त्रुटी....

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
12 Mar 2008 - 9:23 pm
गाभा: 

मा.सरपंच
मिसळपावग्राम,
थोडे आपल्या नजरेस आणू इच्छितो,
प्रकार शीर्षक लेखक प्रतिसाद अंतिम लेखन
काथ्याकुट तुम्हाला काय वाटते? नवीन राजमुद्रा 9 new 45 मिनीटे 29 सेकंद
जनातलं, मनातलं अशा व्यक्ती अशा वल्ली १ - धोंडोपंत 11 new 52 मिनीटे 28 सेकंद
जनातलं, मनातलं धर्मवीर संभाजी महाराज - शेखर 11 new १ तास 4 मिनीट

ह्यातला हा आकडा फ़क्त देवनागिरित येतोय.
त्या बरॊबरचा दुसरा आकडा हा इंग्रजी मध्ये येतोय.
लेखमालेच्या अनुक्रमणिकेत वेळ जिथे दाखवतात तिथला हा प्रकार आहे.
वाचून गम्मत वाटलि,म्हणून हा खटाटॊप.
तेव्हढे फक्त दुरुस्त करावे अशि विनंति.

अबब

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 7:03 am | विसोबा खेचर

मिसळपाववरील त्रुटी जाहीरपणे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! मिसळपाववर अजून बर्‍याच सुधारणा बाकी आहेत त्या हळूहळू होतील..

कधी, ते सांगू शकत नाही, परंतु प्रयत्न सुरू आहेत...

वाचून गम्मत वाटलि,म्हणून हा खटाटॊप.

काय साहेब, मिसळपाववरील त्रुटी वाचून तुम्हाला गंमत वाटली? अहो दु:ख व्हायला पाहिजे होतं! :)

दुसर्‍याच्या त्रुटींना असे हसू नये! :))

बाबारे नीलकांता, हे अबबराव काय म्हणतात ते बघ जरा प्लीज आणि त्याप्रमाणे सुधारणा कर!

छ्य्या! मिपाच्या त्रुटीं सांगण्याबद्दल हौशीहौशीने जाहीरपणे काथ्याकुट उघडतात, आम्हाला खरडी आणि पोष्टकार्ड पाठवून हैराण करतात परंतु मिपाच्या जमेच्या बाजूंबद्दल कुणीच काही लिहीत नाही तिच्यायला! कदाचित जमेच्या बाजूच नसतील! :)

असो,

आपला,
सरपंचतात्या.

केशवराव's picture

13 Mar 2008 - 6:32 pm | केशवराव

मा. सरपंच साहेब ;
मि.पा. चे नुतनी करण झाल्यापासुन माझ्या मि.पा. च्या पानावर अनुक्रमणिका येत नाही.
- - - - - - - - केशवराव.

सरपंच's picture

24 Apr 2008 - 10:07 am | सरपंच

१ व ० चे रूप बदलण्यात आलेले आहे. त्याची नोंद घ्यावी.

केशवराव, अनुक्रमणिकेसाठी पानाच्या खाली अधिक नावाचा दूवा आहे त्यावर टिचकी द्या, म्हणजे पहिल्या सारखा अनुक्रम दिसेल. किंवा डाव्या समासात नवे लेखन नावाचा दूवा आहे. तेथे टिचकी द्या.