विरह

सचिन's picture
सचिन in जे न देखे रवी...
11 Mar 2008 - 12:02 am

मनावर दगड ठेवून म्हणालो तिला
तुझा माझा सम्बन्ध आता सम्पला
म्हणाली , हेच ऐकवण्यासाठी
जवळ केले होतेस का मला ?

आताशा एकटेपणा अक्षरशः
खायला उठतो जिवाला
पण पुन्हा तिला जवळ केले
तर घरे पडतील काळजाला

तिच्या नाही, तरी माझ्या घरचे
विरोध नक्कीच करणार
आणि त्यान्च्यापर्यन्त आमची
कुणकुण तर गेलीच असणार

आमचा समेट घडवायला
मित्र सारे आतुर झालेत
म्हणूनच रूमवरचे सारे ASH TRAY
मी केव्हाच फेकून दिलेत

(कवितेचे नाव "मोठी गोल्ड फ्लेक" ठेवणार होतो, पण मग सस्पेन्स राहिला नसता !)

प्रतिक्रिया

सर्किट's picture

11 Mar 2008 - 12:07 am | सर्किट (not verified)

मस्त कविता.

पण पुन्हा तिला जवळ केले
तर घरे पडतील काळजाला

हे तर मस्तच !!

- सर्किट

धनंजय's picture

11 Mar 2008 - 12:16 am | धनंजय

मस्त.

सहज's picture

11 Mar 2008 - 9:54 am | सहज

भन्नाट आवडली.

बेसनलाडू's picture

11 Mar 2008 - 9:58 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

चतुरंग's picture

11 Mar 2008 - 12:19 am | चतुरंग

ASH TRAY वाचे पर्यंत गुगली समजला नाही!
अजून येऊ देत!

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

11 Mar 2008 - 12:24 am | इनोबा म्हणे

तुमच्या आमच्या सारख्या भावी साहित्यिकांना हा धूर किती गरजेचा आहे याचा अजूनही कुणालाच अंदाज आलेला दिसत नाही.समाजाने याचा गंभीरपणे विचार करायला हवा.(तुम्ही गंभीर होऊ नका म्हणजे झालं)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्राजु's picture

11 Mar 2008 - 12:35 am | प्राजु

अप्रतिम कविता...
एकदमच आवडली..

गुगली आहे खरी...

- (सर्वव्यापी)प्राजु

नंदन's picture

11 Mar 2008 - 1:52 pm | नंदन

कविता आवडली, शेवटपर्यंत 'दूसरा' समजला नाही :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुवर्णमयी's picture

11 Mar 2008 - 12:38 am | सुवर्णमयी

कविता आवडली.

व्यंकट's picture

11 Mar 2008 - 1:41 am | व्यंकट

adhun madhun samarthyadata gGaDev is undefined ashi error deto ani devanagri typing band padatay. mhanoon english madhe pratisad.

आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/

सचिन's picture

11 Mar 2008 - 1:45 am | सचिन

माझ्यासारख्या नवोदिताच्या (आतापर्यन्तच्या) दोनही कवितन्ना मि.पा. वाचकान्नी उत्साहवर्धक प्रतिसाद दिलाय !
जर्रानवाजीका तेहेदिलसे शुक्रिया !!!

स्वाती राजेश's picture

11 Mar 2008 - 1:52 am | स्वाती राजेश

कविता छान आहे..
पुढील गुगली ची वाट पाहात आहे...

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 7:07 am | विसोबा खेचर

कविता छान आहे! :)

तात्या.