कार्तिकी,मिलिंद व पोटदुखी.........

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
19 Feb 2010 - 12:30 pm
गाभा: 

कार्तिकी सारख्या एका सुमार गायिकेला लिटिल चॅम्प करुन झी टीव्हीने अगोदरच वाद निर्माण केला आहे. थोर संगीताचार्याच्या मते हा निव्वळ मुर्खपणा होता. :T
आता तर मिलिंद इंगळेनी तिला आपल्या चित्रपटात गायिका करुन कहरच केला आहे.????? <:P
http://72.78.249.125/esakal/20091227/5117311988583675148.htm

त्यामुळे काही लोकाना पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता बळावली आहे.
त्यानी इनो घ्यावा ही विनंती.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Feb 2010 - 2:51 pm | विसोबा खेचर

कार्तिकी गुणी आहे, सुरेल आहे. तिला अनेक शुभेच्छा..!

तात्या.

टारझन's picture

19 Feb 2010 - 3:14 pm | टारझन

इथे ही पुन्हा तेच का ? च्यायला ... आमच्या प्रतिक्रीया गुपचुप उडवल्या जातात म्हणून टायप नाही .. नायतं ...

:)

- आषाढी

सुहास's picture

20 Feb 2010 - 6:08 am | सुहास

सहमत..!

:-)

--वैशाखी..

अवांतर: कार्तिकी ला शुभेच्छा..!

अनुप्रिया's picture

19 Feb 2010 - 3:42 pm | अनुप्रिया

हे राम?
की हाय राम??
काय म्हणू मी याला? ;)

मेघवेडा's picture

19 Feb 2010 - 4:37 pm | मेघवेडा

चायला अजून एक धागा का???

नका हो काढू असले धागे.. उगाच विषय कुठल्या कुठे जातो आणि सगळा विरस होतो. मागे तो उर्मिला धनगर वर कुणी तो धागा काढला त्याच्यावर अजून प्रतिसाद येतायत. धाग्याचा मूळ विषय राहिला बाजूला कोण कोण आपापसातच भांडतायत..

जाऊदे तिजायला .. रोज मरे त्याला कोण रडे???

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

शुचि's picture

19 Feb 2010 - 4:44 pm | शुचि

मेघ समाज मनाचे आरसे आहेत हे धागे. मला तरी तो "धन्गर" धागा आवडला होत. आपण अजूनही किती कोते आहोत अथवा नाहीत हे कळलं मला.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मेघवेडा's picture

19 Feb 2010 - 6:46 pm | मेघवेडा

असतील समाज मनाचे आरसे ते, पण मूळ मुद्दा बाजूला सारून तिसर्‍याच विषयावर भांडणं होतात म्हणून म्हटलं!! त्या "धनगर" धाग्यात जेवढे शब्द लिहिले आहेत त्याच्या कर्त्याने, त्याच्या सातपट प्रतिसाद आले आहेत त्या धाग्याला..!!! धाग्याचा कर्ता "उर्मिलाचे हार्दिक अभिनंदन" इतकंच बोलून गेलाही .. नंतर कोण कुणाची गाण्याची लायकी काढतो, कोण कुणाच्या .. अरेरे .. काय चाललंय?? जाऊदे.. हवेत कशाला मग असले धागे?

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

शुचि's picture

19 Feb 2010 - 8:54 pm | शुचि

खरं बोललात :)
अशा धाग्यांचं शीर्षक "टीप ऑफ आईसबर्ग" असतया बगा!!! ;)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2010 - 10:19 pm | बिपिन कार्यकर्ते

असतील समाज मनाचे आरसे ते, पण मूळ मुद्दा बाजूला सारून तिसर्‍याच विषयावर भांडणं होतात म्हणून म्हटलं!! त्या "धनगर" धाग्यात जेवढे शब्द लिहिले आहेत त्याच्या कर्त्याने, त्याच्या सातपट प्रतिसाद आले आहेत त्या धाग्याला..!!! धाग्याचा कर्ता "उर्मिलाचे हार्दिक अभिनंदन" इतकंच बोलून गेलाही .. नंतर कोण कुणाची गाण्याची लायकी काढतो, कोण कुणाच्या .. अरेरे .. काय चाललंय?? जाऊदे.. हवेत कशाला मग असले धागे?

मेघवेडा, असं असेल तर मग ओपन फोरम ही कन्सेप्टच नसती आली. इथे एकाने मत व्यक्त केले त्यावर बर्‍याच लोकांनी त्यांची मतं मांडली. त्यातली बरीचशी तुम्हाला पटली नसतील... मलाही नाही पटली... पण म्हणून हे नकोच असे कसे ब्वॉ? बोलू दे की लोकांना...

बिपिन कार्यकर्ते

मेघवेडा's picture

19 Feb 2010 - 11:00 pm | मेघवेडा

बोलण्याला आक्षेप नाही हो, पण मूळ विषय राहतो बाजूला आणि 'चर्चा'/ 'मतप्रदर्शन' तिसर्‍याच विषयावर.. म्हणजे आपण या धाग्यावर जे करतोय ना तेच.. हेहेहे.. म्हणून आपलं म्हटलं राहू दे. आणि काही नाही. ओपन फोरम ला आपला विरोध नाही ब्वॉ! :)

-- अवांतर चर्चाकर्ते!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2010 - 5:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कार्तिकी सारख्या एका सुमार गायिकेला लिटिल चॅम्प करुन

वेताळबाबा, कार्तिकी किंवा इतर कोणा चँपकडून कोणता संगीतकार पार्श्वगायन करून घेतो यात मला काही रस नाही, पण आपली सांगितिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल.

शाहरूखचे आभार.

अदिती

आनंद घारे's picture

19 Feb 2010 - 5:36 pm | आनंद घारे

कार्तिकीच्या आवाजात खासियत आहे, ती अत्यंत धीट, कष्टाळू आणि प्रयत्नशील मुलगी आहे यामुळेच ती शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचली हे कोणीही मान्य करेल. तीच सर्वोत्कृष्ट गायिका होती की आणखी कोणी तिच्याहून चांगले होते यावर मतभेद असू शकतील.
कार्तिकीच्या खास आवाजाचा चांगला उपयोग करून घेण्याचा निर्णय मिलिंद इंगळे यांनी घेतला तर त्यात कहर कसला झाला? यापूर्वीच्या शेड्यूलमध्ये यशस्वीसुद्धा न होऊ शकलेल्या ज्ञानेश्वरांनी गायिलेले झेंडा चित्रपटातले गाणे आज गाजते आहे.
स्पर्धा जिंकणे आणि पार्श्वगायन करणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत करू नये

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

अमोल केळकर's picture

19 Feb 2010 - 5:43 pm | अमोल केळकर

तिच्या ( आणि तिच्या वडिलांच्या ) कष्टाचे सार्थक झाले !! शुभेच्छा !!
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रकाश घाटपांडे's picture

19 Feb 2010 - 10:33 pm | प्रकाश घाटपांडे

हेच म्हणतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अनामिक's picture

19 Feb 2010 - 6:59 pm | अनामिक

कार्तिकी गाते छानच! आता ती तेव्हाच्या त्या पाचात उत्तम होती की नाही यात मतभेद असू शकतील, पण याचा अर्थ ती 'सुमार' गाते असा का काढला? कदाचित स्टेजवर गाताना सुरात कमी पडलीही असेल ती... पण आता गाणं रेकॉर्ड करायचं तेव्हा संगीत दिग्दर्शक करतील की तिला मार्गदर्शन.... आणि गाणं अजून ऐकलेलंही नाही कुणी तेव्हा उगीच टोकाच्या निर्णयापर्यंत का पोचावं आपण?

कार्तिकीने उत्तरोत्तर प्रगती करावी हीच सदिच्छा!

-अनामिक

अविनाशकुलकर्णी's picture

20 Feb 2010 - 10:39 am | अविनाशकुलकर्णी

कार्तिकेला साक्षात माउलीचा आशिर्वाद आहे....त्या मुळेच हे सारे शक्य आहे....प.पु.गुलाब महाराजांना पण असा होता... आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना..............

Dipankar's picture

22 Feb 2010 - 1:45 pm | Dipankar

सारेगमप चे बोलाल त मी प्रथमेश चा समर्थक आहे, पण मिलिंद इंगळेने गाण्यासाठी कोणाला घ्यावे हा त्याचा प्रश्न आहे.

आम्ही वाजंत्री (कृती पेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो)

अजुन कच्चाच आहे's picture

22 Feb 2010 - 8:28 pm | अजुन कच्चाच आहे

प्रत्येक आवाजाची जादू वेगळी नसते काय ?
त्या त्या गाण्याच्या बाजाचा वीचार करून गायक निवडावा?
की सगळीच गाणी फक्त लतादिदींच्याच आवाजात गायची?
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?

अहो गाणी तर हिमेश रेशमिया पण गातो हो आणी लोकांना ते आवडते सुद्धा. पण म्हणुन उद्या कोणी म्हणाले की तो मोहम्मद रफी पेक्शा चांगला गातो तर लोक तोंडात शेण घालतील की नाही?

तिरकसपणा की नाही अक्कलवान माणसाला शोभुन दिसतो. आपल्याकडे जर तो नसेल ना तर आपली अक्कल निघते.