( थॉमस फ्राईड्मनच्या द वर्ल्ड इज प्लॅट पुस्तकातील एका परिच्छेदाचा स्वैर अनुवाद. लेखकानी सबंध पुस्तक त्याच्या अमेरिकन देशवासियांना उद्देशून लिहिले आहे. )
( आमचे मित्रवर्य श्री. नितीन सुपेकर ज्यांनी काही वर्षापूर्वी आमची ह्या पुस्तकाशी ओळख करून दिली त्या बद्दल त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करीत हा अनुवाद करत आहे )
आर्थीक तूट, देशाचे एकूण उत्पादन, बेकारीचे प्रमाण, साक्षरतेचे प्रमाण अशा परंपरागत आर्थीक आणि सामाजीक आकड्यांच्या आधाराने विश्लेषक नेहेमीच विविध राष्ट्रे आणि समाजाच्या तुलना करीत राहीलेले आहेत. हे आकडे महत्त्वाचे आणि ( राष्ट्रीय आणि सामाजीक परिस्थीतीचे) निदर्शक आहेत. परंतू अजून एक आकडा आहे जो मोजायला अवघड आहे, आणि मला वाटतं तो अधिक महत्त्वाचा आणि (राष्ट्रीय आणि सामाजीक परिस्थीतीचा) निदर्शक आहे: (आणि तो म्हणजे) तुमच्या समाजाकडे स्वप्नांपेक्षा अधिक स्मृती आहेत की स्मृतींपेक्षा अधिक स्वप्ने आहेत? स्वप्न म्हणून मला सकारात्मक स्विकारणीय जीवनविषयक विविधता अभिप्रेत आहे.
व्यवसाय व्यवस्थापन सल्लागार मायकल हॅमर एकदा म्हणालेले की, " एखाद्या संस्थेची माणसं जेव्हा मला सांगायला लागतात की पूर्वी संस्था किती चांगली होती ते खरंतर ह्या गोष्टीच निदर्शक असतं की आत्ता संस्था वाईट अवस्थेत आहे आणि कुठल्यातरी संकटातून जात आहे". देशांबद्दल सुद्धा तेच सत्य आहे. आपल्याला आपला सुवर्णकाळ विसरवत नाही. मोठ्या अभिमानाने आपण म्हणतो की अमुक अमुक शतकात आपली संस्कृती आणि देश कसा थोर होता? पण आत्ता जे आहे त्याच काय? जेव्हा स्मृती स्वप्नांपेक्षा मोठ्या आणि गडद होतात तेव्हा समजावं की अंतःकाल समीप आहे.
पूर्वीच्या (त्या त्या काळास सुसंगत अशा) नीति नियमांना सोडायची तयारी असणे आणि ( वर्तमान आणि भविष्याशी सुसंगत असे ) नवे नीति नियम निर्मिण्याची कल्पकता असणे हे यशस्वी संस्थेचे ( समाजाचे / देशाचे / राष्ट्राचे ) लक्षण आहे. ज्या समाजाकडे स्वप्नांपेक्षा अधिक स्मृती असतात त्या समाजातील अधिकाधीक व्यक्ती मागे वळून बघण्यात पुष्कळ वेळ वाया घालवतात. वर्तमान घडवण्यापेक्षा इतिहास चघळण्यालाच ते प्रतिष्ठीत सकारात्मक कार्य मानतात. असे समाज एक उत्तम सशक्त भविष्य घडविण्याचे स्वप्न बघून त्यानुसार वाटचाल करण्यापेक्षा त्या कपोलकल्पीत इतिहासाला इतिहास म्हणूनच अधिकाधीक सुंदर, सुमंगल आणि संमृद्ध बनवण्यात आपली सगळी शक्ती खर्ची घालतात. इतर देश त्या (इतिहास चघळण्याच्या) मार्गाने जात आहेत आणि ते भयानक आहेच. पण अमेरिकेने सुद्धा आपले (स्वप्ने बघायचे आणि त्यावर अंमल करायचे) आचरण सोडून तसल्याच मार्गानी जाणे ह्या सारखे दुर्दैव दुसरे नाही.
प्रतिक्रिया
13 Mar 2008 - 11:19 am | राजमुद्रा
आमचे मित्रवर्य श्री. नितीन सुपेकर
माझाही एक मित्र आहे नितीन सुपेकर नावाचा :)
राजमुद्रा :)