कदाचीत माझे अज्ञान असेल ; पण आत्तापर्यंत फक्त पुरुष नटांनाच हा पुरस्कार मिळाल्याचे स्मरते. [ कुणी माझे अज्ञान दूर करीलका ?] तसा काही नियमच आहे का? नसेल तर स्त्री कलाकाराचे नांवही विचारात घ्यायला काय हरकत आहे ?
------- केशवराव .
'प्राण' ह्यांना 'जीवनगौरव' हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर आता कुठला पुरस्कार देणे उचित होईल का? 'फाळके पुरस्कार' सर्वोच्च असेल तर 'जीवनगौरव' पुरस्कार का देतात?
येस...! प्राणलाच मिळावा ! आपणही सहमत.
तो केवळ खलनायकच नव्हता तर तितक्याच ताकदीचा चरित्र अभिनेताही होता.
शिवाय प्रसंगी विनोदीही (उदा : व्हिक्टोरिया नंबर २०३) !
कुठेही अतिरेकीपणा किंवा गेट अप चा सोस नाही...केवळ अभिनयाच्याच सहाय्याने भूमिका करत राहिला...
प्राणसाहेबा॑ना कुठलीही भूमिका द्या..त्या॑नी प्रत्येक भूमिकेत खर्या अर्थाने 'प्राण' ओतला. 'आह' मध्ये डॉक्टर, 'जिस देस मै ग॑गा बहती है' मधला डाकू॑चा म्होरक्या, 'मधुमती' मधला टि॑बर इस्टेटचा मग्रूर मालक, व्हिक्टोरीया न॑. २०३ मधला मिष्किल 'राणा', 'परिचय' मधला राजासाहब, 'ज॑जीर' मधला 'शेरखान', आणि अगदी अलिकडे म्हणजे 'खोसला का घोसला' मधला पैलवा॑नाचा उस्ताद्..किती तरी भूमिका प्राणसाहेबा॑नी आपल्या कसदार अभिनयाने र॑गविल्या. काही कलाकार उतार वयातसुद्धा देखणे दिसायचे ते म्हणजे अशोककुमार आणि प्राण! त्या॑ना शेरवानी, ब्लेझर- टाय वगैरे दिमाखदार कपडे काय मस्त शोभायचे..अशोककुमारसुद्धा 'मेरे मेहबूब' मध्ये काय शोभलाय नवाबाच्या भूमिकेत्..अस्सल लखनवी नूर
सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या
गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन,
कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला
नाना आणी अमिताभ सोडुन बाकिच्यांची तुलना प्राण साहेबांशी होउ शकत नाही
प्रतिक्रिया
9 Mar 2008 - 10:54 pm | प्राजु
किंवा अनुपम खेर यांनाही ...
- (सर्वव्यापी)प्राजु
9 Mar 2008 - 11:55 pm | भडकमकर मास्तर
हा उपहास नाही ना?
10 Mar 2008 - 2:21 am | केशवराव
मलाही तसेच वाटते.
10 Mar 2008 - 7:13 am | विसोबा खेचर
माझ्या मते प्रख्यात खलनायक व बुजुर्ग चरित्र अभिनेता 'प्राण' या॑ना 'फाळके' पुरस्काराने सन्मानित करावे..इतर मिपाकरा॑ना काय वाटते..?
मी डॉ दाढ्यांशी पूर्णत: सहमत आहे...
आपला,
(प्राणप्रेमी) तात्या.
10 Mar 2008 - 6:55 pm | विवेकवि
मला वाटते कि प्राण साहेबा॑पेकक्षा अजुन खुप व्यक्ती आहेत...
त्या॑ना सुद्धा देऊ शकता ...
विवेक वि.
10 Mar 2008 - 11:08 pm | केशवराव
उदाहरणादाखल .............?
10 Mar 2008 - 11:09 pm | केशवराव
उदाहरणादाखल .............?
10 Mar 2008 - 6:59 pm | व्यंकट
डिजर्वस् ईट.
आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/
10 Mar 2008 - 8:50 pm | चतुरंग
खलनायकांच्या भूमिकेत एक वेगळाच 'प्राण' ओतणार्या ह्या कलंदर कलावंताला हा पुरस्कार नक्कीच शोभून दिसेल.
चतुरंग
10 Mar 2008 - 9:45 pm | सुधीर कांदळकर
विवेकवि जी कृपया हवेत दगड मारू नका. नावे द्या.
11 Mar 2008 - 12:10 am | llपुण्याचे पेशवेll
दादासाहेब फाळके पुरस्कार खरे तर मला द्या.
मी अनेक चित्रपट स्वखर्चाने पाहून भारतीय चित्रपटसृष्टीला किती मदत करत आहे! :)
असो. चावटपणा सोडून. खरे तर हा पुरस्कार प्राण याना मिळावा असे मलाही प्रामाणिक पणे वाटते आहे.
पुण्याचे पेशवे
11 Mar 2008 - 8:01 am | केशवराव
कदाचीत माझे अज्ञान असेल ; पण आत्तापर्यंत फक्त पुरुष नटांनाच हा पुरस्कार मिळाल्याचे स्मरते. [ कुणी माझे अज्ञान दूर करीलका ?] तसा काही नियमच आहे का? नसेल तर स्त्री कलाकाराचे नांवही विचारात घ्यायला काय हरकत आहे ?
------- केशवराव .
11 Mar 2008 - 2:53 pm | नंदन
पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार देविकाराणींना मिळाला होता. शिवाय दुर्गाबाई खोटे, लता, आशा यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आलेय.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
15 Mar 2008 - 1:56 am | केशवराव
नंदन ,
माहिती मधे भर घातल्याबद्दल आभार.
14 Mar 2008 - 2:53 pm | विवेकवि
देव आन॑द
विवेक वि.
15 Mar 2008 - 1:43 pm | प्रभाकर पेठकर
'प्राण' ह्यांना 'जीवनगौरव' हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर आता कुठला पुरस्कार देणे उचित होईल का? 'फाळके पुरस्कार' सर्वोच्च असेल तर 'जीवनगौरव' पुरस्कार का देतात?
15 Mar 2008 - 4:30 pm | सचिन
येस...! प्राणलाच मिळावा ! आपणही सहमत.
तो केवळ खलनायकच नव्हता तर तितक्याच ताकदीचा चरित्र अभिनेताही होता.
शिवाय प्रसंगी विनोदीही (उदा : व्हिक्टोरिया नंबर २०३) !
कुठेही अतिरेकीपणा किंवा गेट अप चा सोस नाही...केवळ अभिनयाच्याच सहाय्याने भूमिका करत राहिला...
15 Mar 2008 - 5:55 pm | डॉ.प्रसाद दाढे
प्राणसाहेबा॑ना कुठलीही भूमिका द्या..त्या॑नी प्रत्येक भूमिकेत खर्या अर्थाने 'प्राण' ओतला. 'आह' मध्ये डॉक्टर, 'जिस देस मै ग॑गा बहती है' मधला डाकू॑चा म्होरक्या, 'मधुमती' मधला टि॑बर इस्टेटचा मग्रूर मालक, व्हिक्टोरीया न॑. २०३ मधला मिष्किल 'राणा', 'परिचय' मधला राजासाहब, 'ज॑जीर' मधला 'शेरखान', आणि अगदी अलिकडे म्हणजे 'खोसला का घोसला' मधला पैलवा॑नाचा उस्ताद्..किती तरी भूमिका प्राणसाहेबा॑नी आपल्या कसदार अभिनयाने र॑गविल्या. काही कलाकार उतार वयातसुद्धा देखणे दिसायचे ते म्हणजे अशोककुमार आणि प्राण! त्या॑ना शेरवानी, ब्लेझर- टाय वगैरे दिमाखदार कपडे काय मस्त शोभायचे..अशोककुमारसुद्धा 'मेरे मेहबूब' मध्ये काय शोभलाय नवाबाच्या भूमिकेत्..अस्सल लखनवी नूर
13 Apr 2013 - 8:14 am | सन्जोप राव
ते प्राणसाहेब नव्हेत असे माझे मत आहे.
12 Apr 2013 - 11:39 pm | आशु जोग
आपली इच्छा पूर्ण झाली आहे
आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
या निमित्ताने मी एका बातमीला धागा होण्या पासूनही वाचवले आहे.
13 Apr 2013 - 12:04 am | चिरोटा
आपणासही त्या निमित्ताने सजाधावका मिपाकर पुरस्कार मिळाला आहे.
सर्वात जास्त धागे वर काढणारा मिपाकर.
13 Apr 2013 - 1:02 am | आशु जोग
जाऊ दे चिरोटाराव
काही करायला जाव बरं, तुमच्यासारखे मिसळकर म्हणतात आपलंच खरं
--
मी या बातमीचा एक धागाच काढतो नवीन, ही धमकी समजा हवी तर
13 Apr 2013 - 10:18 am | अमोल केळकर
अभिनंदन . आज ख-या अर्थाने पुरस्कारात ' प्राण ' आला
अमोल केळकर
13 Apr 2013 - 11:15 am | आशु जोग
सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या
गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन,
कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला यांनाही देतील उद्याच्या काळात
13 Apr 2013 - 11:19 am | श्री गावसेना प्रमुख
सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या
गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन,
कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला
नाना आणी अमिताभ सोडुन बाकिच्यांची तुलना प्राण साहेबांशी होउ शकत नाही
14 Apr 2013 - 10:18 am | पिंपातला उंदीर
शाहरूख, आमिर , जावेद अख्तर याना तो का मिळू नये ते कळल ; )
14 Apr 2013 - 12:13 pm | भडकमकर मास्तर
डॉक्टर दाढ्यांचे स्वप्न इतक्या वर्षांनी साकार झाले... अभिनन्दन... पार्टी झालीच पाहिजे
14 Apr 2013 - 12:32 pm | पंचम
शुक्रवारी प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याचे माझ्या वाचनात आले.
त्यांना ३ मे रोजी हा पुरस्कार देण्यात येईल त्यानंतर होणारी ही चर्चा आणि त्यामागचा हेतु समजला नाही