नुकतेच वाचनात आले की महिलांचा वापर विघातक कारवायांसाठी होवू शकतो आणि त्या स्कार्फ बांधत असल्याने समस्या आणखी जटील होते, ओळख पटवणे कठीण होते. मागेही एकदा पुणे पोलिस आयुक्तांनी मुलीनी चेहेराभर स्कार्फ़ बांधण्यासाठी विरोध दर्शवला होता.
मुलींचे प्रदुषणा पासून, उन्हापासून संरक्षण व्हावे आणि चेहेरा खराब होवू नये हा जरी उद्देश्य त्यामागचा असला तरी त्याचा वापर आपली ओळख लपवण्यासाठी, आपण कुणाबरोबर फिरतो आहे हे कुणालाही समजू नये अशा अयोग्य गोष्टींसाठीसुद्धा काही मुलींकडून केला जातो, हे सुद्धा तितकेच खरे आहे. सगळयात मोठा विरोधाभास आणि विनोद म्हणजे, स्कार्फने पूर्ण चेहेरा झाकणाऱ्या काही युवतींचे कपडे मात्र अंगप्रदर्शन जास्तीत जास्त कसे होईल असेच असतात. अगदी थंडीच्या दिवसातही रस्त्यावर स्कार्फने पूर्ण चेहेरा झाकणाऱ्या काही मुली आणि महिला पातळ, तंग, आखुड टी-शर्ट घालतात आणि पाय उघडे ठेवणारे स्कर्ट घालतात. त्यांना आता थंडीचा त्रास होत नसतो का? इतर शरीराला काय प्रदुषणाचा त्रास होत नाही. फक्त चेहेऱ्यालाच होतो? जरा विचार करा. आहे की नाही विरोधाभास. उद्देश्य एकच. आपली फिगर सतत प्रत्येकाला दिसणे हेच नोकरी, कॉलेज व इतर गोष्टींपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, असे यांना वाटते!
आणि या उलट परिस्थिती पुरुषांबाबत. पुरुषांनी, मुलांनी स्कार्फ किंवा तत्सम कापड प्रदुषणा पासून, उन्हापासून संरक्षण व्हावे या हेतूने जरी घातले तरी त्याच्या कडे संशयाने बघितले जाते. पुरुषांना प्रदुषणाचा त्रास होत नाही की काय?
स्कार्फ नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरला जातो? त्याऐवजी साधा मास्क का नाही वापरला जात? स्कार्फ चे वैद्यकियदृष्ट्या अनेक दुष्परिणामही आहेत.
प्रतिक्रिया
18 Feb 2010 - 1:24 pm | पुरणपोळी
तुमचा सुरक्षेचा मुद्दा समजला, पण मुलिंच्या कपड्यांवर घसरायच काय कारण?
जशी चांगली फिगर मुलींच्या अभिमानाचा विषय असते त्याप्रमाणेच किंवा त्याहुन जास्त अभिमान सुंदर चेहर्याचा असतो. आणि हे कोणीहि मान्य करेल की
चेहरा, केस, मान ह्याची त्वचा ( फक्त मुलींचीच नाहि तर सर्वांची) ईतर ठिकाणच्या त्वचेपेक्षा जास्त नाजुक असते, त्यामुळे चेहरा priority ने झाकतात.
बाकि आपली अंगप्रदर्शना वरची मते वाचुन.. बाकि काय म्हणु
Get a Life...
20 Feb 2010 - 6:03 am | हुप्प्या
तोंडा आणि नाकावाटे श्वासोच्छ्वास होतो. प्रदूषित हवा निदान थोडीतरी गाळून घेऊन शरीरात जावी हाही स्कार्फचा उद्देश आहे. पायाने वा अन्य उघड्या भागाने श्वास घेतला जात नाही हे विचारात घ्या.
(अर्थात स्कार्फने गाळणी प्रक्रिया कितपत प्रभावी होते हे मला माहित नाही पण वाहनांचा आणि इंधनाचा दर्जा बघता थोडे तरी रक्षण होत असेल तर काय हरकत आहे?)
20 Feb 2010 - 10:50 am | टारझन
जावईशोध आवडला :)
-- स्कार्फाराम झाकणे
18 Feb 2010 - 1:48 pm | अविनाशकुलकर्णी
आयुक्तांनी मुलीनी चेहेराभर स्कार्फ़ बांधण्यासाठी विरोध दर्शवला होता. ...पण बुरख्याला विरोध नाहि केला
18 Feb 2010 - 3:49 pm | शुचि
>> आपली ओळख लपवण्यासाठी, आपण कुणाबरोबर फिरतो आहे हे कुणालाही समजू नये अशा अयोग्य गोष्टींसाठीसुद्धा >>
यांत अयोग्य काय आहे? ती मुलगी चोरी करतेय का विनयभंग करतेय कुणाचा? तिला लपवाविशी वाटली स्वतःची आयडेंटीटी तर त्यात तुमच काय गेलं?
बाकी नाजूक त्वचेबद्दल "पुरणपोळी" शी सहमत!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
18 Feb 2010 - 4:20 pm | टारझन
तुमचा प्रॉब्लेम काय आहे क्षणाचा सोबती ? =)) =))
ह्या असल्या ध्याग्यांकडे पाहुन आपण खरोखर क्षणाचे सोबती उरलात असे वाटते =)) =)) =))
असो... बाकी सटरफटर दिसणार्या चिचकुळ्या तोंडाच्या पोरी सुद्धा स्कार्फ घालून फिरतात आणि अगदी मोनालिसा सारखा भाव खातात =)) =))
ह्यांना आम्ही "झाकली मुठ सव्वा लाखाची" म्हणतो
19 Feb 2010 - 4:02 pm | प्रकाश घाटपांडे
=))
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
19 Feb 2010 - 11:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्कार्फचा वापर विघातक कारवायांसाठी करणे सहज शक्य आहे. बरं, स्कार्फच्या पलीकडे दडलंय काय त्याचा शोध घेता येत नाही. विचारण्याची हिम्मत नाही. माणसाची सहज प्रवृत्ती अशी आहे की, स्कार्फच्या पलीकडे असलेली महिला,तरूणी कोण आहे ? खूप सुंदर असेल का त्याची प्रचंड उत्सूकता लागलेली असते. चोरुन का होईना माणूस कटाक्ष टाकतोच. कधी-कधी तर खूपच अपेक्षाभंगही होतो, तो भाग वेगळा. पण या स्कार्फने अनेक प्रॉब्लेम उभे केले आहेत, हे मात्र खरं....!!!
-दिलीप बिरुटे
20 Feb 2010 - 12:43 am | चतुरंग
कधीकधी होणार्या अपेक्षाभंगाबद्दल वाईट वाटले! पुनिशु! ;)
(अनमास्क्ड)चतुरंग
19 Feb 2010 - 3:15 pm | नितिन थत्ते
>>स्कार्फचा वापर विघातक कारवायांसाठी करणे सहज शक्य आहे.
खरं आहे. म्हणून स्कार्फने तोंड झाकू देऊ नये.
त्याचबरोबर काही इतरही धोकादायक प्रकार आहेत त्यावरही उपाय व्हायला हवेत.
उदाहरणार्थ कपड्याच्या आत बॉम्ब दडवून आत्मघातकी हल्ले होऊ शकतात. म्हणून ...................... :?
=)) =)) =)) =))
नितिन थत्ते
19 Feb 2010 - 3:57 pm | चिरोटा
:)) . दहशतवादी सहसा जनतेत मिसळूनच घातकी हल्ले करतात.तेव्हा स्कार्फ घालून, दाढी वाढवून, शेरवानी घालून कोणी बाँब लावेल याची अजिबात शक्यता नाही.
भेंडी
P = NP
20 Feb 2010 - 3:25 am | राजेश घासकडवी
>नुकतेच वाचनात आले की महिलांचा वापर विघातक कारवायांसाठी होवू शकतो
अरे वा, काय काय नवीन शोधून काढतात हे विघातक कारवाया करणारे. लवकरच पुरुषांचाही वापर व्हायला लागला तर आपल्याला आश्चर्य वाटू नये...
20 Feb 2010 - 7:23 am | सुनील
धागा अंमळ मजेशीर आहे!!
ही पुणेरी फ्याशन अद्याप मुंबईत (फारशी) पोचलेली दिसत नाही!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Feb 2010 - 7:28 am | शुचि
मुंबईत घाम-घाम होत असल्यानं ही फॅशन येणारही नाही :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
20 Feb 2010 - 7:42 am | भाग्यश्री कुलकर्णी
मला धुळीचा प्रचंङ त्रास होतो त्यामुळे मी सकाळी फिरायला जातानाही स्कार्फ बांधुन जाते नाकावरुन.माझ्याकडेही लोक असेच बघतात"काय बाई आहे फिरायला येतानाही स्कार्फ बांधुन येते"असेही येत असेल त्यांच्या मनात.
20 Feb 2010 - 1:37 pm | संग्राम
पुण्यातील बंदोबस्तात अचानक वाढ
सकाळ वृत्तसेवा
पुणे - शहरातील ओशो आश्रम, छबाड हाउस, पोलिस आयुक्तालय यासह संवेदनशील ठिकाणांवरच्या पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी सायंकाळपासून अचानक वाढ करण्यात आली. केंद्रीय यंत्रणांकडून "ऍलर्ट' मिळाला असल्याचे समजते. मात्र, बंदोबस्तात वाढ करण्याचे कारण पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, पुरुष वाहनचालकांनी शहर व परिसरात चेहऱ्याला मास्क, रुमाल बांधू नये, तर महिलांनी कोरेगाव पार्क व पुणे कॅंन्टोन्मेंट भागात फिरताना चेहऱ्याला स्कार्फ, रुमाल गुंडाळू नये, असे आवाहन पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केले आहे.
दुवा
20 Feb 2010 - 6:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वरील बातमी सकाळीच वाचण्यात आली. वरील नियम सर्वत्र लागू करावा.
समजा पुणे स्फोटात संशयीत स्त्रीया असल्या असत्या आणि सीसीटीव्हीने अशा चेहरा झाकलेल्या स्त्रीयांचे चित्रण केले असते तर संशयीत व्यक्तींना ओळखता आले असता का ? ओळख पटवता येईल का ? तेव्हा निर्णयाचे स्वागत.
>>महिलांनी कोरेगाव पार्क व पुणे कॅंन्टोन्मेंट भागात फिरताना चेहऱ्याला स्कार्फ, रुमाल गुंडाळू नये, असे आवाहन पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केले आहे.
आता कोणता संशयी उघड्या चेहर्याने 'कोरेगाव पार्क व पुणे कॅंन्टोन्मेंट भागात फिरेल ? अवघडच आहे बॉ !
-दिलीप बिरुटे
20 Feb 2010 - 2:58 pm | नीधप
पण मग हेल्मेटचं काय?
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
20 Feb 2010 - 3:09 pm | चिरोटा
"दहशतवादी चेहेर्याला रुमाल बांधून हळूच कोठेतरी कोपर्यात बाँबची पिशवी ठेवेल आणि धावत सुटेल' असा पोलिसांचा समज आहे की काय? तसे झाले तर तो दहशतवादी महामूर्ख म्हंटला पाहिजे. मुख्य म्हणजे ही बातमी वाचल्यावर/ऐकल्यावर कोण बाँब ठेवेल? केंद्रिय यंत्रणांचे 'अॅलर्ट ' वगैरे नुसते ठोकताळे असतात.आपल्या यंत्रणा बाँबस्फोट झाला की अॅलर्ट होतात.
भेंडी
P = NP
20 Feb 2010 - 3:31 pm | राजेश घासकडवी
कदाचित ते धूर्त दहशतवादी चेहेऱ्यावर स्कार्फ न गुंडाळलेल्या व मानेखाली सर्व भाग झाकलेल्या महिलांचा वापर करतील. म्हणजे चाणाक्ष मिपाकरांच्या नजरेतूनही त्या सुटतील.
ही छान युक्ती आहे. आपण रोजच अॅलर्ट ठेवला तर?