प्रश्नच प्रश्न चहूकडे...

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in काथ्याकूट
14 Mar 2008 - 8:34 am
गाभा: 

मुळेकाठच्या एका दुकानात एक गिर्‍हाईक येते. दुकानदाराचे लक्ष नाही. गिर्‍हाईक घुटमळते.

शेवटी आपल्या दुकानात चोर शिरला असावा अश्या दृष्टीने पाहून दुकानदार वसकन् त्याच्यावर ओरडतो,

"क्वाय हवांय?"

"अहो, असे अंगावर काय येताय?"
"मग काय मुका घेऊ तुमचा?"

गिर्‍हाईक ओशाळते. भीत भीत विचारते,
"डिक्शनरी मिळेल काय?"
"एक का हजार मिळतील, पोटमाळ्यावर हव्व्या तितक्या आहेत."
"पण..."
"पण नाही आणि परन्तु नाही, आमचा नोकर रजेवर आहे. समोरच्या पेण्टराच्या दुकानातून आणा शिडी आणि घ्या हवी ती शोधून आणि हो, अर्ध्या तासात खाली उतरा. आम्ही रात्री दुकान ८ च्या ठोक्याला दुकान बंद करतो. नाहीतर रात्रभर उंदीर व घुशींसोबत गरबा खेळत बसावा लागेल."

(गोष्ट कल्पित: लेखक अनेक).

प्रश्न क्र. १: मराठी भाषा उद्धट आहे का?
___________________________________________

माहिमचे एक श्री. हळक्षज्ञ, अतिशय व्यासंगी भाषांतरकार. मला एकदा म्हणाले, "मला फक्त ७५ पैसे (प्रतिशब्द) काम मिळते. तुमच्याकडे जास्त पैसे देणारे ग्राहक असतील तर मला द्या."

मी ठीक आहे असे म्हटले. थोडे दिवसांनी एका गुजराथी व्यापार्‍याचे काम आले जो लगेच व योग्य पैसे देणार होता. ते मी श्री. हळक्षज्ञ यांच्याकडे पाठवले.

त्यावर ह्या महोदयांनी दीड पान स्वत:ची महती व पुढे अर्धा पान मूळ हस्तलिखित किती भिकार आहे हे त्याला लिहून पाठवले. तो व्यापारी काय ते समजला.

दुसर्‍या एका प्रसंगात एक माहितीतला दिल्लीचा भाषांतरकार त्याला निकड होती म्हणून जास्त पैसे देऊन काम करून घ्यायला तयार होता. मात्र मागील प्रसंगावरून शहाणी होऊन मी ते काम श्री. हळक्षज्ञ आणि अजून २-३ जणांना पाठवले.

त्यावर श्री. हळक्षज्ञ आपल्याला आलेले दिल्लीकरांचे अनुभव - मला, त्या भाषांतरकाराला आणि वर त्या २-३ जणांना आपल्या खास शैलीत २ पाने लिहून पाठवले.

त्याखाली एक ओळ माझ्यासाठी. दिल्लीच्या लोकांची कामे मला पाठवू नयेत.

तिसर्‍या प्रसंगात मला एका अमेरिकन कं. चे $ मध्ये काम मिळाले पण मलाच वेळ नव्हता. पण चांगली संधी का सोडावी म्हणून इतर मराठी भाषांतरकारांना वेगळे आणि श्री. हळक्षज्ञ ह्यांना एक वेगळे असे पत्र लिहिले (ज्यात त्या अमेरिकन कं. विषयी काहीही माहिती लिहिली नाही).

त्यावर श्री. हळक्षज्ञ यांचे मला एक पत्र ज्यात त्यांना आधीच कसे २ मोठ्या कंपन्यांचे सध्या काम मिळाले आहे याचे रसभरीत वर्णन आणि त्याची २ मान्यवर भाषांतरकारांना CC.

शेवटी मला त्या दोन मान्यवरांचे फोन, "हे विद्वान कोण?" असे विचारणारे.

(सत्यघटना, सर्व ई-पत्रव्यवहार इंग्रजीतून).

प्रश्न क्र. २ : मराठी भाषिक उद्धट आहे का?
___________________________________________

प्रश्न क्र. ३ : मुळात मराठी भाषा उद्धट नसून रेल्वे, बँक, महापालिका अश्या सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणार्‍या मराठीचा हेल (Tone) उद्धट आहे का?

___________________________________________

हे राजा, जर तू माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नाही तर तुझ्या डोक्याची.....

प्रतिक्रिया

तात्या विन्चू's picture

14 Mar 2008 - 9:06 am | तात्या विन्चू

प्रश्न क्र. १: मराठी भाषा उद्धट आहे का?

मुळीच नाही. सृष्टीलावण्य ताई, तुम्ही पुण्याकडच्या का हो?? कारण असा गिर्हाईकाला उदद्धट पणे उत्तरे देण्याचा प्रकार सर्वसाधारणपणे पुण्याशीच सम्बधित असतो (हे माझे वैयक्तीक मत आहे, कोणाला वाईट वाटले तर क्षमस्व). गेल्या २५ वर्षान्च्या मुम्बईतील मराठी दुकान्दरानकडुन मी हा टोन कधीच ऐकलेला नाही. त्यामुळे सरसकट 'मराठी भाषा उद्धट' असे मला बिल्कूल वाटत नाही.

प्रश्न क्र. २ : मराठी भाषिक उद्धट आहे का?
भाषेचा Overall Tone हा भाषीकान्च्या सन्स्कारान्वर अवलम्बून असतो. त्यामुळे, प्रश्न क्र. १ च्या उत्तरावरुन Corollary काढायला गेल, तर याही प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळेल.

प्रश्न क्र. ३ : मुळात मराठी भाषा उद्धट नसून रेल्वे, बँक, महापालिका अश्या सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणार्‍या मराठीचा हेल (Tone) उद्धट आहे का?
रेल्वे, बँक, महापालिका अश्या सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणार्‍या सर्वच भाषान्चा Tone उद्धट असतो. हा भाषा सम्बन्धीत विषय नसुन, 'Lack of Cutomer Centric Culture' चा मुद्दा आहे असे माझे मत आहे.

आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2008 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर इतकी चांगले लेखन करणारी सृष्टीचा भाषेच्या चर्चेवरुन तोल कसा काय जातो आहे, कोणास ठाऊक ?
माय मराठीचं किती कौतुक करावं, ती भाषा उद्धट कशी असेल ?
भाषा ही त्या त्या भौगोलिक परिस्थिती, लोकव्यवहार, आणि इत्यादी, इत्यादी कारणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तिचे वेगवेगळे टोन आहेत, वापरकर्त्याच्या टोन्स वरुन भाषेला उद्धट म्हणने मला तरी वेडेपणा वाटतो. खरे तर तुझे लेखन मला उद्धट वाटते असे म्हटले तर तुला काय वाटेल ? तेव्हा त्याबाबतीत मी असा म्हणेन सृष्टीचा टोनच तसा आहे :)

इनोबा म्हणे's picture

14 Mar 2008 - 11:19 am | इनोबा म्हणे

भाषा ही त्या त्या भौगोलिक परिस्थिती, लोकव्यवहार, आणि इत्यादी, इत्यादी कारणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तिचे वेगवेगळे टोन आहेत, वापरकर्त्याच्या टोन्स वरुन भाषेला उद्धट म्हणने मला तरी वेडेपणा वाटतो.
सहमत.
हा मुद्दा भाषेचा नसून संस्कारांचा आहे मला वाटते.त्यामुळे कृपया हा वाद इथेच थांबवावा.

अवांतरः प्रा.डॉ. म्हणजे प्राकृत डॉन तर नव्हे. नाही,इथे आजकाल बर्‍याच डॉन लोकांचा (आमचा छोटा डॉन वगळून) सुळसुळाट झाला आहे.म्हणून विचारले.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2008 - 3:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा मुद्दा भाषेचा नसून संस्कारांचा आहे मला वाटते.त्यामुळे कृपया हा वाद इथेच थांबवावा.

समजून सांगा ना राव ! भाषेवर कशाचे संस्कार होतात म्हणुन ?

आपला
प्रा.डॉ.तुकोबा म्हणे

तात्या ही चर्चा आता बास्...........मिपा हे काही भांडणाचे स्थळ नाही अशी सभासदांची समजूत आहे ती कायम राहु द्यात

तात्याकाम जाबाली's picture

14 Mar 2008 - 3:13 pm | तात्याकाम जाबाली

तात्या ही चर्चा आता बास्...........मिपा हे काही भांडणाचे स्थळ नाही अशी सभासदांची समजूत आहे ती कायम राहु द्यात

सध्या आम्ही शांत आहोत आणि जे काही चाललं आहे ते पाहात आहोत. आम्हाला जरूर वाटल्यास योग्य ती वेळ आल्यावर आम्ही मिपावरील अनावश्यक तो मजकूर हलकेच उडवून लावू. परंतु सध्या तरी मिपावर विशेष अशी काही मारामारी, भांडणं वगैरे सुरू आहेत असं आम्हाला तरी वाटत नाही!

जी काही सुरू आहेत ती थोडीफार मरमतांतरे व थोडीफार शेरेबाजी, फटकेबाजी सुरू आहे व असल्या लहानसहान गोष्टी मिपाला मुळीच वर्ज्य नाहीत! :)

बाय द वे विजुभाऊ, मिपाच्या शुभचिंतकाच्या नात्याने आपण मला वरील दोन ओळी लिहिल्यात याचं खरंच कौतुक वाटतं! आपल्यासारख्या मिपाच्या हितचिंतकामुळेच मिपाची वाटचाल सुरू आहे हे इथे नमूद करतो. मिपा आपलंच आहे, कृपया असाच लोभ असू द्यावा...

आपला,
(सौम्यावर लाईन मारणारा!) तात्याकाम जाबाली! :)

...मुळीच नाही !!
गेली दोन वर्षे मी दिल्लीत राहात आहे. "उद्धट " हा शब्दही अत्यन्त नरम वा मऊ वाटावा अशी इथली हिन्दी भाषा आणि भाषिक आहेत.
अतिशय uncivilised वागणूक ! प्रचंड माजोरीपणा !
आपण मात्र पुण्याच्या मराठीला आणि पुणेकरांना टोचण्यातच समाधान मानतो !
एकमेकांना खेचण्यापेक्षा आपण सारे मिळून मराठीचा आदर आणि अभिमान का बाळगत नाही ?

प्राजु's picture

14 Mar 2008 - 11:48 pm | प्राजु

एकमेकांना खेचण्यापेक्षा आपण सारे मिळून मराठीचा आदर आणि अभिमान का बाळगत नाही ?

सचिन... एकदम बरोबर आहे तुझे.

- (सर्वव्यापी)प्राजु

ॐकार's picture

15 Mar 2008 - 4:27 pm | ॐकार

प्रश्न क्र. १: मराठी भाषा उद्धट आहे का?

उत्तर - हो

मराठीत जवळपास सर्व कठीण उच्चार करता येतात आणि ते नेहमीच्या वापरांतील शब्द असतात.
र, ड, थ, फ (दोन्ही उच्चार), झ, क्ष, र जोडल्याने होणारी जोडाक्षरे, त्त, ट्ट, ड्ड अशी जोडाक्षरे इ. ची वारंवारता तपासायला हवी. त्यामानामे हिंदी, उर्दू, काही युरोपिअन भाषांचा बोलण्याचा मृदू ढंग( जसे र च अर्धवट उच्चार, स्वरांचे उच्चार लांबवणे इ.), जपान, चायना , थायलंड इ. देशांतील टोनल (हेलकट(!) - मराठीत काय म्हणावे?) ढंग ( ञ, ङ च्या जवळपास जाणारे अनुनासिक उच्चार, स्वरांच्या जाती इ.), हिब्रू तसेच मध्यपूर्वेतील इतर भाषांचा जोरकस ढंग (स्पष्ट उच्चार, तीव्र आवाजांचा वापर केलेले शब्द इ.) पाहिल्यास मराठी भाषा राकट ठरते ( हिब्रू इ. भाषा तर आक्रमक ठरेल!)

अवांतर - गोष्ट क्र. १ आणि त्याखालचा प्रश्न यांचा ताळमेळ लागत नाही. तरी भाषेचा राकटपणा मात्र मला मान्य आहे.

बाकी प्रश्नांची उत्तरे देण्यात काही स्वरस्य नाही.

सचिन's picture

15 Mar 2008 - 4:40 pm | सचिन

मराठी भाषा उद्धट आहे असे म्हणतांना , ती राकट असल्याचे सिद्ध करीत आहात.
काहीतरी वैचारिक गोंधळ आहे खास !!
महाराष्ट्राला "राकट देशा कणखर देशा..." म्हटलेच आहे,
पण म्हणजे उद्धट नव्हे .

ॐकार's picture

15 Mar 2008 - 4:55 pm | ॐकार

कोणी काय शब्द वापरावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने भाषा राकट आहे. गोंधळ शाब्दिक आहे! उत्तरादाखल हो म्हटले ते चुकले. भाषा राकट आहे....उद्धट नव्हे!