भारतीय महिला भारतीय पुरुषांसारखे वागायला लागल्या तर काय होईल?

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
20 Dec 2009 - 4:45 pm
गाभा: 

भारतीय महिला भारतीय पुरुषांसारखे वागायला लागल्या तर काय होईल?

उदा- भारतीय पुरुषांना जर मोजे धुवायला सांगितले तर जेव्हढे पाणी साधे मोजे धुवायला वापरतील तेव्हढे पाणी जर भारतीय महिला वापरायला लागल्या तर पुण्यासारख्या ठिकाणी धुण्याच्या पाण्यासाठी आणखी ३ धरणे बांधावी लागतील.

वरील उदाहरणाप्रमाणे आणखी उदाहरणे मिपाकर उत्साहाने सांगतील अशी अपेक्षा. :-)
ह्या चर्चेचा हेतू प्रामाणिक आहे; पुरुषवर्गावर चिकलफेक अथवा त्यांना खिजवण्याचा अजिबात हेतू नाही.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Dec 2009 - 4:55 pm | बिपिन कार्यकर्ते

उदा- भारतीय पुरुषांना जर मोजे धुवायला सांगितले तर जेव्हढे पाणी साधे मोजे धुवायला वापरतील तेव्हढे पाणी जर भारतीय महिला वापरायला लागल्या तर पुण्यासारख्या ठिकाणी धुण्याच्या पाण्यासाठी आणखी ३ धरणे बांधावी लागतील.

आपण जे विधान करत आहात ते काही विदाच्या आधारावर आहे की 'ठोकून देतो ऐसाजे' अशा प्रकारचे आहे? कृपया, निश्चित विदा द्यावा म्हणजे मग काही मत व्यक्त करता येईल.

बिपिन कार्यकर्ते

आनंद घारे's picture

20 Dec 2009 - 5:05 pm | आनंद घारे

पुरुष जर पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशात लहानाचा मोठा झाला असेल आणि स्त्रीच्या माहेरी नळाला चोवीस तास पाणी असेल तर तीच पाण्याचा अधिक अपव्यय करतांना दिसते हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. यात लिंगभेदाचा काही संबध नाही. ज्या परिस्थितीत मनावर जसे संस्कार होतात त्याप्रमाणे माणूस वागतो.
चर्चेचा हेतू प्रामाणिक आहे असे समजून हे तर्कशुद्ध उत्तर लिहिले आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

सन्जोप राव's picture

20 Dec 2009 - 5:12 pm | सन्जोप राव

पुरुष जर पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशात लहानाचा मोठा झाला असेल आणि स्त्रीच्या माहेरी नळाला चोवीस तास पाणी असेल तर तीच पाण्याचा अधिक अपव्यय करतांना दिसते हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. यात लिंगभेदाचा काही संबध नाही. ज्या परिस्थितीत मनावर जसे संस्कार होतात त्याप्रमाणे माणूस वागतो.
सहमत आहे.
स्त्रिया पुरुषांप्रमाणे वागू लागल्या तर काय हा प्रश्न अनाकलनीय आहे. पुरुष आणि स्त्री यांच्यात निसर्गाने काही फरक ठेवले आहेत. यातले काही शारीरीक तर काही मानसिक आहेत. फरक इतकेच माझे म्हणणे; त्यात सरसनिरस असे काही नाही.
त्यातही भारतिय महिला आणि भारतीय पुरुष असे वर्गीकरण का केले आहे ते कळत नाही. एकंदरीत एखादा दगड मारुन काही मोहोळ उठवून द्यायचे असा या चर्चाप्रस्तावाचा हेतू असण्याची शंका यायला वाव आहे.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

चतुरंग's picture

20 Dec 2009 - 10:12 pm | चतुरंग

स्त्रिया पुरुषांप्रमाणे वागू लागल्या तर काय हा प्रश्न अनाकलनीय आहे.
असला काहीतरी शेंडाबुडखा नसलेला प्रश्न विचारण्याचे उद्दिष्ट अनाकलनीय आहे. पण पाण्याचा प्रश्न विचारला आहे त्यामुळे उत्तर दिल्याशिवाय रहावत नाही!

माझे संपूर्ण लहानपण अहमदनगरला गेले. पाण्याचे दुर्भिक्ष्य काय असते हे मी फार जवळून अनुभवले आहे. उन्हाळ्याचे ४-५ महिने पाणी तीन चार दिवसांनी एकदा यायचे त्यावेळी पहाटे नळाला येणारी पाण्याची धार बघता बघता करंगळी एवढी होऊन जायच्या आत दोन का होईना बादल्या भरुन घ्यायची धडपड असायची, त्यातून वाड्यात रहायचो त्यामुळे अजूनच गर्दी! मी पाणी अतिशय जपून वापरतो. ते अंगात भिनूनच गेले आहे. अजून अमेरिकेतही गार/गरम पाण्याचे धो धो वाहते नळ असतानाही दाढीला किंवा दात घासताना मी थेट वाहता नळ फार क्वचित वापरतो अन्यथा छोट्या गडूत/ग्लासात पाणी घेऊन तेच वापरतो. कोणी पाणी नासताना दिसला की त्याला कधी एकदा त्याबद्दल सुनावतोय असं मला होऊन जातं! ;)

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2009 - 5:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रामराज्य येईल असे वाटते. कौटुंबिक न्यायालयांची गरज राहणार नाही.
कुटुंबव्यस्थेला भले दिवस येतील. राजकारण,शासकीय नौकर्‍यात आरक्षणाची गरज राहणार नाही. अजून खूप सांगता येईल.
थोडक्यात काय माणसं सुखी दिसतील. :)

-

-दिलीप बिरुटे

कौटुंबिक चर्चा ही गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे.
ती जेवणाच्या टेबलवर होणे कधीही चुकीचेच. [संग्रहातून]

पर्नल नेने मराठे's picture

20 Dec 2009 - 5:52 pm | पर्नल नेने मराठे

हे बघा...उगाच आम्हाला चाळवु नका /:) आम्ही पुरुषांसारखे वागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होइल. आम्ही आहोत म्हणुन तुमचे संसार निट चालले आहेत हे लक्शात ठेवा. बायांनो चला घ्या हातात लेखणीचे शस्त्र न पाडा पाऊस प्रतिसादांचा :D हा चान्स असा हातचा घालवु नका ;)
चुचु =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2009 - 6:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आम्ही पुरुषांसारखे वागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होइल.

थोडं खरं आहे. :)

>>आम्ही आहोत म्हणुन तुमचे संसार निट चालले आहेत हे लक्शात ठेवा.
म्याडम, माणसं दुख:चे कढ पचवितात, संसारात क्षणा-क्षणाला सावरुन घेतात,वेळ मारुन नेतात. म्हणून संसार टीकून आहेत. त्यात स्त्रीयांचे योगदान १०% ही नसेल असे वाटते. (विदा नाही. पण अनेक मित्रांचे अनुभव पुरेसे आहेत.) :)

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

20 Dec 2009 - 10:42 pm | चतुरंग

बायकांबद्दलचे अनुभव इतके वाईट असतील असं वाटलं नव्हतं! असो कल्जी घेने! ;)

(क्षणोक्षणी सावरुन घेणारा)चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2009 - 11:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>(क्षणोक्षणी सावरुन घेणारा)चतुरंग
हा हा हा यातच सारे काही आले. :)

खरं म्हणजे शिकल्या-सवरलेल्या स्त्रीया, सामाजिक जागृती, स्त्रीयांचे प्रश्न,
स्त्रीया कशा जवाबदारीनं वागतात. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवा:
जिथे स्त्रीयांचा आदर[पुजा] केला जातो तिथे देव [प्रमोद देव नाही] कसा नांदतो अशी दुस-या बाजूने चर्चा जाईल असे वाटले होते, पण काय जमले नाही. भारतीय पुरुष,स्त्री. मग अभारतीय, मग रुपये, डॉलर असा प्रवास अपेक्षीत होता. ;)

शिरीष कणेकर यांची स्त्री-दाक्षिण्याची झलक वाचा. :)

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

21 Dec 2009 - 12:43 am | चतुरंग

तुम्हाला विनोद समजला नाही!
(बाकी काहीही करुन डॉलरपर्यंत प्रवास जावा अशी, विनोदाने का होईना, अपेक्षा होती हे बघून डोळे अंमळ पाणावले! :()

(कणेकरांचा लेख तद्दन भंपकपणाचा नमुना आहे. हल्ली ते पूर्वीचे कणेकर नाही राहिले, जाम बाजारु झालेत!)

चतुरंग

कुंदन's picture

20 Dec 2009 - 6:10 pm | कुंदन

>>>>आम्ही पुरुषांसारखे वागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होइल.
डोके दुखीही वाढेल. पर्यायाने अमृतांजन चा खपही वाढेल.

आशिष सुर्वे's picture

20 Dec 2009 - 6:54 pm | आशिष सुर्वे

काय एक एक विषय मिळतात चघळायला!!

-
कोकणी फणस

Nile's picture

20 Dec 2009 - 6:57 pm | Nile

काही भारतीय महिला काही भारतीय पुरुषांसारखे वागायला लागल्या तर काय होईल? <

असले फालतु काथ्याकुट निघणार नाहीत, बाकी खुळे लोक इथुन तिथुन सारखेच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2009 - 7:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>बाकी खुळे लोक इथुन तिथुन सारखेच!
म्हणजे कसे आणि कोण ?

-दिलीप बिरुटे

Nile's picture

20 Dec 2009 - 7:03 pm | Nile

दासबोध आहे का? नसल्यास उपक्रमावर संजोपरावांनी काही उदाहरणे दिली आहेत बघा उमगतंय का. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2009 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>दासबोध आहे का?
नाही.
>>नसल्यास उपक्रमावर संजोपरावांनी काही उदाहरणे दिली आहेत बघा उमगतंय का.

नो-कमेंट्स !

-दिलीप बिरुटे

Nile's picture

20 Dec 2009 - 7:37 pm | Nile

तिकडे तुमच्या नो कमेंट्स असतील तर पुनेरींच्या खवत डोकवा! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Dec 2009 - 10:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

निळ्या, भारी प्रतिसाद रे सगळ्यात पहिले दिला आहेस तो! (इथे उपप्रतिसाद फक्त माझा तिरकसपणा दाखवण्यासाठी!)

अदिती

शाहरुख's picture

20 Dec 2009 - 11:16 pm | शाहरुख

मस्तच रे निळू..

(स्वतःलाच धुवायचे बरेचदा टाळून पाणीबचत करणारा पुरुष) शाहरुख

सुबक ठेंगणी's picture

21 Dec 2009 - 8:14 am | सुबक ठेंगणी

अदितीला आणि पर्यायाने निळ्यालापण.

नंदन's picture

21 Dec 2009 - 9:11 am | नंदन

सुबक ठेंगणी --> अदिती --> निळ्याशी सहमत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

पर्नल नेने मराठे's picture

20 Dec 2009 - 7:09 pm | पर्नल नेने मराठे

दासबोध रामदास स्वामींनी लिहिलाय का? असल्यास ते बोह्ल्यावरुन पळाले होते ना? त्याना काय माहित ह्यातले ;)
उपक्रम काय आहे :-/

चुचु

अमृतांजन's picture

20 Dec 2009 - 7:08 pm | अमृतांजन

आणखी एक उदाहरण- पोरांची शाळेतील हजेरी ७५% च्या खाली येईल. पोरांचे शाळेतील प्रोजेक्ट जमतील का शंका येईल.
कॉलनीतील बातम्या कोणालाच कळणार नाहीत.

पाषाणभेद's picture

20 Dec 2009 - 7:23 pm | पाषाणभेद

स्त्री पुरूषांच्या वागण्यात भारतीय अभारतीय असा भेद करणे गैर आहे. एखादा अनूभव/ घटना केंद्रस्थानी ठेवल्यास जगातले एखाद्या देशाच्या स्त्रीया अमुक असे वागतील त्याच देशाचे पुरूष तमूक असे वागतील अशी अपेक्षा (Prediction) तुम्ही आधीच करू शकत नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेच्या बाबतीत प्रत्येक स्त्री पुरूष अगदी निरनिराळे वागतील कारण मानव स्वभाव भिन्न भिन्न आहे. पिंन्डे पिंन्डे मतर्भिन्नता:

मानवाचेच सोडा समजा एकादे केळं जर तुम्ही माकडाला टाकलं, त्याच माकडाला दगड मारला तर ते काय करेल याचा अंदाज आपण आधीच करू शकत नाही.

राहता राहीला 'मोजे धुण्याचे' उदाहरण. मी तर असेही इरसाल स्त्री पुरूष बघीतले की कित्येक गॅलन पाणी विनाकारण वाया घालवतात. एक स्त्री तर घरी आलेले गॅस चे सिलींडरही धुवत असे. आमच्या घरासमोरचे सगळे कुटूंब सकाळी सकाळी नळ आले की पुढील पोर्च, गाड्या, चपला, गेट, कंपाउंड भिंती सगळे सगळे दररोज पाण्याने अक्षरश: धुतात. त्याचे लांब लांब लोट वाहतात. अगदी तळे साचते पुढील घरांपुढे. ते कुटूंब एका बाबाचे अनूयायी आहेत. सुरूवातीला एकदम धार्मीक, आदर्श म्हणून मला आदर वाटायचा त्यांचा. त्यांची ही पाण्याची हेळसांड पाहून आदर तर राहीलाच नाही. तुम्हाला जीवनात जर चांगले वागता येत नाही तर. कसले हो बाबा अन पंथाचे अनूयायी?

थोडक्यात आपला वाद अनाठायी आहे. राजस्थानातील स्त्रीया पुरूष पाणी एकसमान जपुनच वापरतील. एखादी स्त्री चांगली मॅनेजर होवू शकेल, एखादा पुरूष चांगला सैपाक बनवेल (गणपा हे साक्षी आहेत.)

बिपीन आनंद, सन्जोपरावांशी सहमत.

------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

दररोज अंगणात सडा टाकू नका. पाणी वाचवा.
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

अमोल जाधव's picture

20 Dec 2009 - 8:47 pm | अमोल जाधव

दारु दुप्पट खपेल.

jaypal's picture

20 Dec 2009 - 10:32 pm | jaypal

हा हा हा
अजुन एक कळलाव्या धागा

कळकळीचा जयपाळ
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अमृतांजन's picture

22 Dec 2009 - 7:22 am | अमृतांजन

चित्रमय प्रतिसाद हे नवेच उच्चप्रतिचे प्रमाण तुम्ही निर्माण केले आहे. त्यात तुमचा हात धरणे अवघड आहे....

मॅन्ड्रेक's picture

21 Dec 2009 - 8:48 am | मॅन्ड्रेक

आम्ही आहोत
J- जोरु
k- के
G- गुलाम .

at and post : Xanadu.

अविनाशकुलकर्णी's picture

21 Dec 2009 - 9:48 am | अविनाशकुलकर्णी

कुठले मोजे यावर पण अवलंबुन आहे..
हात मोजे कि पाय मोजे?

JAGOMOHANPYARE's picture

21 Dec 2009 - 12:38 pm | JAGOMOHANPYARE

लई झ्याक होईल. :)

बायकानी पुरुषांशी लग्नं करावीत.
त्याना नांदायला माहेरी न्यावे.
तिथे पुरुषानी जमेल तशी नोकरी करावी आणि आपल्या मर्जीनुसार हवा तसा खर्च करावा.
कर्तव्ये सगळी बायकांच्या हातात असतील. बायकांच्या आईबापांपासून मुलांच्या आणि नवर्‍याच्या जबाबदारीपर्यन्त..

नवर्‍याने मात्र घरात राहून स्वयपाकपाणी करावे. संध्याकाळी दमून आलेल्या बायकोला आपणच घरात बसून कसे दमलो हेही सांगावे... :)

नाहीतरी हल्ली स्त्रीमुक्तीच्या नावानं बायका पुरुषांचा पार राजीव गांधी करून टाकतात... म्हणजे लग्न करतात, पुरुषाच्या गळ्यात हार घालतात आणि त्यातच स्त्रीमुक्तीचा बॉम्बसुद्धा घालून ठेवतात! :) हे रोल उलट होतील इतकेच!!! :)

.. माझ्या 'धानूने' काय ह्ये च्यालेन्ज घेतलेले न्हाई .. :(

***************************
ये मर्द बडे दिल सर्द बडे बेदर्द चलो जी माना
मर्दों का फिर भी गुलाम है जमाना... :)

अमृतांजन's picture

22 Dec 2009 - 7:14 am | अमृतांजन

मस्त खुसखुशीत प्रतिसाद. ह्या "विरंगुळा-मौजमजा" सदरातील धाग्याला असेच अपेक्षित होते....:-)

विनायक प्रभू's picture

21 Dec 2009 - 5:28 pm | विनायक प्रभू

आमची सौ. निपाणी ची असुन सुद्धा तीला भरपुर पाणी लागते.
पाणी कमी असले तर जरा जास्तच राग येतो.
राहता राहीले तीने माझ्या सारखे वागायचे ठरवले तर?
एक क्रिप्टीक झेपेना............ बघा तुम्हीच विचार करा.

अमृतांजन's picture

22 Dec 2009 - 7:17 am | अमृतांजन

>>...निपाणी ची असुन सुद्धा तीला भरपुर पाणी लागते...

घ्या आमचाही एक ज्योक- निपाणीच्या लोकांना हे भक्तीगीत वर्ज्य आहे का?- "प्रभूजी तुम चंदन हम पानी..."

>>....एक क्रिप्टीक झेपेना............ बघा तुम्हीच विचार करा....

नको आहे तेच बरे आहे. :-)