मुकुट परत मिळाला..

विवेकवि's picture
विवेकवि in काथ्याकूट
12 Mar 2008 - 5:00 pm
गाभा: 

आजच पेपर वाचताना बातमी वाचली म॑दीरातला मुकुट परत मिळाला.
वाचून आन॑द झाला ..

पण चोरणारी व्यक्यी कोण ?
काय हेतू चोरण्याचा ?
आपले काय मत आहे

आपली मते कळवावी...

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

12 Mar 2008 - 5:36 pm | इनोबा म्हणे

हरवला कधी/कुणाचा/कोठून होता?

अवांतरः विवेकराव आधीची बातमीही द्यायला हवी होती. नाहीतर नक्की काय सांगायचे आहे ते लक्षात येत नाही.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

मुकुट, मंदिर ,दर्गे ,पाल्ख्या ,केस,भिंती यात्रा यांचा बंदोबस्त करण्यातच आपले पोलिस दिवसाचे १४/१६ तास जुंपलेले असतात.
तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे?
रिकामटेकडे लोक या सगळ्या गोष्टीना अवास्ताव महत्व देतात्...त्यात भर म्हणून प्रसार माध्यमे ही ताळ्तंत्र सोडुन "सबसे तेज" प्रकाशित करतात.
आपणही ते चघळत बसतो......
तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे?
२४ तास दिल्या जाणार्या बातम्यांमुळे कोणाचे जनरल नॉलेज वाढले ,कोणाचे पोट भरले ,(बातमीदार वगळता) असे मला तरी दिसले नाही.
"के "ने सुरु होणार्या सिरीयल्स्.....पहात बसणारी आपला जनता....वीज पुरत नाही म्हणून लोड्शेडींग सहन करणारी आपली जनता
(या सिरीयल्स्बंद केल्या तर किती गावाना वीज मिळेल ,किती कारखाने चालतील .......असा विचार केला आहे कधी?)
तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे?
या सगळ्यामुळे मनस्ताप होणारा...पण काहीही करु न शकणारा
निष्क्रिय विजुभाऊ

व्यंकट's picture

12 Mar 2008 - 6:53 pm | व्यंकट

तुकाराम महाराजांचा मुखवटा म्हणायचय का? असल्यास आपल्या इतर प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. वृत्तपत्रे वाचत रहा. उत्तरे मिळतील.

व्यंकट

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 6:42 am | विसोबा खेचर

आजच पेपर वाचताना बातमी वाचली म॑दीरातला मुकुट परत मिळाला.
वाचून आन॑द झाला ..

मलाही आनंद झाला...

तात्या.

मनस्वी's picture

13 Mar 2008 - 10:16 am | मनस्वी

ही घटना कुरळेवाडीतील आहे. कुरळेवाडीत बबन लुकतुके आणि जनाजी मुंगळे यांची हौशी नाटककंपनी आहे.
शनिवारी रात्री या नाटककंपनीचा "द्रौपदीचे वस्त्रहरण" चा प्रयोग होता. ऐनवेळेस लक्षात आले की मुंगळ्यांचा (श्रीकृष्णाचे पात्र) मुकुट सापडत नाहीये. म्हणून वेळ निभावून नेण्यासाठी लुकतुक्यांनी मंदिरातील मुकुट मुंगळ्यांना आणून दिला.
इकडे "मंदिरात मुकुट चोरीला गेला" अशी खळबळ उडाली.
प्रयोग संपल्यावर लुकतुक्यांनी झाला प्रकार सांगितला, समस्त नाटकमंडळींनी जाहीर माफी मागितली आणि मुकुट साभार परत केला.
मंदिराचे चिटणीस मुरकुटे आणि गावकर्‍यांनी नाटककंपनीची अनेक वर्षांपासूनची विनामूल्य आणि उस्फुर्त सेवा यांचा विचार करता त्यांना माफ केले आणि मुरकुट्यांनी नाटककंपनीला रुपये ५०१ मुकुट घेण्यासाठी देणगीच्या स्वरुपात दिले.

मनस्वी

पिवळा डांबिस's picture

13 Mar 2008 - 10:31 am | पिवळा डांबिस

मनस्वीराव,
कोणता पेपर वाचता हो तुम्ही?:)))
आम्हीही चालू करावा म्हणतो!!

इनोबा म्हणे's picture

13 Mar 2008 - 10:48 am | इनोबा म्हणे

दैनिक टोळभैरव(संपादक: इनोबा ठाकरे)
(सर्व अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध किंमत: २.५० रु.)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

मनस्वी's picture

17 Mar 2008 - 2:50 pm | मनस्वी

दैनिक बोंबाबोंब
अतिशय परखड आणि भेदक विचारांचे वृत्तपत्र
(किंमत २ रु २५ पै)

इनोबा म्हणतात त्या टोळभैरवामध्ये आणि बोंबाबोंबमध्ये नेहेमी अटीतटीची competition असते!

मनस्वी