रस आणि शेवया

कपिल काळे's picture
कपिल काळे in पाककृती
7 Feb 2010 - 10:46 am

आत्ताच अंगारकी निमित्त, बाप्पाच्या नैवेद्यासाठी रस - शेवया केल्या होत्या. एकदम सोपी सुटसुटीत कृती आहे.

साहित्य
१. तांदळाची पिठी
२. ओले खोबरे
३. गूळ
४. स्वादासाठी वेलची पूड

तांदुळाच्या पिठीची उकड काढून घ्यावी. मुटकुळे करुन घ्यावेत.

उकडीचे गरम मुटकुळे किचनप्रेस मध्ये टाकून शेवया करुन घ्याव्यात. (उकडीचे मुटकुळे गरमच असावेत.)

ओल्या खोबर्‍याचा रस काढून घ्यावा. त्यात बारीक चिरलेला गूळ घालावा. रसात वेलची पूड घालावी.

बाप्पाला नैवेद्य दाखवून नंतर आपणच गरमा गरम शेवया गोड रसा सोबत मनसोक्त खाव्यात.

गणपती त कोकणातल्या घरी हमखास होणारी ही पाककृती बरेच दिवसांनी केली गेली. कोकणात घरी तर एक मोठा लाकडी शेवगा होता. त्यात उकडीचे मोठे गरम गोळे ह्या हातावरुन त्या हातावर करत आजी आई टाकत. मग आम्ही पोरं सोरं शेवग्याचे हँडल फिरवून शेवया पाडण्याची अहमहिका लावायचो.
शेवग्याच्याखाली , शेवया साठवण्यासाठी बांबूची टोपली, केळीची पाने घालून ठेवलेली असे. ती भरेस्तोवर धीर निघायचा नाही. गरम शेवया, टोपलीत पडताक्षणी उचलल्या जायच्या, रसाबरोबर भिजवून चापण्यासाठी !!

प्रतिक्रिया

शुचि's picture

7 Feb 2010 - 10:51 am | शुचि

सात्विक आणि सुग्रास - वाटतोय बघून. खाल्ला नाही कधी. लूक्स लाईक अ‍ॅप्ट फॉर उपास.
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

मेघवेडा's picture

8 Feb 2010 - 5:57 pm | मेघवेडा

अगदी!
घरी शेवया केल्यात म्हटल्यावर जो आनंद व्हायचा तो अवर्णनीय आहे! आणि जेवतानाही पानावर जेव्हा शेवया दिसायच्या त्या पाहून का कोण जाणे मन खरंच प्रसन्न होई. आमच्याकडे शक्यतो मंगळवारी/किंवा विनायकीला केल्या जायच्या शेवया. बाप्पावर आणि बाप्पाला आवडत्या पदार्थांवर आमचा लई जीव बघा! शेवया मात्र खरंच खास!!

रसात बुडवून शेवया खाल्ल्यावर बोटांवरून तळहातावर ओघळणार्‍या आपरसाची चव घेण्यात एक वेगळाच आनंद आहे! आणि आपरसाची चव तर अक्षरशः रेंगाळते जीभेवर!
आपरस नव्हे, सुधारसच तो!!

-- कोकणी नारळ!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2010 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रस आणि शेवया भारीच दिसत आहेत.
शेवटच्या ओळीतील आठवणही तितकीच झकास...!

-दिलीप बिरुटे

बंडू बावळट's picture

7 Feb 2010 - 11:26 am | बंडू बावळट

मस्तच!

शाहरुख's picture

7 Feb 2010 - 12:30 pm | शाहरुख

ह्म्म्म...हा पदार्थ कधी नाही खाल्लेला.
आम्ही ओल्या खोबर्‍याच्या रसाला (दुधाला) 'आपरस' म्हणतो.

(मुळचा कोकणी) शाहरुख

कपिल काळे's picture

7 Feb 2010 - 1:33 pm | कपिल काळे

आपरस असेच लिहिणार होतो. पण समजेल की नाही असा विचार करुन नाही लिहिले.

सुनील's picture

8 Feb 2010 - 10:34 am | सुनील

हे योग्य केले नाहीत. स्थानिक शब्द अगदी आवर्जून लिहावेत. कुणाला समजणार नाही अशी शंका असल्यास त्याचे विश्लेशण एक-दोन वाक्यात द्यावे. अशा तर्‍हेने बोलीभाषेतील शब्द इतरांना कळण्यास मदत होईल.

बाकी हा पदार्थ माझ्या अगदी आवडीचा. फोटोही झकास आलेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Feb 2010 - 12:36 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्त पदार्थाची आठवण करुन दिलीत. आमच्या आजोळी हा पदार्थ आवर्जून केला जातो. बहूतेक या शेवयांचे सोरे हे फिरकीचेच असतात. म्हणजे हँडल फिरवून शेवया पाडायचे. आमच्याकडे याचा चांगला जड असा ३ पायांचा पितळी सोर्‍या आहे. परातीत किंवा सुपात सोर्‍या ठेवायचा. तिवईवर पोतं टाकून बसायचं. आणि पूर्ण जोर लावून हँडल फिरवायचं. मस्त शेवई पडते.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

बट्ट्याबोळ's picture

7 Feb 2010 - 1:40 pm | बट्ट्याबोळ

वाव !!! खूप सुन्दर !!

अविनाशकुलकर्णी's picture

7 Feb 2010 - 7:01 pm | अविनाशकुलकर्णी

श्री गणपा हे खाद्य प्रकार कसे बनवावेत याचे क्रम वार फोटो देणा~या पध्धतीचे आद्य जनक व मुळ पुरुष आहेत....
वरचा प्रकार कधि खाण्यात आला नाहि..फोटो मस्त..

गणपा's picture

8 Feb 2010 - 2:06 am | गणपा

अविनाशराव सचित्र क्रमवार पाककृतीचे जनक आपले पांथस्थशेठ.
त्यांनी तयार केलेल्या पायवाटेवरुन आमचा प्रवास चालु आहे.

कपिलसाहेब रसशेवया प्रकार कधी चाखला नाहीये, पण एकुण प्रकार खुप चवीष्ट असणार यात तीळमात्र शंका नाही.
बिकांशीही सहमत.

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Feb 2010 - 7:23 pm | बिपिन कार्यकर्ते

केरळी चवीच्या खूप जवळ जाईल हा पदार्थ. अप्पम सारखे लागावे बहुधा.

बिपिन कार्यकर्ते

स्वाती२'s picture

7 Feb 2010 - 7:43 pm | स्वाती२

हा बघा इडिअप्पम चा विडिओ
http://video.webindia123.com/cookery/breakfast/idiappam/index.htm

स्वाती२'s picture

7 Feb 2010 - 7:33 pm | स्वाती२

या शेवयांबद्दल खूप ऐकलय पण कधी चाखले नाहिये. पण आता हे फोटो पाहून मात्र एकदा करुन बघायचा मोह होतोय.
एक प्रश्न आहे. ते उकडीचे मुटकुळे पहिल्या फोटोत पाण्यात ठेवलेत का?

काजुकतली's picture

7 Feb 2010 - 9:15 pm | काजुकतली

हा माझा आणि माझ्या लेकीचा अतिशय आवडता पदार्थ आहे.

उकडलेल्या मुटकुळ्याच्या शेवया पाडायला खुप जड जाते. त्यावर उपाय म्हणुन माझ्या आईने तांदळाचे पिठ भिजवुन ते सो-यात भरुन सरळ मोदकपात्रात शेवया पाडुन उकडायचे सुरू केले. आता मीही तसेच करते.

मीनल's picture

7 Feb 2010 - 10:15 pm | मीनल

माझी आ़जी करायची ह्या शेवया.
क्लास लागतात.
मीनल.

दिपाली पाटिल's picture

8 Feb 2010 - 1:15 am | दिपाली पाटिल

अतिशय छान पाकृ...नक्की करून बघणार पण काजुकतलीची पध्द्त जरा सोपी वाटतेय..मुटकुळ्यांची शेवई पाडायला थोडं जड जाईल बहूतेक....
रस वाचून वाटलं की आंब्याचाच रस असावा...:)

दिपाली :)

खान्देशी's picture

8 Feb 2010 - 6:35 am | खान्देशी

कोकन्कानाताला अदभूत चव असलेला स्वर्गीय पदार्थ !!

प्रभो's picture

8 Feb 2010 - 6:45 am | प्रभो

मस्त...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

सहज's picture

8 Feb 2010 - 7:31 am | सहज

पाकृ भारीच!!

अविनाशकुलकर्णी's picture

8 Feb 2010 - 1:47 pm | अविनाशकुलकर्णी

वा मान गये...पांथस्थशेठ...आपल्या कल्पक्तेला दाद द्यावी तेव्ढी थोडीच आहे

चित्रादेव's picture

9 Feb 2010 - 2:00 am | चित्रादेव

आम्ही ह्या शेवया ताज्या आमरसासोबत पण खातो ज्यास्त वेळा.

रेवती's picture

9 Feb 2010 - 6:43 am | रेवती

जीवघेणी पाकृ!
फोटोंमुळे मनाला त्रास झाला.;)

रेवती

हा पदार्थ मी मालवणला एका मित्राच्या घरी खाल्ला आहे. गंमत म्हणजे त्याच्या बहिणीने त्या दुधात चिमूटभर हळद घातली होती. केशराचा रंग त्या पुढे काहिच नाही.

जयंत कुलकर्णी
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

अरुंधती's picture

9 Apr 2010 - 4:03 pm | अरुंधती

मस्त मस्त मस्त पा.कृ.!!!
घरपोच पार्सल मिळेल का? ;-)
तोंडाला जाम पाणी सुटलंय.... नारळाच्या रसासारख्याच आमरसाबरोबरही फक्कड लागत असणार ह्या शेवया.....
आणि केळीच्या हिरव्यागार पानावर मधोमध आमरसाची वाटी आणि भोवताली तांदळाच्या शेवयांची रांगोळी!!!!! बाप्पा खूष!!!!!!!!!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/