भाउबंदकी

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
11 Mar 2008 - 1:58 am

कट्ट्यावरचे वासू तर्कट
वाचा विष्ठा, मनही मळकट!

मांड्यांची चव कोणा कळली?
म्हटले सगळे - "तळकट, तुपकट!"

माउलीसुधा सुटली नाही
लेकरे अशी दिवटी, हलकट

चिलटांची या मस्ती कसली?
वशिंड भरले, शिंगे दणकट!

काका कुठला?पुतणे कुठले?
भाउबंदकी होवो बळकट

प्रतिक्रिया

सचिन's picture

11 Mar 2008 - 2:07 am | सचिन

बेसनलाडूजी,
"स्वतःचा स्वानुभव" की काय ?
असो, पण कविता आवडली ! BALANCE चाङ्गला आहे.

प्राजु's picture

11 Mar 2008 - 2:24 am | प्राजु

"स्वतःचा स्वानुभव" की काय ?
अहो.. मुलिंची कन्याशाळा नका हो करू...

कविता छान आहे. भाऊबंदकीचे चांगले वर्णन केले आहे. नव्या वातावरणात अगदी फिट्ट बसते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु

सचिन's picture

11 Mar 2008 - 2:27 am | सचिन

जानबूझके "....." टाकलेत ना प्राजुताई ?

विसोबा खेचर's picture

11 Mar 2008 - 2:11 am | विसोबा खेचर

अखेर नॉर्थ कॅरोलिनावरून सूत्र हलली म्हणायची! :))

पण कविता बाकी झकास...

चिलटांची या मस्ती कसली?
वशिंड भरले, शिंगे दणकट!

अगदी खरं! वशिंड भरलेल्या आणि शिंग दणकट असलेल्या पुतण्यांच्या संस्थाळवर काका हल्ली वाचनमात्रच असतात! झणझणीत तिखट मिसळ काकांना पचली नाही म्हणायची! :)

माउलीसुधा सुटली नाही
लेकरे अशी दिवटी, हलकट

हम्म! खरं आहे! नकली आयडी घेऊन दुसर्‍याच्या कविता तिसर्‍याच संस्थळावर टाकण्याचा दिवटेपणा माऊलीच्याच लेकरांनी करावा या सारखं माऊलीचं दुसरं दर्दैव ते काय! :)

असो, छान कविता...

आपला,
(निदान माऊलीचं नांव घेऊन किंवा तिची झूल पांघरून संस्थळांवर पालथे धंदे न करणारा!) तात्या.

चतुरंग's picture

11 Mar 2008 - 2:11 am | चतुरंग

'तशा' वाचता प्रतिक्रियाही
शालजोडितिल येई झळकत!

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

11 Mar 2008 - 2:47 am | इनोबा म्हणे

काका कुठला?पुतणे कुठले?
भाउबंदकी होवो बळकट

आपण वकील आहात काय?

च्यायला भाऊबंदकीच्या नावाखाली गळे काढणारे स्वत: त्याच पाण्यात उभे राहून दूसयांना कोरडे रहायला सांगत आहेत.
बे.ला. आपण एक चांगले कवि आहात यात दूमत नाही,पण त्याचा वापर कसा करत आहात यावर सगळं अवलंबून आहे.उगाच वाद वाढवत बसू नये ही विनंती.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

बेसनलाडू's picture

11 Mar 2008 - 3:24 am | बेसनलाडू

आपला हा शिरसावंद्य उपदेश येथील सर्वांनाच कराल काय? लेखक-कवी तसेच वाचकवर्ग, प्रतिसादकर्ते?
(शालजोडीतला)बेसनलाडू

इनोबा म्हणे's picture

11 Mar 2008 - 10:59 am | इनोबा म्हणे

आपला हा शिरसावंद्य उपदेश येथील सर्वांनाच कराल काय? लेखक-कवी तसेच वाचकवर्ग, प्रतिसादकर्ते?
हा उपदेश नसून विनंती आहे.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

बेसनलाडू's picture

11 Mar 2008 - 11:01 am | बेसनलाडू

किंवा विनंतीवजा उपदेश म्हणू हवे तर, उपरोल्लेखित सर्वांनाच कराल काय?
(पृच्छक)बेसनलाडू

सर्किट's picture

11 Mar 2008 - 2:15 am | सर्किट (not verified)

ताज्या विषयावरची ताजी कविता आवडली !

- सर्किट

धनंजय's picture

11 Mar 2008 - 3:23 am | धनंजय

मानले!

कोलबेर's picture

11 Mar 2008 - 3:38 am | कोलबेर

सहमत आहे

वाचा विष्ठा, मनही मळकट!

आवडले!!

व्यंकट's picture

11 Mar 2008 - 3:26 am | व्यंकट

माहिती नसल्यामुळे, उत्तर रामायण कळलं नाही.

व्यंकट

बेसनलाडू's picture

11 Mar 2008 - 3:30 am | बेसनलाडू

पूर्व रामायण नको; महाभारत आहे इकडे, ते वाचा. म्हणजे उत्तर रामायण कळेल :) :)
(वाल्मिकी)बेसनलाडू

पण सगळे अर्जून शब्द-शिखंडीच्या आडून शरसंधान करीत होते.

व्यंकट

बेसनलाडू's picture

11 Mar 2008 - 4:09 am | बेसनलाडू

अहो मुळातच तशा शरसंधानास व्यासरचित महाभारताची परवानगीच आहे :)
(शब्दशिखंडीआडचा)बेसनलाडू

सर्किट's picture

11 Mar 2008 - 4:43 am | सर्किट (not verified)

शब्द शिखंडी हे नाव खूपच आवडले.

जे खळांची व्यंकटी सांडो...

- सर्किट

सुधीर कांदळकर's picture

11 Mar 2008 - 7:59 pm | सुधीर कांदळकर

संदर्भ माहीत असते तर दु:खच झाले असते.

असो. कविता छानच आहे.

माउलीसुधा सुटली नाही
लेकरे अशी दिवटी, हलकट

चिलटांची या मस्ती कसली?
वशिंड भरले, शिंगे दणकट!

वर्णन जोरदार आहे.