विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; पालकांना धडा!

बंडू बावळट's picture
बंडू बावळट in काथ्याकूट
26 Jan 2010 - 5:53 pm
गाभा: 

अलिकडे वरचेवर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचनात आल्या. अभ्यासाचे टेन्शन, परिक्षेत अपयशाची भिती आणि मुख्य म्हणजे पालकांनी आपल्या अतिमहत्वाकांक्षा विद्यार्थ्यांवर लादल्यामुळे त्या आपण पुर्‍या करू शकू की नाही; या भितीपायी विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होतात.

माझ्या मते हा सर्व पालकांना एक प्रकारचा धडाच मिळाला आहे. निदान या पुढे तरी पालक आपल्या अतिमहत्वाकांक्षा विद्यार्थ्यांवर लादणार नाहीत असे वाटते.

आता तरी असे काही अतिमहत्वाकांक्षी पालक सुधारतील काय? त्यांच्यावर आपले अपत्य गमवायची वेळ येऊ नये असे वाटते.

मिपाकर वाचकहो, हा तसा गंभीर विषय आहे. आपले या संदर्भात काही म्हणणे असल्यास येथे अवश्य मांडावे.

--बंड्या.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

26 Jan 2010 - 9:47 pm | मदनबाण

बंड्या भाऊ, अवं पाठीवरचं ओझं...हेच आयुष्याच ओझं झाल्याने पोर बिचारी गळफास लावुन घेतात !!! :(

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

शुचि's picture

29 Jan 2010 - 5:12 am | शुचि

विद्यार्थ्यांच वय ही तस आडनिड असत. बरेच factor आहेत. आईवडीलानच्या अपेक्षा असतात, peer pressure असत, harmones
ची उलथापालथ सुरू झालेली असते. या सर्वानी पाल्याच मानसीक बळ खचत. पाल्याचा सर्वात नाजूक काळ असतो "पौगन्डावस्था" अर्थात teenage. यात महत्त्वाच मला वाटत की पाल्याशी चान्गली मैत्री निर्माण करण गरजेच आहे. मला अमका व्हायच होत ते होता नाही आल म्हणून मझी मुल ते झाली पाहीजेत हा विचार् च चूकीचा आहे. कारण मुलाना त्यान्ची स्वप्न आहेत.

फार फार थोर लेखक खलील जिब्रान च कडव नमऊद करते आणि हा विषय समपवते -

You may give them your love but not your thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of tomorrow,
which you cannot visit, not even in your dreams.
You may strive to be like them,
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो