गाभा:
परवा १ बातमी वाचली की बिहार आता विकासाच्या गतीत देशात २र्या क्रमांकावर आहे. =D>
हे वाचून मला खालील प्रश्न पडले :?
१. ह्या प्रगतीचा महाराष्ट्रावर काय परीणाम होईल?
२. इथले बिहारी परत जातील?
३. इथले उद्योग धंदे पण तिकडे गेले तर???
मिपाकरांना काय वाटतं????
प्रतिक्रिया
6 Jan 2010 - 6:35 am | सुनील
कृपया बातमीचा दुवा द्या.
विकासाची गती म्हणजे विकासदर असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? तसे असेल तर, त्याचा अर्थ बिहार अधिक विकसित असा होत नाही. कारण कमी विकसित प्रदेशाचा विकासदर हा प्रगत प्रदेशांपेक्षा बहुधा अधिकच असतो.
बाकी, बिहार विकसित होत असेल तर ती उत्तम गोष्टच म्हणायला हवी, नाही का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
6 Jan 2010 - 6:37 am | पाषाणभेद
१. ह्या प्रगतीचा महाराष्ट्रावर काय परीणाम होईल?
महाराष्ट्राने कोणती प्रगती केली? प्रगती म्हणजे काय?
२. इथले बिहारी परत जातील?
आमच्या इस्टेटी झाल्यात येथे. आम्ही कशाला जावू तेथे?
३. इथले उद्योग धंदे पण तिकडे गेले तर???
इथले उद्योग तिथे जातील. धंदे इथेच राहतील.
हमार बिहार, बिहार हमरा !

बिहार नवनिर्माण सेना
(बि. न. से.)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
6 Jan 2010 - 8:45 am | टोळभैरव
१. ह्या प्रगतीचा महाराष्ट्रावर काय परीणाम होईल?
होईल? already परीणाम झालेला आहे.
२. इथले बिहारी परत जातील?
नाही.आवा आवा भाजी लेवा,केला लेवा,टमाटा लेवा.
३. इथले उद्योग धंदे पण तिकडे गेले तर???
इथले उद्योग धंदे = वापी,सिल्वासाला कधीच migrate झाले.
मी टोळ. :)
(मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )
6 Jan 2010 - 9:39 am | शाहरुख
विकासाचे विकेंद्रीकरण [नववीच्या नागरिकशास्त्राच्या पेपरात हा शब्द लिहिला होता..त्यानंतर आज ]चांगलेच की !!
पहिला नंबर कुणाचा ?
खुलासेवार प्रतिसाद दुवा दिला की :-D
6 Jan 2010 - 11:47 am | वाहीदा
कोणाचीही मागासलेली परिस्थिती पाहून महाराष्ट्राला असूरी आनंद होत नाही , होणार नाही..
To be happy on somebody's problem or to get angry or upset about somebody's progress is a source of crooked mentality fortunately all Maharashtrians do not think in this manner.
पण याचा अर्थ असा नव्हे की आमच्या प्रगती चा ईतर राज्यांनी त्याचा undue advantage घ्यावा .
आगाऊ बिहारी नेहमीच मार खाणार. उस गोड लागला म्हणून मुळापासून खाणार्या काही बिहारी लोकांना हाताला धरूनच बाहेर काढायला हवे.
बिहार जर प्रगती पथावर आले तर महाराष्ट्राला आनंदच होईल as Progress leads to healthy mind and it will lead heathier thoughts
Only croocked mentality people gets angry or upset about others' progress - no matter how educated they call themselves !! we pity their education.
ईन्शाअल्लाह ! बौध्द , चाणाक्य , महावीर , नालंदा - वैशाली , अशोका ईनकी विरासत रखने वाला बिहार अपनी खोई हुवे वजूद को फिरसे पा ले | हम सिर्फ दुवाही कर सकते है और कुछ नहीं :-(
~ वाहीदा
6 Jan 2010 - 12:17 pm | चिंतातुर जंतू
लेखकाला हा दुवा अभिप्रेत असावा - बिहारी चमत्कार!
यानुसार बिहारने आपल्या जी. डी. पी. मध्ये ११.०५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ही सबंध देशात दुसर्या क्रमांकाची आणि गुजरातच्या खालोखाल आहे. शिवाय जागतिक बँकेने बिहारला गुंतवणुकीसाठी योग्य जाहीर केले आहे. ही सर्व नितीशकुमारांची पुण्याई आहे, असेही नमूद केले आहे.
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
7 Jan 2010 - 11:20 pm | मी-सौरभ
चि.जंतु : आभार...
-----
सौरभ :)
6 Jan 2010 - 12:36 pm | अविनाशकुलकर्णी
आपणास काय वाटते ते कृपया लिहा...आपले मत मांडा..मग लोकांना कामाला लावा....
6 Jan 2010 - 2:23 pm | ज्ञानेश...
या लेखात केतकरांनी नितिशकुमारांचे केलेले कौतुक हा 'चमत्कार' जास्त चमत्कारिक वाटला.
6 Jan 2010 - 2:30 pm | चिरोटा
चमत्कारिक नाही त्यात.!!
राहुल गांधींनी नितीश कुमारांचे मे महिन्यात कौतुक केले होते ते केतकरांच्या अजुनही लक्षात आहे.(http://www.hindustantimes.com/News-Feed/newdelhi/Rahul-praises-Nitish-Ku...)
भेंडी
P = NP
6 Jan 2010 - 3:02 pm | ज्ञानेश...
:>
6 Jan 2010 - 10:08 pm | पाषाणभेद
केतकरांचे बिहारप्रेम समजू शकता येते, कारण केतकरांच्या नावात 'कुमार' आहे; अन बहूतेक बिहारींच्या नावात 'कुमार'च असते.

- पासानभेदकुमार
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेदकुमार बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
7 Jan 2010 - 5:56 pm | आम्हाघरीधन
परवा १ बातमी वाचली की बिहार आता विकासाच्या गतीत देशात २र्या क्रमांकावर आहे. Applause
१ एप्रिल असल्यासारखे वाटते आहे......
नक्किच सर्वांना एप्रिल फुल केले आहे आपण...... अबब.... केवढी ही प्रगती.... बिहार मधे चक्क डांबरी रस्ते बनले आहेत.... कुठेही विज गेलेली नाही.... लख्ख् प्रकाश पडला आहे.....
मी एकदा बक्सर या शहरात गेलो होतो.... डोके सुन्न झाले, 'जयप्रकाशजी नारायण यांनी १९८० साली कामाचे उद्घाटन केलेला मुख्य रस्ता अजुनही पुर्ण झालेला नाही....' कसला विकास..... बिहार नुसतेच भकास....
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
7 Jan 2010 - 11:28 pm | मी-सौरभ
आपल्या सर्वांच्या प्रतिसादांसाठी धन्यवाद...
ही बातमी वाचून मला १च प्रश्न पडला की
२०१० मधे ही अवस्था तर २०२० मधे महाराष्ट्राची अवस्था आत्ताच्या बिहार सारखी होते की काय ??? :?
-----
सौरभ :)