इंडो चायनीजच्या तिसर्या भागात परत एकदा तुम्हा सर्वांच स्वागत.
आजचा मेन्यु हाका न्युडल्स!!!!!!!!!!
यातल चिकन वगळ तर तर ही व्हेज डिश होईल.
तेव्हा शाकाहार्यांनो फिकर नॉट.
साहित्यः
न्युडल्स (मी एग न्युडल्स वापरल्या.)
१ गाजराचे ज्युलियन्स.
१०-१२ फरसबी लांब-लांब उभी चिरुन
१ भोपळी मिरचीचे ज्युलियन्स.
१५० ग्रॅम कोबी लांब लांब उभा चिरुन
३-४पाती कांदे लांब लांब चिरुन.
१ इंच आल्याचे ज्युलियन्स.
३-४ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१-२ हिरव्या मिरच्या लहान चिरुन.
चिकन.
सोयासॉस
मीठ चवीनुसार
कृती:
एका भांड्यात पाणी घेउन त्या चिकनचे मोठे तुकडे उकडण्यासाठी ठेवावे. १५-२० मिनिटानी पाणी गाळुन बाजुस ठेवावे.
(हा चिकन स्टॉक सुप बनवण्यासाठी वापरावा)
चिकनचे हव्या त्या आकारचे तुकडे करुन घ्यावे.
चिकन शिजतय तोवर दुसर्या भांड्यात पाणी घेउन न्युडल्स शिजवत ठेवाव्या.
शिजताना त्यात १ चमचा तेल टाकावे.
साधारण १०-१५ मिनिटांनंतर चाळणीने पाणी गाळुन न्युडल्स ताबडतोब थंड पाण्यात टाकाव्या. आणि परत गाळुन घ्याव्या.
एका ताटात पसरुन काही बर्फाचे तुकडे टाकावे.
एका मोठ्या भांड्यत तेल घेउन त्यात मिरची आल लसुण परतुन घ्यावे. १-२ चमचे सोयासॉस टाकुन मग सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर १-२ मिनीट परतवुन घ्याव्या.
संपुर्ण पणे शिजवु नये. क्रंची ठेवाव्या. चिकनचे तुकडे टाकावे. चवीनुसार मीठ ताकुन परतावे.
थंड झालेया न्युडलस टाकुन नीट एकत्र करुन घाव.
गरमा गरम सर्व्ह कराव.
प्रतिक्रिया
11 Jan 2010 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार
गणपा लेका का असे आमच्या डोळ्यावर आणी आसुसलेल्या जिभेवर अत्याचार करत असतोस ?
कुठे फेडशील हि पाप गणप्या-कोळ्या ???
©º°¨¨°º© नारद ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Jan 2010 - 5:48 pm | पर्नल नेने मराठे
ज्युलियन्स....... 8|
गणप्या ..आम्ही अडाणी लोक रे :(
चुचु
11 Jan 2010 - 6:10 pm | गणपा
चुचे अग ज्युलियन्स म्हंजे सळ्या.. बटाट्याच्या चिवड्यात असताना तश्या उभ्या आकारात कापलेल्या....
11 Jan 2010 - 6:18 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म.... :D आता ठिक आहे
चुचु
11 Jan 2010 - 6:14 pm | रेवती
वाह!!
भारीच दिसताहेत नुडल्स!
दोनेक दिवसांपूर्वीच या रेशिपीचा विचार केला होता......आज हजर!
रेवती
11 Jan 2010 - 6:51 pm | स्वाती२
छान दिसतायत! आमच्याकडे शनिवारी हाच मेनु होता.
11 Jan 2010 - 7:23 pm | पाषाणभेद
गणपा, गणपा हो.....
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
काठी अन घोंगड घ्येवूद्या की रं..
मला बी हाका नुडल्स खाऊद्या की रं...
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
11 Jan 2010 - 7:58 pm | आशिष सुर्वे
गणपा, लेका.. तुझा तिथला पत्या दे रे..
'इंडोमी' चा एक बाक्सच धाडतो तुझ्या घरी... बनव लेका किती बनवायचे तितके नूडल्सचे प्रकार!!
बाकी ह्या पाककृती बद्दल काय म्हणू??
आम्ही वेडे व्हायचे तेवढे बाकी आहोत आता!!
-
कोकणी फणस
11 Jan 2010 - 8:10 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त खा ..मजा करा ...गणपाचे गुण गा...लय भारी..दादा
11 Jan 2010 - 8:11 pm | स्वाती दिनेश
हाका नूडल्स मी ही अशाच पध्दतीने करते,
स्पागेटी नूडल्स वापरुनही हाका नूडल्स करता येतात.
स्वाती
11 Jan 2010 - 10:45 pm | खान्देशी
11 Jan 2010 - 11:56 pm | चतुरंग
=P~ हाका नूडल्स जाम आवडल्या!! माझा आवडता पदार्थ.
इतक्या जबरी दिसताहेत की पाकृच्या शेवटी शेवटी मी 'हाणा नूडल्स' असं वाचंत होतो! ;) =P~
(चिनी)चतुरंग
12 Jan 2010 - 8:53 am | चित्रा
छान दिसतायत नूडल्स.
12 Jan 2010 - 3:56 pm | खादाड
व्वा ! क्या बात है !
12 Jan 2010 - 5:05 pm | वाहीदा
कुठे उघडणार तुम्ही तुमचे रेस्टोरंट ?
मिपाकरां ना काही डिस्काउंट मिळेल का ??
Hats off to your Culinary Skills !
तुमच्या स्वयंपाक-कले पुढे मी खरेच अचंबित झाले ..तुमच्या घरातील सर्व सदस्यांचा आता आम्हास हेवा वाटतो !
~ वाहीदा
13 Jan 2010 - 6:03 am | प्रभो
मस्त रे...(आधीच सांगीतल्याप्रमाणे प्रतिसाद देणारच नव्हतो...पण रहावलं नाही)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
14 Jan 2010 - 9:42 pm | मीनल
विविध प्रकारचे सोया सॉस मिळतात.
कुठला सॉस ईंडिअन स्टाईल चायनिज करताना वापरावा?
मीनल.
15 Jan 2010 - 5:52 pm | सुधीर१३७
<:P
जय गणपा .......