मजेशीर नावे

मनस्वी's picture
मनस्वी in काथ्याकूट
14 Mar 2008 - 12:51 pm
गाभा: 

काल मित्राबरोबर गप्पा मारत असताना त्याने एक मजेशीर गोष्ट सांगितली. त्याच्या ओळखीत एक कुटुंब आहे त्यांच्या मुलांची नावे आहेत -
थेंब आणि ठिपका
आमचा ग्रुप १०-१५ मिनिटं हसतच सुटला. त्याला म्हणालो की टिंग्या सोडू नकोस म्हणून. पण तो म्हणाला टिंग्या नाही.. खरच आहेत.
मग अशाच काहीच्या काही नावांवर चर्चा आणि खीखी - ख्याख्या सुरु झाली.

तुम्हाला माहित आहेत का अशी मजेशीर नावे...??

मनस्वी

प्रतिक्रिया

तात्याकाम जाबाली's picture

14 Mar 2008 - 3:20 pm | तात्याकाम जाबाली

आमच्या नात्यात एक पेंडसे फ्यॅमिली आहे त्यातील एकाचे नांव चक्क 'मर्क्युरी' असे आहे! :)

ही माहिती सांगोवांगी किंवा ऐकीव नाही. कारण त्या मर्क्युरी पेंडसेच्या लग्नाची पत्रिका आजही माझ्याकडे आहे त्यात,

आमचे येथे श्रीकृपेवरून आमचे सुपुत्र

चि मर्क्यूरी

असा उल्लेख आहे!

या पेंडेसे पतीपत्नींनी आपल्या मुलाला पार्‍याचे नांव का द्यावे, याचे उत्तर मला अद्याप सापडलेले नाही! :)

असो, मनस्वी तुझा हा उपक्रम छान आहे. यातून मजेमजेशीर नांवे ऐकायला मिळतील अशी आशा आहे! :)

आपला,
तात्याकाम जाबाली.

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 4:09 pm | मनस्वी

माझ्या एका colleague चे नाव -

अल्फा ओमेगा

आधी नुसते डेस्क वरील व्हाइट बोर्डरील नाव वाचून कळलेच नाही मुलगा आहे की मुलगी.. मुलगी होती.
मी तिला विचारले तुझ्या भावंडांची नावे बीटा आणि गॅमा आहेत का... नाही म्हणाली.

छोटा डॉन's picture

14 Mar 2008 - 4:41 pm | छोटा डॉन

मला आमच्या रोजच्या कामासाठी वारंवार "इटाली, जर्मनी, स्वीडन" वरैरे कॉल करावा लागतो...
मागच्या आठवड्यात 'इटलीमधील वॅलरियो सालसिनी" नावाच्या व्य्क्तीला कॉल करायचा होता.
आता "सालसिनी" हे नाव वाचून माझा एक colleague फार उत्साहित झाला व म्हणाला आधि मी बोलणार ... कारण त्याला वाटले मुलगी आहे...
मग काय लावला कॉल, ह्याने जोशात सुरवात केली "हॅलो साल्सिनी , कार्तीक हिअर फ्रॉम अबक इंडिया ....."
पलिकडून माणसाचा आवाज आला "हाय कार्तीक , टेल मी ..."
ह्यावर आमच्या मित्राचा मूड जाऊन तो मला म्हणला "जाने दे, तू बात कर ...."
मग मी आपले हसू आवरत "कार्तीक" बनून "साल्सिनीशी" डिस्कशन केले .....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 4:49 pm | मनस्वी

छोट्या डॉन्या
विषयांतर करू नकोस.. मजेशीर नावे सांग.

मनस्वी

छोटा डॉन's picture

14 Mar 2008 - 5:53 pm | छोटा डॉन

आमच्या गावात एक महाशय आहेत की ज्यांना "युद्ध , लढाई " वगैरे मध्ये इंटरेस्ट आहे.
म्हणून त्यांनी आपल्या मुलांची नावे अनुक्रमे " रणविजय , संग्राम व ऍलेक्झांडर " अशी ठेवली आहेत ...
आता त्याच्या लोकांनी अपभ्रंश अनुक्रमे "ईज्या , मोंट्या व टिंग्या " असा केला आहे ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Mar 2008 - 6:13 pm | ब्रिटिश टिंग्या

डॉनभाय आपुनका नाम युज कियेलाय वो साला ऍलेक्झांडरने.....
साले का गेम बजा डाल दो.....

- छोटा छत्री ;)

सन्दीप's picture

14 Mar 2008 - 5:00 pm | सन्दीप

निव्वल नावेच का फार विचित्र आद्नावे देखिल आस्तात

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 5:28 pm | मनस्वी

तंदीप
आदनावे पन तालतील

मनस्वी

राजमुद्रा's picture

14 Mar 2008 - 5:41 pm | राजमुद्रा

माझ्या मामाच्या मित्राला एक मुलगा आणि दोन मुली
त्याच्या नावे - भारत, अमेरिका आणि रशिया.
कारण विचारल्यावर सांगतो मुलगा आपला आणि मुली परक्या.

राजमुद्रा :)

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 6:33 pm | मनस्वी

एका परिचित मावशींचे नाव.

मनस्वी

झकासराव's picture

14 Mar 2008 - 6:56 pm | झकासराव

आडनाव कालच एका दवाखान्यात वाचलेली ऍडमीट पेशंटची.
कड
खराबे
बेंबलगे
आता नाव
प्रणय (केला हा सांगण्याचा एवढा का अट्टाहास :))
प्रणाली (हे ऐकुन मला तर जलप्रणाली तत्सम काहितरी आठवत भुगोलात शिकलेल.)
योजना (हा काय मुलीच नाव ठेवण्याजोगा शब्द आहे का?? माणुस कितिही योजनाप्रिय असला तरी. पण नाही एका ठिकाणी मी पाहिलय हे नाव)
अवांतर :
मला हा धागा पाहुन "गोकुळ" हा आताच्या आठवीच्या पुस्तकात असलेला धडा आठवला.
त्यात तो साक्ष द्यायला जाणार असतो. आणि त्याची बरीच पुर्व तयारी करतो. ती करता करताच त्याला कायद्याच्या पुस्तकातील
पंचनामा, साक्ष, दफ्तरीनोंद, उलटतपासणी (चु भु द्या घ्या बर्‍याच दिवसापुर्वी वाचल असल्याने हेच ते शब्द असतीलच अस नाही)
हे असले शब्द आवडु लागतात. कारण त्याच्या मते ते भारदस्त असतात.
तो लग्गेच ठरवुन टाकतो की त्याच्या मुला मुलींची नाव तो अशीच ठेवणार अस.

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 7:02 pm | मनस्वी

बहुतेक "पंचवार्षिक योजने"नंतर झालेली मुलगी असावी...

मनस्वी

गीतांजली's picture

14 Mar 2008 - 6:57 pm | गीतांजली

मि.पा. च्या सदस्यांची नावं काही कमी मजेशीर नाहीत हं.....

आमच्या शाळेत दोन अत्रे बाई होत्या. कुमारी अत्रे आणि सौ. अत्रे.
आम्ही त्याना कुअ आणि सौअ म्हणत असु.
तसेच ३ कुलकर्णी बाई होत्या. त्यांचीही नावं अशीच होती.
मकु (मधुरा कुलकर्णी), संकू (संगीताच्या कुलकर्णी) आणि पीकु (पीटी च्या कुलकर्णी)

पिवळा डांबिस's picture

14 Mar 2008 - 11:01 pm | पिवळा डांबिस

मि.पा. च्या सदस्यांची नावं काही कमी मजेशीर नाहीत हं.....

कोण म्हणतंय असं? साधी मेली सोप्पी, सरळ, चारचौघांत वापरली जाणारी नांवं आहेत आमची!
उगीच बोल लावायचा म्हणजे काय! :)))))

वेलकम टू मिसळपाव!!:)))

-पिवळा डांबिस

छोटा डॉन's picture

14 Mar 2008 - 11:24 pm | छोटा डॉन

"कोण म्हणतंय असं? साधी मेली सोप्पी, सरळ, चारचौघांत वापरली जाणारी नांवं आहेत आमची!"
"डांबिसकाकांच्या" म्हणण्याशी सहमत,
काय प्रोब्लेम आहे हो आमच्या नावात ?
"छोटा डॉन" किती साधे, सोपे, सरळ, सज्जन, सुसंस्कॄत [ याचा सॄलांच्या संस्कॄतशी काहिही देणे घेणे नाही ], सोज्वळ नाव आहे, ऐकले की कसे शांत, पवित्र , समाधानी वाटते [ वाटत नसल्यास तसे वाटवण्याचे आमच्याकडे बरेच मार्ग आहेत ...]. ऊगीच तिच्यायला आम्हाला बदमान करता का ?
आता बाकिची नावे म्हणजे "धमु , डांबिसकाका , टिंग्या , इनोबा " ही पण वरच्या सारखीच गोड आहेत ....
[ फुकट नाही म्हणून आमच्याशी पंगा घेऊ नका , कसे ??? ]

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ's picture

14 Mar 2008 - 7:55 pm | विजुभाऊ

एका फासेपरधी मुलाचे नाव "देशपांड्या काळे" असे होते
त्या मुलाला नावाचे विचारता तो म्हणाला की त्याची आइ जेल मधे बाळंत झाली.त्यावेळी तीला देशपांडे नावाचे जज्ज नी शिक्षेत सूट दीली होती
बाकी फासे पारधी समाजात
पिर्‍या , किरलोस्कर्‍या, इंजन्या , बॅटरी, अशी नावे सर्रास असतात

प्राजु's picture

14 Mar 2008 - 8:16 pm | प्राजु

आमच्या एका स्नेह्यांच्या मुलाचे नाव अनंत आहे. तर त्याच्या लग्नात त्याने त्याच्या बायकोचे नाव.... 'अनादी' ठेवले...
म्हणजे तिचे नाव अनादी अनंत ....... कर असे काहिसे... :))
- (सर्वव्यापी)प्राजु

टिउ's picture

14 Mar 2008 - 10:11 pm | टिउ

या नावाची एक व्यक्ती माझ्या परिचयाची आहे!

विकास's picture

14 Mar 2008 - 10:25 pm | विकास

माझ्या वर्गात एक अफ्रिकेहून आलेला मुलगा होता. त्याचे नाव होते "इनोसंट".

एकदा त्याने माझ्या घरी फोन केला आणि मी आहे का म्हणून माझ्या रुममेटला विचारले. मी घरात नव्हतो म्हणून त्याने उत्तर दिले की नाही, मग त्यांच्यात पुढील संवाद झाला:

माझा रूममेटः "मे आय नो हु इज कॉलिंग?"
वर्गमित्र: " आय ऍम इनोसंट"
माझा रूममेटः "ओके, बट व्हॉट इज युअर नेम?"
वर्गमित्र: "आय टोल्ड यू आय ऍम इनोसंट"
माझा रूममेटः "दॅट्स फाइन, नाउ फर्गेट द फन , जस्ट टेल मी युअर नेम सो दॅट आय कॅन टेल हिम"
वर्गमित्र: (वैतागाने), "कान्ट यू अंडरस्टँड? माय नेम इज इनोसंट"
माझा रूममेटः "उप्स! आय ऍम सॉरी!"

या प्रसंगानंतर मला माझ्या रूममेट कडून जोरजोरात हसत हा किस्सा ऐकायला मिळाला तर "इनोसंट" कडून वैतागून :))

बाकी हा इनोसंट नंतर काम-धंदा शोधताना "नाव सोनूबाई .." सारखाच वागायला लागला.

सचिन's picture

14 Mar 2008 - 11:06 pm | सचिन

आमच्या ओळखीतल्या एका कुटुम्बात ६ मुली होत्या. मुलाची वाट पाहिल्यामुळे !!
सहावीचे नाव ठेवले : इतीश्री !
मग सातव्यान्दाही मुलगी झाली.
नाव ठेवले : प्रगती !!!!!!

झकासराव's picture

14 Mar 2008 - 11:49 pm | झकासराव

अशा बर्‍याच मुली झाल्या की एक उपाय म्हणून मुलीचे नाव "नकोशी" ठेवत.
किंवा "अंबु" ह्याचा अर्थ आता इतक्या मुली झाल्या की अंबुन गेलो.
ह्याची आठवण झाली. :(
हम्म.
चला उगीच सिरियस नको व्हायला.
एक प्रसिद्ध असे नाव आहे. बहुतेक कोणत्यातरी राजकारणी माणसाचे होते.
"पंजाबराव देशमुख" :)
अजुन एक "माँटुकसिंग अहलुवालिया" (हे असच आहे ना??)
एक मुलगा आमच्या कालेजात होता.
त्याच पुर्ण नाव होत
"आशेर फिलिप मनपाडळेकर" :)
माझ तो आधी आडनावानुसार हिंदु मग नावानुसार मुस्लिम आणि पुर्ण नाव ऐकुन गोंधळलेला चेहरा अस काहिस झाल होत.
तो ख्रिस्चन होता. :)
एक चांगला दोस्त होता तो माझा कालेजात :)

प्राजु's picture

14 Mar 2008 - 11:32 pm | प्राजु

भावाच्या एका मित्राचं नाव आहे अभिनंदन.
त्याने फोन केला . त्याला "हॅलो" ऐवजी डायरेक्ट नाव सांगायची सवय असावी. आमचा संवाद असा झाला..
मी : हॅलो
तो : अभिनंदन
मी : धन्यवाद, पण कशाबद्दल?
तो : ताई ना?
मी : हो.
तो : अगं, अभिनंदन..
मी : ते ठिक आहे पण अभिनंदन कशाबद्दल? आणि कोण बोलतय??
तो : मी अभिनंदन्...विकी आहे का?
मी : अच्छा... एक मिनिट..

- (सर्वव्यापी)प्राजु

वरदा's picture

14 Mar 2008 - 11:38 pm | वरदा

आमच्या ओळखीतल्या एका कुटुम्बात ६ मुली होत्या. मुलाची वाट पाहिल्यामुळे !!
सहावीचे नाव ठेवले : इतीश्री !
मग सातव्यान्दाही मुलगी झाली.
नाव ठेवले : प्रगती !!!!!!


कसली लोकं असतात.... ह. ह. मु. व.
माझ्या ओळखीत एका मुलाचे नाव हिरण्यगर्भ आहे...एवढे मोठे नाव..कशी हाक मारतात कोण जाणे..
बाबांच्या ऑफिस मधे एक प्युन होता त्याचं नाव मँगो कांबळे....त्याच्या वडिलांना हा एकच इंग्रजी शब्द कळला आणि त्यांना वाटलं इंग्रजांना आवडेल...:)))

चतुरंग's picture

15 Mar 2008 - 12:26 am | चतुरंग

'कल्पक' असे आहे. (अवांतर - त्याला मी म्हणालो मागून-पुढून 'कल्पक' आहेस! तर काही दिवस माझ्याशी बोलेनासाच झाला.;)

पुण्यात पौड रस्त्याला एका बंगल्याचे नाव आहे 'येना'
(अवांतर - तिथून जाताना नाव बघून आत जावेसे वाटले पण नंतर 'मग बघतो तुझ्याकडे' अशी पुढची अदृश्य अक्षरेही दिसली आणि मी विचार बदलला! ह्.घ्या:))

चतुरंग

अनिता's picture

14 Mar 2008 - 11:03 pm | अनिता

माझ्या ओळखीत एक आहे: मदत अग्रवाल
अवांतर -
पुण्यात पौड रस्त्याला एका बंगल्याचे नाव आहे 'येना'

माझ्या माहितीप्रमाणे बंगल्याचे मालक फौजेत होते. ईम्फाळच्या लढईत जपानी सेनेशी लढले. जपानी शेवटचा जवान असेपर्यत लढले, त्या तुकडीचे नाव 'येना' होते. त्याची आटवण म्हणून बंगल्याचे नाव 'येना'

अनिता

चतुरंग's picture

17 Mar 2008 - 7:08 pm | चतुरंग

आपल्या माहितीबद्दल धन्यवाद!

चतुरंग

केशवराव's picture

15 Mar 2008 - 1:51 am | केशवराव

माझ्या एका मित्राने लग्नाआधीच ठरवीले होते कि, पहीला मुलगाच होणार आणि त्याचे नांव मी घटोत्कच ठेवणार. या मागे त्याचे कारण असे ; ' महाभारतातली कितीतरी नांवे आपण आपल्या मुलांना ठेवतो , मग घटोत्कच काय वाईट ?[ माझा मित्र प्रकृतीने जरा भिमासारखाच आहे म्हणा.]
- - - - - - - - - केशवराव .

प्रमोद देव's picture

14 Mar 2008 - 11:02 pm | प्रमोद देव

ऐकलेली गोष्ट सांगतो.
माझ्या एका मित्राच्या नातेवाईकाचे नाव आहे "गोविंद गुणे"
सगळे त्यांना "गुण्यागोविंदाने" असेच हाक मारतात.

उदय सप्रे's picture

17 Mar 2008 - 2:32 pm | उदय सप्रे

आमच्या शाळेत (सन्मित्र मन्डळ विद्यामन्दीर्-गोरेगाव) एक "मोघे" नावाचा मुलगा होता-त्याचे वडील पदार्र्थविज्ञानाचे प्रोफेसर होते.त्या २ भावान्ची नावे : अपोलो आणि मर्क्युरी अशी होती !

नावपेक्षा आडनावान्ची मजा जास्त आहे :
खानखोजे
शौचे (ह्या आडनावाचा माणूस जेवायला बसला असता त्याला बाहेरुन कशी हाक मारणार?
चोळले (काय काय?)
उदास
घायाळ
ससाणे
वाघमारे
तुपे
.....असो,, लिस्ट फारच मोठ्ठी आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Mar 2008 - 2:42 am | llपुण्याचे पेशवेll

हगवणे असे पण एक मजेशीर आडणाव आहे.
पुण्याचे पेशवे

ठणठणपाळ's picture

21 Mar 2008 - 10:23 am | ठणठणपाळ

आमच्या वर्गात एक 'सुवर्णा हगवणे' नावाची मुलगी होती. कसली श्रीमंत असेल नाही ती?

मनस्वी's picture

17 Mar 2008 - 2:38 pm | मनस्वी

ऑफीसमध्ये एका पात्राचे नाव :

Sandeep Kizhekakoezhisseri

काही बोध झाल्यास मलाही कळवावे.

मनस्वी

नंदन's picture

17 Mar 2008 - 2:39 pm | नंदन

लोकसत्तेत अविनाश बिनीवालेंचे पूर्वी एक सदर यायचे. त्यात त्यांनी नावांबद्दल लिहिताना, मोठ्या मुलीचे नाव शालिनी म्हणून धाकटीचे त्याच्या बरोबर उलटे निलीशा असे एक उदाहरण दिले होते.

बाकी, आमच्या हपिसात टिंगटिंग झू म्हणून एक कर्मचारी आहे. 'युअर नेम हॅज अ रिंग इन इट' हा तिच्या नावावर वरचेवर होणारा विनोद आहे. बाकी 'हॅपिनेस' नावाची एक आफ्रिकन मुलगीही ओळखीची होती. बर्‍याचदा नावांचा अर्थ माहीत नसताना केवळ इंग्रजी शब्द म्हणून नाव ठेवलं जातं. 'टूमॉरो' हे नाव असलेल्या आफ्रिकन मुलाचा त्याच शीर्षकाचा चित्रपट दोन-तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री's picture

17 Mar 2008 - 2:45 pm | आनंदयात्री

लग्नाच्या पत्रिकेत नवरदेवाचे नाव "म्हातारबा पुंजाजी शिंदे" असे वाचले आहे.

राजमुद्रा's picture

17 Mar 2008 - 2:57 pm | राजमुद्रा

मी मंगल कार्यालयाच्या बाहेर साईनबोर्ड पाहिला,लग्नातल्या वधू-वर पक्षाकडील आडनावे त्यावर लिहिली होती नावे होती 'तांबडे' आणि 'हिरवे'. बहुतेक वधु म्हणत असावी आधी तांबडी होते आता हिरवी झाले. तशीच एकदा लग्नपत्रिकेवर नावे वाचली होती 'उभे' आणि 'आडवे'

राजमुद्रा :)

मनस्वी's picture

17 Mar 2008 - 3:02 pm | मनस्वी

जुन्या कंपनीतील सहकारी.
सहकारी मुलगी नसून मुलगा होता.

मनस्वी

आनंदयात्री's picture

17 Mar 2008 - 3:08 pm | आनंदयात्री

असणार. पंजाब्यांच्या पोरा-पोरींची नावे अन कुत्र्यांची नावे यात बरेच साधर्म्य असते असे अस्मादिकांचे मत आहे.

उदा: पप्पी, डॉली, लव्हली ई.ई.

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 3:31 pm | धमाल मुलगा

बाकी सगळी नाव॑ ठीक आहेत...
लव्हली बद्दल काय बोलायच॑ नाय हा॑, पैलेच सा॑गून ठेवतोय. आपल॑ एके काळच॑ झाड व्हत॑ ते.

- धमालसि॑ग भि॑द्रनवाले.

आनंदयात्री's picture

17 Mar 2008 - 4:08 pm | आनंदयात्री

१२ वाजले वाटते ... तिच्यायला धमाल्या सरकलं !

उगी उगी हं बाळा !

मनस्वी's picture

17 Mar 2008 - 3:21 pm | मनस्वी

वर्गातील एका मुलीचे नाव : विद्युत

अवांतर :
मी लहान असताना आमच्या वाड्यात एका वस्ताद आणी अगाऊ मुलीचे दात पुढे येउन गाल फुगलेले होते..
तिला आम्ही नाव ठेवलेले : चंबूराव गायतोंडे.
अशीच हाक मारायचो आम्ही सगळे तिला.. तिची आज्जी जाम चिडायची.

मनस्वी

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 3:37 pm | धमाल मुलगा

चंबूराव गायतोंडे....
लय लय भारी !!!

विद्युत आमच्या आबा॑च्या मित्राच॑ नाव. त्याला आम्ही विद्युतकाका म्हणतो, आणि म्हणून काकूला बिजलीकाकू :-))

विद्युत होती . आम्ही एकाच बाकावर बसायचो.. इ. २ री तुकडी. ब उगाच डोक्यात काहीच्या काही विचार आणू नका ;-)

मनस्वी's picture

17 Mar 2008 - 3:46 pm | मनस्वी

काहींना सवय असते भारदस्त नावे ठेवण्याची.
आता हर्षवर्धन समजू शकते = आनंद वृद्धिंगत होणे.
नाव कसं धष्टपुष्ट दिसलं पाहिजे.. अहो नाव ऐकून माणूस अर्धा गार झाला पाहिजे.. असा काहीजणांचा समज असतो.

आमच्या एका परिचिताने सुपुत्राचे नाव ठेवले आहे - राजवर्धन

याचा नक्की अर्थ काय? म्हणजे मलाच अर्थ माहित नाही हे सुद्धा शक्य आहे.

म्हणजे नावे जरूर ठेवा. पण ती अर्थपूर्ण असावीत, नाही का.

अवांतर :
या राजवर्धनचे नंतर राजू/राज्या, नानासाहेबांचे नानू, बाळासाहेबांचे बाळू होते ती गोष्ट वेगळी.

मनस्वी

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 3:56 pm | धमाल मुलगा

माझा एक मित्र आमच्या सर्वा॑च्या मते ठार "येडा' आहे.
त्याच्या मुलाच॑ नाव काय ठेवल॑ असाव॑?

हव्यवाहन
म्हणल॑, 'म्हणजे काय रे?'
उत्तर: 'कोण जाणे. पण लय भारी वाटत॑य ना?'
मी: 'कप्पाळ! लेका त्याला बोलता यायला लागल्यावर नाव विचारल॑ तर बिचारा नाव सा॑गता सा॑गता कोलमडून पडेल एव्हढ॑ भारी वाटत॑य'.

मनस्वी's picture

17 Mar 2008 - 4:00 pm | मनस्वी

तुमचा मित्र.. भारी वाटतंय म्हणून काय मुलाचंच नाव ठेवायचं??

मनस्वी

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 4:04 pm | धमाल मुलगा

कुठल्याशा काद॑बरीच्या नायकाच॑ नाव होत॑ म्हणे ते!

धन्य ते लेखक, आणि धन्य तो आमचा सखाराम गटणे.

-ध मा ल.(सरळ साधा..हाप-म्याड)

स्वाती दिनेश's picture

17 Mar 2008 - 4:01 pm | स्वाती दिनेश

माझ्या एका विद्यार्थिनीचे असेच एक असेच गमतीदार नाव लक्षात आहे...कु.कोकिळा पोपट मगर.
तर एकीचे नाव 'टीनामुनी'..तिला विचारले अग हे कसले नाव? तर म्हणाली ती नटी नाही का? टीनामुनी...
तिला टीना मुनीम म्हणायचे होते पण बिचारीच्या पालकांना बारशाच्या वेळी हे माहित नव्हते की टीनामुनी नाव नसून ती मुनीमांची टीना आहे.
स्वाती

मनस्वी's picture

17 Mar 2008 - 4:17 pm | मनस्वी

धमालच आहेत नावे एकदम
कु.कोकिळा पोपट मगर :D
टीनामुनी :O
नारदमुनी ठेवले असते तर अर्थपूर्ण तरी झाली असते.

मनस्वी

प्रमोद देव's picture

17 Mar 2008 - 5:01 pm | प्रमोद देव

कु. कोकिळा पोपट मगर..... ऐवजी
कु. कोकिळा मगर पोपट असे असते तर?
कोकिळा...... मगर पोपट! असे म्हणता आले असते!

असेच एक नेहमी ऐकतो असे एक सुप्रसिद्ध नाव आहे. ..... देवकी पंडीत
आता प्रश्न हा पडतो की...... ह्या कोण आहेत? देव.... की.... पंडीत?

नेहमीचेच एक आडनाव आहे "नातू" असे.
आता त्याच्या पुढे एखादे नाव लावा अणि प्रश्न विचारून पाहा.
उदा. अमोल नातू
अमोल ना तू?
आता हा कुणाचा तरी मुलगा आहे असे विचारायचे असेल तर...... नातूंचा ना तू?
अमक्याचा ना तू? तमक्याचा ना तू? वगैरे वगैरे!

तद माताय............
दामू सुकड्या ; पप्पू कंघी ; येडा याकूब ; कादर टकल्या ; जाड्या लाडू
बब्बन पिस्तुल ; बाबू कळक ; राजू शाना ; पक्या खडूस( हे आमाला शाळेत गणीत शिकवायचे) दादू झुरळ( हे पी टी शिकवायचे) ; गोरा लुइस ; काल्या ऍन्थोनी ; गंग्या चड्डी
क्यों बे भूल गये क्या आपने दोस्त लोग कू........
आपुन्का विनम्रसे
गॅन्ग का अधिक्रुत प्रवक्ता
विजुभाऊ( ३ बार एन्कौन्टर रीटर्न)

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 4:41 pm | धमाल मुलगा

क्या विजुभाऊ, तुमी अपने सलीम फेकू को तो भुलीच गये. ऐसा नक्को होना भाई ! और शरद का॑डी, दिन्या सॅटेलाईट, जगन भु॑डा इनका नाम नै आया तो गॅन्ग का रेप्युस्टेशन तो एकदम खल्लास.
क्या...????

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Mar 2008 - 2:49 am | llपुण्याचे पेशवेll

टेक्सास गायकवाड या नावाचे एक विद्रोही साहीत्यकार आहेत.

पुण्याचे पेशवे

सुधीर कांदळकर's picture

18 Mar 2008 - 4:40 am | सुधीर कांदळकर

आमच्या घरासमोरच राहतात. आमच्या शाळेत मी जोईजोडे आणि डोकेफोडे आडनावाची मुले होती.

सुधीर कांदळकर's picture

18 Mar 2008 - 5:09 am | सुधीर कांदळकर

आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहतात.

सहाजिकच त्यांनी नावाची पाटी दरवाजावर लावलेली नाही.

गोकुळ बोकेफोड
वादूमल आलूमल झमटानी
उम्मेदमल टहिलरामानी

चतुरंग

मनस्वी's picture

18 Mar 2008 - 10:52 am | मनस्वी

आम्ही लहान असताना वाड्यात आमच्या वर रहायच्या.
आम्ही त्यांना सुंद्री आज्जी म्हणायचो.
लहानपणी काही कळत नसतं नावांना अर्थ वगैरे असतात.
सुंद्री आज्जी अन्नपुर्णा होत्या.

मनस्वी

झकासराव's picture

19 Mar 2008 - 11:52 am | झकासराव

गुपचुप हे आडनाव असत.
माझ्या एका मित्राच्या फ्लॅट समोर ह्याच आडनावाचे रहात होते.
आणि माझ्या मित्राच इब्लिस पोरटं त्याच्या फ्लेट्ला हळुच जावुन कडी घालत असे.
त्यावर माझा मित्र मला सांगत होता. की हा त्या गुपचुप च्या फ्लॅट ला गुपचुप जावुन कडी घालतो :)

सुधीर कांदळकर's picture

19 Mar 2008 - 10:52 pm | सुधीर कांदळकर

गंगाराम बिन गंगाराम

लौटन हलबल

ही उत्तर भारतीय नावे. विसरलोच होतो की.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

प्रा सुरेश खेडकर's picture

20 Mar 2008 - 8:21 pm | प्रा सुरेश खेडकर

नागपूरची एम्प्रेस मिल (स्थापना १८७४, पण आता संपूर्ण मोडित)म्हणजे टाटा उद्योगसमुहाचे पहिले अपत्य.मी तिथे काम करीत असतांना एकदा कामगारांचा संप झाला तेव्हा पोलिस अधिकारी आले होते.फोन समोर करून मी त्यांना म्हणालो,"जरा ड्राइव्हरसाहबसे बात किजिए." त्यावर चिडून ते म्हणाले," Why should I talk to a driver,I shall talk to the Manager." ह्यावर हंसू आवरित मी म्हटले "Sir, Mr. Driver is the Manager." पारशी लोकांमध्ये अशीच नावे असतात उदा.बाटलीवाला.

सभ्य इसम's picture

20 Mar 2008 - 9:27 pm | सभ्य इसम

बॉक्सवाला,बाटलीवाला,दारुवाला,झुनझुनवाला, मावावाला,बर्फीवाला.....आणि बरेच वाले...

मिथुनचं एक गाणं पण ऐकलं आहे लहानपणी...आ गया आ गया हलवावाला आ गया....

मोहित्यांचा केतन...

भोचक's picture

21 Mar 2008 - 5:59 pm | भोचक

नाशिकला एके ठिकाणी शाकद्विपी आडनावाचा बोर्ड पाहिलाय. घासकवळी नावाचे एक स्थळ माझ्या बहिणीसाठी सांगून आले होते. आडनाव पाहूनच आम्ही नकार दिला. इकडे मध्य प्रदेशात आडनावांचा वेगळाच झमेला झालाय. काही अक्षरे हिंदीत नसल्यामुळे अनेकांची आडनावे बदलून गेलीत. उदा. धडफळे- धरफले, केळकर- केलकर. ज्यांच्या नावात ळ आहे त्याचा ल झाला. त्याचा फटकाही काहींना इतका बसला की त्यांनी आडनावे बदलली. उदा. वाळवडे नावाच्या आणि तशा प्रकारच्या आडनावे असणार्‍यांनी अखेर आपली आडनावे बदलली, अशी मौलिक माहिती इंदूरच्या एका बुजूर्ग मित्राने दिली. तसेच काही भागात मूळ मराठी आडनावे उडाली आणि ते ज्या गावात राहिले ती आडनावे आली. झाशीवाले, घडवईवाले आदी.

पक्या's picture

5 Jun 2008 - 8:38 am | पक्या

एका मित्राच्या परिचितांच्या मुलीचे नाव विनंती आणि मुलाचे नाव विशेष.
ऑफीस मधील एकाचे नाव जयगोबीराम. त्याला सगळे गोबी म्हणतात.
एका ओळ्खीतल्या मुलीचे नाव धारा (त्यापेक्षा राधा बरे.)
असेच अजून एका मुलाचे नाव ओनील लिमये. (ओनील नावाचा क्रिकेटवीर होता आणि वडील क्रिकेट चे फॅन म्हणुन हे नाव ठेवले)
मजेशीर आडनावे: बुचके , बुचडे , भुतडा, मुंदडा , भोंगळे , बारसोडे , डुंबरे (डुंब- रे)
कॉलेज मध्ये एक मुलगि होती तिचे नावः प्रतिमा नागवडे
एका गांधी नावाच्या मित्राचे नुकतेच लग्न झाले. बायकोचे नाव काय असावे ? सोनिया. लग्नाआधी त्या मुलीला कधीही वाटले नसेल आपण सोनिया गांधी होऊ.

शितल's picture

5 Jun 2008 - 5:26 am | शितल

चक्रेश्वरी असे वर्गातील एका मुलीचे नाव होते,
आणि आम्ही असा अ॑दाज बा॑धला की ती चक्रात जन्माला आलेली असल्याने चक्रेश्वरी.
माझ्या मैत्रीनी ने तीला पहायला आलेल्या मुलाचे नाव बबन होते म्हणुन ते स्थळ नाकारले.

रम्या's picture

5 Jun 2008 - 12:16 pm | रम्या

माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये दोन गृहस्थ आहेत. एकाचं आडनाव नाग आणि दुसर्‍याचं गरूड. :D
मारूति चितमपल्लींच्या रानवाटा या पुस्ताकातील माहीती. त्यांनी पाहिलेल्या तीन फासेपारध्यांची नावं होती, कायदेमंत्री, महागाई आणि वॅटरीलाल!!
माझ्या एका मित्राचं नाव होतं विजय डोईफोडे. त्याला एकजण विडो म्हणून हाक मारायचा !!

रम्या

ऋचा's picture

5 Jun 2008 - 2:01 pm | ऋचा

माझ्या ओळखीत एक नाव "विभास"
पण त्याला अर्थ विचारला तर माहीत नाही. (संस्कॄत मधे विभास म्हणजे घुबड)

एक मराठी घरातील मुलाचे नाव्===जैश ( :W )

आमच्या गावातील आडनाव -
दिसले (काय?)
भुरके
भाडभोके :(

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

रिमझिम's picture

5 Jun 2008 - 2:23 pm | रिमझिम

वर्गातील एका मुलाचे आडनाव 'भुते' होते
बिचारा नेहमी आडनाव सागायचे टाळायचा

नाखु's picture

5 Jun 2008 - 2:34 pm | नाखु

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

गिरिजा's picture

5 Jun 2008 - 2:41 pm | गिरिजा

एका मित्राच्या मैत्रिणिच नाव होत.. जयंती (आडनाव माहित नाही)

पण तेव्हा मनात आलेल कि एखाद्या गांधी कुटुंबाने मुलीच नाव ठेवल हे.. तर काय धमाल!

"आडनाव नाव" या प्रथेप्रमाणे.. गान्धी जयंती!!!! :S

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

मन's picture

5 Jun 2008 - 2:58 pm | मन

होता एम पी वाला; त्याचं नाव विनायक म्हणताना तो बिनायक म्हणायच आणि त्याला बोलावताना आम्ही नुसतएच "बिन"
किम्वा "बिनु" म्हणायचो.
मग त्याल "डोके" आडनाव असलेल्या मुलीवरुन चिडवु लागलो.
झाला मग तो:-
बिन्-डोके किंवा बिन्-डोक

आपलाच,
मनोबा

ऋचा's picture

5 Jun 2008 - 3:00 pm | ऋचा

आमच्या वर्गात एक मुलगा होता त्याच आडनाव होत "गांडेकर" =))

मग त्याच्या वडीलांनी तो ९ वीत असताना आडनाव बदलून पालकर केलं.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अनन्त जोशि's picture

30 Jun 2008 - 11:24 pm | अनन्त जोशि

मित्रानो...

माझ्या आजोळी ....जवळपास १९७८ सालची गोश्ट...स्कायलॅब कोसळनार होती...तेव्हा...शेवटी रेडिओवर बातमि...."स्कायलॅब समुद्रात कोसळली"आणि त्याच दिवशी मावशिला मुलगा झाला..नाव ....."स्कायलॅब"

अजून एक नाव्.......आमच्या होस्टेलच्या वाचमनच्या मुलाचे.....सॅम्पल....