श्री लिपीतील मजकूर कसा पाहावा?

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
8 Feb 2010 - 5:46 pm
गाभा: 

श्री लिपी ही देवनागरी लिहिण्याची प्रणाली वापरून लिहिलेला काही मराठी मजकूर मजकडे आहे. परंतु मजपाशी श्री लिपीची प्रणाली नाही. एकही दमडी न खर्चता ही शिंची लिपी वाचण्यासाठी काही उपाय आहे का? अवश्य सांगावा. अग्रिम धन्यवाद.

- चिंतातुर जंतू :S

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Feb 2010 - 6:02 pm | बिपिन कार्यकर्ते
चिंतातुर जंतू's picture

8 Feb 2010 - 6:23 pm | चिंतातुर जंतू

श्री लिपीसारखा 'ट्रु-टाईप फाँट' जर निव्वळ वाचायचा असेल, तर आपल्या संगणकावर निव्वळ फाँट्ची (टी.टी.एफ) गरज असते, अशी आमची समजूत आहे. गूगलवर येणारे दुवे संगणकावर काहीतरी प्रणाली (सॉफ्टवेअर) टाकावी लागेल, असे सुचवतात. ते टाळायचा मार्ग शोधत आहोत. धन्यवाद.
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||

प्रकाश घाटपांडे's picture

8 Feb 2010 - 9:44 pm | प्रकाश घाटपांडे

श्री लिपीशी साधर्म्य दिसणारा दुसरा फॉन्ट दिसला नाही.परिवर्तन वापरले तर आपला श्रीलिपीतील मजकुर युनिकोडात करता येईल. श्री लिपीतील मजकुर उघडायचा प्रथमदर्शनी तो कचरा दिसेल. त्या कचर्‍याला च्या फाईल रुपांतरीत करायचे. मग मजकुर दिसु लागेल. माझ्याकडे चकटफु असलेला कृष्णा टीटीएफ होता. त्याला समांतर असा दुसरा कृति फॉन्ट मला रुपांतर मधे दिसला. मग मी त्याचे युनिकोड केले. त्यामुळेच मला ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी हे पुस्तक जालावर टाकता आले. फारसे तांत्रिकज्ञान नसतानाही केवळ काड्या करण्याच्या वृत्तीतुन हे जमले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

पद्मजा देव's picture

8 Feb 2010 - 11:04 pm | पद्मजा देव

छान.
उपयोगी माहिती.

अभिरत भिरभि-या's picture

9 Feb 2010 - 8:48 am | अभिरत भिरभि-या

या दुव्यावर जा. तुमची फाईल ब्राउझ करुन ड्रॉप-डाऊन मधून Shree-Dev-0714 हा पर्याय निवडून Convert म्हणा.
मी नॉन-युनिकोड पेजेस यातून बघतो. मात्र कधी फाईल Convert केलेली नाहीये. त्यामुळे हमी देत नाहीये.

चिंतातुर जंतू's picture

9 Feb 2010 - 10:00 am | चिंतातुर जंतू

या दुव्यावर जा. तुमची फाईल ब्राउझ करुन ड्रॉप-डाऊन मधून Shree-Dev-0714 हा पर्याय निवडून Convert म्हणा.
मी नॉन-युनिकोड पेजेस यातून बघतो. मात्र कधी फाईल Convert केलेली नाहीये. त्यामुळे हमी देत नाहीये.

धन्यवाद! भिरभिर्‍या यांनी सुचवलेला हा उपाय चालला!

- चिंतातुर जंतू
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||

ब्रिटिश टिंग्या's picture

9 Feb 2010 - 8:56 am | ब्रिटिश टिंग्या

डोळ्यांनी पहावा असे माझे स्पष्ट मत आहे!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

शुचि's picture

10 Feb 2010 - 6:35 am | शुचि

च्या मारी ..... आपने तो भांडाही फोड दिया =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)