ओनियन उत्तप्पा

गणपा's picture
गणपा in पाककृती
12 Jan 2010 - 11:20 am

गेल्या वर्षी मद्राश्यांच्या प्रदेशात असताना डोसे , इडल्या, उतप्पे या पदार्थांनी अगदी उत आणला होता आणि तेव्हा पासुनच त्यांच नाव टाकल होतं.
तसा मी काही यांचा द्वेष्टा नाही पण सारख सारख तेच आणि तेच खाउन जीव कंटाळला होता.
आता बरेच दिवस झाले हाणुन तशी त्यांची आठवण येउ लागली म्हणुन हा प्रपंच....

साहित्यः
पीठासाठी दोनास एक या प्रमाणात तांदुळ आणि उडिद डाळ कमीत कमी ४-५ तास भिजत ठेवावे.
(उपलब्ध असल्यास साध्या तांदळा ऐवजी उकडा तांदुळ घ्यावा.)
१ वाटी शिळा भात. ( असल्यास)
१/२ छोटा चमचा यीस्ट्/इनो


कांदा,टोमॅट,भोपळी मिरची, हिरवी मिरची बारीक चिरुन.
चवीनुसार मीठ.
कृती:

४-५ तास भिजत ठेवलेले तांदुळ आणि उडिद डाळ वेग वेगळे वाटुन घ्या.
शिळा भात असल्यास तो पण मिक्सर मध्ये वाटुन घ्या. एका मोठ्या भांड्यात एकत्र कराव.
घरात यीस्ट् नसल्यास १/२ छोटा चमचा इनो टाकुन मिश्रण चांगले ढवळुन घ्याव.
भांड्यावर झाकण ठेवुन भांड जरा उबदार जागेत रात्र भर ठेवाव.
थंडीत पिठ चढत/फुलत नाही आश्यावेळी रात्रीच ओव्हन २-३ मिनिटांसाठी गरम करुन हे भांड त्यात ठेवाव.
ओव्हन नसेल तरी फिकर नॉट.. तवा १-२ मिनिटांसाठी गरम करुन हे भांड त्यावर ठेवा.

दुसर्‍या दिवशी हे अस दाम दुप्प्टीने वर येईल.

पीठात चवीनुसार मीठ टाका.

उतप्पा टाकताना आधी नॉनस्टीकचा तवा चांगला तापवुन घ्या. थोड पाणी शिंपडुन चुर्रर्रर्रर्रर्रर्र..आवाज आल्यावर त्यावर डावाने पीठ टाकुन थोड पसरवुन घ्याव.


बाजुने थोड तेल सोडुन १/२ मिनिट वर झाकण ठेवाव. झाकण काढुन मग वरुन कांदा, हिरव्या मिरच्या टाकुन परत झकुन ठेवा.


एक दिड मिनिटाने वरुन उतप्पा शिजल्यावर (जाळी पडेल) उलथण्याने उलटुन बाजुने तेल सोडावे. १-२ मिनटे खरपुस शिजु द्यावे.


हिरव्या चटणी सॉस सोबत वाढा.


थोडा बदल म्हणुन पुढच्या खेपेस कांद्या सोबतच भोपळी मिरची, टोमॅटो टाकुन ट्राय करा.

हिरव्या चटणी सॉस सोबत वाढा.

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

12 Jan 2010 - 12:01 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त.....लोण्याचा गोळा टाकावा वर.... अन चापावे ....मस्त लागते...

समंजस's picture

12 Jan 2010 - 12:03 pm | समंजस

व्वा! छान!!! =P~
करायला कंटाळा येणार, खायला मात्र खुप आवडणार...
उत्तप्पा ची सोपी पाककृती टाकल्या बद्दल धन्यवाद गणुभौ .
मला उत्तप्पाचे सर्वच प्रकार आवडतात. साधा उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा, टोमाटो उत्तप्पा, कोकोनट उत्तप्पा, मसाला उत्तप्पा =P~

sneharani's picture

12 Jan 2010 - 12:12 pm | sneharani

मस्तच आवडली रेसिपी.
अजून किती छळ होणार आहे कोणास ठाऊक...!

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2010 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार

आयचा घो !!!

गणपा काय करु रे तुझे ???

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

स्वप्निल..'s picture

12 Jan 2010 - 2:24 pm | स्वप्निल..

म्हणतो ....

स्वप्निल

स्वाती दिनेश's picture

12 Jan 2010 - 12:17 pm | स्वाती दिनेश

उत्तप्पा मस्तच..
अजून एक छोटी अ‍ॅडिशन,वाटीभर चुरमुरे भिजवून, वाटून पिठ आंबवताना त्यात घातले तर छान हलकेपणा येतो.
स्वाती

आशिष सुर्वे's picture

12 Jan 2010 - 12:22 pm | आशिष सुर्वे

गणपा लेका, तू काम कधी करतोस रे??

रवा उत्तपाची थोडी माहिती पुरवलीस तर्र बरे होईल..
-
कोकणी फणस

मॅन्ड्रेक's picture

12 Jan 2010 - 7:29 pm | मॅन्ड्रेक

at and post : Xanadu.

लवंगी's picture

12 Jan 2010 - 8:40 pm | लवंगी

थोडे इथे पाठव बर पटापट..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jan 2010 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच भारी.

-दिलीप बिरुटे

प्राजु's picture

12 Jan 2010 - 11:21 pm | प्राजु

पीठ जर रात्रभर आंबवत ठेवायचे तर त्यात इनो का घालायचे?
तसेही ओव्हन थोडा गरम करून मग त्यात पीठ रात्रभर ठेवले तर फुगून येतेच.
मी इन्स्टंट डोसे करताना, डाळ्-तांदूळ भिजत घालून मग वाटल्यानंतर त्यात थोडा सोडा आणि सायट्रीक अ‍ॅसिड घालते ते लग्गेचच फुगून येते.
पाकृ अ‍ॅज युजवल, भन्नाट! फुटू जबरदस्त!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

रेवती's picture

13 Jan 2010 - 4:58 am | रेवती

हेच म्हणते!
मी तर अव्हन गरमही करत नाही. त्यातला दिवा चालू करून ठेवला तरी पिठाला उब येते. इनो घालायची गरज नाही वाटत. फारच थंडी असेल तर कांदा अर्धा कापून साल काढून पिठात बुडवून ठेवल्यास पिठ चांगले फर्मेंट होते. स्वातीताईची युक्तीही करून पहायला हवी.
आणि ते रंगीबेरंगी फोटो मस्त आलेत. उत्तपाही अगदी गोल झालाय.

रेवती

-----
सौरभ :)

प्रभो's picture

13 Jan 2010 - 6:02 am | प्रभो

मस्त रे...(आधीच सांगीतल्याप्रमाणे प्रतिसाद देणारच नव्हतो...पण रहावलं नाही)

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

मि माझी's picture

13 Jan 2010 - 11:42 am | मि माझी

मस्त रेसिपी.. तुम्ही चटणी सॉस ठेवताना दाखवलेली कलात्मकता खुप आवडली.

मी माझी...
चिंब भिजलेले .. रुप सजलेले.. बरसुनी आले.. रंग प्रितीचे..

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2010 - 12:01 pm | बिपिन कार्यकर्ते

या वेळी आलो की हेच बरं का... एक वेळचा मेनू फिक्स!!!

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

13 Jan 2010 - 2:03 pm | गणपा

समस्त वाचक आणि प्रतिसाद देणार्‍यांचे आभार. :)

चतुरंग's picture

13 Jan 2010 - 7:06 pm | चतुरंग

सक्काळी सक्काळी असली फर्मास डिश समोर आणलीस!!
ला आणि ज आणि वा आणि ब!!
(उत्तप्याचं वर्तुळ कसं अगदी गोऽऽल आलंय नै!! ;) संदर्भ - माझी पहिली चोरी - दमामिरासदार)

चतुरंग

गणपा's picture

13 Jan 2010 - 7:37 pm | गणपा

>>संदर्भ - माझी पहिली चोरी - दमामिरासदार
हा हा हा रंगाशेठ एका विस्मृतीत गेलेल्या कथेची आठवण करुन दिल्या बद्दल आभार..

संदीप चित्रे's picture

14 Jan 2010 - 12:06 am | संदीप चित्रे

कॉलेजमधले स्टेपल फूड म्हणजे ओनियन उत्तप्पा, वडा - पाव, किंवा मिसळ - पाव !
गण्या तुझा उत्तप्पा बघून लगेच पुण्याच्या 'रंगोली'ला चक्कर मारून यावंसं वाटलं बघ !

विकास's picture

14 Jan 2010 - 2:27 am | विकास

नेहमीप्रमाणेच "ज ब रा"!

बाकी नुसते लांबून पहात, याला अजून काय प्रतिक्रीया देणार? :?

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

स्वाती२'s picture

14 Jan 2010 - 3:31 am | स्वाती२

मस्त दिसतोय. =P~

गणपांनी आपल्या पाकृंचे पुस्तक प्रकाशित करायला हवे. बर्‍याच पाश्चिमात्य गुळगुळीत आर्ट पेपरवर वगैरे प्रकाशित होणार्‍या रंगीबेरंगी पुस्तकांतील छायाचित्रे पदार्थांचा 'मेक अप' करून काढलेली असतात. गणपांची चित्रे घरोघरी असलेल्या स्वयंपाकघरांसारखीच भांडी व साहित्य आणि लाइटिंग वापरून काढली असलीतरी अधिक परिणामकारक वाटतात!

विकास's picture

14 Jan 2010 - 6:51 am | विकास

गणपांनी आपल्या पाकृंचे पुस्तक प्रकाशित करायला हवे.

१००% सहमत!

आम्ही आनंदाने पहील्या गिर्‍हाईकांमधे असू!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सहज's picture

14 Jan 2010 - 10:18 am | सहज

गणपांनी आपल्या पाकृंचे पुस्तक प्रकाशित करायला हवे.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jan 2010 - 10:35 am | बिपिन कार्यकर्ते

प्रकाशनपूर्व सवलत दिली तर धावीस कॉप्या घेऊ. :)

@सहज: गणपाला रेस्टॉरंट साठी फायनान्स करावा काय? :?

बिपिन कार्यकर्ते

वाहीदा's picture

14 Jan 2010 - 2:21 pm | वाहीदा

माझी वहीनी एकच आहे ना रे ?? :?
(प्रत्येक देशात जाऊन वाटणार आहेस का ? तिथे अजून माझ्या काही वहीनी नाही आहेत ना ?? )
दाल में कुछ काला नजर आ रहा है
गणपा मुळे सिक्रेटस बाहेर येत आहेत .... /:)
~ वाहीदा

jaypal's picture

14 Jan 2010 - 9:36 am | jaypal

पा.कृ. वाचली .........तडक उठलो............उडप्याकडे जाउन कडक ओनियन उत्तप्पा खाउन आलो..........आणि जिवात शिव आला.
मस्त झालाय उत्तपा. माझी आवडती डीश आणि कधी कधी हेच जेवण सुध्दा.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/