नमस्कार,
सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आजपासुन मराठीतले नाटकावरचे पहिले संस्थळ रंगकर्मी .कॉम पुन्हा सुरु झाले आहे. जवळ जवळ ४ महिन्यापुर्वी गिरिष ओकांच्या हस्ते उद्घाटन होऊन हे संस्थळ सुरु झाले होते,मात्र मध्यंतरी काही तांत्रिक अडचणींमुळे हे स्थळ बंद पडले होते. मात्र आता अथक प्रयत्नानंतर हे संस्थळ पुन्हा सुरु झाले असुन वाचकानी मागितलेल्या सर्व सोयी देण्यात आलेल्या आहेत.
आजपासुन http://www.rangakarmi.com या पत्त्यावर तुम्ही हे स्थळ पाहु शकता. येत्या २४ तासात http://www.rangkarmi.com या जुन्या पत्त्यावर ही साईट दिसु लागेल ,मात्र पहिला पत्ता हाच कायम राहिल
या संस्थळाचे काम दिपक ( ब्लॉगर -भुंगा ) यांनी केले आहे ,त्यांनी गेले काही दिवस आम्हास जे सहकार्य दाखवले ,विशेषत: व्यवस्थापकांची अनुपलबध्ता असतानाही त्यांनी हे काम करुन दिले आहे, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानणेच उचित ठरेल.
आज या निमित्ताने रंगकर्मी व्यवस्थापन आपले मनोगत मांडत असुन नवीन बदलासंबंधी माहितीही देत आहे.
१. या पुर्वी संस्थळावर लिखाण करण्यासाठी व्यवस्थापनाशी संपर्क साधावा लागत असे , मात्र असा होणार नाही, आता आपला संवाद दुमार्गी झालेला आहे
२. संस्थळावर लेख आपण थेट लिहु शकता ,यासाठी आपणाला सदस्य व्हावे लागेल ,त्यानंतर तुम्हाला लेख लिहिता येइल .यासाठी फोनेटिक मराठी टायपिंग ची सोयही देण्यात आलेली आहे. उजव्या कोपर्यात आपणाला ती दिसु शकेल . दिसत नसेल तर तिथे असणार्या छोटाश्या बाणावर टिचकी मारल्यास ते दिसु लागेल .यामुळे सर्व रंगकर्मीना लिखाण करणे सोपे जाईल
३. काही जणाना फक्त अभिप्राय द्यायचा असतो ,त्यासाठी सदस्यत्व घेणे त्या सदस्याना आणि व्यवस्थापनाला ही परवडणारे नसते ,यासाठी संस्थळावर अभिप्राय कोणालाही देता येतील ( सदस्य न होता) मात्र लिखाण करण्यासाठी मात्र सदस्य व्हावे लागेल
४. यातुनही आपणास लेख टाईप करणे न जमल्यास तुम्ही तो आम्हाला पाठवु शकता ,आम्ही तो प्रकाशित करु
५. याशिवाय रंगकर्मी व्यवस्थापनही काही लेख प्रकाशित करेल ते तुम्हाला रंगकर्मी विशेष या भागात वाचता येतील.
६. जगातील सर्व मराठी रंगकर्मी एकत्र यावेत ,हा एक महत्त्वाचा उद्देश या प्रकल्पामागे होता म्हणुनच या साईटवर चर्चा या विशेष विभागात फोरमची सोय देण्यात आलेली आहे
७. एखाद्याला आपला प्रयोग कोठे आहे ,कधी आहे ते इतराना कळवायचे असते ,त्यासाठी आजपर्यंत लोक फेसबुक वगैरेंचा वापर करायचे , मात्र आता हा फोरमही तुम्ही वापरु शकता.
८. रंगकर्मी वरचे महत्त्वाचे लेख लेखकाच्या परवानगीने काही प्रसिद्ध मराठी संस्थळावर प्रकाशित करायची इच्छा आहे.
याशिवाय होणारे बदल आपणाला कळवले जातील .
मित्रानो ,शेवटी इतकेच म्हणायचे आहे, की नाटक हा मराठी माणसाची आवड आणि संस्कृती आहे. ती जोपासण्यासाठी आपण सारे मिळुन प्रयत्न करु . त्यासाठी या नव्या माध्यमात आम्हाला जरुर साथ द्या. लेख आणि अभिप्राय हे त्यासाठी माध्यम असेल. आपण सारे मिळून आपली नाट्य संस्कृती वाढवु आणि टिकवु...
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.
धन्यावाद,
आपले ,
रंगकर्मी व्यवस्थापन
वि .सु.-
साईटवर काही छोटे मोठे बदल राहिले आहेत, ते लवकरच केले जातील
आपण सध्यस्थीतीत आमच्याशी admin@rangakarmi.com वर संपर्क साधु शकता.
आणि जर हा उपक्रम आपणाला आवडला तर त्याबदल इतराना सांगायला विसरु नका.
धन्यवाद
मिसळपाव सदस्यांकडुन या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळावा ही इच्छा.