डिप्लोमाधारकांची मुस्कटदाबी

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
12 Jan 2010 - 8:30 pm
गाभा: 

आपल्याकडे दहावीनंतरचा जो इंजि. डिप्लोमा आहे, तो केल्यानंतर हे विद्यार्थी जमले तर पुढे शिक्षण चालू ठेवतात अथवा कामधंद्याला लागतात. त्यांचे इंजि स्किल तसे बरेच चांगले असते व त्याबळावर ते पद आणि यश मिळवतात. त्यातुलनेने ग्रॅज्युएट झालेल्या सायन्स, कला, कॉमर्स, ई शाखांतून बाहेर पडलेल्या विद्यार्थांपेक्षा नोकरी मिळवण्यासाठी जास्त परीणमकता ह्या पदवीकेत असते हे म्हणले तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

असे पदवीकाधारी, ३ ते ४ वर्षांच्या कामानंतर नव्हे तर अगदी २० वर्षांच्या नोकरी-धंद्यानंतरही पदवीच्या तुलनेत खालीच धरले जातात. ह्यांना एम.बी.ए. काय, अन्य पोस्ट ग्रॅड डिप्लोमेसुध्दा पदवी मिळवल्याशिवाय करता येत नाहीत. हे अत्यंत अन्यायकारक वाटते. डिप्लोमाधारकांना १०-१५ वर्षांच्या अनुभवानंतरही पदवी मिळवण्यासाठी ३ वर्षे काढावी लागतात व त्यानंतर ६ ते २४ महिन्यांच्या कालावधीचे पोस्ट ग्रॅड डिप्लोमे अथवा एम.बी.ए. करावे लागते. ही केवळ त्यांची कुचेष्टा आहे, असे वाटते.

ह्याबाबत संबंधित अधिकारी काही करु शकतील का?

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

12 Jan 2010 - 9:12 pm | चिरोटा

सहमत. हा निर्णय कोण घेते? Directorate of technical education?

त्यांचे इंजि स्किल तसे बरेच चांगले असते व त्याबळावर ते पद आणि यश मिळवतात

सिव्हिल्,मेक्,एलेक्ट्रिकल(प्रॅक्टिकल्स मध्ये) तरी हे लोक सायन्स च्या विद्यार्थ्यांनांपेक्षा काकणभर सरस असतातच.

असे पदवीकाधारी, ३ ते ४ वर्षांच्या कामानंतर नव्हे तर अगदी २० वर्षांच्या नोकरी-धंद्यानंतरही पदवीच्या तुलनेत खालीच धरले जातात

ह्याला लोकांची मानसिकता कारणीभूत आहे. समाजात काही खोट्या प्रतिष्ठेच्या व्याख्या असतात.त्या प्रतिष्ठेच्या व्याख्येत तुम्ही बसत असाल तर ठीक. डिग्रीच्या तुलनेत डिप्लोमा त्या व्याख्येत तेवढा बसत नाही.
भेंडी
P = NP

अमृतांजन's picture

12 Jan 2010 - 10:35 pm | अमृतांजन

>>हा निर्णय कोण घेते?>>
शिक्षणखात्याने घेण्याचा हा निर्णय आहे.

विजुभाऊ's picture

12 Jan 2010 - 9:10 pm | विजुभाऊ

सहमत.
पण एकूणच पाहता आपली शिक्षण पद्धतीच विचित्र आहे.
मला एक अत्यंत विचित्र अनुभव आलेला आहे.
पी एच डी च्या रजीस्ट्रेशन्साठी गेल्यावर एका पुणेरी महामहोपाध्यायानी मला सल्ला दिला की पी एच डी कशाला करता.
अभ्यास व्हावा म्हणून पी एच डी करणार हे उत्तर ऐकल्यावर त्यानी अकलेचे तारे तोडले.
आम्ही पी एच डी रजीस्ट्रेशन सध्या केवळ ज्यांचे अ‍ॅकॅडमीक प्रमोशन वगैरे राहिले आहे त्यानाच प्राधान्य देतो. तुम्ही कशाला पी एच डी करताय? अभ्यास करायचा तर तसाही होतोच की.
हे गृहस्थ विद्यापीठात अत्यंत मानाच्या पदावर काम करीत होते.
अर्थात हे एक प्रत्यक्ष उदाहरण.
त्यांच्या लेखी ज्ञान ही केवळ कागदी भेंडोळी असते.
असो.
डिप्लोमा चा कोर्स उत्तम आहे त्यानन्तर पुढे शिकायचे असल्यास डीबीएम आणि त्यानन्तर एम एम एस आहे. पण पुणे विद्यापीठ डिप्लोमा करून शिवाजी विद्यापीठाचा डीबीएम केलेल्याना एम एम एस ला प्रवेश देत नाही. हे विचित्रच
एकच कोर्स दोन वेगवेगळ्या विद्यापीठात वेगवेगळ्या पातळीवर मोजला जातो.

चतुरंग's picture

12 Jan 2010 - 9:47 pm | चतुरंग

आमच्या ओळखीतले एक सदगृहस्थ पुणे विद्यापीठात पीएचडी ('विद्यावाचस्पती' असा शब्द आहे ह्याला ;) )च्या रजिस्ट्रेशनसाठी गेले. त्या कार्यालयातले काही महाभाग जाडजाड पुस्तकांच्या गठ्ठ्यांवर बसून कामे करत होते. ह्यांनी सहज चौकशी केली तेव्हा समजले की पीएचडीसाठी दाखल केलेल्या प्रबंधांचे ते गठ्ठे होते आणि त्यावर बसूनच ही जत्रा कामे करत होती! :(
त्यांनी रजिस्ट्रेशन करण्याचा विचार रद्द केला हे सांगणे न लगे!!

(दिव्यवाचस्पती)चतुरंग

चतुरंग's picture

12 Jan 2010 - 9:39 pm | चतुरंग

डिप्लोमा दोन प्रकारे करतात १० वी + ३ वर्षे किंवा १२ वी + ३ वर्षे.
त्यानंतर एकदम सेकंड इअर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळू शकतो.
परंतु ज्यांना डिप्लोमानंतर लगेच पुढे शिक्षण चालू ठेवणे शक्य नाही अशा लोकांची फारच कुचंबणा होते. सलग ३ वर्षे तांत्रिक्/औद्योगिक्/अभियांत्रिकीशी संबंधित कामाचा अनुभव असेल तर एखाद्या छोट्या परीक्षेत त्यांची गुणवत्ता तपासून त्यांना अभियांत्रिकी पदवीचा दर्जा देण्याची व्यवस्था करायला हवी. ज्याने त्यांच्या पुढील शिक्षणाची दारे खुली राहतील.
डिप्लोमा हा खरेतर अतिशय कष्टाचा कोर्स आहे. दहावीनंतर ११वी १२वी पेक्षा बरेच जास्त कष्ट ही मुले घेत असतात त्याचा फायदा त्यांना मिळायला हवा.
एक चांगला विषय चर्चेला आणल्याबद्दल अभिनंदन!

चतुरंग

संजय अभ्यंकर's picture

12 Jan 2010 - 9:46 pm | संजय अभ्यंकर

"सलग ३ वर्षे तांत्रिक्/औद्योगिक्/अभियांत्रिकीशी संबंधित कामाचा अनुभव असेल तर एखाद्या छोट्या परीक्षेत त्यांची गुणवत्ता तपासून त्यांना अभियांत्रिकी पदवीचा दर्जा देण्याची व्यवस्था करायला हवी. ज्याने त्यांच्या पुढील शिक्षणाची दारे खुली राहतील."

जवळपास ह्याच्याशी मिळतीजुळती पद्धत जर्मनीत राबवली जाते!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अमृतांजन's picture

12 Jan 2010 - 10:32 pm | अमृतांजन

>>जवळपास ह्याच्याशी मिळतीजुळती पद्धत जर्मनीत राबवली जाते!>>

त्याबद्दल अधिक माहिती येथे तुम्हाला देता आली तर खूप चांगले होईल.

संजय अभ्यंकर's picture

13 Jan 2010 - 9:52 pm | संजय अभ्यंकर

भारतात येणार्‍या काही जर्मन इंजीनीयरांनी, काम करता करता इं.ची डीग्री मिळवल्याचे सांगीतले. नोकरी करणार्‍यांसाठी तेथे डिग्री अभ्यासक्रम वेगळा असतो. थिअरि, प्रॅक्टिकल व नोकरी ह्यांचे गणित कसे जमवले जाते ह्याचा उलगडा व अभ्यासक्रमाचे नेमके स्वरूप ह्या संबंधी माहीती वेळे अभावी मिळवता आली नाही.

ह्या अभ्यासक्रमा संबंधीच्या वेबसाईटही ठाऊक नाहीत.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर's picture

12 Jan 2010 - 9:40 pm | संजय अभ्यंकर

डिप्लोमाधारकांची मुस्कटदाबी, ह्या विषयावर बोलू तेवढे थोडे!

मी स्वतः डीप्लोमाधारक आहे. डीप्लोमा पूर्ण करण्या आधीच, डीप्लोमा केल्यानंतर, सरकारी नोकरीत आपले काय भजे होईल ह्याचा अंदाज आला होता.

म्हणून डीप्लोमा झाल्यानंतर कधीही सरकारी नोकरी करायची नाही हे पक्के ठरवले.

खाजगी नोकरीत, जे यश मिळवले त्या ऐवजी सरकारी नोकरी केली असती तर कुठेतरी आज सुपरवायझर, फोरमन म्हणून काम करत पिचलो असतो.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अमृतांजन's picture

12 Jan 2010 - 10:28 pm | अमृतांजन

एक असा गैरसमज सर्वसाधारणपणे दिसतो की, डिप्लोमा झालेला विद्यार्थी/नी हे जरा अभ्यासात कच्चे असतात. (आणि पदवी झालेले त्यातुलनेने "हुषार" असतात). वस्तुस्थिती बऱ्याचदा उलटी असते. अनेक विद्यार्थी/नी आर्थिक कारणांमुळे पुढे शिकू शकत नाहीत व नंतर जरा स्थिरावल्यावर त्यांना उच्चशिक्षण घ्यावेसे वाटले तर ते अत्यंत वेळखाऊ होऊन बसते. अंगी गुणवत्ता असूनही ह्यांना नोकरीत काही कालावधीनंतर डावलले जाते. इंफोसिस सारख्या कंपन्यातर ह्यांना दारातही उभे करत नाहीत.
अशा वागणूकीमुळे अनेक लोकांचे प्रचंड नुकसान होत आहे व मानसिक कुतरओढ होते आहे.

मैत्र's picture

15 Jan 2010 - 9:14 am | मैत्र

बरेचदा डिप्लोमा झालेले लोक खूप मर्यादित दृष्टिकोनातून विचार करतात. वर्कशॉपच्या पलिकडे जग बघत नाहीत. त्यामुळे असा शिक्का मारला जातो की डिप्लोमाधारकांना विशेष ज्ञान नसतं. व्हिजेटीआय किंवा जीपीपी सारखे सन्माननीय अपवाद वगळले तर अनेक डिप्लोमा होल्डर हे खूपसे मशिन / सी एन सी ओरिएन्टेड असतात.
जे खरोखर बुद्धिमान आहेत आणि आर्थिक वा इतर काही कारणांने डिप्लोमावर थांबले आहेत त्यांना विविध मार्ग आहेत.
AMIE केल्यानंतर थेट चौथ्या वर्षाला प्रवेश मिळतो व BE पूर्ण करता येते. (माझ्या माहितीत असा एक जण आहे आणि त्याने नोकरी करून AMIE पूर्ण करून सी ओ ई पी मधून मेटलर्जी मध्ये डिग्री पूर्ण केली आहे.)
एम बी ए कशासाठी करायचे हेच स्पष्ट नसेल तर त्याचा अजून एक डिग्री वगळता काही उपयोग होत नाही. त्यामुळेच बहुसंख्य मानांकित एम बी ए स्कूल्स तुमची पार्श्वभूमी, अनुभव, विचार धारणा, का एम बी ए करायचं आहे आणि त्यातून पुढे काय करण्याची इच्छा आहे या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व देतात.
इंफोसिस म्हणजे काय टोटल बेंचमार्क आहे का की इंफोसिस डिप्लोमा धारकांना उभं करत नाही म्हणजे सगळं शिक्षण आणि अनुभव व्यर्थ झालं. कंपनीला बिझनेस च्या दृष्टीने रेझ्युमे क्लायंटला देताना डिग्री महत्त्वाची ठरणार. जर इतके लाखो डिग्रीधारक उपलब्ध आहेत ( ८ - १० लाख लोक इंफोसिसला अप्लाय करतात) तर त्यांनी डिप्लोमाधारक का घ्यावा.
तरीही हुशार, उत्तम अनुभव असलेल्या आणि महत्त्वाकांक्षा असलेल्या डिप्लोमाधारकांवर एका मापाने मोजल्याने अन्याय होतो ही वस्तुस्थिती आहे. आणि कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे वाढत चाललेल्या खाजगी महाविद्यालयांमुळे जेवढे इंजिनिअर्स(?) बाहेर पडत आहेत त्यामुळे फक्त डिप्लोमा धारकांची वर्थ (मराठी ?) अजूनच कमी होत आहे.

अवांतरः विद्यावाचस्पती म्हणजे बहुधा एम. फिल. एकदा एका नामवंत विद्यावाचस्पती व्यक्तिच्या घरी फ्रेममध्ये पुणे विद्यापीठाच्या एम. फिल. डिग्री सर्टिफिकेट वर वाचल्याचं आठवतंय.

अमृतांजन's picture

15 Jan 2010 - 8:40 pm | अमृतांजन

प्रतिसाद खूपसा संतुलित; आवडला.

>>इंफोसिस म्हणजे काय टोटल बेंचमार्क आहे का की इंफोसिस डिप्लोमा धारकांना उभं करत नाही म्हणजे सगळं शिक्षण आणि अनुभव व्यर्थ झालं.>>

टोटल बेंचमार्क- भारतीय आय टी कंपन्यांचा तरी आहे असेच म्हणता येईल. इतर आय टी कंपन्याही डिप्लोमाला काहीच भाव देत नाही कारण खूपसे पदवीधर अगदी कोणत्याही पगारावर काम करायला तयार असतील तर मग काय? त्यात पुण्या सारख्या ठिकाणी तर बाहेरील (परप्रांतिय) विद्यार्थी पदवी मिळाली की, नोकरी साठी मुक्काम ठोकून असतात. असो.

>>तरीही हुशार, उत्तम अनुभव असलेल्या आणि महत्त्वाकांक्षा असलेल्या डिप्लोमाधारकांवर एका मापाने मोजल्याने अन्याय होतो ही वस्तुस्थिती आहे.>>

हेच त्यांचे दु:ख आहे.
त्यांना आर्ट, सायन्स, कॉमर्सच्या पातळीचा दर्जा देण्यास आठकाठी नसावी असे सुचविले आहे अनेक मिपाकरांनी.

II विकास II's picture

15 Jan 2010 - 9:06 pm | II विकास II

>>खूपसे पदवीधर अगदी कोणत्याही पगारावर काम करायला तयार असतील तर मग काय?
तयार असतात, पहीली नोकरी मिळेपर्यंत.
जसा अनुभव मिळत जातो तश्या अपेक्षा वाढत जातात.
काही ठिकाणी पदविकाधारक पदवी धारकापेक्षा चांगले काम करु शकतात. हा माझा व्यक्तीगत अनुभव आहे.

रामपुरी's picture

12 Jan 2010 - 11:52 pm | रामपुरी

डिप्लोमा आणि इंजिनीयरींग हे दोन पुर्ण वेगळे अभ्यासक्रम आहेत. त्यांची तुलनाच करायची झाली तर डिप्लोमाचा अभ्यासक्रम हा इंजिनीयरींगपेक्षा थोडासा कमी असतो (दोन्हीमधल्या सारख्याच विषयांची तुलना करता). याचे एक कारण असे असावे कि तो दहावी नंतर करता येतो. अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम त्यांनी अभ्यासलेलाच नसतो. त्यामुळे बरेच डिप्लोमाधारक इंजिनीयरींगला प्रवेश घेतात तेंव्हा गणितात नापास होतात. डिप्लोमा नंतर इंजिनीयरींग केल्यास शैक्षणिक वर्षे तेवढीच लागतात. आणखी एक गोष्ट म्हणजे ५०% पेक्षा जास्त डिप्लोमाधारक हे दहावीला कमी गुण मिळाल्याने (पर्यायाने अकरावीला शास्त्रशाखेला प्रवेश न मिळाल्याने ) डिप्लोमाला प्रवेश घेतात. ही वस्तुस्थिती आहे जी नाकारता येणार नाही (मी स्वतः असा प्रवेश घेतला होता). तेंव्हा जे चालू आहे ते बरोबरच आहे असे माझे मत आहे. यात कुठेच मुस्कटदाबीचा प्रश्न येत नाही. अर्थात अनुभवी डिप्लोमाधारक आणि नवोदीत इंजिनीयर यात अनुभवच सरस ठरेल हेही तितकेच खरे.

अमृतांजन's picture

13 Jan 2010 - 6:30 am | अमृतांजन

>>डिप्लोमा आणि इंजिनीयरींग हे दोन पुर्ण वेगळे अभ्यासक्रम आहेत.>>

डिप्लोमा आणि इंजि ग्र्ञाडची तुलना नाही करु शकत आणि तो प्रयत्नही नाही. डिप्लोमा झालेल्यांनी इंजि डीग्री साठी दुसर्या वर्गाला प्रवेश घेऊन इंजि करणे क्रमप्राप्तच आहे.

माझा मुद्दा वेगळा आहे. एखादा डिप्लोमावाला ३ ते ४ (२० वर्षानंतरही) वार्षांच्या अनुभवानंतर जर सायन्स/ कॉमर्स / आर्ट पदवीधारकांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नसेल तर ते अपमानास्पद आहे. केवळ एक पदवी असल्यामुळे अशा पदवी धारकांना पोस्ट ग्राड डीग्री अथवा पोस्ट ग्राड डिप्लोमे करता येतात तेच डिप्लोमा वाल्यांना नाकारले जाते- ही ती वस्तूस्थिती मी समोर ठेवण्याचा प्रयत्न केला.

असेही करता येईल-

डिप्लोमा जर १० + ३ केला असेल तर त्याला पदवी दर्जा येण्यासाठी २-३ वर्षाचे अनुभव असणे आवश्यक ठरावे.
जर १२ + ३ केला असेल तर लगेचच सायन्स/ कॉमर्स / आर्ट पदवीधारकांच्या तोडीचा ग्राह्य धरावा. [असे केले तर अनेक विद्यार्थी डिप्लोमा हा एक चांगला पर्याय म्हणून ह्या शिक्षणाकडे पाहतील]
म्हणजेच काय तर अशा विद्यार्थांना सायन्स/ कॉमर्स / आर्ट पदवीधारकांना उपलब्ध असलेले उच्च शिक्षणाचे पर्याय उपलब्ध होतील.

पण जर एम-टेक करायचे असेल तर मात्र त्यांना नेहमीप्रमाणे आधी इंजि डीग्री मिळवणे आवश्यक असावे.

"आणखी एक गोष्ट म्हणजे ५०% पेक्षा जास्त डिप्लोमाधारक हे दहावीला कमी गुण मिळाल्याने (पर्यायाने अकरावीला शास्त्रशाखेला प्रवेश न मिळाल्याने ) डिप्लोमाला प्रवेश घेतात."

जरा या वर्षीचे व्ही.जे.टी.आय. चे डिप्लोमा क्लोजिंग मार्क तपासा!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

रामपुरी's picture

13 Jan 2010 - 10:52 pm | रामपुरी

"जरा या वर्षीचे व्ही.जे.टी.आय. चे डिप्लोमा क्लोजिंग मार्क तपासा!"

जरा व्ही.जे.टी.आय. चा डिप्लोमा अभ्यासक्रमही तपासून बघा! तो किती वर्षांचा आहे, तिथल्या सुविधा काय आहेत, हे ही तपासून बघा.

(except VJTI हे लिहायचं मनात आलं होतं पण वाटलं लोक समजून घेतील (बर्‍याच जणानी समजून घेतलंही असेल))

विकास's picture

14 Jan 2010 - 3:35 am | विकास

व्ही.जे.टी.आय. + भागूभाई या दोन्हॉ कॉलेजमधे चार वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे (त्याला सँडविच कोर्स म्हणतात ज्यात एक वर्ष इन्प्लँट ट्रेनिंग असते). कॉलेजात असताना एकलेले आठवले की काही केसेस मधे १२वी नंतर या दोन्ही कॉलेजातून डिप्लोमा करणार्‍यांना अमेरिकेत १२+४ शिक्षण झालेले असल्याने डायरेक्ट एम एस ला प्रवेश मिळाला होता. अजूनही असे प्रवेश मिळत असतील...कदाचीत त्यांना एखादा विषय जास्त करायला लावला असेलही पण बाकी त्यांना कमी ठरवले गेले नाही.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विषय चांगला आहे आणि वास्तव आहे. "अशा वागणूकीमुळे अनेक लोकांचे प्रचंड नुकसान होत आहे व मानसिक कुतरओढ होते आहे" हे अतिशय खरे आहे.

मी दोन भिन्न पिढ्यांमधील किमान ४-५ उदाहरणे पाहून आहे - १९५० च्या दशकात कामाला लागलेले आणि १९९०च्या दशकात कामाला लागलेले. पुर्वीच्या पिढीस याचा जास्त त्रास झाला होता. त्याकाळात तर वर चतुरंगने म्हणल्याप्रमाणे डिप्लोमानंतर डिग्रीस प्रवेश मिळवण्याची पद्धती नव्हती - विद्यापिठास विशेष निर्णय (स्पेशल केस) म्हणून घ्यावा लागत असे. शिवाय जरी डिग्री मिळाली तरी सरळ डिग्री मिळवलेले बर्‍याचदा "हा डीप्लोमा" असेच पहात असे.

अर्थात ९०च्या दशकातील ओळखिच्यांची (ज्यांनी नंतर डिग्री घेतली) असली काही सुदैवाने अवस्था नाही. मात्र जे डिप्लोमाच राहीले त्यांची मात्र असेल. त्याच बरोबर हे देखील एक वास्तव मी डिग्रीला असताना पाहीले आहे की जी मुले डिप्लोमाकरून सरळ दुसर्‍या वर्षाला येत असत, त्यांचे ड्रॉइंग, मेकॅनिक्स/स्ट्रक्चर्स वगैरे चांगले असायचे त्यामुळे ते पुढे पुढे आपोआप करत आणि त्याचा एक परीणाम म्हणून त्यांचा म्हणून एक वेगळा कंपू होऊन राहत असे.

बाकी शिक्षणाने म्हणून एक जात्व्यवस्था तयार केली आहे. काही खालचे काही वरचे...(यात ज्ञानासंदर्भात म्हणत नसून वागणूक/अ‍ॅटीट्यूड संदर्भात म्हणत आहे)

कधी काळी -

आर्ट्स < कॉमर्स <सायन्स < इंजिनियरींग/मेडीकल

इंजिनियरींग मधे:

डिप्लोमा<डिग्री<मास्टर्स<पिएचडी
इंजिनियरींग कॉलेजेस < आय आय टी < अमेरिकेतील कुठलेही कॉलेज < टॉप १० < एम आय टी....

मात्र नंतरच्या काळात अचानक हे डिप्लोमा/डिग्री वगैरेच्या माहात्म्याचे भूत, C/C++/Java वगैरेंनी उतरवले.

आता, इतर क्षेत्रातही खूप काम तयार झाल्याने बर्‍याच अर्थी पैसा असलेले आणि नसलेले अशा दोन जाती भारतात तयार होऊ लागलेल्या आहेत असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

चिरोटा's picture

13 Jan 2010 - 12:36 am | चिरोटा

चांगला प्रतिसाद.

मात्र नंतरच्या काळात अचानक हे डिप्लोमा/डिग्री वगैरेच्या माहात्म्याचे भूत, C/C++/Java वगैरेंनी उतरवले.

सध्या open source भाषा c++/java चे भूत उतरवू पाहात आहेत. :)
भेंडी
P = NP

अमृतांजन's picture

13 Jan 2010 - 6:27 am | अमृतांजन

तुमच्या प्रतिसादाशी मी सहमत आहेच पण माझा मुद्दा बराचसा वेगळा आहे व मी तो वर रामपुरी ह्यांच्या प्रतिसादाला उत्तार देतांना स्पष्ट केला आहे.

Nile's picture

13 Jan 2010 - 1:54 am | Nile

मुळात दोन वेगळ्या उद्देशांकरीता आलेले हे अभ्यासक्रम होते असे मला वाटते. अभियांत्रीकी जेव्हा फक्त फीटर, वेल्डर, प्लंबर यासारख्या आयटीआय टेडमधुन थोडीशी प्रगत झाली तेव्हा त्यापेक्षा जरा सॉफीस्टीकेटेड अश्या पदवीका आल्या त्यात प्रगती होउन पदव्या आल्या. (पुर्वी पदवीकांना खुप मागणी होती)

तेव्हाचे मार्केट आणि आजचे मार्केट यात खुपच फरक आहे. आज मार्केटमध्ये तुम्हाला मेकॅनिकल जरी असलात तरी इले़ट्रॉनीक्स, सोफ्टवेअर यांमध्ये गती असेल तरच चांगले भवितव्य आहे. जसे आयटीआय लोप पावली तश्याच पदवीका ही लोप पावतील असे वाटते.

१० वी म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी मुलाला जगाचे कितपत ज्ञान असते? आजच्या दर पाच दहा वर्षांनी बदलणार्‍या जगात वयाच्या सोळाव्या वर्षीच मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इ. ची पदविका निवडुन संपुर्ण आयुष्याला मर्यादीत करणे मला तरी चुक वाटते.

अमृतांजन's picture

13 Jan 2010 - 6:35 am | अमृतांजन

>>जसे आयटीआय लोप पावली तश्याच पदवीका ही लोप पावतील असे वाटते.>>

बारावी- सीईटी-च्या दुष्टचक्रात सापडू नये म्ह्ण्णून अनेकांनी ह्या खुष्कीच्या मार्गाचा उपयोग करुन घेतला आहे व डिप्लोमाला चांगले मार्क मिळवून ते इंजि च्या दुसर्क्ष्या वर्गाला जातात. त्यामुळे भविष्यात झालाच तर ह्या शिक्षणाला बराच विद्यार्थांचा पसंती चा मार्ग म्ह णून पाहता येईल

अमृतांजन's picture

13 Jan 2010 - 6:57 am | अमृतांजन

>>आजच्या दर पाच दहा वर्षांनी बदलणार्‍या जगात वयाच्या सोळाव्या वर्षीच मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इ. ची पदविका निवडुन संपुर्ण आयुष्याला मर्यादीत करणे मला तरी चुक वाटते.>>

त्यामुळेच अशा डिप्लोमाधारकंअना टेक्निकल बोर्डाने काही वर्षांच्या कालावधीनंतर इंजिनीयरींगच्या प्रत्येक विषयाची "कंपीटंसी टेस्ट" तयार करुन त्या घेण्याची सुविधा दिली तर ते स्वत्।ला काही कालावधीने सिद्ध करुन दाखवू शकतील. अगदी वर्गात वगैरे जाऊन क्लासरूम टीचिंगच त्यांनी घेतले पाहिजे हा अट्टाहास कशासाठी?

रोजच जे प्राक्टीकल करत आहेत, त्यांना वर्क्शॉपचे ज्ञान पुन्हा काय देणार? त्यामुळे जरी एखाद्या अनुभवी डिप्लोमा धारकाने काही वर्षांनंतर डीग्री करण्याचा निर्ण्य घेतला तरी त्याचे स्वरुप अत्यंत वेगळे असावे.

अननुभवी डिप्लोमाधारकाला मात्र जर १०+३ अथवा १२+३ नंतर लगेचच इंजि ला प्रवेश घ्यायचा असेल तर मात्र नेहमीप्रमाणे क्लासरुम टीचिंग योग्य आहे.

अडाणि's picture

13 Jan 2010 - 12:36 pm | अडाणि

रोजच जे प्राक्टीकल करत आहेत, त्यांना वर्क्शॉपचे ज्ञान पुन्हा काय देणार? त्यामुळे जरी एखाद्या अनुभवी डिप्लोमा धारकाने काही वर्षांनंतर डीग्री करण्याचा निर्ण्य घेतला तरी त्याचे स्वरुप अत्यंत वेगळे असावे.

पदविका धारकांची कुचंबणा जिथे होते ते मुळ बदलायला हवे.. त्यसाठि वरील मुद्दा गैलागू आहे. नोकरीमधे पदविका वाले (किंवा पदवी वाले) ज्या पाट्या टाकत असतात त्याचा ३ / ४ वर्षे घेतलेल्या शिक्षणाशी संबध फार कमी असतो. पदवी / पदवीका च्या शैक्षणीक वर्शात मुलभूत वैचरीक क्षमता वाढवण्यावर भर असतो - त्यात मधे पदवी आणि पदवीकेत बराच फरक आहे.

ह्याच प्रमाणे १० वर्षे अनुभव असलेल्या पदवी धारकाला "विद्यावाचस्पती" म्हणून मिरवता येणार नाही...

पण तरीही पदवीकावाल्यांना पुढील शिक्षणाला प्रतीबंध असू नये असे वाटते, किमान पक्षी आर्ट्स / कॉमर्स / सायन्स बरोबर तरी धरायला हरकत नाही...

-
अफाट जगातील एक अडाणि.

नितिन थत्ते's picture

13 Jan 2010 - 7:06 am | नितिन थत्ते

ए एम आय ई ही परीक्षा कलकत्ता येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स ही संस्था घेते. ही परीक्षा पास झालेल्याला डिग्री घेतलेल्याच्या बरोबरीचे समजतात. परंतु त्याला एम बी ए वगैरे ला प्रवेश मिळतो की नाही हे माहिती नाही.

(अनेक डिप्लोमाहोल्डर ही परीक्षा देत असतात. परंतु पुरेसे मार्गदर्शन न मिळणे आणि एकीकडे नोकरी चालू झाल्यामुळे पोटात आग नसणे या कारणांनी ही परीक्षा पास होणार्‍यांचे प्रमाण खूप कमी आहे. जसे बी ए झालेली मंडळी मी लॉ करतो आहे :) असे सांगतात तसेच काहीसे हे असते).

नितिन थत्ते

Nile's picture

13 Jan 2010 - 8:19 am | Nile

उच्च शिक्षणाकरिता AMIE ही पदवी सरकारच्या नियमा प्रमाणे "Equivalent to any BE/BTech from any other Indian university" आहे. पण उच्च शिक्षण संस्था आपल्या आपल्या नियमा प्रमाणे त्यांना प्रवेश देतात किंवा देत नाहीत.

माझ्या मते त्यांचा अभ्यासक्रम हा बराच 'आउटडेटेड' आहे. अपुर्‍या मार्गदर्शना शिवाय अनेक अडचणी असल्याने तो कोर्स काही अ‍ॅट्रॅक्टीव नाही. असो.

विकास's picture

13 Jan 2010 - 8:36 am | विकास

अनेक डिप्लोमाहोल्डर ही परीक्षा देत असतात. परंतु पुरेसे मार्गदर्शन न मिळणे आणि एकीकडे नोकरी चालू झाल्यामुळे पोटात आग नसणे या कारणांनी ही परीक्षा पास होणार्‍यांचे प्रमाण खूप कमी आहे.

खरे आहे. उत्तिर्ण होणार्‍यांची संख्या खूपच कमी आहे. शिवाय जे कोणी डिग्री होल्डर्स असतात त्यांना तात्काळ एमाआयई ही परीक्षा न देता मिळते हा वेगळाच भाग झाला...

`

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विकास's picture

13 Jan 2010 - 9:06 am | विकास

अमेरिकेत अजून एक प्रकार आहे जो आता भारतात पण येऊ पहात आहे:

P.E. = Professional Engineer Certification

तुम्ही विशिष्ठ इंजिनियरींग मधे बीएस/एमएस/पिएचडी काही असलात तरी देखील तुम्ही जो पर्यंत PE नसाल तो पर्यंत, (१) तुम्हाला डिझाईन अथवा काही विशिष्ठ कामे करता येत नाहीत कारण तुम्हाला सही-शिक्क्याचा हक्क नसतो. आणि (२) जर तुम्ही तुमच्या धंद्यात/नोकरीत कुठेही स्वत:ला "इंजिनियर" म्हणून संबोधलेत तर ते दिशाभूल करणारे समजले जाऊन शिक्षा होऊ शकते!

बरं या PE चे बरेच प्रॉब्लेम्स आहेत: एकतर प्रत्येक राज्यात वेगळे सर्टीफिकीट असते. त्यामुळे एका न्यूयॉर्क मधे सर्टीफिकीट आहे म्हणून कॅलीफोर्नियात काम करता येत नाही. काही राज्यात (मॅसॅच्युसेट्स सारखी) त्याच्या परीक्षा देण्यासाठी दोन स्टेप्स असतात. पहीली - इंजिनियरींग इन ट्रेनी (जी सर्वच राज्यात समान असते) पण दुसरी पिईची देण्यासाठी तुम्हाला विशिष्ठ अनुभव लागतो, सहा रेफरन्सेस (त्यातील ३ पिईंचे) लागतात आणि सर्वात मजेशीर प्रकार म्हणजे तुमचा अनुभव सांगताना तुम्हाला तुम्ही (पिईच्या हाताखाली केलेली) डिझाईन्स, इतर इंजिनियरींग संबंधी काम वगैरेचा रिपोर्ट द्यावा लागतो ज्याला किती कागदाचा अशी मर्यादा नाही, पण तो वजनाने एक पौंडापेक्षा जास्त असता कामा नये हे सक्तीचे आहे!

अजून बरेच काही!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

श्रीयुत संतोष जोशी's picture

13 Jan 2010 - 11:38 am | श्रीयुत संतोष जोशी

वेलिंगकर माटुंगा ही संस्था डिप्लोमाधारकांना ३ वर्षांच्या अनुभवाच्या बळावर एम.बी.ए. ला प्रवेश प्राधान्य देत आहे.

ही माहिती आपले एक मिपाकर संकेतजी कळके यांनी फोन करून सांगितल्याप्रमाणे मी फक्त लिहिले आहे.त्यांच्याकडे तसा ई मेल आहे. अधिक माहितीसाठी त्यांना संपर्क करावा.
sanketkalke@gmail.com

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सातारकर's picture

13 Jan 2010 - 1:35 pm | सातारकर

ते लोक PGDBA अशी डिग्री देतात, MBA नाही.

त्यासाठी १२ किंवा समकक्ष शिक्षण आणि किमान ३ (हे कमी जास्त असेल कदाचित) वर्षांचा अनुभव लागतो. त्यांच संकेत्स्थळ आहे;
http://www.welingkaronline.org

-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden

झकासराव's picture

13 Jan 2010 - 12:30 pm | झकासराव

हल्ली डिप्लोमा करण पोराना बर वाटतय.
डिग्रीला अ‍ॅड्मिशन घ्यायचा खुश्कीचा मार्ग.
मागच्या वर्षीचे कटऑफ बघा अम्ग लक्षात येइल.
डिप्लोमा विद्यार्थ्याला डिग्री करण्यासाठी फार कमी ऑप्शन आहेत जे सगळीकडे मान्यताप्राप्त आणि आदरणीय आहेत.
उदा. जर वाडीया कॉलेजला पार्ट टाइम डिग्री केली असेल तर पुणे युनिवर्सिटीचे सर्टिफिकेट मिळेल.
पण अशा कॉलेजेसची संख्या खुपच कमी आहे महाराष्ट्रात. त्यामुळे तिथे अ‍ॅडमिशन होइलच ह्याची खात्री नाही.
बाकी अजुन काही ऑप्शन आहेत जे कागदोपत्री समकक्ष बी ई/ बी टेक आहेत पण त्याना बर्‍याच कंपन्या विचारतदेखील नाहीत. (जसे की ए एम आय ई किंवा ओपन युनिवर्सिटीतुन डीग्री)

अमृतांजन's picture

13 Jan 2010 - 7:27 pm | अमृतांजन

धन्यवाद मिपाकरांनो. माझ्यामते जवळजवळ सगळे मिपाकर मुद्द्याच्या बाजूने आहेत व डिप्लोमा धारकांवरील अन्यायाला दूर करण्यासाठी काही मार्ग सुचवित आहेत.

आशा करुया की, त्यांच्यावरील अन्याय लवकरच दूर होईल व त्यांना स्वशिक्षणाची व्दारे खूली होतील.

किमान पक्षी आर्ट्स / कॉमर्स / सायन्स बरोबर तरी धरायला हरकत नाही..." असे व्हावे ही श्रींच्या चरणी प्रार्थना!

II विकास II's picture

14 Jan 2010 - 9:12 am | II विकास II

अमृतांजन यांचे धागे वेगळ्या पदधतीने विचार करायला भाग पाडतात.

डिप्लोमाला प्रवेश घेणार्‍या व नंतर डिग्रीला न जाणार्‍या, त्याएवजी नोकरी करणार्‍या लोकांचे कधी कधी आर्थिक कारण पण असते.
ह्याचा पण विचार व्हावा.

विटेकर's picture

14 Jan 2010 - 4:22 pm | विटेकर

मी स्वःत पदविका केल्यावर १२ वर्षानी पदवी पूर्ण केली. धन्यवाद BITS, Pilani !
पदविका धारकांची काय अवस्था होते , याचा मी भयानक अनुभव घेतला आहे आणि म्हणूनच मनावर घेऊन वयाच्या ३४ व्या वर्षी B S ( Engineering & Technology ) या Birla Institute of Technology & Sciences , Pilani च्या correspondance कोर्सला प्रवेश घेऊन वयाच्या ३७ व्या वर्षी यशस्वीपणे पूर्ण केला! CGPA 7.30 !
हा ६ सेमिस्टर चा अभ्यास असून तुलनेनं ( AMIE ) अतिशय सोपा आहे ( किमान मला तरी तसे वाटले.. मी एकदाही नापास झालो नाही !! :H ) पण थोडासा खर्चिक आहे. ( साधारण एका मारुती ८०० च्या किमती इतका !)
त्यानंतर मी नोकरी बदलली. जगातल्या नामवंत वाहन उद्योगाने ( Mercedes Benz ) त्याला पदवी अशी मान्यता दिली आहे.
Ashok Leyland / TVS सारख्या कंपन्या हा अभ्यासक्रम "इन हाऊस" राबवतात आणि साहजिकच त्याला अभियांत्रिकी पदवी अशी मान्यता आहे. Birla Institute of Science & Technology , Pilani च्या संकेत स्थळांवर सर्व माहिती उपलब्द्ध आहे. जिज्ञासूनी लाभ घ्यावा.
http://www.bits-pilani.ac.in/dlp-home/admissionnotices/admissionnotices....
--
धन्यवाद!

आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

अमृतांजन's picture

14 Jan 2010 - 7:08 pm | अमृतांजन

अभिनंदन श्री. विटेकर!

माहिती संग्रहणीय आहे व ती मी इतरांना देईन. तुम्ही जी १२ वर्षे खर्ची घातलीघाव नंतर डीग्री मिळवण्यासाठी बराच खर्चही केलात हे टाळले जावे ह्यासाठीच ह्या धाग्याचा विचार केला.

मिपावर अनेक पत्रकार व माननीय व्यक्ति आहेत त्यांनी हा धागा वाचला असेल तर शक्य तेव्हढा ह्या प्रश्नास वाचा फोडावी ही विनंती.

रेवती's picture

14 Jan 2010 - 8:10 pm | रेवती

अरे वा!! छान माहीती!
मीही कधीतरी डिग्रीच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश घेइन व खरी इंजीनियर म्हणवून घेइन ;) नाहीतर डिप्लोमाहोल्डर असा उल्लेख लोक करतात तोच इतक्या वाईट रितीने कि विचारता सोय नाही. (माझी एक मैत्रिण नुकतीच विचारत होती की वॅक्युमक्लीनरचा अमूक एक भाग कसा बदलायचा? तिला आठवण करून दिली की ती एक मेक्यानिकल डिप्लोमाहोल्डर आहे. अरे, खरच की! आता मी पुस्तीका वाचून तो सुटा भाग बदलीन म्हणाली. नंतर आम्ही भरपूर हसलो. संसाराच्या रेट्यात बिचारी पुरती विसरून गेली होती. सुदैवाने माझे अजून तसे झालेले नाही.)

रेवती

मदनबाण's picture

15 Jan 2010 - 10:59 am | मदनबाण

नाहीतर डिप्लोमाहोल्डर असा उल्लेख लोक करतात तोच इतक्या वाईट रितीने कि विचारता सोय नाही.
अगदी हेच म्हणायचे होते.

(डिप्लोमा इन प्रॉडॉक्शन इंजि.)
मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato