झेण्डा

दीप्या's picture
दीप्या in काथ्याकूट
9 Jan 2010 - 10:35 pm
गाभा: 

वा अवधूत गुप्ते !!तुझ्या दारोदार फिरणारा झेडा बघून फारच वाईट वाटले. त्या तल्या तुच उभ्या केलेल्या कार्यकरत्या हुनही तुझी अवस्था भयाण.एकदम चा बू क गोची की राव!
काठी नसणारा हा एकमेव झेण्डा !

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

9 Jan 2010 - 11:24 pm | अविनाशकुलकर्णी

सारे नाटक आहे असे समजते....१५ तारखेला शिक्षणाच्या आईचा घो ! येणारच आहे तुफान गल्ला करायला..ते टाळण्यासाठी हे नाटक आहे असे समजते.....ख.खो.दे.जा....

रेवती's picture

10 Jan 2010 - 2:21 am | रेवती

तरी वाटलच होतं मला!
हे सगळं मुद्दाम केलेलं नाटक असणार म्हणून!

रेवती

प्रभावळ's picture

9 Jan 2010 - 11:37 pm | प्रभावळ

अस पण आहे तर! बर झाल सांगितलत.

तिमा's picture

10 Jan 2010 - 7:37 am | तिमा

समजा हे नाटक नसले तर ? तसे समजून चर्चा चालू ठेवा.
मुळात आधी अवधूतने राजकीय सेंन्सॉरवाल्यांना असे महत्व देणेच चुकीचे आहे. या देशांत खरी लोकशाही आहे कुठे ? कशावरही आपले प्रांजळ मत देणे हे सुध्दा कठीण झाले आहे.
महाराष्ट्रात तरी या राजकीय सेंन्सॉरशिपची सुरवात शिवसेनेनेच केली आहे. आपल्यावरची टीका ज्यांना सहन होत नाही त्यांनी लोकांना 'टिळक-जांभेकरांच्या' पत्रकारितेचे धडे देऊ नयेत.
काँग्रेसनेही आणीबाणीमधे 'सामना' वर बंदी आणण्याचा प्रयत्न केलाच होता.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2010 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मुळात आधी अवधूतने राजकीय सेंन्सॉरवाल्यांना असे महत्व देणेच चुकीचे आहे.

करेक्ट. उद्धव साहेबांची चित्रपटासाठी परवानगी मागितली गेली. त्यामुळे काहींचा 'स्वाभिमान' दुखावणार होता. मा.निलेश राणे[आय बी एन लोकमतवर] म्हणाले की, मग आमची का परवानगी घेतली गेली नाही. मालवणचे एक पात्र म्हणजे साहेबांवर [मा.नारायण राणेंवर] बेतलेले आहे, तो भाग वगळून,बदलून चित्रपट काढण्यास हरकत नाही.

अवधूत गुप्ते हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते म्हणे, त्यामुळे चित्रपटात कोणाचं कौतुक असेल हे काही कोणाला विचारायची गरज नाही. आणि असले तरी, चित्रपट रसिकांना चित्रपटात जे काय असेल ते पाहू द्यावे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची काय चीझ असती का नाय ?

-दिलीप बिरुटे

चिरोटा's picture

10 Jan 2010 - 1:57 pm | चिरोटा

मुळात आधी अवधूतने राजकीय सेंन्सॉरवाल्यांना असे महत्व देणेच चुकीचे आहे.

सहमत.पण त्यांच्या सहमतीशिवाय चित्रपट प्रदर्शीत होईल का?राणे हे महसूल मंत्री आहेत् आणि आपले राजकारणी किती 'सुसंस्कृत' आहेत हे गुप्ते ह्यांनाही माहित आहे.
बाँम्बे चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वी मणिरत्नम ह्यांनी ठाकरे ह्यांची परवानगी घेतली होती.
भारतातल्या ज्या राज्यांमध्ये दादागिरीचे राजकारण चालते त्यात उत्तर प्रदेश्,बिहार बरोबर महाराष्ट्राचाही समावेश होतो.
भेंडी
P = NP

देवदत्त's picture

10 Jan 2010 - 3:07 pm | देवदत्त

आधी झेंडा आणि आता 'शिक्षणाच्या आयचा घो'.

मी नवीन लेख टाकणार होतो, पण हा लेख पाहिला म्हणून इथे माझ्या अनुदिनीवरील त्या लेखाचा दुवा देतो.

प्रभावळ's picture

10 Jan 2010 - 3:13 pm | प्रभावळ

च्यामारी!
सामना हे वृत्तपत्र हे आणीबाणीच्या काळात अस्तित्वात आलेल होत...... हे ज्ञान आमच्यासारख्यांसाठी नविनच आहे.

चिरोटा's picture

10 Jan 2010 - 4:50 pm | चिरोटा

सामना चित्रपट!. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक १९८८पासुन चालु झाले.
भेंडी
P = NP

???
:?

-----
सौरभ :)

नितिन थत्ते's picture

11 Jan 2010 - 12:09 pm | नितिन थत्ते

इतक्या करंट पात्रांवर चित्रपट काढूच नये असे मला वाटते. कारण त्याचे वस्तुनिष्ठ चित्रण होऊ शकतच नाही.

एखाद्या घटनेबाबत चित्रपट काढणे आणि त्यात आनुषंगिक राजकीय व्यक्ती येणे वेगळे (उदा. बॉम्बे चित्रपटात बाळ ठाकरे यांचे पात्र) आणि करंट राजकीय पात्रांवरच चित्रपट काढणे वेगळे.

काढलाच तर या सर्वांची मनोमन तयारी ठेवावी.

नितिन थत्ते