नमस्कार मंडळी,
इंडो-चायनिज् च्या दुसर्या भागात आपलं पुन्हा स्वागत.
आजची खादाडी आहे शेझवान ट्रिपल फ्राईड राईस.
चायनिज् पदार्थ करायला खुप सोप्पे असतात. फक्त त्यांच्या पुर्वतयारीला थोडा वेळ लागतो. भाज्या निवडुन त्या निगुतीने कापणे हे खर हुशारीच काम.
ते जमल की मग बाकीच हाय काय अन नाय काय!!!!!
साहित्यः
१ वाटी चिकन चे लहान तुकडे,
कोळंबी.
१/२ गाजर.
५-६ फरसबी.
२ पातीचे कांदे.
थोडासा कोबी.
१ भोपळी मिरची.
लसुण बारीक चिरलेला.
१ इंच आल्याचे जुलियंस.
१-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
सोयासॉस
शेझवान सॉस.
मीठ चवी नुसार.
तयार भात.
न्युडल्स्.
कृती:
न्युडल्स् आणि भात आधीच तयार करुन ठेवावे.
चिकन आणि कोळंबी यांना १-१ चमचा सोयासॉस व शेझवान सॉस लावुन १० मिनिट मुरत ठेवाव. (दोन्ही सॉस मध्ये मीठ असत त्यामुळे वेगळ लावायची गरज नाही)
एका पॅन मध्ये १ चमचा तेल घेउन त्यात चिकन आणि कोळंबी शिजवुन घ्यावी.
चिकन आणि कोळंबी एक बशीत काढुन, त्याच पॅन मध्ये शिजवलेल्या न्युडल्स परतुन घ्याव्या आणि बाजुला काढुन ठेवाव्या.
त्याच पॅनमध्ये १ चमचा तेलावर लसुण्-हिरवी मिरची, आल परतुन घ्याव.
आच मोठी करुन थोडा शेझवान सॉस आणि भाज्या टाकुन परतावे. चवी नुसार मीठ टाकावे. चिकन आणि कोळंबी टाकावी.
लगेच तयार भात टाकावा आणि नीट मिक्स करुन घ्याव.
वाढताना आधी खाली भाताचा थर लावावा, वरुन न्युडल्स पसरवाव्या, वाटल्यास एक अंड्याचा पोळा काढुन वर ठेवावा.
प्रतिक्रिया
2 Jan 2010 - 12:33 pm | प्रभो
गण्या लेका तू उपवास सोडलास शेवटी तर.....
असो तुझ्या पाकृ कायमच छान असल्याने नेहमी नेहमी चांगल्या प्रतिक्रिया देण्याचा कंटाळा आला आहे....यापुढे प्रतिसाद जीमेल वर मिळेल....
असो....ही गणपाची रेशेपी...तीच्यावर आमचा भारी जीव.....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
2 Jan 2010 - 1:27 pm | शाहरुख
अॅक्च्युअली, "सगळे मिपाकर आपली कल्पकता जर कुठे पणाला लावत असतील तर ती गणपा-जींच्या पाककृतींना प्रतिसाद देण्यासाठी" असे माझे स्पष्ट मत आहे..
मला अजुन काही सुचलेले नाहीय..तो पर्यंत "वॉव", "यम" वगैरे !!
2 Jan 2010 - 1:27 pm | टुकुल
__/\__
काहीच वाचल नाही, फक्त फोटो पाहिले आणी प्रतिक्रिया देत आहे
(वाचायच तशी काही गरज नाही, कारण वाचुन पण तस बनवु शकत नाही)
--टुकुल
2 Jan 2010 - 1:50 pm | चिरोटा
मस्त पाकृ गणपा.
ह्या पाकृच्या नावात 'ट्रिपल' शब्द आहे. त्याचा पाकृशी काय संबंध असतो का?
भेंडी
P = NP
2 Jan 2010 - 2:00 pm | jaypal
很好=hěnhǎo(Very Good)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
2 Jan 2010 - 7:02 pm | समंजस
दिलखुश : :D
2 Jan 2010 - 8:34 pm | चित्रा
एकदा करून पाहीन!
१ इंच आल्याचे जुलियंस.
जुलियस म्हणजे उभे-उभे पातळ कापून ना?
2 Jan 2010 - 9:03 pm | प्राजु
जरा आधी दिली असतीस तर न्यु यर इव्ह ला नसती का केली??
असो...
रेसिपी बाकी छानच हो! :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
3 Jan 2010 - 9:15 am | JAGOMOHANPYARE
आता यातले नॉन वेज काढून टाकून उरलेल्या वेजातून काही बनते का बघतो.. .... :)
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
3 Jan 2010 - 12:25 pm | आशिष सुर्वे
छान
सुंदर
अप्रतिम
..
..
..
..
-
कोकणी फणस
4 Jan 2010 - 11:44 am | दिपक
आवडती डिश. प्रिंटाऊट काढुन घेतले आहे. धन्यवाद रे गणपा.
4 Jan 2010 - 5:58 pm | धनंजय
आधी डोळ्यांनी, मग जिभेने!
5 Jan 2010 - 9:17 am | पाषाणभेद
डोळे अन आत्म तृप्त झाला.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
6 Jan 2010 - 8:53 am | टोळभैरव
सहमत.
मी टोळ. :)
(मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )
10 Jan 2010 - 8:16 am | श्रीयुत संतोष जोशी
अ प्र ति म
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
10 Jan 2010 - 3:54 pm | मॅन्ड्रेक
ह्या वरुन समजा काय ते.
at and post : Xanadu.
11 Jan 2010 - 2:08 pm | मसक्कली
=P~
11 Jan 2010 - 8:16 pm | अविनाशकुलकर्णी
खुप मस्त....
11 Jan 2010 - 11:10 pm | ऋषिकेश
वा!!! रेसिपी "बघितली"! :) आवडली! :)
--ऋषिकेश