काही दुर्मिळ फोटू...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
12 Mar 2008 - 1:53 pm

सदर फोटू मला बाबुजींच्या घरनं मिळालेले आहेत. आमच्या ललितामावशींनी हे फोटू मला दिले आहेत. मिपाकरांसाठी येथे देत आहे!

श्रेय : श्रीमती ललिता फडके, श्री श्रीधर फडके.
टिप्पणी : तात्या अभ्यंकर...

१) दिदी, मन्नादा आणि बाबूजी! कुणाचा गळा अधिक गोड, या प्रश्नाचं उत्तर मला तरी अद्याप मिळालेलं नाही!

२) बहुतेक 'ज्योती कलश छलके'च्या आठवणी ताज्या होत असाव्यात! :)

३) "आशाताईची मेहनत घेण्याची तयारी पाहिली आणि उत्तम गाण्याकरता जिद्दीने कष्टाचे डोंगर उपसण्याची तयारी पाहिली की मन थक्क होत!" असं बाबूजी मला एकदा म्हणाले होते!

४) अण्णांना, अटलजींना, आणि पवारसाहेबांना बाबूजी काय सांगत असावेत बरं?! :)

५) गुरुसमान हिराबाई बडोदेकरांसमोर बाबूजी नतमस्तक होतांना! शेजारी मा. यशवंतराव चव्हाण!
"माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो!

६) खळेसाहेब "बाजे रे मुरलीया बाजे"ची चाल अण्णांना आणि दिदीला शिकवत आहेत!

७) 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोये', 'दैवजात दु:खे भरता' आणि 'जाहल्या काही चुका'! क्या केहेने!!

८) माझी गुरुस्थाने! 'स्वरगंधर्व' आणि 'स्वरभास्कर'! एकाच्या सुरांमुळे शब्दांना वैभव प्राप्त होतं आणि दुसर्‍याच्या स्वरापुढे तर शब्दच संपतात!!

९) स्वरसम्राज्ञी आणि स्वरभास्कर!

१०) "ने मजसि ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला!"
दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सदनापाशी बाबूजी. चाहत्यांना बाबूजींचं अंत्यदर्शन मिळावं म्हणून शेवटी याच सावरकर सदनात बाबूजींचं पार्थिव ठेवलं होतं!

-- तात्या अभ्यंकर.

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

12 Mar 2008 - 3:32 pm | आनंदयात्री

सुंदर फोटो. (अण्णा, अटलजी, पवारसाहेब अन बाबूजी ),(सावरकर सदनापाशी बाबूजी) हे फोटो विशेष आवडले.
सावरकर सदनापाशी बाबूजी हा एकदम वेगळा फोटो आहे, तुमच्या आमच्या घरातल्या एखाद्याचा असावा असा, साधेपण दिसुन येतो.

शेखर's picture

12 Mar 2008 - 2:03 pm | शेखर

तात्या फोटो मिपावर प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.....

बाबुजींची गाण्यांची बात काही औरच आहे..... कितीही दशके गेली तरी गाणी अजुनही कानांना गोड वाटतात.

शेखर...

प्रमोद देव's picture

12 Mar 2008 - 2:14 pm | प्रमोद देव

अप्रतिम प्रकाशचित्रे आणि त्यावरील भाष्यही तितकेच अप्रतिम!
तात्या अभिनंदन आणि मन:पूर्वक आभारही!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2008 - 2:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अप्रतिम प्रकाशचित्रे आणि त्यावरील भाष्यही तितकेच अप्रतिम!
तात्या अभिनंदन आणि मन:पूर्वक आभारही!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन's picture

12 Mar 2008 - 2:27 pm | नंदन

अप्रतिम प्रकाशचित्रे आणि त्यावरील भाष्यही तितकेच अप्रतिम!
तात्या अभिनंदन आणि मन:पूर्वक आभारही!

-- असेच म्हणतो. आनंदयात्रींनी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या फोटोतून त्यांचा साधेपणा दिसून येतो.

अवांतर - बाबूजी बहुतेक पवारसाहेबांना 'डाव मांडून भांडून मोडू नको' असा सल्ला देत असावेत, किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री's picture

12 Mar 2008 - 3:30 pm | आनंदयात्री

>> किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :) <<

खल्लास .......

बर सातव्या फोटोतले बाबुजींच्या बाजुला डावीकडे नौशाद आहेत ना ? अन उजवीकडचे कोण ??

प्रमोद देव's picture

12 Mar 2008 - 4:07 pm | प्रमोद देव

उजवीकडचे खळे साहेब आहेत.

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 4:18 pm | विसोबा खेचर

बर सातव्या फोटोतले बाबुजींच्या बाजुला डावीकडे नौशाद आहेत ना ?

हो, नौशादजीच आहेत. मोंगल ए आझम चित्रपटातील त्यांचं 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोये' हे माझं अत्यंत आवडतं गाणं!

अन उजवीकडचे कोण ??

उजवीकडचे खळेसाहेब आहेत. त्यांचं,

जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

हे गाणंही माझं अतिशय आवडतं गाणं. दिदी अक्षरश: सुरी चालवते काळजावरून!

असो..

आपला,
(दिदीचा दिवाना) तात्या.

धोंडोपंत's picture

12 Mar 2008 - 6:28 pm | धोंडोपंत

अवांतर - बाबूजी बहुतेक पवारसाहेबांना 'डाव मांडून भांडून मोडू नको' असा सल्ला देत असावेत, किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :)

नंदनराव,

सही अभिप्राय. त्याचप्रमाणे
"देव आपणांत आहे....शीर झुकवोनिया पाहे"
"तुझ्या माझ्या जड देही....देव भरोनिया राही"

असेही सांगत असावेत.

आपला,
(सश्रद्ध) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रमोद देव's picture

12 Mar 2008 - 2:34 pm | प्रमोद देव

अवांतर - बाबूजी बहुतेक पवारसाहेबांना 'डाव मांडून भांडून मोडू नको' असा सल्ला देत असावेत, किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :)

शाब्बास नंदन.

खुष केलेत तुम्ही आम्हा मिपा करांना,
दुर्मिळ छायाचित्रे, भाग्य आमचे की आपण ते प्रकाशित केलेत :)

गुरुसमान हिराबाई बडोदेकरांसमोर बाबूजी नतमस्तक होतांना! "माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो!

खरोखर, आजचे होतकअरू गायक बिनधास्त मतां साठी भिका मागतात पण लाज मात्र आम्हालाच येते.

विसुनाना's picture

12 Mar 2008 - 3:26 pm | विसुनाना

अलभ्य लाभ!
ही छायाचित्र बघायचं भाग्य तात्यांमुळं लाभलं...

अवांतर -
हीराबाईं बडोदेकरांच्या बाजूला यशवंतराव चव्हाण दिसत आहेत. (आज त्यांचा जन्मदिवस - १२ मार्च १९१३)

अवलिया's picture

12 Mar 2008 - 3:19 pm | अवलिया

गुरुसमान हिराबाई बडोदेकरांसमोर बाबूजी नतमस्तक होतांना! "माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो!

खरे आहे

आजकालचे पोरे अशी भिका मागतात की फोरासरोडच्या रांडा पण गि-हाइकाला अशी गळेपडुपणा करत नसतील
सगळाच भिकारचोट पणा माजलाय ...

नाना

विवेकवि's picture

12 Mar 2008 - 5:11 pm | विवेकवि

धन्यवाद तात्या ...

बाबुजी॑च्या आठवणी जाग्या झाल्या..

असेच काही फोटो मला पण टाकायला आवडतील ..

मि.पा ला चे आज धन्यवाद .....

विवेक वि.

सृष्टीलावण्या's picture

12 Mar 2008 - 5:11 pm | सृष्टीलावण्या

जाता जाता म्हणावेसे वाटते...

धन्य ती पाऊले जी
ध्यासपंथे चालती,
वाळवंटातून सुद्धा
स्वस्तिपद्मे रेखिती

ह्या मणिकांचन योगाबद्दल तात्यांना हृदयत: धन्यवाद.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

किशोरी's picture

12 Mar 2008 - 5:14 pm | किशोरी

खरच दुर्मिळ फोटो,तात्या फोटो मिपावर प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.....

सृष्टीलावण्या's picture

12 Mar 2008 - 5:16 pm | सृष्टीलावण्या

शेवटच्या छायाचित्रात सावरकर राष्ट्रीय स्मारक (उद्यान गणेशासमोरचे) आहे. सावरकर सदन नव्हे.
कारण सावरकर सदन बालमोहनच्या गल्लीत आहे आणि त्याला लागून समुद्र नाही. हा पुतळा सावरकर राष्ट्रीय स्मारक इथलाच आहे.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

स्वाती राजेश's picture

12 Mar 2008 - 5:25 pm | स्वाती राजेश

या फोटो च्या निमित्याने जुन्या गाण्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.दुर्मिळ फोटो बद्द्ल धन्यवाद.
त्यावेळची मंडळी एका गाण्यासठी किती कष्ट घेत होती? आणि आता दिवसाला १०० गाणी म्हणून रेकॉर्ड करतात.
.....असो नविन गाणी सुद्धा त्यावेळेपुरती हिट होतातच.:)))

वरदा's picture

12 Mar 2008 - 6:21 pm | वरदा

आज दिवसाची सुरुवात इतकी सुंदर झाली माझी...खूप मस्त वाटलं फोटो पाहून आणि तुमची टिप्पणीही खूप छान आहे.
"माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो!

१००% सहमत

धोंडोपंत's picture

12 Mar 2008 - 6:22 pm | धोंडोपंत

वा वा वा वा तात्या,

अप्रतिम छायाचित्रे. इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग's picture

12 Mar 2008 - 7:09 pm | चतुरंग

अहो दिवसाची सुरुवात अशा मांदियाळीच्या दर्शनाने व्हावी ह्यापरते भाग्य ते कोणते!
बाबूजींसारख्या असामान्य सूरसाधकाचा सहवास तुम्हाला लाभलेला असणे हे तर तुमचे पूर्वजन्मीचे सुकृत आहे असे वाटते.
ही दुर्मिळ प्रकाशचित्रे दिल्याबद्दल मी ऋणी आहे! आणि प्रत्येक चित्रासोबतची आपली खास टिप्पणीही उल्लेखनीय.

चतुरंग

व्यंकट's picture

12 Mar 2008 - 7:10 pm | व्यंकट

म्हणतो.

व्यंकट

चित्रा's picture

14 Mar 2008 - 5:15 pm | चित्रा

बाबूजींसारख्या असामान्य सूरसाधकाचा सहवास तुम्हाला लाभलेला असणे हे तर तुमचे पूर्वजन्मीचे सुकृत आहे असे वाटते.
ही दुर्मिळ प्रकाशचित्रे दिल्याबद्दल मी ऋणी आहे! आणि प्रत्येक चित्रासोबतची आपली खास टिप्पणीही उल्लेखनीय.

धन्यवाद तात्या.

प्राजु's picture

12 Mar 2008 - 7:20 pm | प्राजु

वरती सगळ्यांनी इतके सुंदर प्रतिसाद दिले आहेत की माझ्याकडे आता शब्दच नाहीत.
हे फोटो मिपावर यावे या सारखे मिपाचे आणि मिपाकरांचे सुदैव ते कोणते असेल...
प्रेमसाई, यालाच कदाचित नशिब म्हणत असतील.... याचे श्रेय तात्यांना जाते.. धन्यवाद तात्या.

- (सर्वव्यापी)प्राजु

छोटा डॉन's picture

12 Mar 2008 - 7:25 pm | छोटा डॉन

"प्रेमसाई, यालाच कदाचित नशिब म्हणत असतील...."
धन्यवाद तात्या ....

मी तर असे म्हणेन की "देणार्‍याचे हजारो हात , फाटकी आमची झोळी " ....

नशिबवान छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

झकासराव's picture

12 Mar 2008 - 7:21 pm | झकासराव

तुने तो दिल खुष कर दिया यार :)

प्रत्येक फोटो छान आणि त्यावरची टिप्पण्णी मस्त आहे.
मतांची भीक>>>. हे अगदी पटल मनापासुन.

सुधीर कांदळकर's picture

12 Mar 2008 - 9:52 pm | सुधीर कांदळकर

अटलजी व पॉवरसाहेब वगळता.

माझे भाग्य उजळले म्हणायचे.

धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

15 Mar 2008 - 12:06 am | विसोबा खेचर

अटलजी व पॉवरसाहेब वगळता.

हा हा हा, बरं बरं!

पॉवरसाहेबांचं समजू शकतो हो!

पण अटलजी हा माणूस मला अतिशय आवडतो. खूप गोड आणि मिश्किल माणूस आहे तो! राजकारणाच्या चिखलात पडला नसता तर फार बरं झालं असतं!

असो...!

आपला,
(अटलजी प्रेमी) तात्या.

सुधीर कांदळकर's picture

12 Mar 2008 - 9:55 pm | सुधीर कांदळकर

सहमत आहे. ते शेवटचे प्रकाशचित्र स्मारकाचे. सदनाचे नव्हे. स्मारकासमोरच पार्कातील कट्ट्यावर जवळजवळ दहापंधरा वर्षे आमचा रोजचा अड्डा जमायचा.

सचिन's picture

12 Mar 2008 - 10:36 pm | सचिन

बहुत काय लिहिणे !!!

सर्वसाक्षी's picture

12 Mar 2008 - 11:15 pm | सर्वसाक्षी

तात्या,
असे सुरेख प्रसंग इथे जीवंत केल्याबद्दल शतशा: आभार

टिउ's picture

13 Mar 2008 - 1:08 am | टिउ

ही सर्व दुर्मिळ छायाचित्रे इथे प्रकाशित केल्यबद्दल तुमचे मनःपुर्वक आभार. :)

ऋषिकेश's picture

13 Mar 2008 - 9:51 pm | ऋषिकेश

तात्या,
ह्या छा.चिं. बद्दल शतश: आभार.. खूप छान वाटलं बघून

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवराव's picture

14 Mar 2008 - 2:38 pm | केशवराव

तात्या ;
खरेच मन भारावून गेले. प्रकाश चित्रें दुर्मिळच पण एका सांगितीक स्मृती रंजनात [नॉस्टॅलजिआ ] घेवून गेली.
चित्र क्र. ५ च्या टिप्पणीत मा. यशवंतरावांना का वगळले ?
- - - - - - - - - - केशवराव.

विसोबा खेचर's picture

14 Mar 2008 - 6:49 pm | विसोबा खेचर

चित्र क्र. ५ च्या टिप्पणीत मा. यशवंतरावांना का वगळले ?

त्यांच्या नांवाचा उल्लेख करायचा राहूनच गेला खरा! क्षमस्व....

काही एक नितिमत्ता, सभ्यता, सुसंस्कृतता असलेले जे काही मोजके राजकारणी होते त्यांत यशवंतरावांचं नांव आवर्जून घ्यावं लागेल हे मात्र नक्की...

तात्या.

हर्शल's picture

14 Mar 2008 - 7:20 pm | हर्शल

प्रत्येक फोटो छान आणि त्यावरची टिप्पण्णी मस्त आहे.

अविनाश ओगले's picture

14 Mar 2008 - 8:24 pm | अविनाश ओगले

हे मिपाचं वैभव आहे...

सन्जोप राव's picture

14 Mar 2008 - 7:43 pm | सन्जोप राव

चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायानूं!
बरं का मंडळी, फार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. संध्याकाळची वेळ होती. मुंबापुरीतल्या एका त्यातल्या त्यात शांत गल्लीतून मी आणि छगन्या रमतगमत फिरत होतो. आमचा छगन्या म्हणजे एक भारी व्यक्तीमत्व बरं का! कुठही जायचं म्हटलं की आधी स्वारी माझ्या दारात येऊन साद घालणार,"झेंगट्या, आहेस का मायजयां वागानं खाल्ला तुला?' (मायजयां ही आमच्या कोकणातली बोलीभासा आसा हां! नायतर पुन्ना माज्या चावडीवर होळीची लाकडं जमवीन मी!) झेंगट्या हे काही माझं खरं नाव नाही बरं का मंडळी! पण दोस्तांत मी झेंगट्या याच नावानं ओळखला जातो. हां, तर सांगत काय होतो, अशी छ्गन्याची साद आली की मी निमूटपणे लेंगाबिंगा चढवून पायताणं घालायला लागायचो. छगन्या तोवर "काय मावशी, तब्येत काय म्हणते आता?" अशा चौकशा करुन बेसनाचा लाडूबिडू खाऊन पायजम्याला हात पुसत उभा असायचा.तर असा एकदा छगन्याबरोबर फिरायला बाहेर पडलो. फिरताफिरता किती लांब आलो ते कळालंच नाही. नेहमीप्रमाणं काहीतरी गुणगुणत होतो. एकदोन जागा झिंझोटीच्या अंगानं गेल्या आणि वरच्या गॅलरीतून अचानक आवाज आला " भालो, खूब भालो - कौन गाना गाता हाय?" मंडळी, आवाज ओळखीचा वाटला आणि वर वळून पाहिलं तसा अंगावर सर्रकन काटाच आला !
वरच्या मजल्यावरुन साक्षात थोरले बर्मनदा खाली बघत होते. थोरले बर्मनदा म्हणजे आमचे आराध्य दैवत बरं का मंडळी! आम्ही डोळे भरून पहात राहिलो. नकळत पायातली पायताणे काढून छातीशी धरली. बर्मनदांनी त्यांच्या गुरख्याला काहीतरी ओरडून सांगितलं गुरखा लगबगीनं आमच्या जवळ आला. आम्ही नजर न हलवता अमिताभने मुलाला आणि सुनेला तिरुपती बालाजीच्या पायावर घालताना बघावं तशा भक्तीभावानं वर बघत होतो. "आय, लडका लोग, टुमको शाब बुलाटा हाय" गुरखा दरडावणीच्या स्वरात म्हणाला. काय सांगू मंडळी, अहो, 'पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा' अशी आमची अवस्था झालेली. लगबगीनं आम्ही पायर्‍या चढून वर गेलो. बर्मनदा झोपाळ्यावर बसले होते. तोंडात भरपूर रंगलेले पान होतेच. आम्ही त्यांच्या पायावर लोळणच घेतली. "अरे बेटा, गले मिलो -" बर्मनदांनी आम्हाला उराशी धरले. "अब सुनाओ, जो नीचे गा रहे थे.." अहो, बर्मनदांसमोर गायचं म्हणजे काय खायचं काम आहे का मंडळी! आम्ही मनातल्या मनात रोकडेश्वराचं स्मरण केलं आणि पेटी पुढे ओढली. झिंझोटी म्हणजे आमचा आवडता राग बरं का मंडळी! साधारण अर्धा तास आम्ही तो आळवला. बर्मनदा तल्लीन होऊन ऐकत होते. "जिओ बेटा जिओ, क्या तैयारी हाय! अब ये सुनो - " असं म्हणून बर्मनदानी आमच्याच सुरावटीवर बांधलेली रचना आपल्या खड्या आवाजात गायला सुरुवात केली
"मोसे छल किये जाय
हाय रे हाय देखो
सैंया बेईमान -"
(पुढे ती रचना खूप गाजली वगैरे सगळा इतिहास आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!) बर्मनदांच्या घरुन चमचम, शोंदेश वगैरे खाऊन भरल्या पोटाने आणि तृप्त मनाने आम्ही पायर्‍या उतरत होतो तेवढ्यात खालच्या मजल्यावरुन "ऑरे झेंगट्या, तुम इदर क्या करता हाय?" अशी आणखी एक हाक ऐकू आली. टी शर्ट आणि शॉर्टसमधली एक चष्मीश गोलमटोल आकृती घरातल्या घरात फुटबॉल खेळत होती. हा आपला पंचम बरं का मंडळी! माझ्या गणेशोत्सवातल्या गाण्याच्या कार्यक्रमात कधीतरी तंबोरा धरायला वगैरे यायचा. 'रैना बीती जाय - ' चा वेळी सुरुवातीचा आलाप कसा घ्यायचा यावर रडकुंडीला आला होता बिचारा. 'झेंगट्या. बचा लो यार. दीदी का गाना हाय, अच्छा होना चाहिये - ' असं म्हणत माझ्या घरी आला होता. तेंव्हा त्याला पुढ्यात बसवून त्याच्या गळ्यातनं ती जागा घोटवून घेतली होती. पुढे ते गाणं खूप गाजलं. त्याचा एक वेगळा किस्सा आहे, पण तो किस्सा पुन्हा कधीतरी -
बर्मनदांच्या घरुन बाहेर पडलो. मन धुंद झालं होतं. ही संगीताची धुंदी काही वेगळीच चीज आहे बरं का मंडळी! चालत चालत पेडर रोडवर कधी आलो ते कळालंच नाही. अचानकच आजूबाजूची गर्दी वाढल्याचं जाणवलं. लोक टाचा उंच करकरुन बघत होते. आम्हीही गर्दीत सामिल झालो. पांढऱ्या शुभ्र साडीतल्या लतादीदी गच्चीत फेऱ्या मारत होत्या. त्यांचा दारवान पांडुरंग माझ्या चांगल्याच ओळखीचा आहे (आम्ही दोघे पास्कलच्या अड्ड्यावर - पण तो किस्सा पुन्हा कधीतरी!) "काय झेंगट्या, तंबाखू काढ गड्या!" पांडुरंग म्हणाला. मी पुडी त्याच्या हातात ठेवली. "दीदी भेटतील का रे पाच मिनिटं?" मी भीतभीतच त्याला विचारलं. "थांब हां जरा - मी विचारुन येतो - ही तंबाखू धर जरा तोवर" पांड्या माझ्या हातात मळलेली तंबाखू देऊन हात झटकत आत गेला. इकडे आम्ही माना उंचावून बघतोय, हातात मळलेली तंबाखू सत्यनारायणाचा प्रसाद धरावा तशी धरलेली आणि दीदींच्या गच्चीतल्या फेऱ्या सुरुच!
पाच मिनिटे झाली असतील नसतील. पांड्या धापा टाकत खाली आला "लेका झेंगट्या, दीदी कालपास्नं तुला फोन लावतायत. तू काहीतरी बील भरलं नाहीस म्हणून तुझा फोन बंद आहे, असं काहीतरी रेकॉर्डिंग ऐकू येतंय म्हणे. मला म्हणाल्या, "संगीतात काय जादू असते बघ पांडुरंग! मंगेशीनं आपणहून त्याला पाठवला!" मंगेशी म्हणजे आमचं आणखी एक श्रद्धास्थान बरं का मंडळी! "जा लवकर वर!"
आम्ही परत पायताणे काढून छातीशी धरली. वर गेलो. दीदींच्या फेऱ्या संपल्या होत्या. आमच्याकडं बघून त्या नेहमीप्रमाणं प्रसन्न हसल्या. "या, या, झेंगटराव, अहो कित्ती दिवस झाले, काही गाठ नाही, भेट नाही-" दीदींच्या तोंडून 'कित्ती' हा शब्द ऐकणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभव आहे बरं का मंडळी! आम्हाला वाटलं आता 'आयेगा आनेवाला-' म्हणतायत की काय! पण त्या म्हणाल्या, "चपला, तिथं दाराशी ठेवल्या तरी चालतील!"
मग आम्ही बसलो. दीदींनी पन्हं मागवलं. दीदींच्या घरचं पन्हं म्हणजे काय चीज आहे मंडळी! छगन्यानं बावळटासारखं तीनतीनदा मागून घेतलं. "अहो, तुमची मुद्दाम आठवण झाली म्हणजे मीरेची काही भजनं रेकॉर्ड करत्येय. बाळचं डायरेक्शन आहे, पण त्यातल्या काही जागा अपुऱ्या वाटतायत मला! आता हेच बघा" दीदींनी चष्मा सावरत आमच्यापुढं कागद ठेवला. आम्ही पुन्हा एकदा रोकडेश्वराचं स्मरण केलं आणि हार्मोनियम पुढं ओढला. पुढं ती भजनं खूप गाजली वगैरे -पण तो किस्सा पुन्हा कधीतरी!

विसोबा खेचर's picture

31 Mar 2008 - 12:19 am | विसोबा खेचर

प्रतिक्रिया छान आहे!

बाय द वे ही ऐहिकताई पुण्याला राहते का हो? कुठल्यातरी कॉलीजात शिकवते म्हणे! :)

असो,

ही प्रतिक्रिया अगदी हौशीहौशीने इथे छापल्याबद्दल धन्यवाद राव साहेब! असेच मिपावर येत रहा आणि इतरांच्या प्रतिक्रिया अगदी हौशीहौशीने देत रहा ही विनंती! तुमचं मराठी आंतरजालावरचं वाचन पाहून आम्ही बरेच प्रभावित झालो आहोत. उद्या मिपाने कुठला विशेषांक काढायचं ठरवलंच तर आम्हीही तुम्हाला एक कप चाय आणि वीस रुपये रोजी या बोलीवर 'विशेषांक-संपादक' म्हणून कामावर ठेवू! :)

तात्या.

--

काही काही माणसं किती जळू आणि कोत्या मनोवृत्तीची असतात नै! :)

प्रमोद देर्देकर's picture

23 Sep 2013 - 10:23 am | प्रमोद देर्देकर

बाबुजी म्हणजे संगीतातील माझे दैवत. या गानतप्स्वी माणसाचे आपल्या सरकारने म्हणावे तसे चीज केले नाही.
बरे विसोबा खेचर आणि तात्या म्हणजे एकच व्यक्ती आहेत का ?
दुसरे असे कि मला तात्या अभ्यंकर साहेबाना प्रत्यक्ष भेटायचे आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळू शकेल काय?

सूड's picture

23 Sep 2013 - 9:13 pm | सूड

झेंगट्या हुबेहूब उभा केलाय बरं का !!

देवदत्त's picture

30 Mar 2008 - 11:27 pm | देवदत्त

छान छायाचित्रे. पाहून आनंद झाला.
तात्यांचे आभार.

सोम's picture

30 Mar 2008 - 11:33 pm | सोम

धन्यवाद.

धन्यवाद तात्या ...

राग "शिवकंस" गावा वाटतो.
संजीव

रुस्तम's picture

10 Sep 2013 - 10:13 pm | रुस्तम

धन्यवाद तात्या ...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2013 - 10:46 pm | अत्रुप्त आत्मा

७ नंबरच्या फोटोला दिलेल्या नावाला.. सलाम! :)

अनिरुद्ध प's picture

11 Sep 2013 - 2:38 pm | अनिरुद्ध प

निशब्द.

shree pavan's picture

10 Mar 2016 - 12:38 pm | shree pavan

Best collection one should have.....

शान्तिप्रिय's picture

10 Mar 2016 - 7:56 pm | शान्तिप्रिय

उत्तम छायाचित्रे.
संग्राह्य धागा
वाखु साठवल्या आहेत.

सूड's picture

10 Mar 2016 - 9:17 pm | सूड

खायचे आणि दाखवायचे ओळखण्याबद्दल मिपावरती जितकं शिकता येतं तितकं दुसरीकडे कदाचितच शिकता येईल...सहज आपलं एक निरीक्षण!!