चालकाला पहिले मराठी, आणि इतर कुठलीही एक भाषा कामचलाऊ येण बंधनकारक आहे. प्रश्न येतो तो फक्त हा कायदा इंप्लीमेंट करण्याचा जे शक्य नाही हे आपण सगळ्यांनी बघितलच.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे "मुंबई पुरे देशकी" हे प्रसार माध्यमांनी लावलेलं रडगाण आणि त्यात सचिन, मुकेश अंबानी यांची विनाकारण इनवॉल्वमेंट. भारतातलं प्रत्येक गाव, प्रत्येक शहर हे पुर्ण भारताचच आहे ह्याबद्दल कोणाचच दुमत नाही, पण म्हणून कोणालाही स्थानिक लोकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा अधिकार प्राप्त होत नाही.

याच अनुशंगाने राजनी कर्नाटकचं उदाहरण दिलं. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी फतवा काढलेला आहे की, तिकडे काम करणार्या आय.ए.एस. ऑफीसर्सना कन्नड बोलता यायलाच पहिजे नाहीतर त्याचा परिणाम त्यांच्या प्रगतीपुस्तकावर होवू शकतो. या लेवल वरचे महाराष्ट्रातले ऑफीसर्स मात्र "मुंबई ही कुणाच्या बापाची नाही" अशी भाषा करताना आढळतात. असो. भाषण फार नाही, जेमतेम अर्ध्या तासाचच झालं. मी स्वतःही युट्युबवरच बघितलं आणि तुम्ही सगळ्यांनी बघावं म्हणून हा दुवा इकडे शेयर करतोय.

http://www.youtube.com/watch?v=rH4QVcWLb4Y

सुमीत भातखंडे

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

20 Feb 2010 - 10:31 am | पाषाणभेद

नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंना डोळे झाकून पाठिंबा.

मी मराठी!!
जय मराठी!!

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

अप्पा जोगळेकर's picture

20 Feb 2010 - 1:53 pm | अप्पा जोगळेकर

जर राज ठाकरे रंगबदलू नसतील तर माझा पण पाठिंबा आहे. अशी आशा करुया की ते बाळ ठाकरें प्रमाणे वागणार नाहीत.

शैलेन्द्र's picture

20 Feb 2010 - 4:07 pm | शैलेन्द्र

ह्म्म्म्म... पण लक्षणं तशीच दीसतायतं

chipatakhdumdum's picture

20 Feb 2010 - 9:14 pm | chipatakhdumdum

कोणती लक्षण म्हणताय भाऊ ? आम्हाला तरी कळू दे.
लक्षण लिहायला लाजता कशाला?

सुधीर काळे's picture

20 Feb 2010 - 9:29 pm | सुधीर काळे

मराठी माणसाला जो मनापासून पाठिंबा देईल तो "आपला"!
जय राजाभाऊ!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

गजा गाजरे's picture

20 Feb 2010 - 11:14 pm | गजा गाजरे

मागे सकाळ मधे एक ले़ख वाचन्यात आला ,
कन्नड मधे अजुनहि पोलिस स्टेशन मधे क्म्प्लेन कन्नड मधेच घेतात , हिन्दि वा ईन्गजी चालत नाहि
पन अप्ल्यकडे ..........

धनंजय's picture

24 Feb 2010 - 3:43 am | धनंजय

माझ्या नात्यातली काही मंडळी कन्नड बोलत नाहित, पण कर्नाटकप्रवासावर आहेत. त्यांना चोर-दरोडेखोरांनी लुटले-मारले, तर कन्नड शिकेपर्यंत पोलीस मदत करणार नाहीत, तक्रार नोंदवणार नाहीत, हे वाचून अत्यंत काळजी वाटू लागली आहे.

मात्र कर्नाटकातील गुन्हेगारांसाठी उत्तम बिझिनेस प्लॅन आहे : कन्नड न-येणार्‍या व्यक्तीला हेरून त्यांची चोरी-बलात्कार वगैरे करा. पोलिसांपासून कायदेशीर सूट आहे! (हा बिझिनेस प्लॅन गोव्यात चालत नाही. छे, छे गोव्याचे नतद्रष्ट सरकार नेहमी बिझिनेस-विरोधी असते.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Feb 2010 - 6:53 am | अक्षय पुर्णपात्रे

धागा उघडला बरेच झाले. धनंजयनी चांगलाच मजेदार प्रतिसाद लिहिला आहे.

नितिन थत्ते's picture

24 Feb 2010 - 2:27 pm | नितिन थत्ते

धनंजय यांचा प्रतिसाद मजेशीर आहे पण मुद्द्याचा विपर्यास करतो आहे का?
कन्नड यायला हवे असे अधिकार्‍यांना सांगितले आहे. कन्नड न येणार्‍याची तक्रार नोंदवू नका असे सांगितले नसावे.

नितिन थत्ते

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Feb 2010 - 8:00 pm | अक्षय पुर्णपात्रे

धनंजयच्या प्रतिसादात काही विपर्यास जाणवला नाही. काही विपर्यास असेलच तर तो श्री गाजरे यांच्या 'कन्नड मधे अजुनहि पोलिस स्टेशन मधे क्म्प्लेन कन्नड मधेच घेतात' या वाक्यात आहे.

नितिन थत्ते's picture

24 Feb 2010 - 8:04 pm | नितिन थत्ते

खरेच की. चुकलेच माझे.

पण आता दुरुस्ती करता येणार नाही. :(

धनंजयनी समजून माफी द्यावी. :T :S

नितिन थत्ते

धनंजय's picture

24 Feb 2010 - 10:52 pm | धनंजय

:-)

माझा स्वानुभव आहे, की महाराष्ट्रात पोलीस मराठीत(ही) नोंदणी करतात.

(महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्यसेवेत नोकर असताना पोलिसांशी व्यवहार करण्याचा प्रसंग आला होता - १०-१५ वर्षांपूर्वी. माझा पोलिसांशी बहुतेक व्यवहार मराठीत होता, पण वैद्यकीय चाचणीचा अहवाल तेवढा मात्र मी इंग्रजीत लिहिला होता, हे आठवते आहे. पोलिसांची पंचनामा नोंदही मराठीतच होती.)

**"अमुक राज्यात अमुक होते, आणि तमुक राज्यात तमुक होते" वगैरे विधानांमध्ये "आपल्या राज्यात मात्र वेगळेच काही होते" असा गर्भित आरोप असतो. अशी विधाने अन्य राज्यांबाबत चुकलेली असतात, आणि आपल्या राज्याबाबत चुकलेली असतात, असे पुष्कळदा लक्षात येते. पण तर्कातील बहुतेक विधाने गर्भित ठेवलेली असतात, त्यामुळे प्रतिवाद करण्यासाठी शब्द नसतात. सर्व गर्भित विधानांपासून "मी असे कुठे म्हटले" म्हणून हात झटकता येतात. अशा परिस्थितीत युक्तिवाद सुरुवातीला गर्भितांसह जसाच्यातसा स्वीकारून त्याच्या पुढील पायर्‍या दाखवून "रिडुक्सियो आड आब्सुर्डुम" करण्यावेगळा पर्याय मला दिसत नाही. अनर्थक निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी "तुमचे अमुक गर्भित विधान होते" असे मला म्हणावे लागत नाही, आणि त्या गर्भित विधानापासून कोणाला हात झटकून वेगळे होण्याचाही मार्ग नसतो.**

II विकास II's picture

24 Feb 2010 - 8:36 am | II विकास II

धंनजय यु टु =))
असो.
कर्नाटकविषयी काही माहीती नाही. मोठा भाउ बरेच दिवस कर्नाटकमध्ये होता. त्याला विचारुन बघतो.
--
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

चिरोटा's picture

24 Feb 2010 - 2:56 pm | चिरोटा

फार कमी पोलिसांना हिंदी येते. तेव्हा हिंदी येते पण बोलत नाहीत असा प्रकार नाही आहे. वरील भाषणात राज ठाकरे "भाषेची भिंत उभी केली पाहिजे" असे म्हणतात. हिंदी मराठी बाबत ते कठिण आहे.
हिंदी आणि मराठीची लिपी देवनागरी आहे.दोन्ही भाषांमध्ये बरेच साम्य आहे. हिंदीचा प्रामुख्याने प्रसार महाराष्ट्रात(मुंबई/ठाणे/पुणे) होण्याचे कारण-
१)बॉलिवूड आणि त्यातून होणारी सांस्कृतिक देवाण घेवाण.(बॉलिवूड म्हणजे केवळ चित्रपट नाही तर त्याच्याशी निगडीत असंख्य व्यवसाय्-ह्यात लाखो लोक आहेत.)
२)अगणित बँका,कंपन्यांच्या मुख्य कचेर्‍या.
३)अनेक केंद्रिय संस्थाची कार्यालये येथे आहेत.

(वरील तिन्ही गोष्टींचा मुंबईकरांना अभिमान वाटतोच की!!)
शिवाय राज्य सरकारच्या औद्योगिक धोरणांमुळे राज्यात हिंदीचा वापर गेले अनेक वर्षे केला जातो.
दाक्षिणात्या भाषांचे तसे नाही. बेंगळुरु पासुन ४०किमी वर होसूर गाव आहे. हे तामिळनाडूत येते.तिकडच्या माणसाला इकडे काम करायचे म्हंटले तरी कन्नड लिपी शिकावी लागेल.काम इंग्रजीतून होत असेल तर भाग वेगळा.
भेंडी

विशाल कुलकर्णी's picture

24 Feb 2010 - 3:12 pm | विशाल कुलकर्णी

कन्नड मधे अजुनहि पोलिस स्टेशन मधे क्म्प्लेन कन्नड मधेच घेतात , हिन्दि वा ईन्गजी चालत नाहि>>>>

थोडीशी शब्दरचना बदलण्याची गरज आहे असे वाटते..... कंप्लेंट कन्नडमध्येच लिहून घेतली जात असेल कदाचित, सांगणार्‍याने कन्नडमध्येच सांगायला हवे असे थोडेच आहे. एखाद्या परभाषिकाला ज्याला कन्नड येतच नाही त्याने काय तक्रार नोंदवायचीच नाही? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"