सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?
सुर्यग्रहण नुसत्या उघड्या डोळ्यांनी पाहू नये. (ग्रहण नसते तेव्हा व ग्रहणात असा काय बदल होतो जेणेकरून ग्रहणकाळातच सुर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघू नये ते?) नासाच्या या साईटवर ते चांगले स्पष्ट केले आहे पण त्याचे मराठीकरण काय आहे?
आज होणारे सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?
१) ग्रहणाचे चष्मे (ते बनावट कंपनीचेही किंवा चायनीज पण मिळू शकतात.)
२) पाण्यात / कागदावर ग्रहणाची प्रतिमा घेवून
३) पिनहोल कॅमेरा बनवून
४) डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये
५) दुरदर्शनवर :-)
माझ्या मते सुर्यग्रहण हे डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये बघितले असता डोळ्यांवर होणारा परिणाम हा सर्वात कमी असावा व त्यात ग्रहणही चांगले व रंगीत दिसेल.
आपले मत काय? आदीती बै काय म्हणतात.
कृपया अवांतर चर्चा न करता वेगवान, सुयोग्य, उद्बोधक उत्तर अपेक्षीत.
प्रतिक्रिया
15 Jan 2010 - 7:08 pm | भटकंती अनलिमिटेड
का कॅमेराच्या सेन्सरच्या मुळावर उठलात?
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com
16 Jan 2010 - 4:39 pm | संताजी धनाजी
बरोबर आहे. मी एक्स रे फिल्म कॅमेर्याच्या लेन्ससमोर धरून हे फोटो काढले.
- संताजी धनाजी
15 Jan 2010 - 7:17 pm | jaypal
सहमत. कॅमेराचा सेन्सर सेन्सलेस होइल. डायरेक्ट सुर्यप्रकाश, तिव्र उजेडाची रोशनाई ई.प्रकार डिजिटल कॅमे-याने टाळावेत अन्यथा हात चोळावेत. :-(
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
15 Jan 2010 - 7:50 pm | संजा
सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग
ऊद्या सकाळी पहा
संजा.
16 Jan 2010 - 1:35 am | पाषाणभेद
सर्वांना धन्यवाद. अर्थातच डिजीटल कॅमेरा वापरणे चुकीचे आहे. सहमत.
दुरदर्शन हे उत्तम माध्यम आहे यासाठी.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
16 Jan 2010 - 2:45 am | विकास
कोणी सुर्यग्रहण पाहीले का?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
17 Jan 2010 - 7:18 pm | नितिन थत्ते
मी ५ रु ला मिळणार्या खास चष्म्यातून आणि दूरच्या भिंतीवर कवडसा पाडून दोन्ही प्रकारे पाहिले.
पण वेल्डर लोक वापरतात त्या काचेतून पाहणे चांगले व पुरेसे सुरक्षित असते. खासचष्म्यातून स्पष्टता कमी होते.
नितिन थत्ते
16 Jan 2010 - 2:56 am | रवि
आमचं एक वरतिमागुन घोड घ्या.......
सगळ्यात सोपा पर्याय म्हनजे.......एक छोटा आरसा घ्या, त्यावर एक लहान गोलाकार अथवा चौकोनी भोक असलेला कागद चिटकवा. आनि हा आरसा उन्हात धरुन कवडसा भिंतिवर सोडा. आनि मग भिंतिवरच्या प्रतिमेचे हवे तेवढे फोटो घ्या.
हे बघा ......
आनि फोटो पन ......
रवि
अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
एक नजर इकडेही टाका
16 Jan 2010 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्हीबी...दुर्बीणीच्या साह्याने घरातल्या भिंतीवर प्रतिमा पाहिल्या.
-दिलीप बिरुटे
16 Jan 2010 - 8:16 pm | पाषाणभेद
छायाचित्रे डकवल्याबद्दल धन्यवाद.
हो पण तरीही अशा कोणत्या पद्धतीलाही आक्षेप घेतल्याचे मला आठवते. तुम्ही हे ग्रहण पाहिलेच आहे अन त्यामुळे तुम्हाला ईजा तर झालेली नाही.
तरीही ही योग्य पद्धत आहे का?
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
17 Jan 2010 - 5:20 pm | रवि
अर्थात, या पद्धतित काहीही धोका नाही. कारण आपण सुर्याकडे न बघता पडद्यावर टाकलेल्या प्रतिमेकडे बघत असतो. त्यामुळे डोळ्यांना कुठलिही इजा होउ शकत नाही.
आनि तुम्ही जो आक्षेप म्हनताय तो नककी कशासाठी, त्यामुळे काही इजा होउ शकते असं की नक्की काय ? आक्षेप नक्की कुठल्या मुद्दावर आहे.....??
रवि
अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
एक नजर इकडेही टाका
17 Jan 2010 - 5:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>आक्षेप नक्की कुठल्या मुद्दावर आहे.....??
हेच विचारतो...!
-दिलीप बिरुटे
17 Jan 2010 - 7:42 pm | पाषाणभेद
या पद्धतीतही सुर्याचे किरण डोळ्यात जातात त्यास आक्षेप होता. पण मला वाटते तुमची पद्धतच योग्य आहे. त्यात गॉगच्या काचेचाही रंग मिसळत नसल्याने मिळणारी प्रतीमा जास्त नैसर्गीक आहे. पुढील ग्रहणात हिच पद्धत अवलंबणे योग्य होईल.
- पाभे/ दफो.
17 Jan 2010 - 8:34 pm | चतुरंग
थेट किंवा भिंगातून्/काचेतून डोळ्यात गेल्यास इजा होण्याची दाट शक्यता असते. शिवाय अशी इजा झालेली आहे हे लगेच समजत नाही हा त्यातला आणखी वाईट प्रकार आहे. प्रखर अतिनील किरणांमुळे रेटीनावरचे कोन्स आणि रॉड्स जळतात आणि काही दिवसांनी दृष्टी कमी होणे, धूसर दिसणे, अंधारात नेहेमीपेक्षा अचानक कमी दिसायला लागणे असे सुरु होते असे नेत्रतज्ञ डॉ. लहाने यांचे लिखाण दोन तीन दिवसापूर्वीच्या सकाळमध्ये वाचनात आले!
कागदावरुन किंवा भिंतीवरुन परावर्तित झालेली प्रतिमा तशी धोकादायक नसते.
चतुरंग
18 Jan 2010 - 3:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
घ्या आणखी एक वरातीमागून घोडं; फिल्टरशिवाय काढलेला फोटो:
अदिती