आमच्या वाचनात आलेल्या खबरीनुसार याहू शोध, फ्लिकर आणि बिंग शोध या संस्थळांनी भारतीय जनतेला आंतरजालावरील अश्लील स्थळांपर्यंत पोहोचू न देण्याचा विडा उचलला आहे. बातमीमध्ये असेही प्रतिपादन केले आहे की आपल्या भारतमातेच्या सुकन्या/पुत्रांचे 'सेक्स'शी संबंधित शोध करण्याचे प्रमाण इतर देशांच्या पुत्र/कन्यांपेक्षा अधिक आहे. हे वाचून अभिमानाने आमचा उर दाटून आला, पण त्वरित चिंताही वाटू लागली, की आता आपल्या देशाचे कसे होणार?
आमचा परममित्र गूगल (डू नो ईव्हिल) याने अजून तरी असे काही पाऊल उचललेले दिसत नाही, हाच त्यातल्यात्यात भारतमातेच्या (आमच्यासारख्या कोट्यवधी) सुकन्या/पुत्रांना दिलासा.
ता. क. गार्डिअनने आम्हाला 'सविता भाभी'शी ओळख करून दिल्याबद्दल त्यांचेही आभारच मानायला हवेत. मात्र सरकारी ससेमिर्यापायी भाभीचे दर्शन हुकणार, त्यामुळे तूर्तास आभारप्रदर्शन संस्थगित.
- चिंतातुर जंतू :S
प्रतिक्रिया
30 Dec 2009 - 6:46 pm | अवलिया
प्रॉक्सी वापरा कुठलीही साईट बॅन असेल तर.. अधिक माहिती साठी मास्तरला लिहा.
--अवलिया
30 Dec 2009 - 7:21 pm | चिंतातुर जंतू
संस्थळांवर बंदी नसेलही; पण ती हुडकून काढण्यास मदत करणार्या शोध इंजिनांनीच असहकार पुकारला आहे. नमुन्यादाखलः समजा एखाद्या विशिष्ट तरुणीची टंच छायाचित्रे शोधण्याचा आपला मनसुबा आहे. आपण भारतीय असल्याचे कळताच ती शिंची इंजिने तिची (पक्षी: उपरोल्लेखित विशिष्ट तरुणी) केवळ शालीन छायाचित्रे आपणास सादर करून तो (पक्षी: मनसुबा) धुळीस मिळवतील ना! अधिक माहितीसाठी गूगल सेफ सर्च हा दुवा पाहावा. बिंग किंवा याहू शोध आता पुळचट संस्थळेच शोधणार :S
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
30 Dec 2009 - 9:20 pm | अमृतांजन
इंटर्नेट सर्व्हीस प्रोव्हायडर लोकांचा बिझनेस मार खाणार आता. त्या तसल्या साइटचे कर्ते-करवते कोण हे पाहिले असता धक्कादायक बातम्या मिळतील.
30 Dec 2009 - 9:59 pm | शाहरुख
त्या तसल्या साइटचे कर्ते-करवते आय्.एस्.पी. असतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?
30 Dec 2009 - 9:45 pm | चिरोटा
वा. म्हणजे नुसती चित्रे बघायला बंदी पण 'ना.द.' तिवारींसारख्या लोकांनी गांधी टोपी घालून राजभवनात काहीही केले तरी साधी अटक पण नाही?
भेंडी
P = NP
30 Dec 2009 - 11:46 pm | बिपिन कार्यकर्ते
बहुतेक चालत असावे... टोपी घालणे ही चांगली गोष्ट आहे. :D
बिपिन कार्यकर्ते
31 Dec 2009 - 5:25 am | चतुरंग
आता 'नादभवन' असं करायला हरकत नाही! ;)
(नादखुळा)चतुरंग दत्त तिवारी
31 Dec 2009 - 7:56 am | विनायक प्रभू
असेच म्हणतो.
पुस्तकांना परत चांगले दिवस येणार की काय?
विप्र त्रीवारी.
31 Dec 2009 - 8:02 am | प्रभो
पुस्तकांना चांगले दिवस आले तर कॉलेज लायब्ररीत गर्दी वाढणार....
--(वाचक)प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
31 Dec 2009 - 8:12 am | छोटा डॉन
अहो पुस्तकांना चांगले दिवस येणार म्हणजे लायब्रीत गर्दी वाढणार असे नव्हे.
अहो ती पुस्तके वेगळी ;)
ती लायब्रीत कशी मिळतील ? अर्थात आजकाल ती ही "सोय" झाली असल्यास काही कल्पना नाही बॉ ;)
बाकी मास्तरांशी आणि अवलियाशी सहमत ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
31 Dec 2009 - 7:58 am | विनायक प्रभू
कशाला बॉ?
जगभरातुन अभिनंदन व्हायला पाहीजे.
वय ८५+ मधे ट्रीपल संडे व्वा.
31 Dec 2009 - 6:39 am | सन्जोप राव
भारतीय लोक आणि लैंगिकता हा एक मनोरंजक 'विषय' आहे. भारतीय लोकांचा लैंगिकतेकडे बघण्याचा (दुटप्पी) दृष्टीकोन, लैंगिकतेला 'तसले काहीतरी घाण' समजण्याची वृत्ती, लैंगिक शिक्षणाला 'काहीतरी फाजीलपणा आहे झालं, लग्नं झाली की सगळं व्यवस्थित होतं. आम्हाला कुणी काय सांगितलं होतं? झालीच ना आम्हाला मुलं?' असे म्हणून हिणवण्याची वृत्ती हे सगळे एका बाजूला आणि या प्रचंड लोकसंख्येच्या उष्ण कटिबंधीय देशात दहाव्या -बाराव्या वर्षांपासूनच शरीरात आतून धडका देणारी ती आदिम कामवासना याचा अनंत काळापासून चालत आलेला गोंधळ आहे. भारतात अश्लील संकेतस्थळे बघणार्यांची संख्या जगात सर्वात अधिक असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. या खंडप्राय देशात निकोप, निरोगी लेंगिक सुखाला पारखे झालेल्यांची संख्याही प्रचंड आहे. अविवाहित लोक, विवाहित असून नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी राहाणारे लोक, विधवा, विधुर आणि घटस्फोटित... ही न संपणारी यादी आहे. त्यातून कायदेशीर रीत्या नवरा-बायको नसलेल्या पण एकमेकांशी पूर्ण संमतीने लैंगिक संबंध ठेवू इच्छिणार्या युगुलांमागे कायद्याचा आणि त्याहूनही मोठा असा 'मॉरल पोलिसिंग' करणार्या सनातन संघटनांचा बडगा आहे. मग अशा कोट्यवधी उपाशी लोकांनी आपली ही भूक भागवायची तरी कशी? आंतरजालावर लैंगिक विषयांवरच्या संकेतस्थळांचा सुकाळच नव्हे तर सुळसुळाट आहे. त्यामुळे गावागावांतून, खेड्याखेड्यांतून आणि असंख्य इंटरनेट कॅफेंमधून लाखो तरुण तरुणी मांड्या चुळबुळत असल्या साईटस बघत असतात.
पण असे केल्याने त्यांच्या अनावर कामवासनेचे दमन होते का? तर मुळीच नाही. मुळात आंतरजालावरील लैंगिकतेला वाहिलेली संकेतस्थळे अत्यंत भडक, बटबटीत आणि अतिरेकी असतात ( वर सविताभाभीचा उल्लेख झालेलाच आहे) . आंतरजालावरील बरेचसे लैंगिक साहित्य हे अनैतिक शारीरिक संबंध, अनैसर्गिक संबंध या विषयांवरचे, चटपटीत, मसालेदार आणि 'जनते'ला आवडेल असे असते. असल्या सगळ्याने झालेच तर मूळ लैंगिक भावनांचे विकृतीकरणच होत असेल.
(मला वाटते) 'कोसला' मध्ये चांगदेवचा पार्टनर त्याला म्हणतो, "खुल्लमखुल्ला चढने दो सालोंको, दो सालमें अपने आप ठंडे पड जायेंगे' वरकरणी अश्लील वाटणार्या या वाक्यामध्ये भारतीय लैंगिक समस्यांचे उत्तर आहे, असे मला वाटते.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
31 Dec 2009 - 7:06 am | अमृतांजन
तुमचा प्रतिसाद वाचून लग्नाचे वय कमी असावे की काय असे वाटू लागले आहे.
31 Dec 2009 - 7:49 am | टारझन
मागे कोणीतरी मिपावर वर्ल्डफेमस सदस्याने "बालविवाह चालू करावेत काय ? " म्हणून धागा सुरू केला होता. तो पण आपलाच आय.डी. होता काय ?
असो ! संजोपराव म्हणतात ते आम्हालाही माहित होत :) पण अगेन :) सो कॉल्ड आणिबाणीत प्रतिसाद उडेल म्हणून तेवढं स्पष्ट लिहीलं नाही !
एक बरंय हल्ली आयटीवाल्यांनी ऑनसाईट चान्स मिळतो , काम करायचा.
असो बदलीन !
- ( टार्याचा जगप्रसिद्ध मित्र) जंबो
31 Dec 2009 - 10:25 am | पर्नल नेने मराठे
सविता नाव किति बदनाम झालेय
शी...आय हेट ऑल दिस नॉनसेन्स.. X(
चुचु
31 Dec 2009 - 6:48 am | वाचक
(कोसला चा नायक पांडुरंग सांगवीकर आहे.)
31 Dec 2009 - 9:46 am | विजुभाऊ
बरोबर कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर आहे आणि त्याचा मित्र गिरीधर आहे.
चांगदेव पाटील हा एक प्राध्यापक आहे. त्यामुळे कदाचित चित्रपटातल्या नायकाच्या जागी प्रेक्षक स्वतःला कल्पत असतो त्याप्रमाणे आपल्या प्राध्यापकसाहेबांचाही थोडा गैर समज झाला असावा.
कोणत्याच वासनेचे दमन करने शक्य नसते. दमन वरवर दिसले तरी मन आतून बंड करत असते.
ओशो रजनीश म्हणतात त्या नुसार ब्रम्हचारी रहाणारा सर्वात जास्त विचार कामवासनेबद्दल करत असतो.
31 Dec 2009 - 10:08 am | छोटा डॉन
>>बरोबर कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर आहे आणि त्याचा मित्र गिरीधर आहे.
बरोबर.
नायक हा पांडु सांगवीकर आहे पण मित्र अनेक आहेत असे वाटते. कोणा एकाचे नाव घेता येणार नाही.
इफॅक्ट तुम्ही जे "गिरीधर"चे नाव घेता आहात तो त्याचा कॉलेज जीवनातील मित्र नसुन कादंबरीच्या शेवटी जेव्हा पांडु गावाकडे परत जातो तेव्हा त्याला भेटलेल्या रिकामटेकड्या मित्रांमधला एक म्हणजे गिरीधर. इतर नावे सोटम्या वगैरे आठवतात.
त्याच्या कॉलेजच्या मित्रात सुर्ष्या ( सुरेश ), इचल्या (इचलकरंजीकर ) ( किंवा हे दोन्ही एकच असु शकतील ) , जंगम, सोमण, पाटील आदी नावे येतात, ह्यांच्याशी त्याचे दोस्ती जरा घनिष्ठ दाखवली आहे. कॉलेजात असताना गिरीधर ह्या नावाचा कोणीही त्याचा दोस्त नाही.
असो, बाकी चालु द्यात.
>>चांगदेव पाटील हा एक प्राध्यापक आहे.
हम्म्,
नेमाड्यांच्या "झुल, बिढार आणि जरिला" ह्या तिन्हही कादंबर्या "चांगदेव पाटील" ह्या नायकावर बेतलेल्या आहेत ( असे मला वाटते ). त्यातली मी फक्त "जरिला" वाचली आहे व त्यात चांगदेव "प्राध्यापक ( म्हणजे कॉलेजात शिक्षक असतो, त्याचे पद नक्की प्राध्यापक आहे का रिडर आहे ह्यावर जाणकार प्रकाश टाकतीलच )" असतो / आहे. बिढारबद्दल माहित नाही.
नो कमेट्स !!!
चालु द्यात, आम्हाला काय कळते त्यातले ?
------
छोटा डॉनरंग सांगवीकर
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
31 Dec 2009 - 11:51 am | विजुभाऊ
चांगदेव पाटील हा आसिस्टन्ट लेक्चरर आहे. त्या काळी उदा: क्लॉक अवर बेसीस वगैरे आस्तित्वात नव्हते नाहीतर तो तस्सच असता,
असो.
कोसलातले सर्वात जास्त भिडलेले वाक्य म्हणजे पांदुरंग सांगवीकरची बहीण मरते तिला पुरतात तेंव्हा सांगवीकर म्हणतो " तीच्याबरोबर तिचे इवलेसे गर्भाशय ही पुरले गेले. आणि त्याबरोबरच पुढील अनेक पिढ्यादेखील "
31 Dec 2009 - 8:36 am | मदनबाण
http://bit.ly/8OS0iO
विळखा.. http://www.misalpav.com/node/4777
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
31 Dec 2009 - 8:54 am | प्रकाश घाटपांडे
गरज ही शोधाची जननी आहे. ती जेव्हा संपेल त्यावेळी चावट शोध आपोआप बंद होतील. :?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
31 Dec 2009 - 11:29 am | Nile
जननीच्या अंतापर्यंत अपत्यप्राप्तीची अपेक्षा काही नविन नाही! :)
31 Dec 2009 - 11:42 am | अर्चिस
गरज ८७व्या वर्षी देखील संपली नाही. ते नुसते शोध घेउन थांबले नाहीत.......
ह्यांनी म्हणे स्वातंत्रलढ्यात भाग घेतला होता!!!!!
31 Dec 2009 - 11:45 am | अर्चिस
गरज ८७व्या वर्षी देखील संपली नाही. ते नुसते शोध घेउन थांबले नाहीत.......चावट शोध जाऊद्या........ह्या तिवारींच्या प्रवृत्तींना आवरा.
ह्यांनी म्हणे स्वातंत्रलढ्यात भाग घेतला होता!!!!!
31 Dec 2009 - 2:28 pm | चिरोटा
तिवारींचे हे 'नाद' गेल्या अनेक वर्षांपासुन आहेत.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पासुन अनेक लोकांनी तिवारींविरुद्ध तक्रार केली होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाल्यावर महत्वाच्या ठिकाणी विशेष राजकिय कार्य न केलेल्या स्त्रियांची अचानक वर्णी लागायची.!!
आश्चर्याचा भाग म्हणजे मिडियावाले ह्या विषयावर काहीच बोलायला तयार नाहीत.५००० मैलांवरचे क्लिंटन्-मोनिका प्रकरण तर भारतिय मिडियानेही बरेच चघळले.म.टा./लोकसत्ताने क्लिंटन ह्यांना सबुरीचे सल्लेही दिले होते.
भेंडी
P = NP
31 Dec 2009 - 1:16 pm | आशिष सुर्वे
आता बहुधा पर्रदेसात नोकरी शोधावी लागणार बहुतेक!!
-
कोकणी फणस
31 Dec 2009 - 2:27 pm | ब्रिटिश टिंग्या
अरेरे! :(
अंमळ हळव्या नंदनचा हेवा वाटतोय! :(