धुणे वाळवणे (चित्रे)

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
11 Mar 2008 - 12:04 pm

घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".

पण स्वच्छ धुतलेले कपडे कधी छान चित्रे चितारतात, आणि वेगळेच गुपीत सांगतात...

या इवल्याशा घराचे इवलेसे वाळवण -
Alappuzha drying laundry

आणि वाळणार्‍या चादरींनी केलेली संगत -
Alappuzha drying sheets

हिरव्याकच्च शेतापाशी पाचवी-लाल रंगत -
By the backwater drying laundry

टीप : ही सर्व चित्रे "पॉइंट-अँड-शूट" कॅमेर्‍याने काढलेली आहेत. त्यांच्यामध्ये छायाचित्रकाराचे काही विशेष कसब नाही.

प्रतिक्रिया

चित्तरंजन भट's picture

11 Mar 2008 - 4:29 pm | चित्तरंजन भट

पण स्वच्छ धुतलेले कपडे कधी छान चित्रे चितारतात, आणि वेगळेच गुपीत सांगतात...घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".

मस्त विषय आहे. पण "वॉशिंग डर्टी लिनन इन पब्लिक" चा "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन" असा अनुवाद चपखल वाटत नाही. 'अब्रू चव्हाट्यावर आणणे'छाप एखादी म्हण वाक्संप्रदायकोशात मिळते का ते बघायला हवे.

धनंजय's picture

11 Mar 2008 - 5:18 pm | धनंजय

हा वाक्प्रचार मनात होता.

स्वैर भाषांतरे :
"शिवला काय कावळा, चिंध्या आंगणात वाळवा" - अर्थ मागच्या पिढीत समजला असता.
"आतले कपडे बाहेरच्या दांडीवर टाकलेत"
"घरच्या घाण चादरी, आंगणात मांडून दाखवी"
"शेजेवरची दुपटी, घाटावरती धोपटी."
(मराठीत वाक्प्रचारांना, म्हणींना प्रास किंवा यमक असण्याची लकब आहे.)
भाषांतरात कपड्यांचा उल्लेख करायचा नसला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे "अब्रू चव्हाट्यावर आणली" हेच ठीक आहे.

विसोबा खेचर's picture

11 Mar 2008 - 6:44 pm | विसोबा खेचर

"आतले कपडे बाहेरच्या दांडीवर टाकलेत"
"घरच्या घाण चादरी, आंगणात मांडून दाखवी"
"शेजेवरची दुपटी, घाटावरती धोपटी."

हा हा हा! वरील तीनही आयटेम एकदम भारी!

आपला,
(दुपट्यातला) तात्या.

नाहीतर सगळे चाकोरीतून फिरणारे गरगरवून टाकते!
वाळत घातलेले कपडे हा तसा अगदीच अनोखा विषय नाही कारण अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजांमधली 'वस्त्र' ही अन्नानंतरची लगेचची गरज आहे.
चित्रे छानच आहेत.

"धुतली कापडं चांगली अन् वाळायला बाहेर टांगली!" हे कसे?

(अवांतर - "शिवला काय कावळा.." चा अर्थ जाणून आहे;))

चतुरंग

चित्तरंजन भट's picture

11 Mar 2008 - 10:57 pm | चित्तरंजन भट

वरील प्रत्येक चित्रात एक कहाणी दडलेली दिसते आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रासाठी स्वतंत्र वाक्प्रचार, म्हण वापरल्यास अधिक चांगले.

विसोबा खेचर's picture

11 Mar 2008 - 4:42 pm | विसोबा खेचर

हा हा हा धन्याशेठ! धुणी वाळत घातलेल्या चित्रांची कल्पना बाकी झकास आहे!

तू सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :))

परंतु चित्रं बाकी मस्तच आहेत. शेवटच्या चित्रातील रंगसंगती तर क्लासच!

आपला,
(चड्डी बनियन बाल्कनीत वाळत घतलेला) तात्या.

कोलबेर's picture

11 Mar 2008 - 7:26 pm | कोलबेर

हा हा हा!! का ते आठवत नाही पण मी सुद्धा एकदा पॉइंट अँड शूट कॅमेर्‍यानेच घरांसमोर वाळत घातलेली धुणी टिपली होती..

(चड्डी बनियन बाल्कनीत वाळत घतलेला)तात्या.

हे वाचून त्यातले हे चित्र आठवले..ते इथे शोधून टाकले !! :)

बाकी शेवटच्या चित्रातील रंगसंगती मस्तच आली आहे...

अंडरस्टँडींग एक्स्पोजर नावाचे फोटोग्राफी शिकण्यासाठी उत्तम पुस्तक आहे..त्याच्या पृष्ठ क्र. ९४ वरती असाच एक अंतरवस्त्रे वाळत घातलेला ऍमस्टरडॅम मधील अप्रतिम फोटो आहे (त्या चित्राची थिम साधारण धनंजयच्य शेवटच्या चित्रासारखीच आहे)

चित्रा's picture

18 Mar 2008 - 12:59 am | चित्रा

शेवटचे प्रकाशचित्रही छान. (फोटोला नक्की काय म्हणायचे असते ? प्रकाशचित्र का छायाचित्र?)

सर्किट's picture

18 Mar 2008 - 1:28 am | सर्किट (not verified)

फोटोला नक्की काय म्हणायचे असते ? प्रकाशचित्र का छायाचित्र?

ते कुणी काढले ह्यावर अवलंबून आहे.. :-)

डिपेण्ड्स वरून एक आठवले.

गर्लफ्रेंड तिच्या नवीन बॉयफ्रेण्ड ला विचारते. "तुला काय घालायला आवडते ? बॉक्सर की ब्रिफ ?" तो म्हणतो, "डिपेण्ड्स..."

- सर्किट

आणि फिल्मवरती वस्तूची छाया ठेवून जाणारे म्हणून छायाचित्र सुध्दा! :)
म्हणून इट डिपेंड्स!!

चतुरंग

माझ्या मते छायाचित्र हा अधिक लोकप्रिय शद्ब असला तरी प्रकाशचित्र हा जास्त बरोबर आहे. कारण कोणत्याही फोटोचे 'शॅडोज(छाया) आणि हाईलाईट्स' हे दोन्हीही मुख्य भाग असतात..त्यामुळे नुसतेच छायाचित्र म्हणणे किंचीत चुकीचे वाटते.

प्रकाश किरणांनी काढलेले चित्र म्हणजे प्रकाशचित्र हे अधिक अचुक वाटते