क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले - पुण्यतिथी

शेखर's picture
शेखर in जनातलं, मनातलं
10 Mar 2008 - 12:41 pm

क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिनी विनम्र अभिवादन.

थोडक्यात जीवनपट......

जन्म - ३ जानेवारी १८३१
लग्न - १८४०
शिक्षणाची सुरवात - १८४१
मराठवाड्यात शाळेची स्थापना - १८४७
पुण्यात मुलींची पहिली शाळेची स्थापना - १ जानेवारी १९४८
प्रौढांसाठी शाळा चालू - १८४९
निधन - १० मार्च १८९७

- (नतमस्तक) शेखर

प्रतिक्रिया

राजमुद्रा's picture

10 Mar 2008 - 12:48 pm | राजमुद्रा

आज आम्ही सर्व मुली ज्यांच्या कर्तुत्वामुळे शिक्षण घेत आहोत, स्वतःच्या पायावर उभे राहात आहोत त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे विनम्र अभिवादन!
जर यांनी आयुष्यात कष्ट सहन केले नसते तर आज मी कुठे असते याची कल्पना सुद्धा करता येत नाही.

राजमुद्रा :)

राजमुद्रा's picture

10 Mar 2008 - 12:50 pm | राजमुद्रा

पुण्यात मुलींची पहिली शाळेची स्थापना - १ जानेवारी १९४८
यातील साल १९४८ ऍवजी १८४८ आहे का? मला स्वतःला ते माहित नाही तसे नसल्यास क्षमा असावी

राजमुद्रा :)

शेखर's picture

10 Mar 2008 - 1:01 pm | शेखर
शेखर's picture

10 Mar 2008 - 12:59 pm | शेखर

आपले अगदी बरोबर आहे. १९४८ च्याऍवजी १८४८ असे वाचावे. चुकी बद्दल क्षमस्व....

- (शरमिंदा) शेखर

सृष्टीलावण्या's picture

10 Mar 2008 - 2:09 pm | सृष्टीलावण्या

एक स्त्री म्हणून सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ. भीमराव आंबेडकर यांचे ऋण खरोखरच मान्य करायला हवे. स्री - शिक्षण, घटनेने स्रियांना दिलेले समान अधिकार हे पाहून भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय असल्याचा गर्व वाटतो.

सावित्रीबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

आनंद घारे's picture

10 Mar 2008 - 4:53 pm | आनंद घारे

सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७)
साता-याजवळच्या नायगांव येथे जन्मलेल्या सावित्रीबाई थोर समाजसुधारक होत्या. या कार्यात त्यांना त्यांचे पति महात्मा ज्योतीराव फुले यांचेकडून प्रोत्साहन मिळाले. ब्रिटीश राजवटीमध्ये स्त्रियांच्या हक्कासाठी झटणारी ती पहिली स्त्री होती. पुणे येथे सुरू झालेल्या महिलांच्या पहिल्या विद्यालयामधील पहिली शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला. स्त्रियांचे शिक्षण व पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये होणा-या जाचापासून तिची मुक्तता करणे, विधवांचे विवाह आणि अस्पृष्यतानिवारण ही त्यांनी आपल्या जीवनाची उद्दिष्टे ठरवली. सन १८५२ मध्ये त्यांनी अस्पृष्य मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उघडली. १९६८ साली त्यांनी अस्पृष्यांना आपल्या विहिरीमधून पाणी भरण्यासाठी आमंत्रित केले. १९७३ मध्ये एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी समाजासाठी एक उदाहरण घालून दिले.
ज्या काळांत स्त्रियांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते, त्या काळांत त्यांचे चौफेर कार्य इतर महिलांच्या तुलनेने ठळकपणे उठून दिसण्यासारखे होते. पुण्याच्या सनातनी लोकांनी त्यांच्या या तत्कालिन रूढीविरुध्द जाणा-या "अघोरी" कामगिरीवर जळजळीत टीकास्त्र सोडले व त्याला कडाडून विरोध केला. तरीही सत्यशोधक समाजाची सक्रिय सदस्य राहून त्या अस्पृष्य व महिलांच्या मुक्तीसाठी झटत राहिल्या.

जर यांनी आयुष्यात कष्ट सहन केले नसते तर आज मी कुठे असते याची कल्पना सुद्धा करता येत नाही.

१००% सहमत.
स्री - शिक्षण, घटनेने स्रियांना दिलेले समान अधिकार हे पाहून भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय असल्याचा गर्व वाटतो.

खरं आहे.

सुधीर कांदळकर's picture

10 Mar 2008 - 9:52 pm | सुधीर कांदळकर

दगडफेक केली. त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे मारले. तरी त्या विचलित झाल्या नाहीत.

त्यांना सहस्र प्रणाम.

शेखरशेठ आपण हा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

11 Mar 2008 - 1:02 pm | विसोबा खेचर

म्हणतो..!

आपला,
(नतमस्तक) तात्या.

प्राजु's picture

11 Mar 2008 - 1:35 am | प्राजु

आज आम्ही सर्व मुली ज्यांच्या कर्तुत्वामुळे शिक्षण घेत आहोत, स्वतःच्या पायावर उभे राहात आहोत त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे विनम्र अभिवादन!
जर यांनी आयुष्यात कष्ट सहन केले नसते तर आज मी कुठे असते याची कल्पना सुद्धा करता येत नाही.

राजमुद्राताईंशी सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु

आपला आभि's picture

11 Mar 2008 - 6:23 am | आपला आभि

इनोदी लेख .. काळजाला हात घालणारे (आणि ते वडून काढणारे), भावनिक वगैरे वगैरे... असल काहि लिहनारे कमी नाहीत ..पण तुम्ही काहि सत्य आणि स्फुर्तीदायी लिहित आहत हे पाहुन , वाचुन आनन्द वाटला ..
लिहीत रहा...

---
थोरांच्या उपकारावर या दुनियेत अंग फुगवून वावरनारं आपल एक चिलट
आआआभि