एका वाक्यात उत्तर द्या

प्रेमसाई's picture
प्रेमसाई in काथ्याकूट
12 Mar 2008 - 5:22 pm
गाभा: 

नशिब कशाला म्हणतात

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

12 Mar 2008 - 5:32 pm | इनोबा म्हणे

ह्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यास तुमचे नशिब.

अवांतरः या प्रश्न्नाला किती गुण मिळणार याचा उल्लेख असावा.(ह. घ्या. किंवा कशाला घेता?)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

वरदा's picture

12 Mar 2008 - 5:43 pm | वरदा

रोज आपण ज्या लेन मधून ड्राईव्ह करु तीच अडकून राहीली आणि बाकी सगळे लोक पुढे जाताना दिसले की समजावं हेच आपलं नशीब
(ट्रॅफिकला कंटाळलेली) वरदा

स्वाती राजेश's picture

12 Mar 2008 - 6:05 pm | स्वाती राजेश

इंडिकेटर लावून त्या लाईनमधे जायचं(घुसायचं). हे तुझे नशीब नाही का?:))))
ह. घे.

व्यंकट's picture

12 Mar 2008 - 6:55 pm | व्यंकट

लक ला मराठीत नशीब असे म्हणतात.

व्यंकट

इनोबा म्हणे's picture

12 Mar 2008 - 6:59 pm | इनोबा म्हणे

बरं झालं आम्हाला सांगीतलं ते! (ह. घ्या. :)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

व्यंकट's picture

12 Mar 2008 - 7:02 pm | व्यंकट

लक म्हणजे कंबर

व्यंकट

छोटा डॉन's picture

12 Mar 2008 - 7:03 pm | छोटा डॉन

या प्रश्नाचे उत्तर घेण्याची तसदी आम्ही घेतली हे तुमचे नशिब व हे उत्तर देण्यासाठी मला २ तास विचार करावा लागला हे माझे (फूटके) नशिब .....
अजून "डांबिसकाकांनी " येऊन तुमची काढली नाही हे तुमचे अजून एक नशिब ....
"प्राजू" ने अजून "चारोळी" लिहून नशिब म्हणजे काय याचे उत्तर दिले नाही हे अजून एक नशिब ...
"स्वाती-राजेशने किंवा पेठकर काकांनी " यावर "नशिब कसे बनवतात्/घडवतात" याची रेसिपी दिली नाही हे पण एक नशिब ....
"सर्कीट" ने "मी नशिब मानत नाही व बाकीचे मानत असल्यास मला माहित नाही " असा अभिप्राय दिला नाही, हे पण एक नशिब ...
"धमु" ने "हाण तिच्यायला नशिबाच्या , जे होईल ते बघू "असा प्रतिसाद दिला नाही हे नशिब ...
"केशवसुमारां" नी "कशी नशिबाने थट्टा मांडली" या गाण्याच्या विडंबनातून प्रतिसाद दिला नाही हे नशिब ...
"धोंडोपंतकाकांनी " तुमच्या नशिबासाठी "तुमची कुंडली मांडली नाही हे नशिब ....
"संजोपरावांचा कशी नशिबाने थट्टा मांडली " हा लेख तुम्ही वाचला नसल्यास फुटलेले तुमचे नशिब ....
"इनोबांनी" नशिब म्हणजे काय आहे याचे उत्तर दिले आहेच ....
"तात्यांनी " असेच नशिब घडवत रहा , आम्ही बघतो आहोत असा अभिप्राय दिला नाही, हे पण एक नशिब ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

12 Mar 2008 - 7:08 pm | इनोबा म्हणे

असला जबरा प्रतिसाद मिळावा हे एक नशिब.
डॉन्या लेका मस्तच रे! (ह. ह. पु. वा.)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2008 - 9:40 pm | पिवळा डांबिस

अजून "डांबिसकाकांनी " येऊन तुमची काढली नाही हे तुमचे अजून एक नशिब ....

अरे बाबा, त्या प्रेमसाईंची मी कशाला काढू? त्यांनी बिचार्‍यांनी माझं काय घोडं मारलंय?
बाकी डॉन्या तू दूर बंगळूरात असल्याने तुला पायाचे अंगठे धरून उभा करता येत नाही हे माझं (फुटकं) आणि तुझं (चांगलं) नशीब!! :))
थांब, आता कन्नड वेदिकेच्या लोकांचीच ओळख काढतो!! :))

आणि प्रेमसाई, तुमच्या प्रश्नाला आमचे म्हातार्‍याचे एका वाक्यात उत्तरः
"नशीब म्हणजे, जे ओळखण्यात चूक होऊ शकते, पण जे कधीही बदलता येत नाही ते!"

आपला,
डांबिसकाका

छोटा डॉन's picture

12 Mar 2008 - 10:04 pm | छोटा डॉन

"थांब, आता कन्नड वेदिकेच्या लोकांचीच ओळख काढतो!! :)""
काका जर यात प्रादेशिकवाद आणताल तर आम्हालाही "विनोबा ठाकरे" यांची मदत घ्यावी लागेल. तसे झाल्यास फुकट बेंगलोरमध्येही "राडा" होईल ...
बाकी अंगठे धरण्याचे म्हणताल तर मला आता त्याचे काही वाटत नाही [ कारण मास्तरची नजर फिरल्याफिरल्या लगेच खाली कसे बसायचे ह्याचा आम्ही लहानपणीच "क्र्याश कोर्स " केला होता .... ह. घ्या किंवा घेऊ नका ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

13 Mar 2008 - 12:45 am | इनोबा म्हणे

काका जर यात प्रादेशिकवाद आणताल तर आम्हालाही "विनोबा ठाकरे" यांची मदत घ्यावी लागेल. तसे झाल्यास फुकट बेंगलोरमध्येही "राडा"होईल ...
का नाही होणार?,च्यायला मराठी माणसाला मारायला जर कन्नड वेदीका येणार असेल तर आम्हालाही आमचे हत्यार बाहेर काढावे लागेल. पुण्यातली कर्नाटक शाळा फोडून टाकतो रात्रीच्या रात्री. बाकी पार्टीवाले घटना घडल्यानंतर निषेध करतात आपण च्यायला आधी करायचा नवा पायंडा पाडू.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

पिवळा डांबिस's picture

13 Mar 2008 - 10:18 am | पिवळा डांबिस

आम्हाला बंगळूरमधले दुसरे कुठले गुंड माहिती नाहीत हो!!!:((
हेच एक माहिती होते जे लोकनियुक्त प्रतिनिधींचा अपमान करतात ते! :))
प्रादेशिकता नको असेल तर इनोबा, तुम्हीच चार मराठी माणसे पाठवून द्या बंगळूराला, ह्या डॉन्याला ठीकठाक करायला!! :))
आमची हरकत नाही.

इनोबा म्हणे's picture

13 Mar 2008 - 10:41 am | इनोबा म्हणे

प्रादेशिकता नको असेल तर इनोबा, तुम्हीच चार मराठी माणसे पाठवून द्या बंगळूराला
असं काहीतरी बोला ना! च्यामारी चार लोकांना तेवढाच रोजदार मिळणार असेल तर आपली ना नाही.आत्ता बंदोबस्त करतो.

(एकमेका साह्य करु | अवघे होऊ श्रीमंत)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

छोटा डॉन's picture

13 Mar 2008 - 3:43 pm | छोटा डॉन

"असं काहीतरी बोला ना! च्यामारी चार लोकांना तेवढाच रोजदार मिळणार असेल तर आपली ना नाही.आत्ता बंदोबस्त करतो."
आम्हाला यश देण्यास व ते मिळवण्यासाठी ताकद देण्यास "आई जगदंबा" समर्थ आहे. तेव्हा आमच्या बंदोबस्तास जत तुम्ही माणसे पाठवणार असताल तर आम्ही एवढेच म्हणू ...
"ऊदयीक येणार असाल तर आजच या"

बेंगरूळ शेर चंद्रराव छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

13 Mar 2008 - 7:56 pm | इनोबा म्हणे

आम्हाला यश देण्यास व ते मिळवण्यासाठी ताकद देण्यास "आई जगदंबा" समर्थ आहे
आई जगदंबा आहे की समर्थ आहेत? एकदाच काय ते बोला राव! परत परत डोक्याची मंडई नको.

"ऊदयीक येणार असाल तर आजच या"
आज नाही जमणार राव.आज माझ्या 'डूडूंबगाटूंगा' या झूलू भाषेतील कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आहे. उद्या सकाळीच मी सनी सिंगापूरच्या जत्रेला निघालो आहे.यायला दोन तीन दिवस तरी लागतील.परत आल्यानंतर संपर्क करतो.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

छोटा डॉन's picture

13 Mar 2008 - 8:58 pm | छोटा डॉन

"आज माझ्या 'डूडूंबगाटूंगा' या झूलू भाषेतील कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आह"
आहाहा .. ऐकुन लैच मस्त वाटलं बघा .... शेवटी कोणीतरी झुलु जाणणारा ....
आमच्या त्या कार्यक्रमास शुभेच्छा ....

अवांतर : आम्ही कधी काळी लिहलेले एक गीत आज झुलु लोकात फार फेमस आहे ....
आम्ही तर असे ऐकले आहे की तेथिल लहान मुले संध्याकाळी "शुभंकरोती कल्याणम्" च्या जागी म्हणत असतात ...
असो. डुडुंबा झुब्मा गन्त्ता. चामुंडा कुम्बा डुंगडुंग .... [ म्हणजे आता बास झाले. नंतर भेटू ...]

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सर्किट's picture

13 Mar 2008 - 4:33 am | सर्किट (not verified)

खूपच मस्त !

- सर्किट

धमाल मुलगा's picture

13 Mar 2008 - 3:45 pm | धमाल मुलगा

"धमु" ने "हाण तिच्यायला नशिबाच्या , जे होईल ते बघू "असा प्रतिसाद दिला नाही हे नशिब ...

घ्या..आता ह्याच्यावर आम्ही काय "हाण तिच्याआयला" म्हणणार ?

आयला ह्या डॉन्याचा खर॑च ब॑दोबस्त करायला पायजेल, लैच मोकाट झालाय हल्ली.

तू भेट रे एकदा, मग सा॑गतो तुला नशिब म्हणजे काय ते!

ओ प्रेमसाई, हे वरच॑ वाक्य तुमच्यासाठी नव्हत॑ बर॑ का..ते डॉन्यासाठी.

नशिब म्हणजे काय हे एव्हढ॑ ठाऊक नाही पण ते दिसायला फुटक्या खापरासारख॑ असाव॑ असा आमचा अ॑दाज.

प्राजु's picture

12 Mar 2008 - 7:08 pm | प्राजु

अरेरेरे......
छोटा डॉन ने याचे इतके मोठे उत्तर द्यावे.. छ्या... नशिब .. दुसरं काय?? (ह्.घ्या.)

- (सर्वव्यापी)प्राजु

छोटा डॉन's picture

12 Mar 2008 - 7:11 pm | छोटा डॉन

"प्राजूने व इनोबांनी " लगेच २ मिनिटात प्रतिसाद देऊन मला "टोला" हणावा हेच आमचे नशिब .... ह.घ्या .

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती राजेश's picture

12 Mar 2008 - 7:34 pm | स्वाती राजेश

अरे छोटा डॉन,
नशिब आपले आपणच घडवतो म्हणजे ही एक प्रकारची रेसिपीच...
ही तुला समजली नाही हे.....नशिब

वरदा's picture

12 Mar 2008 - 8:37 pm | वरदा

इंडिकेटर लावून त्या लाईनमधे जायचं(घुसायचं). हे तुझे नशीब नाही का?:))))

मी शिफ्ट झाले की नेमकी ती दुसरी लेन स्लो जायला लागते गं...:(

व्यंकट's picture

12 Mar 2008 - 8:42 pm | व्यंकट

ऑफ़ीस स्पेस?

व्यंकट

वरदा's picture

12 Mar 2008 - 9:24 pm | वरदा

हे हे हे :)))))
अहो ती मिळवण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो हेही नशिब......

व्यंकट's picture

12 Mar 2008 - 9:34 pm | व्यंकट

>>मी शिफ्ट झाले की नेमकी ती दुसरी लेन स्लो जायला लागते गं...:(

असा सीन आहे ऑफिस स्पेस नावच्या सिनेमात.

व्यंकट

वरदा's picture

13 Mar 2008 - 12:41 am | वरदा

चला आज जरा ज. न. मधे भर पडली....

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2008 - 1:06 am | बिपिन कार्यकर्ते

बाकी काही नाही पण आज नशिबाचंच 'नशिब' जोरावर दिसतंय.....

बिपिन.

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Mar 2008 - 2:49 am | ब्रिटिश टिंग्या

नशीब म्हणजे स्वत:चे अपयश आणि दुसर्‍याच्या यशाला श्रेय देण्याची जागा.......

उदा :
केशाच्या विडंबनाला एवढे प्रतिसाद कसे बॉ ? -> (दुसर्‍याच्या कविता वापरुनही)सालं त्याचं नशीबं चांगलं.
अन् माझ्या लिखाणाला प्रतिसाद कसे नाही बॉ ? -> (मी एवढा प्रतिभासंपन्न असुनही)सालं आमचं नशीबच XX.

काय समजलं ना?

आपला,
('नशीब'वान) छोटी टिंगी ;)

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 6:45 am | विसोबा खेचर

आयुष्यातले योग आणि भोग यांच्या सरमिसळीला नशीब म्हणतात!

आपला,
(योगापेक्षा भोग मोठे आहेत हे मानणारा!) तात्या.

मनस्वी's picture

13 Mar 2008 - 9:42 am | मनस्वी

लायकी नसताना प्रोजेक्ट मॅनेजर बनणे - हे पीएमचे गुड लक आणि
तो पीएम आपल्याला येणे हे आमचे बॅड लक

मनस्वी

मुकुल१'s picture

13 Mar 2008 - 9:57 am | मुकुल१

जानी ये नसिब नसिब खेलना बंद करो, देखो बकार्डी तुम्हे बुला रही हैं, कहां हो तुम..

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 10:09 am | विसोबा खेचर

मस्त! :)

चतुरंग

जुना अभिजित's picture

13 Mar 2008 - 11:33 am | जुना अभिजित

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

घडुन गेलेल्या गोष्टिना नशिब म्हणतात

धमाल मुलगा's picture

13 Mar 2008 - 1:03 pm | धमाल मुलगा

पण मग, 'नशिबात असेल तर मिळेल अस॑ आपण जे म्हणतो', ते तर भविष्यकाळाबद्दल असत॑ ना?

नशीब म्हणजे मांजर..आपण उंदीर
मांजरा पासून सुटका हवी असेल तर उंदीर मारायचे औषध उपयोगी ठरेल....
मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार

प्रभाकर पेठकर's picture

13 Mar 2008 - 1:12 pm | प्रभाकर पेठकर

एखादे यश सहज प्राप्त झाले तर ते आपले 'कौशल्य'; पण तेच यश दुसर्‍याने कौशल्याने मिळविले तर ते त्याचे 'नशिब'.

यन्ना _रास्कला's picture

13 Mar 2008 - 1:22 pm | यन्ना _रास्कला

एका डोळ्यात आसू आनि एका डोळ्यात हासू देते ते नशीब...