झित्रोन कुकन- लेमन केक

Primary tabs

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
11 Jan 2010 - 12:37 pm

आमच्या त्सेंटाआजीची खासियत म्हणजे हा लेमन केक..
साहित्य-
२५० ग्राम साखर, २५० ग्राम मैदा, २५० ग्राम लोणी/तूप, ५ अंडी
२ चहाचे चमचे बेकिंग पावडर, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १ चिमूट मीठ
१००-१२५ ग्राम पिठीसाखर, ४ ते ५ लिंबांचा रस, लिंबाची किसलेली साल १ ते २ चमचे
कृती-
लोणी/तूप भरपूर फेटणे,नंतर साखर घालून फेटणे,मीठ घालून फेटणे,अंडी घालून फेटणे. वॅनिला इसेन्स घालून फेटणे.
लिंबाची साल घालून फेटणे. मैदा+बेकिंग पावडर एकत्र करणे व ते घालून फेटणे.
केक च्या साच्याला बटर लावून घेणे व त्यात ते मिश्रण ओतणे.
अवन प्रिहिट करणे, १८० अंश सेल्सिअस वर ५५ ते ६० मिनिटे बेक करणे.
केक तयार झाला की मोल्डमधून बाहेर काढणे व जाळीवर ठेवणे म्हणजे वाफ धरणार नाही. कोमट झाला की त्याला टोचणीने/विणायच्या सुईने (विणायच्या सुईशी माझा एवढाच संबंध! :) ) सर्व बाजूंनी भोके पाडणे.
लिंबांचा रस + पिठीसाखर एका ट्रे/मोठ्या ताटलीत घेणे व त्यात हा केक उलट सुलट सर्व बाजूंनी घोळवणे‌‌. कडा जास्त घोळवणे. रस सगळीकडे लागायला हवा आणि केक च्या आतही जायला हवा.
पिठीसाखरेने सजवणे.
गार झाल्यावर तुकडे करणे‍. गरम गरम कॉफीबरोबर खाणे.
(जर्मनांना केक बरोबर कॉफी लागतेच लागते! आपण जसे चहाफराळाला बोलावतो तसे ही मंडळी 'काफे उंड कुकन' साठी बोलावतात!)
हे तुकडे प्लास्टीक कागदात गुंडाळून प्लास्टीक डब्यात घालून डीप फ्रिझ मध्ये ठेवले तर ४/५ महिने टिकतात.
(अर्थात तसेही ते खाण्यातून उरायला तर हवेत..:) )

प्रतिक्रिया

गणपा's picture

11 Jan 2010 - 1:08 pm | गणपा

खल्लास!!!!!!
स्वाती तै,ठार मेलो..

सहज's picture

11 Jan 2010 - 1:51 pm | सहज

सही आहे, वाद नाहीच.

पण वर्षाच्या सुरवातीलाच साखर मैद्याच्या रेशीपी म्हणजे :-(

:-)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jan 2010 - 4:23 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत...

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

12 Jan 2010 - 12:04 am | चतुरंग

तुमचं दु:ख पोटात मावत नाहीये हे समजून आहे मी! ;)

(समदु:खी)चतुरंग

sneharani's picture

11 Jan 2010 - 2:46 pm | sneharani

मस्तच. आवडली रेसिपी.

स्वाती२'s picture

11 Jan 2010 - 4:51 pm | स्वाती२

व्वा! मस्त दिसतोय.

रेवती's picture

11 Jan 2010 - 6:17 pm | रेवती

मस्त दिसतोय केक!
करून पाहीन व कळवीन!

रेवती

चतुरंग's picture

12 Jan 2010 - 12:02 am | चतुरंग

स्वातीताई एकतर बरेच दिवसांनी आलीस आणि आलीस ती एकदम हा असला भन्नाट केक घेऊनच!!
ती वरची केकावली बघून पोटात केकावली सुरु झाली! ;)

('केका'टणारा)चतुरंग

नंदन's picture

12 Jan 2010 - 3:09 am | नंदन

>>> ती वरची केकावली बघून पोटात केकावली सुरु झाली! Wink
--- सहमत आहे :). फोटो आणि पाकृ दोन्ही क्लास!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास's picture

12 Jan 2010 - 8:37 am | विकास

खायला कधी बोलावणार? :)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

चित्रा's picture

12 Jan 2010 - 8:49 am | चित्रा

केकचा तुकडा उचलला की तुटेल असे वाटते आहे.

श्रावण मोडक's picture

12 Jan 2010 - 8:50 pm | श्रावण मोडक

असे पदार्थ खायला(च) घालायचे असतात हे शिकवा रे कुणी तरी या सुगरणींना (आणि सुगणांनाही)!!!

लवंगी's picture

12 Jan 2010 - 9:13 pm | लवंगी

खायला कधी बोलावणार?

प्राजु's picture

12 Jan 2010 - 11:45 pm | प्राजु

अ फ ला तू न!! :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रभो's picture

13 Jan 2010 - 6:18 am | प्रभो

स्वाती तै..मस्तच

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी