...फिरवा चला आरी पुन्हा!!

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
12 Mar 2008 - 8:23 am

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल ...त्याचीच ओढा री पुन्हा!!

.............................................................
...फिरवा चला आरी पुन्हा!!
.............................................................

सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा !
जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ?

सार्‍याच विषयांचे असे पेपर तरी देऊ कसे...
लाजू नको नापास हो...येईल रे वारी पुन्हा !

ऐकून माझे घे जरा...मारू नको नुसते मला...
खोडी अधी मी काढली,म्हणलेचना सॉरी पुन्हा !

जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी...
मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा !

मी शब्द हा होता दिला नाही शिव्या देणार मी...
येता समोरी आज तू... म्हणलेच "च्यामारी" पुन्हा !

करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी...
नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा !

झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा...
नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा !

अध्याय पहिला संपुनी झाला न थोडा वेळ ही...
भलत्याच अन रंगात ही आली पहा स्वारी पुन्हा

फुटले जरी डोळा तरी सजतात दुढ्ढाचार्य हे...
बसती नव्या कट्ट्यावरी लावून हे बारी पुन्हा !

गेला कुठे रे खांब तो , इतक्यात मी जो पाहिला...
डोळ्यापुढे आली कशी माझ्याच अंधारी पुन्हा ?

डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...?
गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!!

'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले...
नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!!
.............................................................
- केशवसुमार
.............................................................

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

12 Mar 2008 - 9:21 am | बेसनलाडू

एकदम शॉल्लिड. मस्त विडंबन. फार आवडले.

जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी...
मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा !

करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी...
नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा !

झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा...
नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा !

डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...?
गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!!

'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले...
नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!!

लई बेस!

(आस्वादक)बेसनलाडू

प्रमोद देव's picture

12 Mar 2008 - 9:55 am | प्रमोद देव

केशवसु'मार' मार डाला पापडवालेको.
अप्रतिम. अजून काय सांगु?

चित्तरंजन भट's picture

13 Mar 2008 - 1:40 am | चित्तरंजन भट

"केशवसु'मार' मार डाला पापडवालेको" म्हणजे काय, प्रमोदकाका? तुम्ही पापड विकायला सुरुवात केलीत की काय? असो. पोटाला जपा.

इनोबा म्हणे's picture

12 Mar 2008 - 10:40 am | इनोबा म्हणे

केशवा खल्लास रे!लय भारी......!

सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा !
जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ?

जबरा............

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्राजु's picture

12 Mar 2008 - 7:03 pm | प्राजु

वावावा.....
करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी...
नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा !

झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा...
नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा !

हे मस्तच... असा नवरा भेटला तर काय सुख...!
- (सर्वव्यापी)प्राजु

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Mar 2008 - 7:10 pm | ब्रिटिश टिंग्या

हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............

'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले...
नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!!

हीहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............

(आपला पंखा) छोटी टिंगी ;)

चतुरंग's picture

12 Mar 2008 - 7:42 pm | चतुरंग

एकसे बढकर एक शेर!
खल्लास!!

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Mar 2008 - 7:54 pm | llपुण्याचे पेशवेll

झक्कास बुवा आपल्याला तर फार आवडले.
पुण्याचे पेशवे

सुधीर कांदळकर's picture

12 Mar 2008 - 10:18 pm | सुधीर कांदळकर

मान लिया सरकार.

चांगली मूळ कविता असली की आपले विडंबन रंगते. हे खरेच.

करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी...
नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा !

झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा...
नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा !

हे शब्द झकास.

आपल्या प्रतिभेस दंडवत.

स्वाती राजेश's picture

12 Mar 2008 - 11:39 pm | स्वाती राजेश

के.कु.(केशवकुमार),
कसं सुचते हो तुम्हाला...
बाकी सुंदर विडंबन झाले आहे.

स्वाती राजेश's picture

13 Mar 2008 - 1:42 am | स्वाती राजेश

के.सु. चा के.कु.केला.
ह.घ्या.:))

रविराज's picture

13 Mar 2008 - 2:23 am | रविराज

खुपच छान विंडंबन. वाचून मजा आली. धन्यवाद!!
सगळीच कडवी एकसे एक भारी.

-रवी.

अभिज्ञ's picture

13 Mar 2008 - 2:32 am | अभिज्ञ

लई भारि करता राव तुम्ही विडंबने.
हे तर झ्याक जमलय.

केशवसुमार's picture

13 Mar 2008 - 4:49 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार

अविनाश ओगले's picture

13 Mar 2008 - 9:45 pm | अविनाश ओगले

मि.पा.वर आलं की आधी के.सु.ची विडंबने हुडकून वाचतो. झकास...