केंद्रिय मंत्री म्हणे वर्षातून ४८ वेळा...आपल्या कितीही नातेवाईकांसकट....विमानाने फुकट प्रवास करू शकतात......म्हणजे माकडाच्या हाती कोलीतंच की !
दुसरी बातमी आता नोकरदारांना मिळणार्या सगळ्या भत्त्यांवर कर भरावा लागणार आहे. हा कर पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ एप्रिल २००९ पासून लागू होणार असल्याने यंदा चालू वर्षांतच करदात्यांवरील कराचा बोजा वाढणार !
वा रे खासा न्याय ! अर्थमंत्री झोपलात काय ? आधीच महागाईने, मंदीने होरपळलेल्या प्रामाणिक करदात्याचे कंबरडे मोडण्याची ही सरकारची नवी चाल. आता निवडणूका ५ वर्षांनी होतील त्यामुळे अर्थातच् या मतदारांची सरकारला गरज नाही, तुम्ही जगा किंवा मरा आम्ही ५ वर्ष ऐश करणार ! बिसलरीवर कर लादून पाण्यासारख्या गरजेच्या वस्तूला महाग करणार, पाऊस नाही म्हणून अन्नधान्याच्या तुटवड्यावर मात करण्याकरता आयात करून त्यातही हात मारणार.
वा रे न्याय !
गाभा:
प्रतिक्रिया
23 Dec 2009 - 3:27 pm | टारझन
छाण लेख ! काँग्रेसवाल्यांनी आवर्जुन वाचावासा :)
23 Dec 2009 - 3:59 pm | चिरोटा
उद्याच्या लोकसत्तेच्या अग्रलेखात कुमार केतकर ह्या नविन करांचे स्वागत करतील. त्याचे समर्थन करायला युरोप्/अमेरिकेची कुठली तरी उदाहरणे देतील.
भेंडी
P = NP
25 Dec 2009 - 11:04 am | स्वानन्द
हो ना... हे एवढे आभ्यासू लोक आपली बुद्धीमत्ता अशा सरकारच्या पायी गहाण टाकतात हे पाहून खूप वाईट वाटतं.
शिवाय, निवड्णूकांच्या काही दिवस आधी सर्व वस्तूंचे दर कमी केले की झालं...मतदारांची स्मरणशक्ती तर काय फार कमीच असते ना!
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
23 Dec 2009 - 4:36 pm | jaypal
माझ्या कडे अशी विचारणा करणार वाटत?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
23 Dec 2009 - 4:38 pm | llपुण्याचे पेशवेll
चित्र सहीच आहे रे जयप्या. एक नंबर.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
23 Dec 2009 - 5:14 pm | स्वाती२
सॉलिड!
23 Dec 2009 - 9:16 pm | झकासराव
जयपाल क्लासिक व्यंगचित्र आहे हे.
बाकी सरकारी पवित्र्याबद्दल काय बोलणार.
आधीच महागाई त्यात कर वाढवतील.
महागाईवर ताबा मिळवण्यासाठी मार्केटमधील लिक्विडिटी कमी करण्याचा हा एक उपाय वाटतोय. मार्च नंतर गृहकर्जेदेखील व्याजदर वाढवतील अस वाटतय.
अवलियासारख्या जाणकारानी एखादा माहितीपुर्ण लेख टाकावा अशी इच्छा आहे.
24 Dec 2009 - 12:19 pm | ब्रिटिश टिंग्या
श्री जयपाल-जी,
बर्याच कालानंतर मिपावर अर्थ समजणारे व्यंगचित्र पाहिल्याने आनंद झाला!
24 Dec 2009 - 12:30 pm | प्रभो
प्रतिक्रियेने पूर्व आशियात परत सुनामी येणार तर... =))
रोमन लुंग्या
23 Dec 2009 - 5:28 pm | मदनबाण
ताई,अहो जिथे गरीबाला खायला धान्य नाही तेथे त्याच धान्यापासुन मदिरा बनवण्यासाठी परवाने वाटले जातात...राजकारणी म्हणजे सफेद पोशाखातले काळे गुंड असं म्हंटल तर चूकीचे ठरेल काय ?
तुम्ही आम्ही ४ चाकी घेऊ पण उडी कितपत जाईल... यांच्या गाड्यांची नावे तर वाचा आणि ती गाडी कष्टाच्या पैशाने सामान्य व्यक्ती कधी घेऊ शकेल काय ? अहो मंदी ही आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठीच !!!
पुन्हा निवडणुका आल्या की तोच ड्रामा परत रिपीट करायचा...पुन्हा काही दिवस मिडीया समोर पैसा बचाव अभियान सादर करायच...
आधी ब्रिटीश राज्य करत होते आत्ता हे लोक करत आहेत...शेवटी होरपळला जातो तो सामान्य नागरिक.
शेतकरी आणि सेना यांचे पूर्ण खच्चीकरण करुन हे लोक देश विकायला सुद्धा काढतील...म्हणजे या राजकारणी लोकांची वाटचाल पाहिली की याची खात्रीच पटते.
आता २००९ संपुन २०१० सुरु होईल... तेच खड्ड्यातले रस्ते...तीच लोकलची गर्दी...तेच टॅकरचे पाणी, तेच विजेचे भार नियमन्,नव्याने शेतकर्यांच्या आत्महत्या...आणि...नको !!! आपला देश नक्की कुठे चालला आहे याचे भानच या राजकारणी लोकांना राहिलेले नाही.
(हिंदूस्थानी)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
23 Dec 2009 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वसामान्य पगारदारावर त्याचा परिणाम होणार नाहीत म्हणतात.
घरभाडे, प्रवास भत्त्यावर किती कर बसेल कोणास ठाऊक ?
-दिलीप बिरुटे
[घरभाडे, प्रवासभत्ता घेणारा]
24 Dec 2009 - 12:50 am | अडाणि
नोकरदार लोकांप्रमाणे सर्व मंत्र्यांना पण कर का नाही लागू करत...
-
अफाट जगातील एक अडाणि.
24 Dec 2009 - 8:24 pm | देवदत्त
प्रकाटाआ
24 Dec 2009 - 4:39 pm | ज्ञानोबाचे पैजार
ज्या देशात,
ज्या देशात मतदानाच्या दिवशी सहलीला जाणारे नागरिक आहेत,
ज्या देशात ज्याला प्राथमिक शिक्षण देखिल पुर्ण करता आले नाही अशा नागरीकाला देशातील सत्ता कोणाच्या हाती पाहीजे याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे,
ज्या देशात पैसे फेकुन मत मिळवली जाउ शकतात,
ज्या देशाच्या प्रत्येक नागरीकाने आयुष्यात एकदा तरी भ्रष्टाचार केला आहे,
ज्या देशातील नागरीक शेजारच्या घरी शिवाजी जन्माला यावा म्हणुन प्रार्थना करत असतो, व स्वतः च्या मुलांना उच्च शिक्षणाच्या नावाखालि परदेशी पाठ्वतो,
ज्या देशात केवळ जातिच्या आधारे कोणत्याहि ठिकाणी प्राधान्य मीळु शकते,
ज्या देशात जात, धर्म, प्रदेश यांना गुणवत्ता, निती या पेक्षा जास्त प्राधान्य मिळते,
ज्या देशात मुलगा हवा या हट्टा पायी गर्भातच मुलींची हत्या केली जाते,
ज्या देशात मेळाघाट, किल्लारी या सारख्या आपत्ती ग्रस्त भागात दील्या जाणार्या मदतीत भ्रष्टाचार होतो,
ज्या देशात शेतकर्या पेक्षा दलाल अधिक गब्बर आहेत,
ज्या देशात खुनी, गुंड मवाली असणे हीच सत्ताधारी बनण्या साठी असलेली पात्रता असते
असल्या देशातल्या ज्या नागरीकाला त्या देशात काडीची ही किंम्मत नाही, त्याने असले प्रष्ण इतर फालतु नागरीकांना विचारु नयेत
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
24 Dec 2009 - 5:30 pm | धमाल मुलगा
काय बोलु पैजारबुवा,
सगळं सगळं अगदी पटतंय.
दुर्दैव देशाचं..आणी आपलंही! आपणच माती खातो तर दुसर्याला काय बोल लावणार?
25 Dec 2009 - 2:18 pm | अविनाशकुलकर्णी
घटना हाय ज्यक केली आहे..व पक्षिय सामुदायीक हुकुम शाहि आहे,,ति हि लोक्शहिच्या मार्गाने,