आमच्या शाळेत भरविलेले सायन्स प्रदर्शन

शनआत्तार's picture
शनआत्तार in काथ्याकूट
16 Feb 2010 - 7:12 pm
गाभा: 

photo
नमस्कार
आपणास मी एक आज गम्मत सांगणार आहे. आपण सगळे जण लहान मुलांना अल्लड समजतो. त्याना काही कळत नाही त्याना सगळ्या गोष्टी समजाव्याला लागतात मात्र हे सर्व साफ खोटे.आमची शाळा देवगड तालूक्यातील शिरगाव सारक्या लहान खेड्यात आहे. आमच्या शाळेत इंग्लंड च्या न्यु कासल विश्वविद्यापीठातर्फे अनुदान मिळाले असून त्या अनुदानावर आम्ही संगण्क शिक्षण मुलांना देतो. आम्ही संगणक शिक्षण देत नसून ती मुले आपोआप आपणच त्या संगणक प्रयोगशालेत स्वःता शिकत असतात. त्याना तेथे सकाळी ७.०० वाजल्या पासून संद्याकाळी ८.०० वाजे पर्यंत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा उपयोग करून शाळेतील मुले मेल पाठवणे, चाट करणे गेम खेळणे अशा गोष्टी सहजच करायला शिकली आहेत. त्याना कोणिही मार्गदर्शन करत नाही मात्र ते काय करतात या वर माझे बारकाईने निरीक्षण असते त्यांच्यात होणारे बारीक सारीक बदल मी नोंदवत असतो तसेच ते बदल अनुभवत असतो.
असे हे गेले वर्षभर चालू आहे . आत्ता मुले चांगल्या प्रकारे संगण्कावर काम करतात ,आत्ता तर ती परदेशातील शिक्षंकाशी स्काईप वर संपर्क साधून आपल्या अभ्यासातल्या शंका दूर करत आहेत. आज आमच्या शालेतील २०० विद्यार्थांचे इमेल पत्ते आहेत . हेसर मी त्या मुलांच्या प्रगती बाबत बोलत होतो.

हे सर्व पहात असताना मला स असे वाटलेकी या ईंटरनेट चा वापर करून विद्यार्थ्याचईची सायन्स विषयात आवड निर्माण करता येईल का? याचा मी विचार केला व अरविंद गुप्ता ( जे पुण्यात आयुका चालवतात ) त्याच्या वेबसाईटचा पत्ता टाईप करून संगणक प्रयोगशाळेतील नोटीस बोर्डाबर लावला आणी एक स्पर्धा घोषित केली की विद्यार्थ्यानी या वेब साईट ला बेट द्यावी व तेथील माहीती वाचून पाहून सायन्स वर आधारीत खेळणी व प्रतीक्रुती तयार कराव्यात आपण तयार केलेल्या साहित्यांचे एक प्रदर्शन २६ जानेवारीला भरवण्यात येईल. आणि या माझ्या आवाहनाला प्रचंड प्रतीसाद मिळाला मुले शाळा सुटल्यावर, शाळा भरण्याच्या , पूर्वी मधल्या सुट्टीत इंटारनेट वर जाऊन त्या वेब असाईट वरील माहीती पहात होते आणि आपल्या प्रतीक्रुती तयार करत होते . जेव्हा २६ जानेवारीस प्रदर्शन भरले तेव्हा १३४ मुलानी सहभाग घेतला होता. त्यात मुलींचा सहभाग हा जास्त म्हणजेच होता म्हणजेच ७७ प्रतीक्रुती ह्या मुलींनी सादर केल्या होत्या. फक्त प्रतीक्रुती सादर केल्या नाहीत तर त्याची तत्वे , माहीती, त्या कशा तयार केल्या का केल्या या सवा सर्वांची माहीती त्यानी प्रदर्शनात करून दीली . प्रदर्शन नेटनेटके व फार चांगले भरले होते. त्यातून मी प्रथम ५ क्रमांक काढले व त्याना रोख अरक्कम व प्रमाणपत्र अशी बक्षिसे दीली तर सहभागी सर्व विद्यार्थ्याना प्रमाण पत्र दिले
सागंण्याची बाब ही की मुलाना अभ्यासात आवड निर्माण करण्यासाठी अशा योजना राबवणे गरजेचे आहे. त्याना फक्त पुस्तकी शिक्षण देण्या पेक्षा अनुभवातील शि़षण दिल्यास ते फार मोलाचे व बराच वेळ ठीकणारे असते. या प्रदर्शनातील काही फोटो पण आपल्याला पाहण्यासाठी देत आहे.

मक मला मराठी चांगले टाईप करता येत नाही त्या मुळे ब-याच चूका आहेत समजी समजून घ्या
आपणाकडेही असे काही उपाय असतील तर मला सुचवा मी माझ्या शालेतील विद्यार्थांसाठी निश्चित राबवीन
धन्यवाद !!!!!

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

16 Feb 2010 - 8:21 pm | पाषाणभेद

नक्की कोणकोणते मॉडेल्स बनविलेले होते ते ही सांगणे. मॉडेल चल होती की अचल?

अन लिहीत रहा. लिखाण सुधरेल.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

बोका's picture

16 Feb 2010 - 8:29 pm | बोका

आत्तार भाई,
तुमच्या शाळेबद्दल आधी वर्तमानपत्रात वाचले होते.
छान उपक्रम !
अभिनंदन आणि शुभेच्छा !!

मदनबाण's picture

16 Feb 2010 - 8:54 pm | मदनबाण

छान उपक्रम... :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

चतुरंग's picture

16 Feb 2010 - 9:05 pm | चतुरंग

आणि तुमच्या शाळेतल्या चिमुकल्यांचेही.
अरविंद गुप्तांना संपर्क करणे, मॉडेल्सची स्पर्धा घेणे हे फार कल्पक आहे.
तुमच्या मेहेनतीला दाद!
मॉडेल्सचे फोटो जरुर टाका. ती बनवणार्‍या मुलांचेही फोटो शक्य असल्यास टाकाच!
फोटो कसे टाकावेत ह्याची अडचण असेल तर हे वाचा.

चतुरंग

चित्रा's picture

17 Feb 2010 - 1:40 am | चित्रा

असेच म्हणते.

प्रकल्प आवडला, फोटो पहायला खूपच आवडले असते.

विकास's picture

17 Feb 2010 - 2:11 am | विकास

हेच सर्व लिहीणार होतो! चांगला प्रकल्प! सायन्सची मुलांसाठीची माहीती असलेल्या अनेक चांगल्या वेबसाईट्स आहेत. जास्त माहीती परत कळवेनच.

तुम्हाला आणि या प्रकल्पाला शुभेच्छा!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

धनंजय's picture

17 Feb 2010 - 3:07 am | धनंजय

अधिक लिहा. मुलांनी केलेली मॉडेले बघायला आवडतील.

सुनील's picture

17 Feb 2010 - 6:51 am | सुनील

हेच म्हणतो.

लिहीत चला. आपोआप मराठी टंकन जमू लागेल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संग्राम's picture

16 Feb 2010 - 10:34 pm | संग्राम

तुमचे आणि तुमच्या शाळेतल्या चिमुकल्यांचे अभिनंदन ...
स्तुत्य उपक्रम !!!

मॅन्ड्रेक's picture

16 Feb 2010 - 10:38 pm | मॅन्ड्रेक

आपल्या उपक्रमास शुभेच्छा
माहिती दिल्यबद्द्ल धन्यवाद.
आधि कळवल्यास उपक्रमास हजर रहाता येउ शकेल.

at and post : Xanadu.

शाहरुख's picture

17 Feb 2010 - 5:51 am | शाहरुख

=D> =D>

अक्षय पुर्णपात्रे's picture

17 Feb 2010 - 7:11 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री आत्तार, अतिशय स्तुत्य उपक्रम. पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा. तुम्ही फार मोठे काम करत आहात. या उपक्रमाविषयी अधिक लिहावे, ही नम्र विनंती.

विसोबा खेचर's picture

17 Feb 2010 - 10:02 am | विसोबा खेचर

अतिशय स्तुत्य उपक्रम. पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.

हेच म्हणतो...

तात्या.

वाहीदा's picture

17 Feb 2010 - 1:17 pm | वाहीदा

=D>
आमची शाळा देवगड तालूक्यातील शिरगाव सारक्या लहान खेड्यात आहे.
आत्ता मुले चांगल्या प्रकारे संगण्कावर काम करतात ,आत्ता तर ती परदेशातील शिक्षंकाशी स्काईप वर संपर्क साधून आपल्या अभ्यासातल्या शंका दूर करत आहेत. आज आमच्या शालेतील २०० विद्यार्थांचे इमेल पत्ते आहेत
हे सर्व पहात असताना मला स असे वाटलेकी या ईंटरनेट चा वापर करून विद्यार्थ्याचईची सायन्स विषयात आवड निर्माण करता येईल का? याचा मी विचार केला व अरविंद गुप्ता ( जे पुण्यात आयुका चालवतात ) त्याच्या वेबसाईटचा पत्ता टाईप करून संगणक प्रयोगशाळेतील नोटीस बोर्डाबर लावला आणी एक स्पर्धा घोषित केली की विद्यार्थ्यानी या वेब साईट ला बेट द्यावी व तेथील माहीती वाचून पाहून सायन्स वर आधारीत खेळणी व प्रतीक्रुती तयार कराव्यात आपण तयार केलेल्या साहित्यांचे एक प्रदर्शन २६ जानेवारीला भरवण्यात येईल. आणि या माझ्या आवाहनाला प्रचंड प्रतीसाद मिळाला

खेड्या पाड्यातील शाळेचा अप्रतिम उपक्रम !!
तुमचे विषेश कौतुक !!

=D> =D> =D> =D>
~ वाहीदा

स्वाती२'s picture

17 Feb 2010 - 5:09 pm | स्वाती२

अत्तारभाई, तुमचे आणि तुमच्या शाळेतील मुलांचे अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

विजुभाऊ's picture

17 Feb 2010 - 5:22 pm | विजुभाऊ

सर तुमचे अभिनन्दन
मला शाळेत असेच एक सर भेटले होते. ते आमच्याकडून बरेच काही शास्त्रीय प्रयोग /उपकरणे करून घेत असत.
माझ्या त्या वर्गातील ५५ पैकी ५१ मुले इंजीनीयर आहेत.
शास्त्राची आवड निर्माण केल्याबद्दल आम्ही सगळेच त्यांना धन्यवाद देतो